जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 November 2023

भोकर किनवट रोडवर विचित्र अपघात तीन जण जागीच ठार

भोकर. प्रतिनिधी भोकर ते किनवट रोड वरील आज सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बँकेचे पैसे घेऊन जाणारी जीप व समोरून येणाऱ्या मोटरसायकलचा सुधा नदीच्या पुलावर मोटरसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली त्या मोटरसायकलचा क्रमांक MH26CC1330 मयत व्यक्तीच्या खिशात शंकर अप्पाराव राठोड मु. कुंचली पोस्ट धानोरा तालुका नायगाव असे नाव आहे दुसरा व्यक्ती हा हिमायतनगरहून भोकर कडे येत असताना करंजी फाट्याजवळ बैलगाडीला धडकेत झालेल्या अपघातात मरण पावल्याची माहिती मिळाली भोकर येथील पवार कॉलनीतील असलेला सचिन
कमटलवार हा युवक असल्याचे कळते गाडी क्रमांक MH261191 असे आहे.

भोकर येथे महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती उत्साहात साजरी.

भोकर प्र :- आद्य कवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती ही तैल चित्राची मिरवणूक भोकर शहरातील मुख्य रस्त्याने काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
     जयंती निमित्त 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील वाल्मीक ऋषी मंदिरात असलेल्या मूर्तीची विधीवत जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर दुपारी 2 वाजता शहरातील मुख्य रस्ता असलेल्या मार्गाने तैल चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पुरातन महादेव मंदिर असलेल्या कोळी गल्ली (वाल्मीक नगर) येथून सुरुवात करण्यात येऊन तुकडोजी नगर, क्रांतिवीर लहुजी साळवे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक या मार्गाने जाऊन कोळी गल्ली (वाल्मीक नगर) येथील महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मंदिरा जवळ मिरवणूक आल्यावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येऊन तदनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
    या मिरवणुकीत शेकडो समाज बांधव व महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी संतुकराव घिसेवाड, व्यंकट घिसेवाड, पत्रकार विजय चिंतावार, मधुकर चारलेवाड, गणेश गोल्लेवाड, गोविंद फुजूलवाड, बालाजी रुमणवाड, दिगंबर रेड्डेवाड, लक्ष्मण भहिरवाड, बाबू वर्सेलवाड, प्रकाश मुदिराज, दिनेश कोटुरवार, अनिल बेरदेवाड,माधव गोल्लेवाड, साईनाथ नेमेवाड, मारोती पांडलवाड, यांच्यासह अनेक समाज बांधव व कार्यकर्त्यांनी मिरवणूक पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान देऊन मिरवणुकीला कुठेही गालबोट लागू न देता मिरवणूक शांततेत पार पाडली.

25 November 2023

गुन्हे शाखेचे खंडेराय यांची निखील हंकारे यांनी घेतली सदिच्छा भेट

स्थानिक गुन्हे शाखा(LCB) नांदेड च्या पोलीस निरीक्षक पदी जिल्ह्याचे भूमिपुत्र उदय खंडेराय यांची निवड झाल्याबद्दल, पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे भोकर तालुकाध्यक्ष तथा शिवा संघटनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत स्वामी मुस्तापूरे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नांदेड जिल्हा महासचिव निखिल भाऊ हंकारे यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खंडेराय यांच्याशी संवाद साधताना भोकरच्या कायदा व सुव्यवस्थेविषयी चर्चा करून भोकर तालुक्याकडे लक्ष देण्याची विनंती हंकारे यांनी केली.

भोकर तालुक्यात कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासन दबाव आणत असून अवैध धंदे बंद करण्याच्या तक्रारी केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्याची जणू मोहीमच स्थानीक पोलिसांनी उघडली असे चीत्र तालुक्यात निर्माण झाले असून पोलीसांच्या या जुलमी अत्याचाराविषयी विशेष लक्ष घालण्याची विनंतीही खंडेराय यांच्याकडे करण्यात आल्याचे हंकारे यांच्याकडून संगण्यात आले.

22 November 2023

विजेचा धक्का लागून रेणापूरच्या आदित्य भगत या युवकाचा मृत्यू

भोकर : तेलंगणा राज्यातील भैंसा मंडलच्या कुंडसर गावात काल (दि २१.)बुधवारी रात्री झालेल्या विद्युत अपघातात भोकर तालुक्यातील मौजे रेणापुर येथील एक तरुण ठार तर तीन जण जखमी झाल्याची हृदय द्रावक घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. 

