जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 April 2020

नांदेडच्या त्या कोरोना निगेटीव्ह झालेल्या इसमाचा मृत्यू

उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांची माहिती
 नांदेड दि 30 |  जिल्ह्यात पहिला कोरोनबाधित रुग्ण म्हणून नोंद झालेल्या त्या 64 वर्षीय इसमाचा गुरुवार दि. 30 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, असून चार दिवसांपूर्वी या इसमाचे कोरोना संसर्गाचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मृत्यूच्या बातमीस प्रशासनाने दुजोरा दिला आहे.शहरातील पीरबुर्‍हाण नगर भागात राहणार्‍या एका 64 वर्षीस इसमास दि. 22 एप्रिल रोजी कोरोनाचे लक्षण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. प्रशासनाने पीरबुर्‍हाण भागास सील करून तपासणी मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आले होते.मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वी या रुग्णाचे दुसरा अहवाल निगेटीव्हा आला होता. परंतु उपचार सुरुच होत. तिसरा अहवाल 5 ते 6 मे रोजी येणार होता. परंतु त्यापूर्वीच त्या इसमाचा मृत्यू झाला आहे. या वृत्तास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व डॉ. राजेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन असून पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला, असून दोन रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये सेलू येथील एका महिलेचा समावेश आहे. तर एक रुग्ण अबचल नगर येथील आहे.

29 April 2020

सेलूवरून उपचाराला आलेली ती महिला कोरोनाबाधित

नांदेड ः- सेलू येथून उपचारासाठी असलेली महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीनवर पोहचली आहे.परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राहणार्‍या एक साठ वर्षीय महिला आजाराने त्रस्त आल्याने तिच्यावर काही दिवस औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सेलू येथे आल्यानंतर त्या महिलेस सेलू येथून नांदेड येथे दि. 28 रोजी रेफर करण्यात आले होते. ती महिला नांदेड येथे उपचारास येण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन आली होती. उपचार सुरु असताना या महिलेचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.या महिलेचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यानंतर नांदेडच्या प्रशासनाने परभणी प्रशासनाला माहिती देण्यात आली, त्यानुसार संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी खबदारीची उपाययोजना म्हणून सेलू या शहरात तीन दिवस कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाबीशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

28 April 2020

कोरोनाचा एक संशयित रुग्ण निगेटिव्ह ; नांदेड जिल्ह्यासाठी दिलासादायक परिस्थिती

 नांदेड दि . 28 : - जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती . त्यापैकी नांदेड पिरबु - हाणनगर येथील व्यक्तीचा सहा दिवसाच्या उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे जिल्ह्यासाठी ही दिलासादायक परिस्थिती असन आतापर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 985 एवढी आहे . यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 285 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 81 नागरिक आहेत . यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 108 नागरिक आहेत तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 877 अशी संख्या आहे . तपासणीसाठी एकुण 799 नागरिकांचे नमुने घेण्यात आली होती त्यापैकी 729 नमुने निगेटीव्ह आली आहेत तर 62 नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे . तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत . नांदेड जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 82 हजार 271 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत , अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे . 

लॉकडाऊनमुळे लग्नसोहळे लांबणीवर बॅन्डंवाल्याना मोठा फटका

देगलुर : लॉकडाऊनमुळे लग्नसोहळे लांबणीवर पडल्याने बॅन्डंवाल्याना मोठा फटका बसला आहे .  कोरोना ने बॅन्डं वाजविणार्याचाच बॅन्डं वाजविल्याचे म्हणत कर्ज काढुन मजुरांना दिलेले अॅडव्हान्स व बॅन्डं उभारणीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न बॅन्डं मालकांकडून विचारला जात आहे . जगात कोरोना ने थैमान घातले आहे . त्यामुळे उद्योगची दररोज फीरणारे चाके बंद पडली आहेत . तर व्यवसायाचे ही शटर बंद झाले आहेत . त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या रोजगारावर उपासमारिची वेळ आली आहे . तीच गत सध्या बॅन्डंचालकांची आणि त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांची झाली आहे . बॅन्डंवाले झाले हतबल कोरोना मुळे गर्दि टाळण्यासाठी 22 मार्चपासून लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतले होते . त्यामुळे बॅन्डंवाल्याना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे . बॅन्डंचे खर्या अर्थाने एप्रिल व मे महिना हे सिझन असते . या कालावधीतच जास्त लग्न होत असतात . मात्र या सिझन च्या वेळेतच लॉकडाऊन आल्याने ते हतबल झाले आहे . पुढे ही लॉकडाऊन उठवण्याचे अजुन संकेत दिसत नाही . तर लॉकडाऊन उठला तरी लग्नसोहळ्याना परवानगी मिळण्याची शक्यता नाही . त्यामुळे बॅन्डंवाल्याचा व्यवसाय चौपट झाल्याचे चित्र आहे. त्यांना राज्यभरातुन मागणी आहे . बॅन्डं कलाकार संघटनेच्या नुसार देगलुर मध्ये लहान मोठे मोठ्या प्रमाणात बॅन्ड कार्यरत आहेत . लग्नात बॅन्डंवाल्याची तीस हजारापासून ते दिड लाखापर्यंत सुपारी असते . एका बॅन्डंपार्टीत साधारपणे 15 ते 35 कलाकार काम काम करतात . बॅन्डंचालक आर्थिक विवंचनेत लग्नाच्या घेतलेल्या तारखा रद्द झाल्याने बॅन्डंचालकांचे मोठे नुकसान झाले आहे . सिझन सुरू होण्याअगोदर वाद्य वाजविणार्या काही महत्वाच्या कलाकारांशी करार करून त्यांना अडव्हान्सं दिला जातो . तर बाजारात संगीताचे नवनविन तंत्रज्ञान पुढे येत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी ते खरेदि करावे लागते . अनेकांनी कर्ज काढुन बॅन्डं उभा केला आहे . त्यामुळे बॅन्डंचे कर्ज कसे फेडायचे ? असा प्रश्न बॅन्डंचालकांसमोर उभा राहीला आहे . त्यासाठी शासनाने  विचार करून पुन्हा उभे राहण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी बॅन्डंचालकाकडुन केली जात आहे . मंगलकार्यालय ही पडले ओस एप्रिल - मे महिन्यात मंगलकार्य फुल्ल असतात . मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्नसराईने कायम फुल्ल असणारे मंगलकार्यालय ओस पडली असल्याचे चित्र आहे . कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दि करता येणार नाही . त्यामुळे गर्दीच्या लग्नसोहळ्यावर बंदि घालण्यात आली आहे . यामुळे एप्रिल - मे महिन्यात लग्नासाठी करण्यात आलेले बँकिंग रद्द करण्यात आले आहेत . त्यामुळे राज्यातील हजारो मंगलकार्यचालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे . त्यानुशंगाने केटअर्स आदिंच्याही रोजगाराव कुर्हाड पडली आहे . कर्ज काढून बॅन्डं उभा केला आहे . वर्षाच्या सुरवातीला काही कलाकरांशी करार करून अडव्हान्सं रक्कम ही दिली आहे . मात्र लॉकडाऊन मुळे एप्रिल व मे मधे घेतलेल्या आर्डर रद्द झाल्या आहेत . त्यामुळे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न माझ्यासमोर आहे . यासाठी शासनाने बॅन्डंवाल्याना मदत देणे आवश्यक आहे .

माझ्या एप्रिल व मे मधील लग्नाच्या तारखा बुक होत्या . मात्र लॉकडाऊन मुळे त्या रद्द करण्यात आल्या . त्यामुळे पुढच्या वर्षी बॅन्डं कसा चालवायचा असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहीला आहे . शासनाने आम्हाला मदत करावी व शासनाने आमच्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करावा . -  - आणतेश्वर घाटे राम कृष्ण हरी बॅन्डंमालक देगलुर

27 April 2020

कोरोना विषाणु संदर्भात सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 15 संशयितांची नोंद..

 नांदेड , दि . 27 : - कोरोना विषाणु संदर्भात आज सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 15 संशयितांची नोंद झाली आहे . यापैकी घेण्यात आलेले स्वब एकुण 737 आहेत , त्यापैकी 677 निगेटिव्ह असून 53 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत . आतापर्यंत एकूण 5 स्वब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वॅब 737 असून त्यापैकी 2 रुग्णांचा स्वब पॉझीटिव्ह आढळला आहे . हे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहेत . नांदेड शहरातील पिरबुहाणनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला आहे . या रुग्णास मधुमेह , उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे . या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे . तसेच त्याचा निकटवर्तीय संपर्कातील 16 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत . त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत . जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . 

अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील

नांदेड:- कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नांदेड शहरात अबचलनगर भागातील 44 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल रविवार दि. 26 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्हणून सील करण्यात आला आहे.या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयितांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत.जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे आणि अत्यंत आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

कोरोना च्या जनजागृतीसाठी पोस्टर चे प्रदर्शन अल ईम्रान प्रतिष्ठाण चा सामाजिक संदेश

बिलोली:कोरोना विषाणूचा संकट आज संपूर्ण भारतावर आलेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्दपातळीवर उत्कृष्ट काम करित आहे.सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील अल ईम्रान प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना वर आधारित  पोस्टर चे अनावरण  बिलोली चे उपविभागिय पोलीस अधिकारी डाँ.सिध्देश्वर धुमाळ यांच्या हस्ते दि.२५ एप्रिल शनिवारी करण्यात आले.
◼गेल्या अनेक वर्षापासून अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली ही संस्था वृक्षारोपण,कला,क्रिडा,सांस्कृती,व्यसनमुक्ती,स्वच्छता,भ्रुण हत्या,एडस जनजागृती,कुष्ठरोग,क्षयरोग आदि राष्ट्रीय कार्यक्रम निस्वार्थ करित आहे.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एंवम क्रिडा मंञालयाचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले.
◼या पोस्टर चे अनावरण प्रसंगी अल ईम्रान प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा वार्ताहर  प्रा.मोहसीन खान,वार्ताहर शिवराज रायलवाड माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांच्यासह उपविभागिय पोलीस कार्यालयाचे ए.पी.आय तायवाडे पी.आर.,सिध्दापूरे ए.बी.,वाघमारे जी.बी.,कर्णे के.जी.,स्वामी एस.एम,शेख.मौलाभई आदि पोलीस कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.आज घडीला कोरोना विषाणू हा कश्या प्रकारे मानवजातीवर हल्ला करित आहे.व त्या पासून आपला व आपल्या कुंटुबियाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे अशी जनजागृती पोस्टर च्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पंजाब सरकारने पाठविलेल्या ऐंशी टॅ्रव्हल्स नांदेडमध्ये दाखल

