जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

26 August 2024

वसंतराव चव्हाण यांच्यावर नायगावात उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड दि. 26 ऑगस्ट :- नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्टला पहाटे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
       
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड मतदार संघातून ते विजयी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे प्रथम नांदेड येथे व नंतर हैद्राबाद येथे उपचार घेत होते. मात्र 26 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांनी दुखवटा व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात घेण्याचे निर्देश नांदेड जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
 
#वसंतराव चव्हाण यांचा परिचय
खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील नायगाव (बा.) आहे. त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.
 
राजकीय कार्य
स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.

11 August 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र. 17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणार

नांदेड दि. 11 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा अर्थात तीन हजार रुपये जमा होणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाच लक्ष अर्ज मंजूर झाले तरी ज्यांच्या खात्याशी आधार कार्ड संलग्न आहेत अशाच खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी जोडले गेले आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जाऊन आधार जोडणी करून घ्यावी. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब आवश्यक आणि अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे.

एक जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना 17 ऑगस्ट रोजी थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचा लाभ जमा होणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना सूचना

नागरिकांना आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने या कार्यात सहभागी असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मदत कक्ष प्रमुख, या सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांनी देखील ज्यांचे अर्ज नामंजूर असतील त्या सर्व लाभार्थ्यांची संपर्क करावा. त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. पुन्हा ऑनलाईन जमा करावेत. ज्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळेल. त्यामुळे ज्यांच्या त्रुटी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्रुटी दूर करण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

10 August 2024

गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हान यांचा हजारो गोर सैनिकाच्या सोबत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणारं

समाजासाठी दिवस रात्र काम करणारे,
बंजारा समाजासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून अन्याय व अत्याचाराच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकणारे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. जेव्हा जेव्हा बंजारा समाजावर अन्याय आणि अत्याचार होतो त्या वेळेस गोर सेना मैदानात उभी राहते बंजारा समाजातील ऊसतोड कामगारासाठीही गोर सेनेने अनेक आंदोलने केलेली आहे .वेगवेगळे मेळावे घेतलेले आहे. आणि शासनाच्या माध्यमाने त्यांच्या समस्येचे निराकरण केलं आहे. अन्याय व आत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रखर लढा उभा करणारे अरुण भाऊ चव्हाण आणि त्यांचें हजारो गोर सैनिक यांचा प्रचंड मोठा ताफा येत्या ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी रमेश चिनीतला, नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात, विजय वडेटीवार, अमित देशमुख यांच्या व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

साहेबांना आता वेळच वेळ, दलबदलू नेत्यांना धडा शिकवू सामान्य जनतेच्या भावना

बिलोली:देगलुर- बिलोली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. दीड, दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. उमेदवार घोषित होतील तेव्हा होतील, पण आतापासून मतदारसंघ पिंजून काढण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. विशेषता विद्यमान आमदार तर मतदारांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. ज्यांच्या भेठी घेण्यासाठी बंगल्यातून खाली येई पर्यंत तासनतास मतदारसंघातील सामान्य जनता बसून रहायची त्या आमदार साहेबांकडे आज घडीला कोणतेही काम घेऊन जा, आमदार महोदय ते काम करण्यासाठी तत्पर राहत आहेत. एवढेच नाही तर मी पुन्हा निवडून आल्यास तुमचे काम शंभर टक्के करतो, असे आश्वासनही देत आहेत. गेली अडीच वर्ष साहेबांना वेळ नव्हता, आता मात्र वेळच वेळ असल्याची कुजबुज ऐकावयास मिळत आहे. अडीच वर्षाच्या काळात कधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या अभिवादन चे बॅनर झळकले नाही मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या वेळेस बॅनर च बॅनर झळकले,सध्याच्या राजकारणात निष्ठा उरली नाही, असे लोक म्हणत आहेत. कारणही तसच आहे निवडणुकीच्या काळात आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी वाट्टेल ते करण्यास अनेकजण तयार आहेत. अनेक वर्ष एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी एका रात्रीतून दुसऱ्या पक्षाचा झेंडा फडकावण्यास हे तयार असतात. त्यामुळे स्वार्थी राजकारणी नेत्यांची संख्या जागोजागी दिसून येत आहे. अशा नेत्यांना मतदार ओळखून असते. परंतु, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही एकनिष्ठ कार्यकत्यांची, नेत्याच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेक दिवस पक्षासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी राबायचे अन् दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना ऐनवेळी संधी द्यायची, अशी प्रथा निर्माण झाली आहे. दिवस रात्र ज्या नेत्याला निवडून आण्यासाठी जे कार्यकर्ते मेहनत घेतली त्यांना मात्र आमदारांनी कधी कोणत्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली नाही.ज्यांनी मेहनत घेतली ते राहिले बाजूला मात्र हौशी कार्यकर्ते  घेऊन मिरवण्याचा एक नवीनच प्रकार पहावयास मिळत आहे.त्यामुळे अशा दलबदलू नेत्यांना धडा शिकविला पाहिजे, अशी कुजबुज जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

आज समस्त बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली- भोकर

 दि.9. गुरुवार (बातमीदार) भोकर विधानसभा मधील सर्व तालुक्यातील समस्त बंजारा समाज बांधवांची भोकर संगम मंगल कार्यालय येथे गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली, येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा तालुक्यातील प्रमुखासोबत केली, येत्या या विधानसभा निवडणुकांमध्ये आता ओबीसीचा नवीन चेहरा आता आमदार म्हणून आपण देऊया व तसेच आपण सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन या विधानसभा मध्ये आपली एकजूटता दाखवू आणि काम करूया असे उपदेश राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी आज समस्त बंजारा समाज बांधवांना बैठकीत सांगितले या बैठकीमध्ये गोरसेना जिल्हा अध्यक्ष पापाराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड, जिल्हा नायक प्रकाश राठोड,जिल्हा संघटक धोंडू राठोड, जिल्हा सचिव सखाराम राठोड, जिल्हा सहसचिव किशोर जाधव, तालुका अध्यक्ष मिलन जाधव, उमरी गोरसेना तालुका अध्यक्ष विष्णू जाधव, तसेच उमरी तालुक्यातील गोरसेना पदाधिकारी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते, भोकर गोरसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, उपाध्यक्ष योगेश जाधव, व तसेच भोकर येथील सर्व गोरसेना पदाधिकारी उपस्थित होते.

08 August 2024

साहेब, तुम्ही खरंच कोणत्या पक्षात? एकाच घराण्याचे नेतृत्व नको

बिलोली:महाराष्ट्राचे राजकारण सोबतच गेल्या तीन-चार महिन्यात नांदेड जिल्ह्यात अनेक घटना घडामोडी घडल्या. पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदलली. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली. अशोकराव चव्हाण यांनी आपल्यासोबत अनेक पदाधिकारी, नेतेमंडळींना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रमुख नेता उरला नव्हता. परंतु लोकसभेला मतदारांनीच काँग्रेसचा प्रचार करून नांदेडची जागा खा.वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला मिळवून दिली. सध्या अशोकराव चव्हाण यांचे मित्र, विश्वासू सहकारी स्व.आ.रावसाहेब अंतापुरकर यांचे सुपुत्र देगलुर बिलोली चे आमदार जितेश अंतापुरकर हे कोणत्या पक्षात आहेत, यावरून चर्चा होत आहे. मात्र त्यांनी मी काँग्रेसमध्ये असल्याचे सांगितले आहे. मात्र जिल्हा काँग्रेस कमिटीने सरळ शब्दात सांगितले आहे की अंतापुरकर हे कोणत्या पक्षात आहेत त्यांनाच माहिती असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी सांगितले की अंतापुरकर यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न च येत नाही येणाऱ्या काळात कोणत्या पक्षात राहतील अशी चर्चा नागरिकांमधून जोरदार सुरू आहे. त्यात मतदारसंघांतील नागरिक आपण ज्यांना निवडून दिलो ते जर निवडून आल्यानंतर त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात जात असतील तर काय म्हणून आम्ही निवडून द्यायचं असा काही रोष नागरिकांमधून व्यक्त होत आहे.तसेच भाजप नेते तथा खा.अशोक चव्हाण यांच्या समवेत भेटी घाठी घेत आहेत व ते खा.चव्हाण यांचा हात धरतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे.त्यामुळे साहेब, तुम्ही खरंच कोणत्या पक्षात आहात, अशी कुजबुज होत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काही मतदारसंघामध्ये नेत्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्याच नातेवाईकांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना आता आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का? असा विचार त्यांच्या मनात येत आहे. ज्यांनी अनेक वर्षे मतदारसंघावर राज्य केले, त्यांच्याच घरातील मुलाबाळांना उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही कधी निवडणूक लढवायची असा प्रश्न विचारला जात आहे. नेत्यांनी मोठे मन करून कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, अन्यथा कार्यकर्ते काहीही करू शकतात, अशी कुजबुज ऐकावयास मिळत आहे.

02 August 2024

भोकर काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी सुभाष भालेराव यांची निवड

भोकर प्रतिनिधी 
भोकर येथील सुभाष आनंदराव भालेराव यांची भोकर शहर काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली 
मागील लोकसभा निवडणुकीत सुभाष भालेराव यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्य केले भोकर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रचार सभा सहभाग नोंदविला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडली जागरूक मतदारांनी नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांना विजय केले.
सुभाष भालेराव यांची कार्यपद्धतीचा विचार करून काँग्रेस पक्षासी घनिष्ठ संबंध ठेवल्या मुळे त्यांची भोकर शहर काँग्रेस कमिटी शहर उपाध्यक्ष पदी निवड केली, हयावेळी 
तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, शहराध्यक्ष तोसिफ इनामदार, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी पाटील लगळूदकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार, समाजसेवक भिमराव दुधारे, तालुका उपाध्यक्ष गोविंद देशमुख, मुजीब अहमद, आशु पटेल, शिवसेना माजी तालुका अध्यक्ष सतीश देशमुख, राष्ट्रवादी च्याअध्यक्ष चंद्रकला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष साबळे मॅडम, आप्पाराव राठोड, दिगंबर चव्हाण, सोशल मीडिया प्रल्हाद सुंकळेकर यांच्या उपस्थितीत शहर अध्यक्ष तोसिफ इनामदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

व पत्रकार उत्तम कसबे, पत्रकार अनिल डोईफोडे,पत्रकार विशाल जाधव, पत्रकार गजानन गाडेकर, पत्रकार अनिल जाधव पाटील, पत्रकार अंबादास बोयावार, बालाजी कांबळे, चंद्रकांत बाबळे, गोविंद राठोड, अभिषेक चिंतावर, प्रकाश खांडरे सर, माधव गायकवाड, श्याम वाघमारे, अवधूत नामेवाड, अनिल बनसोडे, साईनाथ बरकमकर, नितीन वाघमारे,सदाशिव कराळे, अमर भालेराव,यांनी फोनवरून व व्हाट्सअप च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विद्यापीठ म्हणजे डॉ. अण्णा भाऊ साठे होय-संपादक उत्तम बाबळे

राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगारात साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी 

भोकर(प्रतिनिधी): साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी नकारात्मक परंपरेच्या तत्वज्ञान जगतात आपल्या झुंजार लेखणीच्या सामर्थ्याने वास्तव तथा सकारात्मक विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विचारपीठ तयार केले. यामुळेच त्यांचे साहित्य २७ भाषेत भाषांतरित झाले.नव्हे तर त्यांच्या साहित्यावर आज असंख्य अभ्यासक,विद्यार्थी अभ्यास करुन पीएचडी घेताहेत.म्हणून डॉ.अण्णा भाऊ साठे हे केवळ एक साहित्यिक नसून विज्ञानवादी मराठी साहित्याचे जागतिक विद्यापीठ होत,असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगाराच्या वतीने आयोजित डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भोकर बस आगाराच्या वतीने प्रति वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच औचित्याने भोकर आगारातील अधिकारी,कर्मचारी, चालक,वाहक व आदींच्या वतीने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी भोकर आगारात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संजयकुमार ना.पुंडगे हे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बस स्थानक प्रमुख पी.जी. साखरे,सेवानिवृत्त कर्मचारी सायलू काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटीत कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,नगर परिषद कर्मचारी संघटनेचे दिलीप वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार गाडेकर,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर चे पदाधिकारी पत्रकार गंगाधर पडवळे,विशाल जाधव,गजानन गाडेकर यांसह आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी गिरी महाराज यांनी मनोगतातून डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जीवन कार्य मांडले.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की, अविज्ञानवादी परंपरागत जगतात जगणारे लोक चिकित्सकता व विवेकशीलता हरवून बसतात. परिणामत: जगण्यासाठी लढण्याचे बळ ही गमावून बसतात. अविज्ञानवादी परंपरांत नकारात्मकतेची बीज पेरलेली असतात.ही बीज दलित,शोषित, वंचित,पिडीत,कष्टकरी,कामगार व सर्व सामान्य माणसांत रुजली गेली तर ते मानसिक गुलामगिरीत ही अडकून पडू शकतात.आणि हे होऊ नये म्हणून जगण्यासाठी लढण्याचे बळ देण्याकरिता आपल्या अनुभवाच्या संचयावर डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी अनेक प्रकारे विज्ञानवादी साहित्याची निर्मिती केली.जसे की,'मरी आईचा गाडा'. मरी आईचा गाडा ही डॉ‌.अण्णा भाऊ साठे यांच्या सिद्धहस्ते अवतरलेली एक अप्रतिम विज्ञानवादी कथा आहे. ती अविज्ञानवादींना विज्ञानवादी शिक्षणाची प्रेरणा देते.म्हणून डॉ. अण्णा भाऊ साठे हे थोर विज्ञानवादी साहित्यिक आहेत,असे ही ते म्हणाले. तर अध्यक्षीय समारोप संजयकुमार पुंडगे यांनी केला.

यावेळी भोकर बस आगारातील बहुसंख्य वाहक,तंत्रज्ञानी,महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.विद्युत रोषणाईने बस स्थानकाची केलेली सजावट,स्वादिष्ट भोजनासह अतिशय नियोजनबद्ध व आनंदोत्सवात संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरीष्ठ लिपीक श्रीदत्त चाटलावार यांनी केले.तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे.ए.सुर्यवंशी,एन.एस. पोतरे,आर.एन.गजभारे,यु.पी.कदम, व्ही.पी.वाघमारे,बी.पी.शिवेवार, शै.चं.गुडमेवार,आर.एस.पवार यांसह आदींनी परिश्रम घेतले.

01 August 2024

साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन

आमचे मार्गदर्शक आकाश गेंटेवार भाऊ. मित्र मंडळ आणि त्यांचे सोबतचे सवंगडी . अण्णाभाऊ फोर संघटना तालुका अध्यक्ष संतोष झुंजारे ए बी एस फोर्स संघटना तालुका उपाध्यक्ष अंबादास के एल बोयावार शिंगणीकर परिवार व झुंजारे परिवार यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.