जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

20 December 2024

संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील लाभार्थ्यांनी बँकेशी आधार संलग्न करावे

नांदेड :- विशेष सहाय योजनेतील अर्थात संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनातील जिल्ह्यामधील मंजूर 2 हजार 125 लाभार्थ्यांनी अद्यापही आपले बँक खाते आधारशी संलग्न करून घेतले नाही. अशा निराधार लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे तातडीने बँकेशी आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने आवाहन केले आहे.   
 
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना बँक किंवा पोस्ट खाते आधार क्रमांकाशी संलग्न अर्थात जोडल्या गेल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप केले जाते. हा शासन निर्णय आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 2 हजार 125 लाभार्थी नव्याने पात्र ठरले असून या नव्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार खात्याशी संलग्न केले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाजसेवकांना, नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की अशा लाभार्थ्यांची मदत करावी. त्यांना सेतू केंद्र व बँक येथे पोहोचवून त्यांचे खाते आधार कार्डशी जोडून घ्यावे, यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे तहसिलदारांनी केले आहे. 

14 December 2024

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार

नांदेड दि. 14 डिसेंबर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे येथील आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून #ऊसतोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू / सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते / ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत. 

राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन, व्हाट्सअँप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात यावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशा स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. सदर तक्रारनिवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गटऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट-अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे. 

तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी. सदर तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक ( #साखर ) यांच्याकडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचा rjdsnanded@rediffmail.com ईमेलवर #तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

13 December 2024

जप्त रेती साठ्याचा नायगाव (खै.) येथे बुधवारी लिलाव

नांदेड दि. 13 डिसेंबर :- नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास तसेच सन 2019 मधील मौ. ईज्जतगाव (बु.) येथील 700.00 ब्रास असे एकुण 5004.98 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आले होते. या रेतीसाठ्याचा लिलाव 600 रुपये या दराने उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वा. ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात भाग घ्यावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय नायगांव (खै.) च्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

29 November 2024

ई-पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करा शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक

नांदेड : शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई-पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरुन मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने रब्बी हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी दि.१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

त्‍याकरिता ई-पीक पाहणी (DCS) V 3.0.3 डाऊनलोड करावे. तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही.

तरी जिल्‍हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी रब्‍बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.

27 November 2024

नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.    

सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये सर्व निर्बंध लादण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

25 November 2024

मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद पार्थिव त्यांच्या मूळ गावीआणणार

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- अति थंडी आणि बर्फाचा प्रभाव झाल्याने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथील जवान हवलदार सुधाकर शंकर राठोड आज #शहीद झाले आहेत.  

चंदीगड येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज 25 नोंव्हेंबर 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला. उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी #मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथे येणार आहे. 

हवलदार सुधाकर शंकर राठोड हे 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान होते. त्यांची पारिवारीक माहिती पुढीलप्रमाणे आहे. वडीलाचे नाव दिवगंत शंकर सखाराम राठोड व आई श्रीमती धोंड्याबाई शंकर राठोड, भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी श्रीमती आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय 8 वर्ष), मुलगी सपना सुधाकर राठोड (वय 6 वर्ष) आहे. भाऊ मधुकर शंकर राठोड असा त्यांचा परिवार आहे.

08 November 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त #नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 16 धडक कारवाई

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 6 नोव्हेंबर रोजी विभागाने 16 ठिकाणी धाडी टाकून एकूण 3 लाख 38 हजार 980 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

6 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 16 गुन्हे, वारस 16, अटक आरोपी 16, रसायन 450 लि. देशी मद्य 94.20 लि., जप्तवाहन संख्या 03  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 3 लाख 38 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध #मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

29 October 2024

विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 #अर्ज दाखललोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल


 
•मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल 

#नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत. 

नांदेड #लोकसभा पोटनिवडणूक 
16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत.
       