नांदेड:– दीड महिन्यांपूर्वी नांदेड येथील संचखंड गुरुव्दारा येथे दर्शनासाठी आलेल्या पंजाब, हरीयाणा व दिल्ली येथील भाविकांना लॉकडाऊनमुळे अडकून पडावे लागले होते. यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली, असून ऐंशी टॅ्रव्हल्स नांदेडमध्ये सोमवार दि.27 रोजी नांदेड येथे दाखल झाल्या आहेत. जवळपास अडीच हजार यात्रेकरू नांदेड येथून पंजाबकडे सायंकाळी रवाना होणार आहेत.कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंघ घालण्यात आले आहत. त्यामुळे जवळपास तीन ते साडे तीन हजार यात्रेकरू नांदेड येथील गुरुव्दारा येथे दीड महिन्यांपासून अडकून पडले होते. या यात्रेकरूंना पंजाब येथे जाता यावे, यासाठी महाराष्ट्र व पंजाब सरकारने समन्वय साधत या यात्रेकरूंना गावी जाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मागच्या दोन दिवसांमध्ये 25 टॅ्रव्हल्समध्ये 900 यात्रेकरू पंजाबच्या दिशेने जाऊ शकले.उर्वरीत सर्व यात्रेकरूंना त्यांच्या मुळ गावी घेऊन जाता यावे, यासाठी पंजाब सरकारने खास ऐंशी गाडयांची व्यवस्था केली आहे. या सर्व गाडया नांदेड येथे सोमवारी सकाळी दाखल झाल्या आहेत. प्रत्येकी एका गाडीसोबत तीन ड्रायव्हर असून सर्व गाडयांवर दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पंजाब सरकारने सोबत दिले आहेत.संतबाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या कृपा आशिर्वादने नांदेडमध्ये अडकून पडलेल्या यात्रेकंरूसाठी जाण्याची व्यवस्था झाली असल्याची माहिती पत्रकार तथा नानकसाई फांऊडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी दिली

अन्नधान्य वाटपासाठी बडूरच्या रणरागीणी सरसावल्या

बिलोली:गेल्या अनेक दिवसा पासून देशात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैयमान घातला असल्याने शासणास देशात १४४ कलम लागू करुन लॉक डावून करावा लागला. या धोरणावर गोरगरीब माणूस उपाशपोटी राहू नये. यासाठी बिलोली तालुक्यातील बडूर येथिल मावली महिला ग्रामसंघ व पचायत समिती बिलोली यांच्या संयुक्तपणे व्हीआरएफ यांच्या मधून दहा टक्के निधीचा वापर करुन येथिल अनाथ ,अपंग, मतिमंद परितक्त्या व कुपोषीत बालक अशा गरजू लोकानां एक किट तयार करुन त्यामध्ये तांदूळ, दाळ, साखर, चहापती, गोडतेल, मिरची पावडर यासोबत हात धुण्यासाठी साबण व मास अशा वस्तू गरजू लोकानां आ. अंतापूरकर, येथिल सरपंच मनोहर गुजरवाड, तुकेश कुंभार प.स. बिलोली  उपसरपंच प्रतिनिधी प्रकाश पाटील जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण देशपटवाड, सौ. सुनंदा राजगणेश दावलेकर (बँक सखी), सौ. चंद्रकला सायबु भंडारे (सीआरपी) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथिल सर्व महिला बचत गटानी सहकार्य केले.

लॉकडाऊनमुळे बांधकामे थांबली ; रोजगारा अभावी गवंडी (मिस्त्री) , मजुरांचे हाल

बिलोली:संसर्गजन्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर ठोस उपाययोजना केल्या जात असून , ३ मे पर्यंत संपूर्ण देशात ' लॉकडाऊन ' घोषित करण्यात आला आहे . जागतिक आपती म्हणून घोषित झालेल्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने देशात शिरकाव केला . या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून केंद्र व राज्य शासनाने ' लॉकडाऊन सह संचारबंदी लागू केली . त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवसायांवर झाला आहे . ' लॉकडाऊन ' मुळे गवंडी(मिस्त्री) , बांधकाम मजूरांचे मोठे हाल होत असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपास मारीची वेळ आली आहे . कोरोनाच्या आपत्तीचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून शहरासह तालुक्यातील सुरु असलेल्या बांधकाम इमारतींची कामे थांबली आहेत . बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र समोर आले आहे . सद्य : स्थितीत बांधकामाच्या सर्व , व्यवहार , साईटस बंद असून बांधकामा अभावी ओस पडले आहेत . बांधकाम व्यवसायाशी निगडित मजूर वर्गाला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे .बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे . मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर बांधकामे थांबली आहेत . मध्यंतरी वाळूसह अन्य साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकामांचा वेग मंदावला आहे . लॉकडाऊनमुळे तर आता चक्काजाम झाला आहे . बांधकामासाठी लागणारे मटेरियल वाहतूक , प्लंबिंग , रंगकाम , इलेक्ट्रीक फिटिंग , फर्नीचर , सेंटिंग काम करणारे कारागीर , खड्डे खोदकाम करणारे मजूर बांधकाम व्यवसायावर आपले पोट भरतात . कामेच ठप्प झाल्याने मजुरा समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे . बांधकाम व्यावसायिकांचे भांडवलही मोठ्या प्रमाणात अडकले आहे . सुरू असलेल्या घरांच्या कामाचे सर्वच साईटस बंद पडले आहेत . दरवर्षी बांधकाम व्यावसायिक गुढीपाडव्याला नव्या साईटसचा शुभारंभ करतात . यंदाचे वर्ष याला अपवाद ठरले आहे . बांधकाम क्षेत्राची स्थिती अतिशय केविलवाणी झाल्याचे चित्र दिसून येत आहे , मजूरदार वर्ग फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याचे दिसून येते .
                                   ... प्रतिनिधी:शुभम निदाने

26 April 2020

नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रूग्ण

नांदेड | नांदेडकरांनो शहरात दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे . आता सर्व शहर वासियांनी जास्त दक्षता घेत लॉकडाऊन १०० टक्के पाळण्याची गरज आहे . एकूणच दुसरा रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे . प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्या नेतृत्वात अत्यंत तातडीची बैठक बोलावली असून या नवीन कोराना रुग्णासंदर्भाने काय काय उपाय योजना करण्याची गरज आहे . त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन सुरू आहे .काही दिवसांपुर्वी एक चार चाकी गाडी चालक प्रवाशांना घेवून तीन राज्यांचा प्रवास करून त्यांना सोडून आला होता . त्यानंतर पुन्हा एकदा असेच घडले आणि तो पुन्हा एकदा तीन राज्य पार करून जाऊन आला . दुसऱ्यावेळेस परत आला तेंव्हा नांदेड पोलीस प्रशासनाने त्याला सिमेवरूनच क्वॉरंटाईन केले आणि त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले . आज आलेल्या स्वब नमुना अहवालामध्ये त्या चालकाचा स्वब पॉझिटीव्ह आला आहे . त्यामुळे त्याला क्वॉरंटाईन कक्षातून काढून शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठविण्यात आले आहे . स्वब नमुन्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने एक बैठक बोलावली आहे . ही बैठक रात्री ९ वाजता सुरू झाली . या संदर्भाने हा चालक शहरात आल्यानंतर कोणा - कोणाला भेटला आणि काय - काय त्याचा संपर्क इतरांशी आला याचा शोध होईल . सोबतच आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोविड - १९ नियमावली नुसार ज्या भागातला हा व्यक्ती आहे त्या भागाला नियमाप्रमाणे तीन किलो मिटरच्यावर्तुळ परिसरात कंटेनमेंट झोन निर्धारीत करावा लागेल . त्या भागातील कोणीही व्यक्ती बाहेर जावू शकणार नाही आणि बाहेरचा व्यक्ती आत येवू शकणार नाही असाच एक अनुभव नांदेडकरांना कांही दिवसांपुर्वी आला होता . त्यानुसार त्या भागात सध्या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यंत कडक शिस्तीत जाण्या - येण्याचा प्रबंध करण्यात येणार आहे .प्रशासन आपल्यावतीने मागील एक महिन्यापासून भरपूर मेहनत घेत आहे . पण जनतेची सुध्दा या संदर्भाने मोठी जबाबदारी आहे . ज्या भागातील हा कोरोना रुग्ण आहे . त्या भागात आता सर्वांची तपासणी होईल या आरोग्य तपासणीला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे . तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येईल नसता हा प्रकार असाच सुरू राहिल . आजपर्यंत आम्ही आनंदी होतोत . पण आता आमचा आनंदात विरजण पडले आहे . चार दिवसांपुर्वी सापडलेल्या कोरोना रुग्णाची आता संख्या दुसरा रुग्ण सापडल्यानंतर दुहेरी झाली आहे . या परिस्थितीत सुध्दा सर्वानी संयम राखून प्रशासनाच्या सुचनांना आपल्या प्रत्यक्ष अंमलात आणले तरच कोरोनाची झालेली दुहेरी वाढ पुढे रोखण्यात आम्ही यशस्वी होणार आहोत . नाहीतर येणाऱ्या आपत्तीपासून कोणीही रोखू शकणार नाही . दुसरा कोरोना रुग्ण छोटयाशा फायद्यासाठी दोनदा बाहेर जावून आला आणि आपल्यासोबत कोरोना घेवून आला . कालपासूनच रमजान महिन्याची सुरूवात झाली आहे या काळात सुध्दा छोट्यात छोट्या कार्यक्रमात सुध्दा सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज आहे . पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रमजान महिन्यातील कार्यक्रम सर्वांनी घरीच पाळलेले आहेत . असाच प्रतिसाद सर्वांनी देण्याची गरज आहे . कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनातील व्यक्ती झटत आहेत . पण त्यांच्या या झटण्याला खरे यश आपण दिलेल्या प्रतिसादानंतर येईल . आपण प्रतिसाद नाही दिला तो सुध्दा सोशल डिस्टंसिंग , घरात राहाणे , वारंवार हात धुणे याबाबींना तर नक्कीच कोठे तरी आमच्या शहरात आणि जिल्ह्यात एक मोठे संकट आकार घेणार आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही .

