नांदेड, बातमी दि:24 ः कोरोनासारख्या आजाराला अटकाव घालण्यासाठी यमराज रस्त्यावर अवतारल्याचे शुक्रवार दि. 24 रोजी वजिराबाद परिसरात बघायला मिळाले. तु रस्त्यावर आल्यास तुझ्या घरात कोरोना येणार असा इशारा या वेळी रस्त्यावर फिरणार्या वाहनचालकांना यमराजांनी दिली.जगभर कोरोनाने थैमान घातले, असून प्रत्येक गाव व शहर हे कोरोनाच्या संसर्गामुळे पछाडले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये,यासाठी देशभर लॉकडाऊन केले, तरी रस्त्यावर फिरणार्या हवसे-नवसे व गवशांची संख्या कमी नाही. पोलिसांनी अनेकांना लाठयांचा प्रसाद दिला, तरी यात सुधार बसून शहाणे होण्याचे प्रमाण ही कमीच आहे. यांना प्रबोधनाच्या माध्यमातून तरी अक्कल यावी, यासाठी पोलिस प्रशासनाने यमराजांना रस्त्यावर उतरविण्याची शक्कल लढविली.या वेळी वजिराबाद पोलिस स्टेशन व सप्तरंग सेवा संस्थेच्या पुढाकाराने वजिराबाद चौकातून दुचाकीवर फिरणार्या स्वारांना कोरोनाचे महत्व पटवून देण्यात आले. असेच बाहेर फिराल तर, घरात कोरोनाला घेऊन जाल.त्यामुळे रस्त्यावर न येण्याची ताकीद ही या वेळी यमराजांनी दिली. या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी भेटी दिली. यमराजचर भूमिका यश जेठवाणी तर चित्रगुप्ताची भूमिका गणेश काकडे यांनी साकारली.







0 comments:
Post a Comment