बिलोली :तालुक्यातील बेळकोणी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार योजनेतील शिल्लक तांदूळ चे वाटप अतिशय शिस्तबद्ध व रांगेत सोशल डिस्टन्सिंग ची काटेकोर पणे अंमलबजावणी करत वाटप केले.सध्याच्या कोरोना विषाणू च्या संसर्गा मुळे निर्माण झालेल्या महामारी चा मुकाबला करत असताना शाळेतील शिल्लक तांदूळ वाटप पालकांना करत असताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेने कळविले होते.कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी योग्य अंतर ठेवून एक मीटर अंतरावर खूणा करुन जाण्याचा येण्याचा मार्ग वेगवेगळा ठेवून व गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.वाटपासाठी मुख्याध्यापक कदम सर,बुद्धेवार सर, रोडे सर, लिपीक छाया यरकवाड,अवधुत यरकलवाड यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
23 April 2020
Home »
» बिलोली :तालुक्यातील बेळकोणी (खु)येथे छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार वाटप







0 comments:
Post a Comment