महात्मा बसवेश्वर जयंती सहशिक्षक श्री पाटिल सर यांनी घरीच केले साजरी

बिलोली | शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा . मनोहरजी धोंडे सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  अक्षय तृतीया " रविवार दि . 26 एप्रिल 2020 रोजी सकाळी ठिक 10 वाजता , वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक क्रांतीसुर्य , जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती  दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते . याही वर्षी ही जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन सुरू असतानाच कोरोना या भयानक व्हायरस ने डोके वर काढले आहे . भारतातही त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे . त्याचाच परिणाम म्हणून देशासह राज्यात यावर्षी एकाच आप - आपल्या घरीच कुटुबांसह साजरी करा .त्यासाठी सर्वांनी जयंतीच्या दिवशी सकाळी  आप - आपल्या घरावर शिवा संघटनेचा ध्वज लावावा आणि घरातच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन  करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी पुष्प वाहुन पुजन करावे. याच पद्धतीने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो कुटुंबाकडून सकाळी ठिक 10 वाजता जयंती निमित्त एकत्रित अभिवादन केल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यात यावे असे आवाहन शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते त्यांच्याच आव्हानाला प्रतिसाद देत विद्यानिकेतन शाळेतील सहशिक्षक श्री पाटिल सर यांनी आपल्या सावळी येथील राहत्या घरी सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत  क्रांती सुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर राजे यांची जयंती घरीच राहुन साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येऊ नये : फुले शाहु - आंबेडकर युवा मंच

 नांदेड दि . 26 | सध्या कोरोना या महारोगामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे सर्व विद्यापीठ व सलग्नित सर्व महाविद्यालय बंद असल्यामुळे या वर्षी होणाऱ्या उन्हाळी परीक्षा होणार की नाही किंवा झाल्या तर ऑनलाईन होणार का या संभ्रमामध्ये विद्यार्थी आहेत . रोजी फले - शाह - आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी स्वा रा ती म विद्यापीठ नांदेड चे मा कुलगुरु डॉ . उद्धव भोसले सर व परीक्षा नियंत्रक डॉ . रवि सरोदे सर यांना व्हाट्सअप द्वारे निवेदन सादर करण्यात आले . निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आपल्या विद्यापीठातील सर्व संकुल व सलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी हे दुर्गम भागातील असून व काही विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या कडे Android मोबाईल नाहीत व ज्यांच्या कडे आहेत त्यांना नेटवर्क चा प्रॉब्लम भासत आहे त्यामुळे मा . कुलगुरु महोदय आपण अश्या ऑनलाइन परिक्षेपासुन वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा व ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी फुले - शाहु - आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे . 

25 April 2020

उदगीर मध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण 70 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

उदगीर :शहरात शनिवारी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती . मात्र परराज्यातील आठ यात्रेकरू बाधित निघाले होते . ते सर्वजण कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते . दरम्यान उदगीरच्या बातमीने चिंता वाढली आहे . उदगीरमध्ये हा पहिलाच रुग्ण आढळला आहे . त्यांचा प्रवास इतिहास काय आहे , तो स्थानिक की बाहेरील याची माहिती घेतली जात आहे . उदगीरमधील रुग्णाबाबत माहिती कळल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून इतरांना लागण पसरू नये यासाठी काळजी घ्यावी . _ _ असे निर्देश दिले आहेत . सदरील रुग्ण महिला असून ती 70 वर्षांची आहे . अन्य आजारांनी त्रस्त असल्याने ती रुग्णालयात आली होती . दरम्यान उदगीरवासीयांनी घाबरून जाऊ नये प्रशासन खबरदारी घेत आहे . लोकांनी घराबाहेर पडू नये लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे . असे आवाहन करण्यात आले आहे . सदर महिलेला बाधा कशी झाली , तिचा प्रवास इतिहास आदी तपासून पाहिला जात आहे , तसेच तिच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन केले जाईल . दरम्यान , सदरील महिलेचा संपर्क गुजरातमधून आलेल्या महिलेशी आला होता , अशी प्राथमिक माहिती आहे , ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले , आरोग्य विभागाने तपासणी केली , त्यात पॉझिटिव्ह अहवाल आला .

18 विद्यार्थ्यांचा टँकरमधून जीवघेणा प्रवास सर्व विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात , शासकीय रुग्णालयात दाखल .

नांदेड , दि . २५ : टँकरच्या टाकीत लपून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात निघालेल्या १८ जणांना शनिवारी पहाटे नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले . हे सर्वजण जालना येथून आपल्या गावाकडे निघाले होते . संशय आल्यामुळे पोलिसांनी विचारपूस केली , तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला . जालन्यातील एका कृषी प्रशिक्षण कंपनीत पदविका अभ्यासक्रमासाठी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विजयवाडा , गुडूर , राजमुद्री , काकीनाडा येथील १६ तरुण व दोन तरुणी , असे १८ जण काही महिन्यापूर्वी राज्यात आले होते . जवळचे पैसे संपले आणि लॉकडाऊनचा असह्य झाल्यामुळे त्यांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला . अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य कोणतीही वाहने सुरू नसल्यामुळे त्यांनी टँकरच्या टाकीत बसून जाण्याचा मार्ग निवडला . एका टँकरचालकाला विनंती करून भाडे ठरवून घेतले . एम पी ०९ - एच जी / ३४५७ या टँकरमधून गाव गाठण्यासाठी हे सर्वजण निघाले . टँकरमध्ये तेल टाकण्याच्या तोंडातून ते आत शिरले . हवा येण्यासाठी टँकरचे झाकण उघडे ठेवले . त्यामुळे चालकाशिवाय टँकरमध्ये कोणी अन्य असतील , याचा कोणालाही संशय आला नाही .हे टँकर जालना येथून निघाल्यानंतर नांदेडच्या पूर्णा रोडवरील पावडे पेट्रोल पंपाजवळ आले . पोलिसांनी अडवून विचारपूस सुरु केली असता उत्तरे देताना टँकरचालकाचा संशय आला . टँकर सोबत इंधन भरलेली व पुढच्या गावांना जाण्याची कागदपत्रे नव्हती . पोलिसांनी टॅकरची तपासणी केली . त्यावेळी टँकरच्या आतून मानवी आवाज येत होता . आता डोकावून पाहिले असता काही तरुण व तरुणी असल्याचे पोलिसांना दिसले . तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . या सर्वांना टँकरच्या बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . * स्वब घेऊन विलगीकरण ' या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून इतर प्रवाशांप्रमाणे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे . त्यांच्या घशाचे द्रव नमुने देखील घेतले जातील , असे सूत्रांनी सांगितले . * पासिंगने फोडले बिंग हा टँकर मध्यप्रदेश पासिंगचा आहे . मध्यप्रदेशातून महाराष्ट्रमार्गे तेलंगणा कडे जाणारे असे कोणते महत्त्वाचे इंधन आहे , याची पोलिसांना शंका आली . टँकर चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने हा संशय आणखी बळावला . त्यामुळे पुढची तपासणी करण्यात आली आणि हे बिंग फुटले . टँकर चालकासह या सर्व तरुण आणि तरुणींवर लॉक डाऊन तोडून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याच्या आरोपाचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे नांदेड शहर पोलीस उपअधीक्षक अभिजीत मस्के यांनी सांगितले . 

लॉकडाऊन काळात ही म. रा.वि.वितरण कंपनी भोगळ कारभार दररोज दिवस -रात लाईट होते गुल


रमज़ान महिन्यात लोडशेडिंग होऊ नये मुस्लिम समाजाची मागणी
बिलोली:आजपासून मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान सुरु होणार आहे त्या निमित बिलोलीत मुस्लिम समाजाचा वतीने विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी व सम्बंधित अधिकारीऱ्याना देण्यात आले.देशात कोरोना महामारीमुळे देश फार 
संकटात आहे तर कोरोना वायरस चा प्रादुभाव वाढल्याने यावेळी   मुस्लिम समाज यावेळी रमज़ान आपल्या घरात नमाज पटन  करीत  आहे व  उपवास (रोजा)ही आपल्या कुटुंबा सोबत घरिच सोडनार आहे. दि.24 एप्रिल 2020 रोजी बिलोली येथील मुस्लिम समाजाचा वतीने दिनांक 25 पासुन पवित्र रमज़ान महिन्यात खाली दिलेल्या   विविध  मागण्या दररोज नियमित घंटागाडी सपूर्ण शहरात येणे, नियमित पाणी पुरवठा करने,सर्व मशीदेच्या समोरील परिसर स्वच्छ ठेवणे,ज्या ठिकाणी विद्युतखांब बंद पडलेले आहे त्वरिक्त दुरूस्त करून चालू करने,मध्यवर्ती बैंक ते कुंडलवाडी क़ुरैशी गल्ली नवीन बसस्थानक पासून मोठी मस्जिद पर्यतचे काही  डिवाइडर वरील बंद  आहे ते चालू करने,बिलोली शहरात वार वार  विज खंडित होत आहे ज्यामुळे लॉक डाऊन मुळे नागरिक घरात असल्यामुळे त्यांना खुप त्रास होत आहे पवित्र रमज़ान महिन्यात एक महीना लोडशेडिंग करू नेय,शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुतरे,व डूकरे या जनावरा चा बंदोबस्त करावा अश्या विविध मागण्या संदर्भातचे निवेदन तहसीलदार,मुख्याधिकारी, म.रा.वी.वि.कंपनी अभियंता, पोलीस निरीक्षक व नगराध्यक्षा यांना देण्यात आले यावेळी मौलाना अहमद बेग ईमाम जामा मस्जिद ,मौलाना मुबीन बेग ईमाम, शेख फारुख अहेमद,वलियोद्दीन फारुखी,शेख सुलेमान,साजिद क़ुरैशी,शेख ईरशाद मौलाना आदिचे हस्ताक्षर आहे

24 April 2020

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती दि: 24 एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत

आज दिनांक 24 / 04 / 2020 रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात खालीलप्रमाणे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येत आहे . आज दिनांक 24 / 04 / 2020 रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजे पर्यंत जिल्हा नांदेड येथे 901 संशयितांची नोंद झालेली आहे , त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे . एकूण घेण्यात आलेले स्वैब 600 व त्यापैकी 496 नेगीटिव्ह असुन 98 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत . आजतागायत एकूण 05 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . एकूण घेण्यात आलेले स्वॅब 600 व त्यापैकी 01 रुग्णाचा स्वैब पॉझीटिव्ह असुन सदर रुग्ण हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे दाखल उपचारासाठी दाखल आहे . सदर रुग्णास मधुमेह , उच्च रक्तदाब व दमा यांसारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे . सदर रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात 38 व्यक्तींचे अहवाल नेगीटिव्ह आले असून ४२ अहवाल प्रलंबित आहेत . जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये तसेच अफवावर विश्वासु ठेवु नये .

