जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 May 2024

भोकर येथील विधी तज्ञाच्या गाडीने मोटरसायकल स्वारास उडविले

तालुका प्रतिनिधी 
भोकर- येथील जिल्हा शस्त्र न्यायालयातील विधी तज्ञाच्या गाडीने एका निष्पाप मोटरसायकल स्वारास उडविण्याची ह्रदयद्रावक घटना दिनांक 25 मे रोजी सकाळी 11वाजता किनवट रोडवरील पेट्रोल पंपा जवळ घडली असून यात एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की कंचली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील सोनाबाई अजय जाधव वय 26 ही आपल्या माहेरी बेलगाव कुबेर येथून उदल सुभाष जाधव या नातेवाईकासोबत भोकर येथे दुचाकी वर येत होती भोकर किनवट महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ येताच मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक एम एच 26 ए के 51 89 या गाडीने जोरदार धडक दिली. यादरम्यान अपघातात मोटार सायकल स्वारासह पाठीमागे बसलेली महिला उडून खाली आढळल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिकाकडून सांगण्यात आले अवध्या काही क्षणात परिसरातील नागरिकांनी सदर महिलेस दुचाकी स्वारास भोकर येथील शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले सदर महिलेस जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने तेथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

यावर्षीही विमल इंग्लिश स्कूल ने मारली बाजी

तालुका प्रतिनिधी 
भोकर -या परीक्षेत कृष्णा सुनिल फेंडर 97.60 टक्के गुण घेवून शाळेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. व तसेच व्यंकटेश संतोष पोलशेटवार 97.20 टक्के गुण घेवून सर्वद्वितिय येण्याचा बहुमान पटकावला आहे.
 शंतनू संतोषकुमार शेळके 96.20 टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. 
तर शालमली दंडे 94.80 टक्के, आदित्य बुट्टनवाड 94 टक्के, श्रीया असावा 94 टक्के, रिषीका लोकावाड 93.80 टक्के, प्राची सादुलवार 93.40 टक्के, वैष्णवी लिंगमपल्ली 90.80 टक्के, गणराज गुज्जेवाड 90.60 टक्के, हसीनी बंदकुलुवाड 89.60 टक्के, गणराज शेट्टे 89 टक्के, दिनेश ढगे 88.60 टक्के, आयशा खाजा 88 टक्के, राजेश बच्चुवार 87.80 टक्के, साईविक्र आलेवाड 87.20 टक्के, प्रविण गाणलावाड 86.60 टक्के,साईनाथ बोलेवार 84.80 टक्के, प्रतीक देष्टेवाड 83.60 टक्के, गोविंद डुब्बेवार 82.40 टक्के, ओम पिंगलवाड 82 टक्के, सुमीत पोलावार 80.80 टक्के, अमेय गुंडले 74.20 टक्के, अरवा खाजा 74 टक्के, शुभम मंदलवाड 73.60 टक्के, शिफा बेगम 78 टक्के, गीतेष पांचाळ 69.20 टक्के, साबा अब्दुल 60 टक्के या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राम जाधव, सचिव ईश्वर जाधव, संचालिका डॉ. रंजू जाधव, मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले आहे.

23 May 2024

भोकर मध्ये खुलेआम अवैध मिलावटी सिंधी विक्री

तालुका प्रतिनिधी -
भोकर -शहराच्या बाजूला असलेला तेलंगाना सीमा अगदी काही किलोमीटर असताना तेथून काही सिंधी माफिया सिंधी आणून भोकर शहरांमध्ये अवैध रीतीने सिंधी विक्री करताना आढळून आले आहे, व तसेच काही जागी सिंधी च्या नावाखाली मिलावटी सिंधी स्वतः घरी बनवून त्यात केमिकल मिसळून विक्री करत आहे   मागील काही  महिन्याखाली बरेच तरुण सिंधीच्या चपेट मध्ये आले आहेत, ही सिंधी जीवाला धोकादायक अशी ठरली आहे. परंतु अशा सिंधी माफियांवर प्रशासन कठोर पाऊल कधी उचलणार हे कळालेला नाही. भोकर शहरात बरेच ठीक ठिकाणी अवैध रीतीने नशेली सिंधी विक्री जोराने चालू आहे. यांच्यावर कठोर कारवाई कधी होईल असे जनतेचा प्रश्न आहे. तरुण पिढी या सिंधीच्या आधीन झाले आहेत व त्यांना लत लागली आहे यावर त्यांचा घर सुद्धा उद्धवस्त होताना दिसून येत आहे.

