देगलूर: देगलूर विधानसभा मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती या राखीव प्रवर्गातून दोन वेळा निवडून येऊन सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले आणि त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करत असताना, व पोलीस दलाकडून मानवंदना देत असताना त्यांचे तिरंगा लपेटलेले पारथिव हे आदरपूर्वक एखाद्या उंच टेबलावर ठेऊन विधी करणे अपेक्षित असताना ते जमिनीवर खाली मॅट देखील नसताना पूर्ण करण्यात आली तर दुसरीकडे पोलीस दलाकडून मानवंदना देणारे पोलीस कर्मचारी हे मॅटवर उभे राहून मानवंदना देऊन शासकीय इतमाम पूर्ण केल्याने आमदार अंतापूरकर यांच्या तिरंगा लपेटलेल्या पारथिवाची प्रशासनाकडून अवहेलना झाली का असा प्रश्न बिलोली देगलूर मतदार संघातील तमाम चाहत्यांना पडला असून त्याची चौकशी करून जिमेदारी निश्चित करून तातडीने दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा होताना दिसून येत आहे.देगलूर विधानसभा मतदारसंघ या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील राखीव असल्याने 2009 मध्ये आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन आमदार झालेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 2014 च्या निवडणुकीत अल्पशा मतानी पराभव झाला मात्र त्यांनी पराभव स्वीकारून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि त्यांना येथील जनतेने 2019 च्या निवडणुकीत पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले सर्व सामनाचा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती ते मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपून आल्यानंतर आजारी पडले त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले त्यानंतर त्यांना मुंबई येथे नेण्यात आले तेथे त्यांच्यावर कोरण्याचे उपचार करण्यात आले ते कोरोणा निगेटिव्ह झाले मात्र त्यातून त्यांना उद्भवलेल्या इतर आजारामुळे त्यांचे निधन झाले त्यांची कोरोना चाचणी निगेटिव आल्याने त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव देगलूर तालुक्यातील अंतापूर येथे अंतेविधीसाठी आणण्यात आले व शोशल डिस्टन्ससिंग चे नियम पाळून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना पहिल्यांदा पुष्पचक्र अर्पण करून जिल्हाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पित केली व त्यानंतर खासदार आमदारांसह प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींनी पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली व बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडून मानवंदनाही देण्यात आली हा विधी संपन्न होत असताना मात्र त्यांचे तिरंगा लपेटलेले पार्थिव उंच टेबलावर ठेवून आदरपूर्वक होण्याऐवजी तो जमिनीवर खाली साधी म्याटिंग देखील टाकण्यात आली नव्हती मात्र शासकीय इंतमामा पूर्ण करणारे पोलीस हे मॅटवर उभे टाकून श्रद्धांजली अर्पण करत होते तिरंगा लपेटलेले पार्थिव जमिनीवर व श्रद्धांजली देणारे पोलिस मात्र मॅटींगवर हा हलगर्जीपणा कोणाकडून झाला याची चौकशी करून जिम्मेदारी निश्चित करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी मतदार संघातील तमाम जनतेतून दबक्या आवाजातून होताना दिसून येत आहे.
11 April 2021
Home »
» तिरंगा व आमदारच्या पार्थिवाचे प्रशासनाकडून अवहेलना







0 comments:
Post a Comment