रास्तभाव दुकानदारांविरुद्ध प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 नांदेड , दि . 24 : - जिल्हूयात सर्वत्र अन्नी धान्यो वितरण करण्यात येत असून विविध योजनांचे निकष अन्नदधान्यन परिमाण , दर यामध्येर शिधापत्रिकाधारक यांचा संभ्रम झाल्याने रास्तक भाव दुकानदारांविरूध्द मोठ्या प्रमाणात तक्रारी व्हॉनटसअप ई - मेल दुरध्वरनी व लेखी स्वमरूपात जिल्हार प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत . या तक्रारी निकाली काढण्यावच्या दृष्टी ने तालुकानिहाय नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्तीत जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी केली आहे . राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हिड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यायसाठी राज्याहत साथरोग प्रतिबंधात्म्क कायदा 1897 दि . 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2 , 3 व 4 मधील तरतुदीनुसार दिनांक 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित झाल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे . सार्वजनिक वितरण व्यनवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेमार्फत अन्नयधान्यह पुरविण्यातचे जाहीर केले आहे . त्यामध्ये एप्रिल ते जून 2020 यामध्ये अंत्योदय , प्राधान्य कुटंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचे नियमीतचे धान्यण वाटप झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नय योजनेंतर्गत याच लाभार्थ्यांना प्रति व्यमक्ती 5 किलो तांदुळ मोफत देण्यात येत आहे . तसेच नियमीत एपीएल शेतकरी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रती व्यक्तील 2 किलो तांदुळ दर 3 रुपये प्रति किलो व 3 किलो गहू दर 2 रुपये प्रति किलो प्रमाणे वितरीत करण्यापत येत आहे . तसेच ज्यात शिधापत्रिकाधारक राष्ट्रीनय अन्नि सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या , शेतकरी योजनेंतर्गत सवलतीच्या दराने लाभ मिळत नसलेल्याय तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्ना 1 लाखाच्या आत आहे , ज्यांची संगणकीय प्रणालीमध्येच नोंद झाली नाही अशा पात्र लाभार्थ्यांरना मे व जुन 2020 या कालावधीत गहू 8 रुपये प्रति किलो व तांदुळे 12 रुपये प्रति किलो प्रतिमहा प्रति व्यलक्तीव 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या प्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे . जिल्ह्यात रास्तलभाव दुकानदारांविरूध्दक प्राप्त होणाऱ्या तक्रारी निकाली काढण्यादसाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . यामध्ये तालुका नोडल अधिकारी , सहा नोडल अधिकारी यांचे नाव व मोबाईल क्रमांक कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे . नांदेड तालुका - तहसिलदार अरून जव्हाड 9511774349 , सारंग चव्हाण ना त पुरवठा 9822232545 , 02462 - 236769 . अर्धापूर - तहसिलदार सुजीत नरहरे 8275273829 , जाधव ना त पुरवठा 982327145902462 - 272167 . कंधार - तहसिलदार सखाराम मांडवगडे 9011925584 , ताडेवार ना त . पुरवठा 9822638671 , 02466 - 223424 . लोहा तहसिलदार व्ही . एम . परळीकर 9049286856 , राम बोरगावकर ना त . पुरवठा 9404465313 , 02466 - 242460 . भोकर - तहसिलदार भरत सुर्यवंशी 9623398559 , के . व्हि . मस्के ना त पुरवठा 8390247049 , 02467 - 222622 . मुदखेड - तहसिलदार दिनेश झांपले 9422965456 , एस . जी . जोगदंड ना त . पुरवठा 8669064978 , 02462 - 275551 . धर्माबाद तहसिलदार शिंदे डी . एन . 9422611487 , एस . एन . हांदेश्वादर ना . त . पुरवठा 9423439557 , 02465 - 245200 . उमरी - तहसिलदार एम . एन . बोथीकर 9921844511 , राजेश लांडगे ना तह . 9049945378 , _ 02467 - 244202 . देगलूर - तहसिलदार अरविंद बोळंगे 7776889999 , वसंत नरवाडे ना त पुरवठा 9421913691 , 02463 - 255033 . मुखेड - तहसिलदार काशिनाथ पाटील 9422911933 , आर आर पदमवार नरवाडे ना . त . पुरवठा 8805889485 , 02461 - 222522 . बिलोली - तहसिलदार राजपुत विक्रम महाजन 9922317071 , उत्तम निलावार ना त पुरवठा 8208290063 , 02465 - 223322 . नायगाव तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे 7775034666 , एन . एस . भोसीकर ना त पुरवठा 9545929394 , 02465 - 203592 . किनवट - तहसिलदार नरेंद्र तबाजी देशमुख 7588560342 , श्री . लोखंडे ना त . पुरवठा 9421759608 , 02469 - 222008 . माहूर - तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर 9421490400 , 8668676787 , गोविंदवार ना त पुरवठा 9423352436 02460 - 268521 , हदगाव - तहसिलदार जीवराज डापकर 7350531111 , विजय येरावाड ना त पुरवठा 9545009009 , 02468 - 222328 . हिमायतनगर तहसिलदार जाधव एन . बी . 9552972949 , अनिल तामसकर ना त पुरवठा 9403460422 , 02468 - 244428 याप्रमाणे आहेत . नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून ई - मेल , दुरध्वानी , व्हॉटसअप व पत्राद्वारे तसेच नागरिकांकडून प्राप्त4 झालेल्या तक्रारीबाबत स्वत : किंवा आपले यंत्रेणेमार्फत 24 तासाच्या आत वस्तुसस्थितीदर्शक चौकशी करावी . त्यानंतर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा . ज्यात तक्रारीमध्येक तथ्यक दिसुन येत नाही , त्या तक्रारी त्वरीत निकाली काढून जिल्हाधिकारी कार्यालयास तसे अवगत करावे . तक्रारदारांने चुकीची तक्रार केल्यानचे चौकशीअंती निदर्शनास आल्यास तक्रारदाराविरूध्दर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची व योग्यी ती कार्यवाही करावी . या परिपत्रकात दिलेल्याक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे . यात हलगर्जीपणा , टाळाटाळ केल्याचे निर्दशनास आल्यापस संबंधितांविरुध्दा नियमानुसार कार्यवाही करण्यायत येईल , असे परित्रकात जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे .

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी यमराज रस्त्यावर

नांदेड, बातमी दि:24 ः कोरोनासारख्या आजाराला अटकाव घालण्यासाठी यमराज रस्त्यावर अवतारल्याचे शुक्रवार दि. 24 रोजी वजिराबाद परिसरात बघायला मिळाले. तु रस्त्यावर आल्यास तुझ्या घरात कोरोना येणार असा इशारा या वेळी रस्त्यावर फिरणार्‍या वाहनचालकांना यमराजांनी दिली.जगभर कोरोनाने थैमान घातले, असून प्रत्येक गाव व शहर हे कोरोनाच्या संसर्गामुळे पछाडले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये,यासाठी देशभर लॉकडाऊन केले, तरी रस्त्यावर फिरणार्‍या हवसे-नवसे व गवशांची संख्या कमी नाही. पोलिसांनी अनेकांना लाठयांचा प्रसाद दिला, तरी यात सुधार बसून शहाणे होण्याचे प्रमाण ही कमीच आहे. यांना प्रबोधनाच्या माध्यमातून तरी अक्कल यावी, यासाठी पोलिस प्रशासनाने यमराजांना रस्त्यावर उतरविण्याची शक्कल लढविली.या वेळी वजिराबाद पोलिस स्टेशन व सप्तरंग सेवा संस्थेच्या पुढाकाराने वजिराबाद चौकातून दुचाकीवर फिरणार्‍या स्वारांना कोरोनाचे महत्व पटवून देण्यात आले. असेच बाहेर फिराल तर, घरात कोरोनाला घेऊन जाल.त्यामुळे रस्त्यावर न येण्याची ताकीद ही या वेळी यमराजांनी दिली. या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी भेटी दिली. यमराजचर भूमिका यश जेठवाणी तर चित्रगुप्ताची भूमिका गणेश काकडे यांनी साकारली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ' टेस्ट किट ' च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे - महाळुकर हिचे मोठे योगदान आहे . या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था ( एनआयव्ही ) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे . शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे . त्यांचे शिक्षण एम एस्सी बायोटेक झाले असून त्या कुसगाव ( पुणे ) येथील ' इम्नो ' सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास ( रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ) विभागात प्रमुख आहेत . गेल्या चार - पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत . या कंपनीने प्रेग्नन्सी , डेंग्यु , एचआयव्ही , एचसीव्ही याचे निदान करणाऱ्या टेस्ट किट बनविल्या आहेत कोरोना महामारीच्या संकटात विषाण प्रादुर्भाव ओळखण्याची किट तयार करावी अशी कल्पना पुढे आली . कंपनीतील शितल रंधे - महाळुकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे ( एम एस्सी बायोटेक ) , अविनाश तुळसकर अमृत कोरे वर्षा गुंजाळ ( ही पिंपळदरी , ता . अकोले येथील आहे ) , अवधुत सातपुते , ललित बारावकर , हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली प्रथम किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताबाहेरुन मागविला . लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास थोडा विलंब झाला . तरीही जास्त वेळ मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली आहे . किट पुण्यातील आयसीएमआर /एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली . सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल आरगनायझेशन ( सीडीएससीओ ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे . १५ मिनिटांत कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला की नाही ? याचे निदान या किटमुळे होते . लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होत आहे . संशोधन क्षेत्रात आवड होती . गेल्या चार वर्षांपासून कंपनीत संशोधन विभाग सांभाळते . एम . एस्सी . बायोटेक असलेले माझे काका अतुल तरडे यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली . कोरोना महामारी संकटाच्या काळात आपल्या देशासाठी काहीतरी संशोधन कार्य करण्यात सहभाग नोंदवण्याचे भाग्य मिळाले याचे समाधान वाटते .

मुक्रमाबाद , नांदेड़ पोलीसांची धाडसी कार्यवाही गावठी दारुसह रसायन जप्त

 मुक्रमाबाद : लॉकडाऊनमुळे गावठी दारु अवैद्य रित्या चढ्या भावाने विकत आसल्याचे मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन दि . २२ एप्रिल रोजी पहाटे स पो . निरिक्षक कमलाकर गडिमे यांच्या पथकाने अचानक चिंचणापल्ली तांडा , गोजेगाव येथे धाडी टाकुन गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारा १२०० लीटर रसायन मिश्रित साठा जप्त करुन त्याची व्हीलेवाट लावून २० लीटर गावठी दारु सहीत ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन सात जनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले . देशासह राज्यात कोरोणा महामारीचा संसर्ग वाढत असल्यामळे यावर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी केल्यामळे जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद असल्यामुळे व दारु भेटत नसल्यामुळे पर्याय म्हणून नागरिकांनी गावठी दारुकडे आपले पाय वळविल्यामुळे देशी विदेशी दारु विक्रेते चोरुन दारु चढ्याभावाने विकत आसल्यामुळे खिशाला जास्तीची कातर लागत असल्याम ळे नाईलाजास्तव नागरीक या देशी विदेशी दारु ऐवजी गावठी दारुकडे वळल्यामुळे गावठी दारु विकणा - यांना सोन्याचे दिवस आले आहेत . याचा फायदा घेत चढ्याभावाने गावठी रसायन मिश्रित विषारी दारु विकत नागरिकांची आर्थिक लुट व नागरिकांच्याआरोग्याशी खेळ खेळत आसुन यामुळेनागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . अवैद्य रित्या गावठी दारु तयार करणे व विकणे याची गुप्त माहिती मिळाल्याने मुक्रमाबाद पोलीसांनी अचानक चिंचणापल्ली तांडा येथे धाड टाकून गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारा रसायन मिश्रित साठा अंदाजे १२०० लीटर किमत ४२ हजार रुपयांचा माल जप्त करुन जमिनीवर सांडूण टाकले व गोजेगाव येथे गावठी दारु किमत २२००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जनाविरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स . पो निरिक्षक * कमलाकर गड्डिमे * सह बिट जमादार शिवाजी आडेकर , मिलींद नरबाग , माधव मरगेवाड आदीनी ही धाडसी कारवाई केल्याने चोरी चुपके चुपके देशी विदेशी दारु विकणा - यांचे धाबे दनानले आहेत .    