20 May 2024

पद्मजा मोटर्स टाटा मोटर्स नांदेड यांच्याकडून कस्टमर गेट-टुगेदर आयोजित

भोकर- पद्मजा मोटर्स टाटा मोटर्स नांदेड यांच्याकडून कस्टमर गेट-टुगेदर भोकर येथे आयोजित करण्यात आले ,यात पद्मजा चे सर्व कर्मचारी ग्राहक व तसेच फायनान्शियल कंपनीचे ऑफिसर तालुक्यातील व्यापारी ,कर्मचारी उपस्थित होते. 
कस्टमर गेट-टुगेदर हे भोकर येथील संगम मंगल कार्यालय रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे आयोजित करण्यात आली. पद्मजा चे प्रमुख गुरमीत सिंग यांनी नागरिकांना व आलेल्या सर्व ग्राहकांना मार्गदर्शन केले गाडी विषयी कंपनी विषयी विविध प्रकारची माहिती त्यांनी सांगितली इलेक्ट्रिक गाडीचे फायदे व मायलेज येणाऱ्या भविष्यामध्ये इलेक्ट्रिक गाडीचा किती फायदा होणार हे देखील गुर्मीत सिंग यांनी सांगितले व तसेच नवीन लॉन्च झालेले टाटा मोटर्सचे गाडीचे प्रदर्शन येथे करण्यात आले . व तसेच आकाश राठोड यांनी सुद्धा नागरिकांना मार्गदर्शन केले माहिती सांगितली आणि हा कार्यक्रम संपताच आलेल्या सर्व कस्टमर व्यापारी कर्मचारी यांच्यासाठी टाटा मोटर्स पद्मजा कडून भव्य असा भोजन देखील आयोजित करण्यात आले.

19 May 2024

भोकर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक PSI जाधव यांचा सत्कार

भोकर पोलीस स्टेशन येथे नव्याने रजू झालेले पोलीस उपनिरीक्षक PSI जाधव साहेब यांचा आज डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राम नाईक यांच्या जीवन ज्योत हॉस्पिटल येथे PSI जाधव साहेबांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्कार करताना डॉक्टर राम नाईक ,ईश्वर जाधव, लखन जाधव, भोकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लहू राठोड, पत्रकार विशाल भाऊ जाधव, पत्रकार अंबादास बोयावर ,प्रभाकर राठोड उपस्थित होते.

सुमेध सर' क्लासेसचे विद्यार्थी सीबीएसई दहावी परिक्षेत टॉपर

भोकर(प्रतिनिधी)
 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे घेतलेल्‍या इयत्ता दहावीच्‍या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शहरातील गुणवत्तेत अग्रणी आसलेल्या सुमेध सर'स क्लासेसच्या 
 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे असून गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव होत आहे.
भोकर शहरात विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तेसाठी धडपडणारी एकमेव खाजगी शिकवणी संस्था म्हणून सुमेध सर'स क्लासेसचे नाव लौकीक आहे. सुमेध सर'स क्लासेसचे संचालक सुमेध हनवते, प्राध्यापिका प्रणिता जाधव, यांच्या समर्पित प्रयत्नामुळे दहावी, बारावी, तासेच शिष्यवृत्ती नवोदय परिक्षेत घवघवीत यश मिळवत आहेत. या क्लासमध्ये विद्यार्थ्याना वैयक्तिक लक्ष दिल्या जाते आणि वेळोवेळी तज्ञांकडून विषयानुरूप मार्गदर्शन केले जाते हे जमेची बाजू आहे.याचाच परीणाम नुकतेच घोषित करण्यात आलेल्या सन २०२४ च्या दहावी (सीबीएसई) परिक्षेत 
 रेहान अल्लाउद्दीन शेख 89.6% मुदखेडच्या केंद्रीय शाळेत पहिल्या क्रमांकावर आला आहे तर अभिषेक जळबा सरोदे या विद्यार्थ्याने 76% गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे .
.केंद्रीय पद्धतीत शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणून सुमेध सरस क्लासेसचे नाव समोर येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, या क्लासेसचे कर्मचारी सुमित गणेशराव हनमंते, प्रशांत गणेशराव हनमंते,श्रद्धा सतीश जाधव आदीसह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील आनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय अधिवेशन गणराज हॉटेल नांदेड येथे संपन्न

