This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
30 November 2019
डॉ. प्रियंका खून आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे
भाजपचा ‘हा’ खासदार अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज महाविकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी होणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.
नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळ जवळ एक तास चर्चा झाली. चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.पवार आणि चिखलीकर यांच्यात काय चर्चा झाली याबाबत तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, प्रतापराव चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती.
पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून मारल्याची घटना
29 November 2019
आदर्श प्ररकरणाची कोणतीही चौकशी नाही असे ED ने स्पष्ट केले
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची निवड
मुंबई | विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने हंगामी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता वळसे पाटलांची निवड झाली आहे.महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी मांडण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना कोणतीही अडचण होऊ नये आणि कोणताही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी वळसे पाटलांची निवड झाली आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांना संसदीय राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद भुषवलं आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज!
‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’; मंत्रालयातील केबिनबाहेर लागली पाटी
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हजारोंच्या जनसमुदायासमोर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज ते मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या केबिनबाहेर ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी पाटी लावण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मंत्रालयात जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांचे केबिनही सजवण्यात आले असून त्यांच्या नावाची पाटी दरवाजावर लावण्यात आली आहे.उद्धव ठाकरे महाराष्ट्र विकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली. 20 वर्षानंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला असून उद्धव ठाकरे सैनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.
दरम्यान, शिवसेनेनं भाजपसोबत युती करत विधानसभा लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजप-सेनेमध्ये बिनसलं. उद्धव ठाकरे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. आघाडीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे.
काँग्रेस च्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले उद्धव ठाकरे यांना पत्रा द्वारे शुभेच्छा
शिवतिर्थावरील शपथसोहळ्यात उद्धव ठाकरेंसोबत ‘या’ नेत्यांनीही घेतली शपथ!
मुंबई | बरोबर सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी जयंत कुसुम राजाराम पाटील असं म्हणत आणि शरद पवार साहेबांना वंदन करून शपथ घेतो की, असं म्हटलं. यावेेळी शिवतिर्थावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसंच राष्ट्रवादीचे दुसरे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण केलं. त्याचबरोबर भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन केलंदुसरीकडे काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. तर विदर्भातले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत आणि तथागत गौतम बुद्ध यांना साक्ष ठेवत मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
28 November 2019
देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापन झाल्या वर पहिली टीका
स्थापन झाल्या च्या काही तासात
आला आहे. फडणवीस यांनी ट्विटर वर सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवला असून पुन्हा विदर्भाचा राग आळवला असल्याचं समोर आलं आहे.फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारे माप घोषणा असल्या तरी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटेवर वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख ही सुद्धा असू नये हे दुर्दैवी आहे. असं म्हणत नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा करू असं ट्विट केलं आहे.
महाविकासआघाडीचा खातेवाटप फॉर्मुला ठरला
27 November 2019
सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले: एकनाथ खडसे
बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला!
मुंबई | बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार तातडीने सिल्व्हर ओकवर रवाना झाले होते.
दरम्यान, अजित पवार ही त्यांच्या निवासस्थानाहून सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाले होते.
शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.
26 November 2019
बिलोली येथील विद्यानिकेतन शाळेत संविधान दिन साजरा
जे भल्याभल्यांना जमलं नाही ते भाऊजी सदानंद सुळेंनी करून दाखवलं ?
*26/11चा मुंबई हल्ला : 'कसाब रोबोसारखा गोळीबार करत होता आणि मी त्याचे फोटो घेतले'*
मी पुन्हा येईन, पुन्हा येईन…या या या आमच्या बोकांडी बसा”
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हे वाक्य म्हटलं होतं. त्यांचं हे वाक्य संपुर्ण महाराष्ट्रभर गाजलं. देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्यामुळं सोशल मीडियावर विरोधकांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. आता तर त्यांच्या याच वाक्यावर एक गाण आलं आहे.
‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा…या या या आमच्या बोकांडी बसा’ अशी गाण्याची सुरूवात आहे. गायक साजन बेंद्रेंनी हे गाण गायलं आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्राभर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ ही टॅगलाईन चांगलीच गाजली. या टॅगलाईनला कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनातील ‘या या या बसा आमच्या बोकांडी’ ही क्लीप कापून फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ या क्लीपला एकत्रित जोडली गेली. त्यानंतर ही क्लीप महाराष्ट्रातील अनेकांच्या व्हाट्सअप स्टेटसह फेसबुक, इन्टाग्रामवर पाहायला मिळत होती.
दरम्यान, गायक साजन बेंद्रे यांंचं हे गाण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.
25 November 2019
आमचं अगोदरच ठरलं होत अजित पवारांचा गौप्यस्फोट ?
राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समीतीची मागणी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार फडणवीस सरकारचं भवितव्य; आज होणार सुनावणी
नवी दिल्ली | राज्यातील सत्तेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झालाय. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीलाचं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. तर सुप्रिम कोर्टाने राज्यपालांचा आदेश आणि आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्याचा आदेश दिलाय. या सगळ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देतं यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद आता कोर्टात पोहोचलाय.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याची बाजू मांडतांना कपिल सिब्बल यांनी फडणवीस सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
दरम्यान, जर राज्यात भाजपकडं बहुमत आहे तर त्यांनी ते आजचं सिद्ध करावं. तसेच मध्यरात्री अचानक राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केला.
24 November 2019
23 November 2019
शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट एअरपोर्टवरुन पकडून आणलं!
मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठ्या अनाकलनीय घडामोडी घडत असून आता असाच एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला चक्क एअरपोर्टवरुन पकडून पुन्हा परत आणलं आहे.
संजय बनसोडे असं या राष्ट्रवादीच्या आमदाराचं नाव आहे. ते उदगीर जळकोट मतदारसंघातील आमदार आहेत.राष्ट्रवादीचे काही आमदार विमानतळावरुन महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचं समोर आलं होतं. त्यांची नावं आणि विमानाची वेळही समोर आली होती. या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोडे यांना चक्क पकडून आणलं. त्यांना शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या
महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस
अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी; प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार
मुंबई | अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या एकदम विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता अजित पवारांसोबत जाणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडते आहे. त्या पत्रकार परिषदेला पवार संबोधित आहे.
आम्हाला अजित पवार यांनी मला फोन केला. मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यानंतर तिथे 8 ते 9 आमदार आले. अजित पवारांनी राजभवनावर नेलं. आणि त्यानंतर काही कळण्याच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली, असा सविस्तर वृत्तांत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.संयुक्त पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे हे उपस्थित आहेत.
दरम्यान, अजित पवारांसोबत राजभवनात हजर असलेल्या पण परत आलेल्या आमदारांनी शरद पवारांसोबतच राहण्याचं आश्वासन दिलं आहे.
22 November 2019
एसटीची पहिली स्लीपर बस 'रातराणी' प्रवाशांच्या सेवेत दाखल
21 November 2019
अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या; शिवसेनेची मागणी
20 November 2019
राष्ट्रीय विधी सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत बिलोली येथे भव्य रँली
19 November 2019
*१० नापास झालेल्या या मुलाने ३५ विमान तयार केलेत भाऊ.*
18 November 2019
सोशल मिडिया वर #मी_भाजप_सोडतोय ट्रेंड
17 November 2019
बाळासाहेब ठाकरेंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आठवणीतले काही खास फोटो…
15 November 2019
यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान- संजय राऊत
१७ आमदार स्वगृही येणार ! विखे - पाटील काँग्रेसमध्ये परतण्यास तयार !
मुंबई , बुधवार महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीत भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे . धक्कादायक माहिती म्हणजे भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी अहमद पटेल यांची भेट घेतली आहे . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशीदेखील चर्चा केली . एकूण १७ आमदारांना घेऊन आम्ही स्वगृही परततो , असा POP )निरोप राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडून आला आहे ! जे नेते भाजपात गेले ते जवळजवळ सर्वच्या सर्व पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये परतण्यास तयार झाले आहेत . फुटीर नेत्यांची बैठक काल संध्याकाळी झाली . जे जे फुटले आणि भाजपात गेले ते ते परत येण्यास तयार झाले आहेत .