शेतीविषयक आस्थापना चालू ठेवण्यास सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत वेळेची मुभा

 नांदेड , दि . 24  - शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शुद्धीपत्रक 24 एप्रिल मध्ये अंशत : बदल करुन केवळ अशा शेतीविषयक आस्थापना दुकाने कृषि उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक ज्यांना यापुर्वीच्या आदेशान्वये चालू ठेवण्यास मुभा दिली आहे . त्यांना आता सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा वेळोवेळी निर्गमीत आदेशात नमद अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिली आहे . या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि . 13 . 15 . 19 . 21 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे शेती विषयक आस्थापना , दुकाने वगळून इतरांसाठी दिलेले वेळेचे बंधन इत्यादी यापुर्वी प्रमाणेच अंमलात राहील , असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी 23 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे .

23 April 2020

बिलोली :तालुक्यातील बेळकोणी (खु)येथे छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार वाटप

बिलोली :तालुक्यातील बेळकोणी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार योजनेतील शिल्लक तांदूळ चे वाटप अतिशय शिस्तबद्ध व रांगेत सोशल डिस्टन्सिंग ची काटेकोर पणे अंमलबजावणी करत वाटप केले.सध्याच्या कोरोना विषाणू च्या संसर्गा मुळे निर्माण झालेल्या महामारी चा मुकाबला करत असताना शाळेतील शिल्लक तांदूळ वाटप पालकांना करत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना  शाळेने कळविले होते.कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी योग्य अंतर ठेवून एक मीटर अंतरावर खूणा करुन जाण्याचा येण्याचा मार्ग वेगवेगळा ठेवून व गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.वाटपासाठी मुख्याध्यापक कदम सर,बुद्धेवार सर, रोडे सर, लिपीक छाया यरकवाड,अवधुत यरकलवाड यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

अफवा पसरवु नका अन्यथा कारवाई करू: डॉ विपीन इटनकर

नांदेड | नागरिकांना चुकीचे संदेश पाठवून गैरसमज पसरवू नका अन्यथा गुन्हे दखल करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी दिला आहे . कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या पिरबुर्हान नगर भागात आज जिल्हाधिकारी डॉ विपीन , पोलीस अधीक्षक मगर , म . न . पा . आयुक्त लहाने यांनी भेट देऊन त्या परिसरातील बंदोबस्ताची पाहणी केली . त्या नंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन डॉ विपीन यांनी केले आहे . पीरबुहान परिसरात पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे , त्या मुळे इतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये संयम पाळावा असे आवाहन ही डॉ विपीन यांनी केले आहे . सामाजिक माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत . हा प्रकार थांबवा अन्यथा सायबर सेल कडून गुन्हे दखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे . 

22 April 2020

साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे , स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रांतर्गत सर्व कापूस खरेदी केंद्रास परवानगी

 नांदेड दि . 22 : - जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिली आहे . देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे . केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने 15 एप्रिल रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कृषि शेतमालाची खरेदी - विक्री व कृषि शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे . त्यानुसार सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव ( पणन ) यांनी 17 एप्रिल रोजी भारतीय कापूस निगम ( ccl ) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित ( MSCCGMP ) मुंबई यांच्यामार्फत कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत . त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे . शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनाने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे . त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार असून लघुसंदेशामध्ये नमूद दिनांकास शेतकऱ्यांने सात बारावरील पीकपेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधीत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे . एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही . Non FAQ दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे . कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक पुणे यांनी तालुकास्तरावर तालुका उप / सहायक निबंधक , सहकारी संस्था , कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांनी समिती गठीत केली आहे . शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर साथसोवळे सामाजिक अंतर ( Social distance ) व स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आवाहन , सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे . 

रस्त्यांची कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण वेळेत पूर्ण करा - सा.बां.मंत्री अशोक चव्हाण

 नांदेड दि . 22 : - जिल्ह्यातील रस्त्यांची मंजूर व प्रलंबित कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले . नांदेड जिल्ह्यातील मंजूर व प्रगती पथावरील , प्रलंबित , प्रस्ताविक नवीन कामांचा आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ . शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात ( काल दि . 21 रोजी ) संपन्न झाली , त्यावेळी ते बोलत होते . बैठकीस जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी , अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता , कंत्राटदार यांची यावेळी उपस्थिती होती . पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व त्याची यादी सादर करण्याबाबत निर्देश दिले राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन कोल्हार ते नरसापुर 57 कि . मी . काम वीस टक्के झाले असून मुदत संपून एक वर्ष झाले तरी ती कामे अपूर्ण आहेत सदर कामे तात्काळ पूर्ण करावीत . वसमत ते नांदेड 30 किमी पैकी 14 किमी रस्त्याचे काम 50 टक्के झाले आहे . नांदेड - बारड - भोकर - म्हैसा रस्त्याचे काम सुरू असून बारसगाव ते राहटीपर्यंन्ताचे काम लॉकडाऊनमुळे प्रलंबित आह . रस्ता कामासाठी डांबर कमी होते ते निदर्शनास आणून देणे आवश्यक होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले . भोकर ते राहाटी पर्यंतचे काम पूर्ण करावे . त्यापुढील काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्यात यावे यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याशी चर्चा करावी . उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याशीही समन्वय ठेवून तीन कामांच्या मोजण्याचे काम पूर्ण करावे . नांदेड ते जळकोट रस्त्याचे कामाच्या मोबदला देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी कामे अडवले असून तीन कामे रस्त्याची शिल्लक आहेत . या कामांची सविस्तर माहिती सादर करावी . लखमापुर चार पॉईंट 50 किमीचे काम परमिट आहे , तेंव्हा या कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित कामांचा आढावा घ्याव नांदेड - वारंगा बायपास रस्ता 30 मीटर शासकीय जमीन आहे , परंतु रस्ता करण्यास विरोध होत असल्यास रस्त्याचे काम पोलिस संरक्षणात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले . मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे 184 कामे प्रगतिपथावर आहेत . ती अठरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाची आहेत . कामाची प्रगती 25 टक्के असून तसेच 2015 व मधील मुखेड , हातराळचे काम अपूर्ण आहेत . या कामाचे अंदाजित रक्कम दहा कोटी रुपये आहे . हे काम चार वर्षापासून अपूर्ण आहे ही बाब गंभीर आहे . तेंव्हा संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे . याबाबत या कामाची बैठक पुढील आठवड्यात घेऊन अहवाल सादर करावा करावा असेही निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले . ज्या - ज्या ठिकाणी प्रलंबित कामे आहेत त्या - त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदरच्या अडचणी सोडविण्यात याव्यात . शंभर गाव काकांडी येथील रस्त्याच्या कामासाठी संपादनाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी शासकीय कामासाठी लागणारे लोखंड , सिमेंट , डांबर उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी ठेवली आहेत . ट्रक वाहतुकीसाठी पोलिस विभागाकडून पास देण्यात येत आहेत . जिल्हाधिकारी यांनी शासकीय प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामास परवानगी दिली आहे . ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे व जी कामे झाली आहेत तेंव्हा निधी देत असतांना केलेल्या कामाची गुणवत्ता तपासून निधी उपलब्ध करुन दयावा शासकीय रस्ते , पूल , इमारतीची कामे विहित कालावधीत चांगले गुणवत्तेने व मुदतीत पूर्ण होतील याकडे लक्ष देण्यात यावे . कंत्राटदार यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले . तसेच मजूरांची संख्या जास्तच असल्यामस कामाच्याा ठिकाणीच जवेणाची व निवासाची स्वणच्छेतागृहे , मास्कम , सॅनिटायझर इत्यादी उपलब्ध करुन देण्यायत यावी . सोशल डिस्टीन्से पाळले जाईल याचीही दक्षता घेण्याडत यावी , असेही पालकमंत्री अशोक चव्हाउण यांनी बैठकीत सुचना दिल्या . यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत म्हणून जीजी कंट्रक्शन श्री कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख एक हजार रुपयाचा निधी धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सुपूर्द केला .

नांदेडमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रूग्ण

नांदेड: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती . यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता . बुधवारी मात्र नांदेड शहरातील पीर बहाणनगर भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नांदेडवासीयांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . या रुग्णाचे वय 64 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे . पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थिती ही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती . यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता .

नांदेड जिल्ह्यातून मंगळवारी रात्री 8 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते . यातील एका एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे . हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत .

