जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 April 2020

मांजरम येथे विज पडून शेतकरी व बैल ठार,मुलगा गंभीर जखमी

नायगाव: तालुक्यातील माजरम येथे वीज पडून एक शेतकरी ,व बैल जागीच ठार तर शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्राथमिक उपचार करून नांदेड  येथे  हलविण्यातआले .ही घटना सोमवार दि.६ एप्रिल रोजी सांयकाळी ४:३० वाजता घडली.माजरम येथील शेतकरी मारोती व्यंकटराव शिंदे वय 42 वर्ष हा आभाळ व विजेचा कडकडाट पाहून शेतातील बैल खोपित बांधण्या साठी नेत असताना बैल व शेतकरी जागीच ठार झाला.पाठी मागे बैल  हाकणारा मुलगा कृष्णा मारोती शिंदे वय 13 वर्ष हा विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. जखमी वर नायगाव ग्रामीण रुग्णालयात  डॉ.देवणीकर देशपांडे यांनी प्राथमिक उपचार करून नांदेड येथे रवानगी केली तर मयत मारोती शिंदे यांचे शवविच्छेदन प्रक्रिया चालू होती.मयत मारोती शिंदे  कै.माजी प .स .सदस्य दता पाटील शिंदे यांचा धाकटा बंधू होय.मुलाच्या शिक्षणासाठी असणारे कुटुंब कोरोना मुळे गावाकडे आले आहे.सालगडी सुट्टीवर असल्यामुळे शेताकडे गेले असता ही घटना घडली.  या घटनेने मांजरम गावावर  व परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे .

0 comments:

Post a Comment