मुंबई | यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं आहे. ते मुबंईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील तर त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. शरद पवार शेतकऱ्यांसोबतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईलच, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच फॉर्म्युल्याची चिंता करू नका ते उद्धव ठाकरे ठरवतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.







0 comments:
Post a Comment