जीवनावश्यक वस्तूंच्या भाव अव्वाच्या सव्वा ; कृत्रिम टंचाई . . . ग्राहकांना भुर्दंड .. प्रशासनाचे दुर्लक्ष

बिलोली | Covid - 19 च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे भाव  सर्रास वाढविण्यात आले आहेत .यामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत . साखर - तेल यासह सर्वच वस्तूसाठी पाच ते पन्नास रुपये अधिक मोजावे लागत आहेत . काही ठिकाणी कृत्रिम टंचाई केली जात आहे . साठेबाजी वाढत आहे . बंदी असलेला तंबाखूजन्य सूर्य छाप जर्दा पाच रुपयाला मिळतो पण तो पंधरा रुपयाला विकला जात आहे . अशा अनेक वस्तूंच्या किमती बाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. पण ना दाद . . . ना फिर्याद . . .सामान्य नागरिकांनाची पिळवणूक होत आहे.अशा दुकानदारावरहि प्रतिबंध करणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे लोकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली . या काळात जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली . परंतु दुकानदारांनी ग्राहकांना जादा दराने वस्तूंची विक्री करत आर्थिक पिळवणूक करण्यास सुरुवात केली आहे . साखर तेल संसारोपयोगी वस्तूचे भाव सर्रास पाच रुपये - दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत जास्तीची किंमत आकारणी केली जात आहे त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच यंत्रणा नाही त्यामुळे लोकांना ताळेबंदीत आर्थिक झळ सहन करावी लागत आहे . तंबाखूजन्य वस्तू विक्रीला बंदी आहे तरीही दुकानावर ते सहज उपलब्ध होतात यात सूर्य छाप जर्दा पाच रुपयाला मिळतो पण तो कृत्रिम टंचाईमुळे पंधरा रुपयाला विकला जात आहे . बिडी सिगारेट गुटका त्या सगळ्या वस्तूंना बंदी पण लपूनछपून जास्त किंमतीने विकली जाते . तालुकास्तरावर या जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना कायद्याचा चाप लावण्याची आवश्यकता आहे . ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय विदारक पण लोकांना नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन माल घ्यावा लागतो . जिल्हा व तालुका प्रशासन संचारबंदी काळात अतिशय कटाक्षाने काम करीत आहेत . लोकांना संचार प्रतिबंध करत असतात परंतु दुकानदारांच्या वाढत्या किमतीच्या विक्रीला मात्र अद्यापही प्रशासन स्तरावर पावबंध घालता आला नाही . त्यामुळे एकीकडे मजुरांना काम नाही तर तर दुसरीकडे दुकानावरून जास्तीचे पैसे देऊन वस्तू विकत घ्याव्या लागतात या नफेखोरी मुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे . तालुका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे व जास्तीची किंमत आकारण्यात येणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे . 

21 April 2020

बेळकोणी खु येथे घरपोच अन्नधान्याची किट वाटप

बिलोली- देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अशा परिस्थितीत श्री लक्ष्मण ठक्करवाड (जि.प.सदस्य आरळी यांच्या कडून गावातील गरजूंना अन्न धान्याची १० किट वाटप करण्यात आले.कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा  पासुन लॉकडाऊन  व संचारबंदी  असल्याने  हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे.हेच लक्षात घेऊन गावातील 10 कुटुंबाना किट वाटप करण्यात आले.यावेळी गावातील क्रष्ण मंदिरचे पुजारी किशन महाजन, राजेंद्र कापावार,(से.सो.चेअरमन), सुधाकर कापावार(अध्यक्ष तंटामुक्ती) किशन मलेकरी,श्रीहरी कापावार, राजेंद्र गोनेवाड,दिगंाबर अनमुलवाड, पेंटाजी आनमुलवाड,उत्तम यारावाड यांची उपस्थित होती

बिलोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

बिलोली : शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी सोमवारी संध्याकाळी 9 च्या सुमारास बिलोली शहरासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला , तर काही गावात गाराही पडल्याची माहिती समोर आली आहे . या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरांचे ही नुकसान झाले आहे . मागील तीन ते चार दिवसापासून  तापमानात वाढ झाले होते एवढेच नव्हे तर सकाळी गारवा दुपारी कडकडून ऊन आणि रात्री पाऊस असा काही सांगा बिलोली शहरासह  काही गावांनी अनुभवला मात्र सोमवारी संध्याकाळी 9 च्या सुमारास  तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली .शहरातील देशमुख नगर,गांधी नगर,फारूखी गल्ली, परिसरातील गावांमध्ये मुसळधार पावसाने अनेकांच्या घरांचे नुकसान केले व विजेचे खांब तुटून पडले आहेत .दरम्यान सोमवारी सायंकाळी 8  वाजल्यापासूनच शहरात जोरदार वारे वाहू लागले होते त्यामुळे बिलोलीकरांनी पाऊस येणार असा अंदाज बांधला होता . ९ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि बिलोलीकरांचा अंदाज खरा ठरविला .

20 April 2020

जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे नांदेड जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही

 
दि: 20 एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत

▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 0
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 664
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 218
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 37
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -73
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 591
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 10
▪️एकुण नमुने तपासणी- 383
▪️पैकी निगेटीव्ह - 320
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 10

नाकारण्यात आलेले नमुने - ५


▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 76917 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

आरोग्य विभाग, नांदेड मार्फत...

शहापूर येथे मुस्लीम युवा मंडळी व वसीम शहापुरकर मित्र मंडळाच्या वतीने १०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप

शहापूर- देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लाऊकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अश्या परिस्थितीत गरजू लोकांसाठी मुस्लिम युवा मंडळी व वसीम शहापुरकर मित्र मंडळ यांच्या पुढाकारातून  १०० कुटुंबाना  अन्न धान्य व अत्यावाश्यक साहित्य वाटप करण्यात आले.कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा  पासुन लॉकडाऊन  व संचारबंदी  असल्याने  हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. संचार बंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी  दानशूर व्यक्ती कडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या मदतीने गरजू नागरिकांना साहित्य पुरविले आहेत.वसीम शहापूरकर व त्यांच्या मित्र मंडळानी सुमारे १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून आवश्यक सामान वाटप केले. यात तांदुळ,मसुरदाळ ,मिरची पॅकिट,तेल पॅकेट, हळद पॅकिट,मिठ पॅकिट,आदी वस्तूंचा  समावेश आहे.हे सर्वाची किट तयार करून गरजुना वाटप करण्यात आले.यामध्ये सर्व मित्र मंडळीने परीश्रम घेतले.
                                      प्रतिनिधी:गंगाधर भोयावार

भोकरचे ' ते ' १८ जण निगेटिव्ह !

 भोकर ( वार्ताहर ) , दि . २० : तेलंगणातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या भोकर येथील १८ जणांच्या घशाचा द्रव तपासणीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे . तालुका आरोग्य अधिकारी डॉ . राहुल वाघमारे यांनी या माहितीला दुजोरा दिला . यासोबतच शुक्रवारी नांदेडहून पाठवलेल्या एकूण ४८ जणांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली . त्यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या ३६८ वर गेली असून एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आलेला नाही . भोकर - म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर १६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता . तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनाचे आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी त्या कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला . रविवारी रात्री उशिरा त्या १८ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली . दुसरा अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे . कोरोनाबाधीत ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांचा काय रिपोर्ट येईल याबाबत भोकर तालुक्यातील नागरीकांत । चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने चिंताग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .

बिलोली उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रशंसा

बिलोली | बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने केलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन आणि उत्कृष्ट कार्य याची प्रशंसा जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांनी केली आहे . कोरोना - कोविड - 19 या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होवू नये म्हणून देशासह राज्याने अनेक उपाय योजना केल्या त्यात सर्वात महत्वपूर्ण संचार बंदी होती . ही परिस्थिती तालुका आणि । गावपातळीपर्यंत अंमलात आणण्यासाठी सर्वांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या . त्यात बिलोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी आपल्या सहकारी अधिकारी , कर्मचारी आणि खाजगी सेवकांच्या मदतीने रुग्ण तपासणी , रुग्ण देखभाल , रुग्णवाहिकेची सोय , कोरोना विषयी कार्यशाळेचे आयोजन , बसस्थानकात जावून प्रवाशांची आरोग्य तपासणी आणि केलेल्या सर्व कामांची प्रसार माध्यमांमार्फत माहिती प्रसारीत करणे . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत नेहमी संपर्क ठेवून कोरोना विषाणू इतर लोकांना ग्रासणार नाही यासाठी खुप प्रयत्न केले . या सर्व कामाची नोंद घेवून जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांनी एका शासकीय पत्राच्या मार्फत दि . 12 एप्रिल 2020 रोजी डॉ . नागेश लखमावार यांची प्रशंसा करून कौतुक केले आहे . हे प्रशंसा पत्र आल्यानंतर बिलोली येथील सर्व समाजातून डॉ . नागेश लखमावार यांचे अभिनंदन होत आहे . डॉक्टारांच्या कामकाजांना जाणारे डॉ . विपीन यांच्यासह वैद्यकीय उपसंचालक , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी डॉ . नागेश लखमावार यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामकाज पध्दतीसाठी गौरवउदगार काढले आहेत .

*कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती*

      दि: 19 एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत

▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 0
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 649
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 196
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 35
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -73
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 576
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 05
▪️एकुण नमुने तपासणी- 373
▪️पैकी निगेटीव्ह - 320
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 48

नाकारण्यात आलेले नमुने - ५


▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 76211 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

आरोग्य विभाग, नांदेड मार्फत...

19 April 2020

कार्यालये , कार्यस्थळे , कारखाने आणि आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी मानक कार्यप्रणाली

 
नांदेड , दि . 19 : - सर्व कार्यालये , कार्यस्थळे , कारखाने आणि आस्थापनां मध्ये खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी . यात परिसरातील जंतुनाशकांचा वापर करून संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जावे , असे जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आदेशात नमुद केले आहे . इमारत , कार्यालयाचे प्रवेशद्वार इ . , कॅफेटेरिया व कॅन्टीन , बैठक कक्ष , कॉन्फरन्स हॉल , उपलब्ध मोकळी जागा , व्हरांडा , प्रवेशद्वाराचे गेट / फाटक , बंकर्स , कॅबिन , इ . इतर साहित्य तसेच लिफ्ट , बाथरुम , प्रसाधनगृहे , पाण्याचे ठिकाणे , भिंती व इतर सर्व पृष्ठभाग , सार्वजीनक इमारतीतील सर्व वॉश बेसिन्सच्या नळांना तोटया बसविण्यात यावे . बाहेरुन येणा - या कामगारांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था संबंधीत कार्यालयप्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी . त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनवर अवलंबून राहावे लागू नये वाहन क्षमतेच्या 30 ते 40 % प्रवासी वाहतुक करण्यानस परवानगी असेल कार्यालयाचे आवारात येणारी सर्व वाहने निर्जंतुक करुन घ्यावीत . शासकिय आवारात / कार्यालयाचे आवारात प्रवेश करणा याची अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करुन घ्यावी . स्पर्श न करता वापरता येण्याजोगे हात धुण्यारकरिताची साधने . पुरेशा प्रमाणातील सॅनिटायजर्स प्रवेशद्वाराजवळ तसेच निर्गमन द्वाराजवळ ठेवण्यात यावे कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन अवकाश कालावधीमध्ये शिथीलता ठेवावी . 10 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असेल अशा बैठका टाळाव्यात कामाच्या ठिकाणी , बैठकीनिमित्त जमावाचे ठिकाणी एकमेकापासून 6 फूट अंतरावर बैठक व्यावस्था असावी . लिफ्टमध्ये एकावेळी 2 / 4 व्यीक्तीस ( त्या चे आकारमानानुसार ) प्रवेश द्यावा चढण्यासाठी जिन्या च्यार वापरास प्रोत्साहन द्यावे गुटखा , तंबाखू यावर कडक निर्बंध असुन सार्वजनीक ठिकाणी थुकण्यास सक्त मनाई आहे . दोषी व्यक्तीं विरुध्द आदेशातील नमुद तरतुदीनुसार कारवाई करावी . अनावश्यक अभ्यागतांना शक्यतो टाळावे . कोविड रूग्णांवर उपचार करण्यास अधिकृत असलेल्या जवळपासच्या भागातील रूग्णालयांची नोंद करुन घ्यावी आणि सदर दवाखान्यांची यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध असावी सर्व तालुक्याचे तहसिलदार तथा ईन्सीडेंट कमांडन्ट हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होणा - या अत्यावश्याक हालचाली करीता पासेस वितरण करतील जसे सूट दिलेली कार्यालये कामाच्या ठिकाणे , कारखाने व आस्थापनांमधील कर्मचारी इत्यादी . अशा दिलेल्या सर्व पासच्या प्रती स्थानिक पोलिसांना अग्रेषित करावे .