नऊ विधानसभा क्षेत्रापैकी 
किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले. 
84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले. 
85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले. 
86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छुकांनी आज 65 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 81 इच्छुकांनी 97 अर्ज दाखल केले. 
87-नांदेड दक्षिणमध्ये 38 इच्छुकांनी आज 50 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 56 इच्छुकांनी 73 अर्ज दाखल केले. 
88-लोहामध्ये 19 इच्छुकांनी आज 31 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 54 अर्ज दाखल केले. 
89-नायगावमध्ये 18 इच्छुकांनी आज 27 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 48 अर्ज दाखल केले.
90-देगलूरमध्ये 28 इच्छुकांनी आज 39 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 43 इच्छुकांनी 60 अर्ज दाखल केले. 
तर 91-मुखेडमध्ये 13 इच्छुकांनी आज 19 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 24 इच्छुकांनी 35 अर्ज दाखल केले. 

नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेसाठी एकूण 288 इच्छुकांनी आज 388 अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण 515 इच्छुकांनी 667 अर्ज दाखल केले आहेत. 

25 October 2024

नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त

नांदेड दि. 25 ऑक्टोंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत 24 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील काही दिवस आणखी सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने फिरते पथक व स्थिर निगराणी पथक तैनात केली आहेत. 

या पथकामार्फत काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप,रोख रक्कम,अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येवून एकूण 24 लाख 4 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

यात भोकर 1 लाख 70 हजार 30 रुपये, देगलूर 2 लाख 77 हजार 650, हदगाव 26 हजार 900, किनवट 1 लाख 71 हजार 725, लोहा 44 हजार 100, मुखेड 71 हजार 140, नायगाव 3 लाख 10 हजार 980, नांदेड उत्तर 12 लाख 35 हजार 380, नांदेड दक्षिण 97 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

सोमवार-मंगळवार ; फक्त 2 दिवस उमेदवारी .अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी अर्जासाठी सार्वजनिक सुटी

नांदेड दि. 25 ऑक्टोबर :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. उद्या शनिवार व परवा रविवारी शासकीय सुट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी अर्ज दाखल केले जाणार नाहीत. त्यामुळे सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर व मंगळवार 29 ऑक्टोबर या दोन दिवसातच उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात यापूर्वीच विशेष आदेश काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 1951 च्या प्रतिनिधित्व कायदा अंतर्गत निवडणूक काळात येणाऱ्या सुट्यांमध्ये दुसरा व चौथ्या शनिवारी अर्ज न स्विकारण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या शनिवारी दिनांक 26 ऑक्टोबरला कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. नांदेड जिल्हा प्रशासनाने देखील ही सूचना जारी केली आहे.

त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक व जिल्यातील नऊ विधानसभेसाठी शनिवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारांकडे सोमवार व मंगळवार हे दोन दिवस असून त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेतच अर्ज स्विकारले जाणार आहेत. सर्व इच्छूक उमेदवारांनी ही बाब लक्षात घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तिरुपती (पप्पू) कोंढेकर यांना काँग्रेस पक्षाची भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केलेली असून त्या यादीमध्ये (८५) भोकर विधानसभा मतदारसंघाकरीता युवा नेतृत्व तिरुपती ऊर्फ पप्पू बाबुराव कदम कोंढेकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कडून घोषीत करण्यात आले आहे.
भावी आमदार म्हणून अनेक जण इच्छुक असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देण्यात आली असल्याने त्यांच्याविरोधात आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कोणता तगडा उमेदवार मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना आज दि. २४ ऑक्टोबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली असून त्यात युवा नेते अशी ओळख असणारे व सर्वसामान्यांसोबत नाळ जोडून असलेले युवा नेतृत्व तिरुपती ऊर्फ पप्पू बाबुराव कदम कोंढेकर यांना उमेदवारी जाहीर होताच भोकर विधानसभा मतदारसंघात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कोंडेकर यांच्या उमेदवारीमुळे आता लढतीत खरी रंगत येणार असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर निष्टवंताला न्याय मिळाला, आता ईतिहास घडणार.. अशा पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झालेले आहेत. एकूणच पप्पू कोंडेकर यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षाला धक्का बसला आहे. येणाऱ्या काळात पप्पू कोंडेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस भा.ज.पा. अशी सरळ लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत.

