जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

11 April 2026

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्केनागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड, दि.११ एप्रिल:- #नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. 

त्यानुसार राष्ट्रीय #भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.45 Hrs. वाजता या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी नोंदविण्यात आली असून, याचा केंद्रबिंदु हिंगोली जिल्ह्यातील #वसमत तालुक्यातील #शिरली गावाच्या उत्तरेला असल्याचे कळते. 

सदर धक्का हा सौम्य प्रकारचा आहे . तसेच या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत संबंधित तहसीलदार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. 

याबाबत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत प्रशासनाशी आपण संपर्कात असून नागरिकांनी सतर्क राहावे,घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर नागरिकांनी सतर्क राहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे.

08 April 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम



जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 
नांदेड दि.8 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या विशेष मोहिम शिबीर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त अर्जदार-पालकांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य, व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे. 

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम येत्या 8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा करण्याचा शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी घेतला आहे. या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत या कालावधीत समिती कार्यालयात पुढीलप्रमाणे विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. 

विशेष मोहीम कार्यक्रम

बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी शैक्षणिक, सेवा व निवडणूक विषयक ज्या जाती दावा प्रकरणामध्ये कागदपत्रे पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा अर्जदार यांना त्रुटी पूर्ततेबाबत समितीने यापूर्वी एसएमएस व ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. अशा अर्जदार अथवा पालकांनी सदर दिवशी उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता केल्यास अशा प्रकरणात प्राधान्याने समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. 

गुरूवार 9 व शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी समिती स्तरावर विशेष सुनावणी आयोजित करुन जाती दावा प्रकरणे प्राधान्याने व निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच विशेष सुनावणी दरम्यान उपस्थित अर्जदार-पालक यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत समक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी समितीने वैध केलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन वैधता Validity प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.