कोविड 19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे काटेकोर पालन करावे - - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड , दि . 19 : - कोविड - 19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाची अंमलबजावणी आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार करणे अनिवार्य असुन दोषीविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचा प्रावधान आहे . सार्वजनिक स्थळ सर्व सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी चेह - यावर मास्क रुमाल वापरणे बंधनकारक आहे . भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा ( Social Distancing ) नियम पाळण्याची खात्री करण्यात यावी . कोणतीही संस्था अगर व्यवस्थापक हे सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा जमाव होऊ देणार नाही . अंत्यसंस्कार या ठिकाणी होणारे जमाव आदेशात नमुद तरतुदीनुसार नियंत्रित करावे सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास आदेशात नमुद तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करावी . तसेच दारु , गुटखा , तंबाखू इ . च्या विक्रीवर कडक निर्बंध असतील धुंकण्यानस सक्त मनाई असेल . अशा व्यहक्ती विरुध्दख आदेशात नमुद तरतुदीनुसार कारवाई करावी .कामाचे ठिकाण सर्व कामाच्या ठिकाणी संबंधीत विभागप्रमुख । आस्थाप्रमुख यांनी तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था असेल आणि तेथे सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावी . कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर ( Social Distancing ) सुनिश्चित करण्यासाठी कर्मचा - यांच्यास भोजन अवकाश कालावधीमध्ये शिथीलता ठेवावी . 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती सह - रुग्ण , 5 वर्षाखालील मुलांच्या पालकांना घरातून काम करण्यास प्रोत्साहित करावे . खासगी आणि सार्वजनिक अशा सर्व कर्मचा - याना आरोग्यसेतुच्या वापरास प्रोत्साहित केले जावे . सर्व संस्थांनी आपले कामाची ठिकाणे शिफ्टबदली दरम्याान निर्जंतुकीकरण करुन घ्यावीत . मोठया बैठका टाळाव्यात . उत्पादन आस्थापना सामान्यतः वारंवार साफसफाई व हात धुणे अनिवार्य करावे शिफ्ट बदलामध्ये अंतर असावा . कॅन्टीनमधील भोजनावेळी सामाजिक अंतराचे पालन करावे . सुसंवाद व संभाषणाच्या माध्यमातुन स्वाच्छते बाबत प्रशिक्षण घेतले जावे , असे जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी कळविले आहे .

कोरोना बाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आल्याने भोकर येथील १२ पोलिस कर्मचारी


तपासणी नाक्यावरील तीन कर्मचारी होमकॉरंटाईनवर भोकर तालुक्यात माजली एकच खळबळ
 भोकर | करोना बाधित पॉजिटीव्ह ट्रक चालकाच्या संपर्कात आल्यामुळे भोकर येथील ०३ पोलीस अधिकारी , ०९ पोलीस कर्मचारी , ०२ होमगार्ड , ०१ आरटीओ अधिकारी , ०२ आरटीओ कर्मचारी , ०१ स्वयंपाकी अश्या एकूण १८ जनांना श्री गुरुगोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय नांदेड येथे पुढील तपासणीसाठी पाठवून होमकॉरंटाईन केल्याची घटना दि . १८ एप्रिल रोजी घडल्याने भोकर शहरासह तालूक्यात खळबळ उडाली .तेलंगणा राज्यातील करिमनगर येथील ट्रक चालक याला अस्वस्थ वाटू लागल्याने दि . १४ एप्रिल रोजी दवाखान्यात गेला असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील रिपोर्ट येई पर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला . परंतु खांबगाव येथील आंबे ट्रक मधे भरलेले असल्याने सदर डिलेव्हरी घेऊन सदर ट्रक चालक भोकर - म्हैसा बॉर्डर वरिल तपासणी नाक्यावर १६ एप्रिल रोजी सकाळी पोहंचला असता तपासणी नाक्यावरील तीन कर्मचाऱ्यां सह पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येवून सदर ट्रक चालक खांबगाव येथे आंबे उतरवून परतीला येवला येथून कांदा भरून निघाला . सदर ट्रक चालकाचा करोना पाँझिटीव्ह रिपोर्ट आल्याने तेलंगणा येथील पोलीस ट्रक चालकाचा शोध करत होती . परंतु ट्रक चालकाचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होत नसल्याने याबाबत ची माहिती भोकर पोलिसांना दिली . दि . १८ एप्रिल रोजी पहाटे सदर ट्रक कांदे घेऊन राहटी येथील तपासणी नाक्यावर परत आला असता ट्रक अडवून ट्रक चालकासह क्लिनर ला ताब्यात घेऊन याबाबत माहिती तेलंगणा पोलीसांना दिली . तेलंगणा येथील वैद्यकीय टिम बॉर्डर वरून करोना बाधित ट्रक चालकाला व सोबतच्या क्लिनरला अंबुलन्स मधून पुढील उपचारासाठी घेऊन गेले . या ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या तपासणी नाक्यावरील कर्मचारी , पोलीस कर्मचा - या सह तपासणी नाक्यावरील स्वंयपाक्यास असे एकूण सोळा जणांना होमकारमटाईम प्रशासकीय पातळीवर करण्यात येवून नांदेडला वर्ग केले आहे . सदर घटनेची माहिती भोकर शहरासह तालुक्यात पसरली असता नागरिकांत एकच खळबळ उडाली असुन सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असुन वरिष्ठ पातळीवरुन या घटनेबाबत त्वरित पाऊले उचण्यात येवून परिस्थिती वर बारकाईने लक्ष केंद्रित करून शासनातर्फे पाऊले उचलली जात आहेत .

लाॅकडाऊनच्या काळात वाहन धारकांकडून पावणेदोन लाखाचा दंड वसूल

          धर्माबाद वाहतूक पोलिसांची कामगिरी
धर्माबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी काही हौसी तरुण वाहन घेऊन विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांना आवर घालण्यासाठी वाहतूक शाखेचे पो . हे . कॉ . सूर्यवंशी शिवाजी व माधव पाटील खतगावकर यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांना पकडून त्यांच्याकडून दंड वसुलीची मोहीम राबवीत असून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १७ एप्रिल २०२० पर्यंत ५९१ वाहनधारकांकडून १ लाख ७७ हजार २०० रुपये दंड वसुल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली आहे . त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दनाणले आहेत . जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवून ३ मे पर्यंत केलेला आहे . वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व सफाई कामगार यांच्या सततच्या परिश्रमामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे . व बऱ्याच प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होत असताना दिसत आहे . जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कठोर पावले उचलली असून विनाकारण बाहेर फिरणार्या लोकांची गय न करता योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत . त्यानुसार धर्माबाद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी धर्माबाद शहरात वाहन धारकाविरोधात धडक मोहीम सुरू केली असून वाहतूक शाखेचे पो . हे . काँ . शिवाजी सुर्यवंशी व माधवराव पा . खतगावकर या जोडीने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दि . १७ एप्रिल पर्यंत ५९१ वाहन धारकाविरोधात कार्यवाही करून १ लाख ७७ हजार २०० रुपये दंड वसूल करून वाहन धारकांना चाप लावीत सरकारी तिजोरीचा महसूल वाढविला आहे . या कार्यवाहीत सहा . पोलीस निरीक्षक अशोक उजगरे , पो . उप . निरीक्षक अनिल सनगले यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .

वादळी वारा व गारपीट झाल्याने चिटमोगरा परिसरातील शेतकरयांचे प्रचंड नुकसान

बिलोली | तालुक्यातील चिटमोगरा येथे वादळी वारा व पाऊसासह गारपीट झाल्याने अनेक शेतकरयांच्या शेतीपिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी  मागणी केली जात आहे . बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली . या गारपीट व अवकाळी पावसामुळे अनेक पिके भुईसपाट झाले . तोंडाला आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने आज शेतकरी संकटात सापडला आहे . या गारपीटीमुळे रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून , गावातील अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहे . या झालेल्या गारपीटीत टरबूज , भुईमूग , गहू , ज्वारी व भाजीपाल्यांसह फळबागांची नुकसान झाली आहे . सध्या जगभर चालु असलेल्या कोरोना या महामारीच्या संकटासमयी वादळी वारा व पाऊसासह गारपीट झाल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे . या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घरमालक यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. 
                                           प्रतिनिधी:शुभम निदाने

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय ; राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सोमवार पासून उपस्थिती 10 टक्के