16 October 2024

भोकर विधानसभा मतदार संघातील २ लाख ९९ हजार २२८ मतदारांसाठी ३४४ मतदान केंद्रांची स्थापना

तर नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक प्रक्रिया ही या विधानसभा निवडणूकी बरोबरच पार पडणार 

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवीत लोकशाही बळकट करावी-निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी 

भोकर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल आज वाजला असून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.एकाच टप्प्यात व एकाच दिवशी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.त्या अनुषंगाने ८५-विधानसभा मतदार संघातील २ लाख ९९ हजार २२८ मतदारांसाठी ३४४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करुन सदरील मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवीत लोकशाही बळकट करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुद्दत दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक कधी होणार? याची उत्सुकता सर्व पक्षीय व अपक्षीय इच्छूक उमेदवार आणि मतदारांना लागली होती.अखेर आज दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ती उत्सुकता संपली आहे आणि आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय व अपक्षीय इच्छूक उमेदवारांना दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून आपले नामनिर्देशन पत्र (अर्ज)दाखल करता येणार आहेत.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि.२९ ऑक्टोबर २०२४ असून दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.त्यानंतर निवडणूक रिंगणातील वैध उमेदवारांसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा मतदार संघ रिक्त झाला होता.त्या अनुषंगाने होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही पार पडणार असून दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजीच लोकसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करता येणार आहे व मतमोजणी ही दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र होत असल्याने नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांना दि.२० नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांकरीता अनुक्रमे दोन मतदान करता येणार आहे.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदार संघाची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी भोकर तहसिल कार्यालयाच्या बैठक कक्षात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार,मुदखेडचे तहसिलदार आनंद देऊळगावकर,अर्धापूरचे तहसिलदार रेणूकादास देवणीकर व नायब तहसिलदार सुनील माचेवाड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली‌. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी घोषित केलेल्या मतदार यादीप्रमाणे भोकर विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ९९ हजार २२८ मतदार आहेत.यात १ लाख ५२ हजार ८४० पुरुष व १ लाख ४६ हजार ३७९ स्री आणि इतर ९ मतदार असून ८५ वर्षांवरील ४२२७ जेष्ठ मतदार व २८६१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.तर २४९ सैनिक मतदार ही या मतदार संघात मतदानाचा हक्क बजावणार आहेत.उपरोक्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार संघात एकूण ३४४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.यात लोकसभा निवडणूकीत नसलेल्या एका मतदान केंद्रांची भोकर तालुक्यातील नांदा बु.तांडा येथे नव्याने स्थापना करण्यात आल्याच्या समावेश असून मतदार संघातील १४ मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्यात आले आहेत.तसेच विविध पथकांची स्थापना करण्यात आली असून दरम्यानच्या काळात ३६ झोन व झोनल अधिकारी, २५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजावणार आहेत.तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी व लोकशाही बळकट करावी,तसेच आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले आहे.

16 September 2024

सोनारी तांडा येथील चिमुकली वर दोन नाराधमांकडून अत्याचार .महिना संपण्याच्या आदीच ... दुसरी बाब ??

भोकर  :तालुक्यातील मौजे सोनारी तांडा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची निंदनीय घटना दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजताच्या सुमारास घडली असून दि. १५ सप्टेंबर रोजी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, मौजे सोनारी तांडा येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील १५ वर्षीय अलपवयीन पिडीत मुलगी गणेशोत्सव चालू असल्याने ती तिच्या आईवडील व गावातील लोकांसोबत एका टेम्पोत दिनांक १४ सप्टेंबर रोजी सुमारे सात वाजता पाळज येथे गेले.या ठिकाणी गणरायांच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती त्या गर्दीत या मुलने रांगेत दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येऊन आईवडिलांची वाट बघत थांबली असता तिच्याच गावातील (सोनारी तांडा)गावातील घरा शेजारी असणारा शंकर ऊर्फ कोंडीबा उत्तम पवार हा पिडीत मुलीस आकाशी पाळणा खेळण्यास येण्याची विनवनी करत असताना तीने नकार देताच बळजबरी तीचे हात पकडून त्याचा मित्र कुणाल राठोड याच्या टेम्पो कडे घेऊन गेला. तेथे कुणाल राठोड हा आगोदरच उपस्थित होता.दोघांनी त्या मुलीस बळजबरी टेम्पोत टाकून अश्लील चाळे करत असताना त्या पिडीतेने मला जाऊ द्या म्हणून आरडाओरडा करीत विनवणी करत असताना तिच्यावर तोंड दाबून आळीपाळीने अनन्वित दुष्कर्म करण्यात आले.ही घटना दि. १४ सप्टे च्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली आहे..





      दरम्यान "त्या" पिडीत मुलीचे आईवडील देव दर्शनानंतर आपली मुलगी मंदिराबाहेर कुठेच दिसत नसल्याने तिचा शोधाशोध करीत असताना त्या टेंपोजवळ दिसली.आरोपितानी सदरील घडलेली घटना कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारू अशी धमकी दिल्याने पिडितेने घाबरून,ही घटीत घटना कुणासही सांगितली नाही मात्र परत घरी आल्यानंतर पिडीतेच्या पोटात दुखायला सुरू झाल्याने मुलीने तीच्या काकुस ही घडलेली सर्व घटना सांगितल्याने सर्व कुटुंबियांना माहिती झाली तेव्हा त्यांना एक प्रकारचा धक्काच बसला त्यातून सावरत त्यांनी मुलीवर उपचार केले दुसऱ्या दिवशी दि. १५ रोजी येऊन भोकर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यावरून भोकर पोलीसांनी आरोपी नामे शंकर ऊर्फ कोंडीबा उत्तम पवार व कुणाल राठोड या सदरील आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहीता नुसार, गुन्हा रजिस्टर नंबर ३४३ / २०२४ कलम ७०(२), १३८, ३५१(२)(३), ३, (५) सहकलम ४, ८, १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



  सदरील तपास पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनानुसार स. पो. नि. कल्पना राठोड हया पुढील तपास करीत आहेत.

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा- विशाल जाधव

बंजारा समाजाचा इतिहास मौखिक आहे. नवीन पिढीला आपला गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी म्हणून मा. संजय भाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र वाशिम जिल्ह्यातील जगतगुरु सेवालाल महाराज व .प. पू. डॉ रामराव बापू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या काशी पोहरादेवी येथे बंजारा नंगारा या प्रतिकृती वास्तू निर्माण संग्रहालय निर्माण कार्य 3 डिसेंबर 2018 तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे डॉ. रामराव बापू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले व 6 वर्षांनंतर वास्तूचा काम अंतिम टप्प्यात आले असून आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व साधुसंत प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पोहरादेवी ला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार, व गोरसेना नांदेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विशाल भाऊ जाधव यांनी केले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा- विशाल जाधव



बंजारा समाजाचा इतिहास मौखिक आहे. नवीन पिढीला आपला गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी म्हणून मा. संजय भाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र वाशिम जिल्ह्यातील जगतगुरु सेवालाल महाराज व .प. पू. डॉ रामराव बापू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या काशी पोहरादेवी येथे बंजारा नंगारा या प्रतिकृती वास्तू निर्माण संग्रहालय निर्माण कार्य 3 डिसेंबर 2018 तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे डॉ. रामराव बापू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले व 6 वर्षांनंतर वास्तूचा काम अंतिम टप्प्यात आले असून आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व साधुसंत प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पोहरादेवी ला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार, व गोरसेना नांदेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विशाल भाऊ जाधव यांनी केले आहे.