बिलोली: शहरातील आंबेडकर नगर येथील समाज मंदिर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व सोशल डिस्टन्सचे पालन करत केली साजरी.भारतासह जगभरात 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते . याही वर्षी ही जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन सुरू असतानाच कोरोना या भयानक व्हायरस ने डोके वर काढले आहे . भारतातही त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे . त्याचाच परिणाम म्हणून देशासह राज्यात यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता घरातच पण उत्साहात साजरी करण्यात आली.आंबेडकर नगर येथील समाज मंदिर येथे नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष मारोती पटाईत,भाजपा युवा चे तालुकाध्यक्ष ईद्रजीत तुडमे,नगरसेवक प्रकाश पोवाडे यांच्या सह आदींची उपस्थिती होते .
14 April 2020
Home »
» बिलोलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोशल डिस्टन्सचे पालन करत केले साजरी







0 comments:
Post a Comment