नांदेड () - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथील गणराज पॅलेस हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आले होते.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील ,तालुक्यातील व तसेच ग्रामीण भागातील हजारो पत्रकार या कार्यक्रमात उपस्थित झाले होते. महाराष्ट्र अध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर , मराठवाडा सचिव उत्तम बाबळे , महाराष्ट्र सचिव, जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे,,प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व तसेच सदस्यांसह सर्व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातिल पदाधिकारी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 


 संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ विजय जी सूर्यवंशी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकर येथील मराठवाडा सचिव उत्तमरावजी बाबळे ,तालुका अध्यक्ष आर के कदम,तालुका सचिव गंगाधर पडोळे,कोषाध्यक्ष विशाल जाधव,सदस्य साईनाथ बंडोड यांच्यासह आदिजण बहुसंख्येने उपस्थित होते. पत्रकारांवर होणारे हमले पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार विमा योजना,पत्रकार सुरक्षा योजना असे अनेक योजना बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ विजय जी सूर्यवंशी यांचा सत्कार तालुका राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्याकडून सत्कार करण्यात आला.


15 May 2024

पोटा तांडा येथे पारंपरिक पद्धतीने दसरा सन साजरा

तालुका प्रतिनिधी 
भोकर-
बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने काल मंगळवार रोजी प्रत्येक तांडा मध्ये व घरोघरी दसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच पोटा तांडा येथे देखिल हा कार्यक्रम साजरा करण्यात आला..... 

हे कार्यक्रम असे की..... 
कुळ दैवतेसाठी वर्षानुवर्ष चलत आलेली पारंपारिक पद्धत बळी परंपरा अंतर्गत बकऱ्याची बळी देत असून. बंजारा समाजामध्ये हा अतिशय उत्साह मध्ये व आपल्या सर्व सोयरे- धायऱ्यांना आतुरतेने बोलावून हा सण हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. 
ही परंपरा अतिशय आजही बंजारा समाजामध्ये चालत आलेली आहे. 
बकऱ्याचा मटण, रस्सा, सलोई नाराजा असे अनेक खाद्य जेवण या दिवशी बनवण्यात येते, 
मुलगी जावई ,मामा मामी, आजी-आजोबा ,नानी नाना, काका काकू ,आत्या सर्व नातलगांना आवर्जून सर्वांना कार्यक्रमात सहभाग करून या कार्यक्रमाचा आनंद घेण्यात येतो, म्हणजे असे की अशा कार्यक्रमांमध्येच सर्वजण एकत्र एका जागी जमून आचार विचार घेताना दिसून येतात.....

सामाजिक चळवळी मध्ये सदैव तत्पर असणारे . परमेश्वर कांबळे भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

भोकर. सामाजिक चळवळीमध्ये सदैव पुढे असणारे मित्र परिवारामध्ये हसत खेळत राहणारे व तसेच कष्टातून आपल्या समाजात व मित्र परिवारात एक नवीन ओळख निर्माण करून स्वाभिमानाने समाजात जगणारे,
वेळप्रसंगी मित्रपरिवारासाठी अर्ध्या रात्री धावून येणारे आदरणीय आमचे मित्र परमेश्वर विश्वनाथ कांबळे( स्वमान फायनान्शिअल सर्विस प्रा. ली. जिंतूर ब्रांच मॅनेजर ) यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

14 May 2024

विजयमाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन- भोकर

भोकर- शहरांमध्ये विजयमाला मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांचे उद्घाटन आज करण्यात आले.विजयमाला हॉस्पिटल (किनवट रोड भोकर) डॉक्टर आकाश राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातील कोषाध्यक्ष विशाल भाऊ जाधव उपस्थित होते, व तसेच उद्घाटन सोहळ्यामध्ये भोकर तालुक्यातील नामवंत लोकांनी डॉक्टर आकाश राठोड (एमडी जनरल फिजिक व सर्जन) यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते. 
भोकर शहरात नव्याने सुरू होत असलेल्या या दवाखाना आज पासून जनतेसाठी सुरू करण्यात आली आहे.

भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

भोकर-
(तालुका प्रतिनिधी ) 12 मे रोजी दुपारी दोन वाजल्यापासून हवामानाचा बदल दिसून आल्यानंतर वादळे वारे सुरू झाले.आणि विजाच्या कड कडाटासह पावसाला सुरुवात झाली चाळीस मिनिट पावसाचा धारा कोसळल्या शेतामध्ये पाणी वाहू लागले शेतामधील पिकाचे देखील नुकसान झाले .शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून थांबावे लागले वादळी वाऱ्यामुळे शेतातील सामानाचे नुकसान झाले .पावसाच्या धारा कोसळल्याने उकाड्या पासून थोडा बहुत दिलासा मिळाला अचानक वादळी वारे आणि पाऊस झाल्याने नागरिक मात्र हैराण झाले होते तर शहर व तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळत असतानाच उखाड्याचा सामना लागला.

12 May 2024

शेतात असलेल्या गाईवर वीज कोसळली

भोकर -तालुक्यातील मौजे रेणापुर येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतात बांधलेल्या गायीवर विज कोसळली, अन् यात गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.दि.१२ मे रोज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला यातच विजेचा कडकडाट होऊन मौजे रेणापुर येथील शेतकरी आबाजी शिवाजी कोळेकर यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली अन् गाय जागीच मरण पावली आहे.

11 May 2024

टायर फुटल्यामुळे क्रुझर गाडीचा अपघात

 (प्रतिनिधी)- 
टायर फुटल्याने भरधाव क्रूझर जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोघांना जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास येळी- महाटीच्या पुलावर घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये जीपचालक आणखी एका युवकाचा समावेश आहे.ही क्रूझर जीप शिखाचीवाडी (ता. मुदखेड) येथील असून, शिखाचीवाडी येथील जीपचालक आणि येळी (ता. लोहा) येथील युवक चिलपिंपरी येथे बोळवण सोडून शुक्रवारी सायंकाळी येळीकडे निघाले होते. भरधाव वेगातील ही क्रूझर जीप येळी-महाटीच्या पुलावर आली असता अचानक टायर फुटले आणि जीप क्रमांक mh26 bq 2061 पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. यात थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे (25)रा.येळी ,उद्धव आनंदराव खानसोले (30)रा.शिकाची वाडी यांचा मृत्यू झाल्याच्या समजते.

या घटनेचे वृत्त समजताच नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जीपचालक आणि त्याच्यासोबतच्या युवकाचा मृत्यू झाला. तसेच क्रूझर जीपचेही नुकसान झाले. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

09 May 2024

सोनारी गावातील युवा शेतकऱ्याने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या..

भोकर- 
(प्रतिनिधि ) 
 तालुक्यातील सोनारी गावातील अल्पभुधारक युवा शेतकरी अनिल लक्ष्मण तोडे ,वय 25 वर्ष यांनी सतत होणारी नापिकी तर कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टी मुळे होणारे नुकसान यातच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत असता त्यातच झालेलं सावकारी कर्ज राष्ट्रीयकृत बँक कडुन घेतलेल कर्ज फेडण्यासाठी अहोरात्र मेहनत करून सुद्धा कर्जाची परतफेड होत नाही, मग अश्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे अश्या मानसिक तणावाखाली येऊन दि 25/04/2024/ रोजी आपल्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले असता त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात नांदेड येथे उपचार चालू असताना त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांचा पश्चात दोन भाऊ व वयस्कर आई वडील असा परीवार आहे ,

भोकर शहरात आज अचानक पावसाला सुरुवात

भोकर:ता. प्र) मे महिना म्हटल्यावर उष्णतेचा कडकडाट नागरिक झाले त्रस्त घराबाहेर पडणे झाले कठीण आणि तसेच लग्नसराईचा हा महिना अनेक दिवसापासून उष्णतेचा पारा हे वारंवार वाढत चालला होता यामुळे नागरिकांना उष्णते सोबत चांगलीच कसरत करावी लागत होती आणि आज अचानक वार गुरुवार रोजी दुपारी वातावरणामध्ये बदल पडला असून ढगाळ वातावरणामध्ये होत असलेल्या गर्मीमुळे अचानक धुवाधार पावसाला सुरुवात झाली कुठेतरी पाण्यामुळे वातावरणामध्ये थंड निर्माण झाल्यामुळे नागरिकांना आनंद होत आहे पावसामुळे सर्वत्र वातावरणामध्ये थंड निर्माण झाला तसेच उन्हाचा व गर्मीचा काही काळासाठी दुरावा निर्माण झाला आहे,