 नांदेड: - संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती 10 टक्के इतकी ठेवण्यात यावी . याअनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव , संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी , असे सामान्य प्रशासन विभागाने दि . 18 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आदेशीत केले आहे . कोरोना विषाणूंचा ( कोव्हीड 19 ) प्रसार राज्यातील कार्यालयामध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी , कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने सामान्य प्रशासन विभागाकडून शासन आदेशान्वये विविध सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत . शासन अधिसुचनेनुसार राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे . शासन निर्णय 23 मार्च 2020 अन्वये शासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती 5 टक्के इतकी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या . आता 15 एप्रिल रोजीच्या अधिसुचनेनुसार लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आल्या असल्याची बाब विचारात घेऊन तसेच यासंदर्भात सर्वंकष विचार करुन राज्याच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित शासन निर्णय 18 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत केला आहे . संपूर्ण राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती 10 टक्के इतकी ठेवण्यात यावी . याअनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी . तथापि मंत्रालयातील सर्व सह / उपसचिवांनी कार्यालयात उपस्थित रहाणे बंधनकारक राहील . यापैकी महिला अधिकाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीपासून सूट देण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन सचिवांना / कार्यालय प्रमुखांना राहतील . या उपस्थितीबाबतचे आदेश सोमवार 20 एप्रिल 2020 पासून अंमलात येतील . या आदेशाचा भंग करणारे अधिकारी , कर्मचारी हे शिस्तभंगाविषयक कार्यावाहीस पात्र राहतील . मंत्रालय उपहारगृह तात्काळ सुरु करण्यासाठी संबंधित कार्यासनाने यासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही करावी . लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये उपनगरीय सेल्वेसेवा पूर्णपणे बंद असल्याने बृहन्मुंबई येथील शासकीय कार्यालयातील तसेच मंत्रालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बससेवेचा उपयोग करावा . तसेच बहन्मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीही संबंधित प्राधिकरणाच्या उपलब्ध बससेवेचा उपयोग करावा . कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . तथापि असे निदर्शनास आले आहे की , अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या पुरेशी नसल्याने त्यामध्ये अत्यंत गर्दी होत असल्याने कर्मचाऱ्यांना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही . परिणामी अनेक अधिकारी कर्मचारी कार्यालयात जाण्यास इच्छूक नसल्याचे दिसते . सबब या बसेसधील प्रवशांमध्ये उपलब्ध आसन व्यवस्थेपेक्षा अतिरिक्त प्रवासी घेतले जाणार नाहीत याची संबंधित स्थानिक प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या प्रशासनाने उचित दक्षता घ्यावी . तसेच तशी सूचना सर्व संबंधितांना निर्गमित कराव्यात याकरिता सकाळी 7 ते 11 या कालावधीत तसेच सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत पुरेशा संख्येने बसेसच्या सेवा उपलब्ध होतील याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात . मंत्रालयातील अधिकारी , कर्मचारी यांची असलेली मोठी संख्या तसेच त्यांना दरच्या ठिकाणावरुन करावा लागणारा प्रवास तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील त्यांची अवलंबितता या सर्व बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास याद्वारे आदेशित करण्यात येते की , त्यांनी सकाळी 7 ते 11 यावेळेमध्ये पश्चिम रेल्वे , मध्य रेल्वे , हार्बर या रेल्वेस्थानकाजवळून मंत्रालयापर्यंत ( मधल्या विविध टप्पा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनाही घेऊन ) त्याचप्रमाणे सायंकाळी 4 ते 7 यावेळेत मंत्रालयापासून उक्त स्थानकापर्यंत जाण्यासाठी विशेष व पुरेशा संख्येने बसेसच्या सेवा सुरु कराव्या बसमधील गर्दी टाळण्याकरिता दोन बसेसमधील कालावधी जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी .बृहन्मुंबई क्षेत्राकरिता बेस्ट यांनी वरीलप्रमाणे विशेष बससेवा मंत्रालयीन अधिकारी , कर्मचारी यांच्यासाठी सुरु कराव्यात या सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . असेही सामान्य प्रशासन विभागाने दि . 18 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केले आहे .

18 April 2020

कोरोनाच्या सावटाखालील खानापुरातील लग्नाची अशीही गोष्ट . . . !

देगलूर:संपूर्ण जगाला कोरोना महामारी ने ग्रासले असताना भारतीय विवाह संस्कृतीला हा विषाणू धक्का लावू शकला नाही सोशल डिस्टन्सची लक्ष्मण रेषा पाळत काढलेला मुहुर्त ,ठरलेली वेळ , यानुसार ही कन्यादान करता येते हे खानापुरातील एका लग्नाच्या गोष्टीवरून दिसून आले . जल्लोषात लग्न करता येणार नसल्याने काही काळ हिरमोड ही झाला , लग्नावर होणारा खर्च टाकल्याने त्यातुन बचत झालेल्या रकमेतून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेत इंगळे व हिवराळे परिवाराने सामाजिकतेचे भान जपत कोरोनाच्या सावटाखालील लग्नाच्या निमित्ताने कोरोना विरोधी लढण्याचा निर्धारही बोलून दाखविला.खानापूर ग्राम पंचायतीचे सदस्य माधवराव इंगळे यांची एकुलती एक कन्या पूजा चा वाढनिशचय मुखेड तालुका जांभळी येथील आनंदराव हिरवाळे यांच्या गणेश या मुलांशी कोरोना ची चाहूल जगाला लागण्यापूर्वीच झाला होता .दिनांक १५ रोजी दुपारी बारा - एक वाजता विवाहाचा मुहूर्त ही त्यावेळीच ठरविला गेला होता . मुहूर्ताची घटिका भरण्यापूर्वीच कोरोना चे आक्रमक वाढत गेले पंतप्रधानांनी जाहीर केलेला लाकडाऊन संपल्यानंतर विवाह मुहुर्त असल्याने वर वधूचे पिता निधारस होते . इकडे विवाहाच्या पत्रिका व इतर तयारीसाठी खानापुरच्या जगदंब ग्रुप ,देवा ग्रुप ,बसवा ग्रुप , कृष्णा मित्रमंडळाने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सोशल डिस्टन्स पाळत लग्नाची जय्यत तयारीही चालवली होती मात्र वरचेवर कोरोनाचे संकट गडद व्हायला लागल्याने पंतप्रधानांनी लाकडाऊन ची मुदत तीन मे पर्यंत वाढवली . वधुपित्याने ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या समन्वयातन ठरलेल्या मुहूर्तालाच शासनाच्या नियमांचे पालन करीत कन्यादान करण्याचा निर्णय घेतला . बुधवार १५ रोजी पुजा व गणेश हे अवघ्या अकरा वराडाच्या उपस्थितीत घरातील तुळशी वृंदावनाच्या साक्षीने विवाहबुध्द होत . . . गो कोरोना . . . . कोरोना गो . . . असा संदेशही दिला वरासह आलेले माता - पिता व मामानी वधु परिवारा । कडील आदरतीर्थ स्वीकारीत आलेल्या वाहनांसह लागलीच जांभळी ता मुखेड कडे रवानाही झाले . यावेळी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला वधूचा भाऊ अभिजीतने लावलेली वहिण निघाली सासरला ही धन ऐकताच उपस्थितीताचा डोळ्याच्या कडा ओलावल्या . . . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , अनावश्यक खर्च टाळून , प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत एकुलत्या एक कन्येचे कन्यादान केले . या महामारी संकटामुळे अनेका पुढे अनेक प्रश्न , उभे टाकले आहेत . मी माझ्या परीने यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे मनोमन माध्यमांशी संवाद साधताना सांगितले . . 
                                          .. प्रतिनिधी गंगाधर भोयावार

तेलगंणा राज्यातून कुंडलवाडीत आलेल्या चार जणांवर गुन्हा दाखल

कुंडलवाडी | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे देशात ३ मे पर्यंत लाँकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे . महाराष्ट्र - तेलगंणा सीमावर्ती भागात तेलगंणा राज्यातील गावात कोरोना विषाणूचे रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील तेलगंणा त अडकलेले नागरिक महाराष्ट्रात शेतातुन , नदीपात्रातुन , पायीवाटेन दिवस रात्र येत आहेत . तेलगंणातुन कुंडलवाडी शहरात आलेले ४ जणांना कुंडलवाडी पोलीसांनी दि . १५ एप्रिल रोजी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वांरनटाईन केले आहे .कुंडलवाडी शहरासह बिलोली तालुका हा तेलगंणा च्या सीमेवर आहे . कोरोना विषाणू चे पॉझिटिव्ह रूग्ण तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यात आढळून आले . त्यामुळे महाराष्ट्रातून तेलगंणात गेलेले नागरिक घाबरून घराकडे येण्यासाठी पायी चालून येत आहेत . दि . १५ एप्रिल रोजी सांयकाळच्या सुमारास तेलंगणा राज्यातून चार जण तेलगंणातील बोधन येथील पाहूण्यांना भेटून नागणी पर्यंत पायी येऊन नागणीहून एम . एच . २६ बीके ८८६० या वाहनातून येऊन कुंडलवाडी शहरातील चुंगी नाका येथे आले असता बिलोलीचे नायब तहसीलदार रघूनाथसिंह चौहान , कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे , पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांनी सदरील वाहनास थांबवून चौकशी केली असता त्यात ४ जण तोंडाला रूमाल न बांधता प्रवास करीत असलेले आढळले . अधीकची चौकशी केली असता ते तेलगंणातुन आल्याची माहिती समोर आली . त्यावरून उपरोक्त चार जणांची बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली . व त्यांना सीआरपीसी कलम ४९ ( अ ) प्रमाणे नोटीस देऊन त्यांच्या हातावर होम क्वांरनटाईन चे शिक्के मारून घरी राहण्यास सांगण्यात आले आहे . संचारबंदी व जमावबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे कर्मचारी धोंडीबा वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त चार जणांविरुद्ध १८९७साथरोग प्रतिबंधात्मक कायदा कलम १८८ , २६९ , ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि सुरेश मांटे यांच्या मार्गदर्शनाखाली एस . आय . इंगळे हे करीत आहेत .

16 April 2020

गुटखा विक्री : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड दि . 16 : - गुटखा , पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणारे कंधार भवानीनगर येथील राहुल बन्सीलाल व्यास व कंधार छोटी गल्ली येथील शेख मतीन शेख नजीर या दोघांनी मोटार सायकल क्र . एम एच 26 . बि . एम . 6830 या वाहनाद्वारे कंधार तालुक्यातील कुरळा येथे प्रतिबंधीत अन्न पदार्थ 11 हजार 880 रुपयांचा साठ्याची विक्रीसाठी वाहतूक करत होते . याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा व भा . द . वि . नुसार गुन्हा दाखल केला आहे . ही कार्यवाही सहायक आयुक्त ( अन्न ) तु . चं . बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली . प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणुक वाहतुक , विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या चोरटया पद्धतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री उत्पादन साठा वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाहीस समोर जावे लागेल , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती

नांदेड दि . 16 : - जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून ही नांदेड जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे . आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 556 आहे . यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 169 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 60 नागरिक आहेत . यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 नागरिक आहेत . तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 517 अशी संख्या आहे . आज तपासणीसाठी 22 नागरिकांचे नमुने घेतले होते . आजपर्यंत एकुण 296 नमुने तपासणी झाली आहेत . यापैकी 226 नमुने निगेटीव्ह आले असून 65 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे . तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत .जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 74 हजार 326 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे . तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत . यामध्ये कंधार तालुक्यात - 9481 . किनवट - 2526 . देगलूर 7195 , धर्माबाद - 1505 , बिलोली - 4413 , लोहा - 4963 , उमरी - 1938 , हदगाव - 5982 , भोकर - 2220 , मुखेड 11637 , मुदखेड - 1780 , अर्धापूर - 2356 , माहूर - 3437 , हिमायतनगर - 1979 , नायगाव - 6383 , नांदेड तालुका 2442 तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड 4089 यानुसार जिल्ह्यात एकुण प्रवासी संख्या 74 हजार 326 एवढी आहे , अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे .