जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 August 2024

गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हान यांचा हजारो गोर सैनिकाच्या सोबत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणारं

समाजासाठी दिवस रात्र काम करणारे,
बंजारा समाजासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून अन्याय व अत्याचाराच्या विरोधामध्ये रणसिंग फुंकणारे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. जेव्हा जेव्हा बंजारा समाजावर अन्याय आणि अत्याचार होतो त्या वेळेस गोर सेना मैदानात उभी राहते बंजारा समाजातील ऊसतोड कामगारासाठीही गोर सेनेने अनेक आंदोलने केलेली आहे .वेगवेगळे मेळावे घेतलेले आहे. आणि शासनाच्या माध्यमाने त्यांच्या समस्येचे निराकरण केलं आहे. अन्याय व आत्याचाराच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रखर लढा उभा करणारे अरुण भाऊ चव्हाण आणि त्यांचें हजारो गोर सैनिक यांचा प्रचंड मोठा ताफा येत्या ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी रमेश चिनीतला, नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात, विजय वडेटीवार, अमित देशमुख यांच्या व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

0 comments:

Post a Comment