अधिक वृत्त असे की, तालुक्यातील रेणापूर येथील रोहिदास जाधव, आकाश भगत, आदित्य पवन भगत आदी चारजण जनावरांसाठी चारा आणण्यासाठी भैंसा मंडळाच्या कुंडसारा येथे गेले होते. एका शेतकऱ्याकडून भात चाऱ्याच्या पेंढ्याचे गठ्ठे विकत घेऊन व्हॅनमध्ये येत असताना कुंडसरा गावात विजेच्या तारेची स्पारकिंग त्या टेम्पोतील चाऱ्याला आग लागली. पाण्याने ती आग विझवताना पाण्यासोबत विजेचा धक्का लागून आदित्य पवन भगत याचा जागेवरच मृत्यू झाला तर रोहिदास जंगवाड, आकाश भगत हे जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना तातडीने १०८ वाहनातून भैंसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी आदिनाथला मृत घोषित केले तर जखमी रोहिदास, आकाश व शंकरराव यांना प्रार्थमिक उपचारानंतर घरी जाण्यास सांगीतले.

   सदर वार्ता गावात कळताच भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी गावकऱ्यांसोबत तात्काळ भैंसा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन जखमी रुग्णांची भेट घेऊन कालच भोकर येथे आधिक उपचारासाठी घेऊन आले. मयत आदित्य यांचे शव विच्छेदनाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर रेणापूर येथे आदित्य वर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आदित्य हा आईवडिलांना एकुलता एक होता असेही कळते. या घटनेमुळे रेणापूर गाव परीसरात शोककळा पसरली आहे.

17 November 2023

ग्रामगीते तील विचार गावाला स्वयंपूर्ण बनवू शकतात : महंत चैतन्य महाराज

भोकर (प्रतिनिधीः)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पग्रामगीताच खऱ्या अर्थाने गावाला स्वयंपूर्ण बनवू शकते. तेव्हा गावातील प्रत्येक घराघरात ग्रामगीतेचे विचार पोहचुन त्याप्रमाणे आचरण करावे असा मौलिक संदेश कोंडल्य आश्रमाचे महंत श्री चैतन्यजी महाराज यांनी भोकर तालुक्यातील मौजे कांडली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला.

 यावेळी मोझरी येथील श्रीमती निर्मलाताई, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, मा. उपसभापती सुभाष पाटील कोळगावकर, सरपंच कमाजी पेनलोड, उपसरपंच गणेश डुमलवाड,राष्ट्रीय कीर्तनकार गंगाधर गिरोड गुरुजी, बापूराव पाटील सोनारीकर, गंगाप्रसाद जामदरीका, पत्रकार बालाजी नालेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पुढे मार्गदर्शन करताना महंत चैतन्य महाराज यांनी सांगितले की भारत देश हा गावागावातून वसलेला असल्याने अगोदर गावाची सुधारणा होणे ही काळाची गरज आहे हे राष्ट्रसंतांनी हेरले. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा। गावची भंगता येईल अवदसा। देशाशी ।। ही जाणीव राष्ट्रसंताना होती म्हणून त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन माणसांना सुसंस्कारी बनवण्यासाठी
भजने, कीर्तन, प्रवचने करुन जनजागृती केली. मानवाच्या व गावाच्या उद्धारासाठी त्यांनी मौलिक अशी पग्रागीता लिहून आपल्या उद्धारासाडी ठेवलेली आहे. तेव्हा प्रत्येक गा- वागावात या ग्रामगीतेचे वाचन हाले पाहिजे व त्या विचाराचे अनुकरण करून आपले गाव आपण तीर्थ बनवले पाहिजे असे सांगून आई- वडिलांनी लहानपणापासूनय आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत, कोणालाही व्यसनाकडे कळू देऊ नये, प्रत्येकाला जीवन शिक्षण देऊन त्यांना घडवावं असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी ही आपले विचार व्यक्त करून राष्ट्रसंतांच्या विचाराची आजही खन्या अर्थान समाजाला गरज असल्याचे सांगितले..

10 November 2023

दिवशी खुर्दच्या सरपंच ग्रामसेवकांकडून किचन बांधकाम दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार; चौकशीची मागणी

भोकर - तालुक्यातील दिवशी खुर्द येथे पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शालेय किचन बांधकाम रिपेरिंग दुरुस्ती मध्ये अपव्यवहार करण्यात आला असून ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी अंबादास तुळशीराम भालेराव यांनी आज(दि.०८नोव्हे) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

सन २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये मौजे दिवशी खुर्द तालुका भोकर येथे किचन रूम बांधकामासाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ०१ लाख १४ हजार ३७७ रुपये चा निधी खर्च करण्यात आला असून सदर निधी अंदाज पत्रकारानुसार खर्च न करता संगणमत करून अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे, थातुर माथूर काम सरपंच व ग्रामसेवक यांनी बिले उचलून घेतलली आहेत अश्या आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अंबादास तुळशीराम भालेराव यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. यावर वरिष्टान कडून कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी तहसील कार्यालयासमोर,ग्रामसेवक व सरपंच यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषणास प्रारंभ केले आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी नांदेड उपविभागीय अधिकारी भोकर यांना देण्यात आल्या आहेत.

09 November 2023

भोकरमध्ये सेवा समर्पण च्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन

भोकर : विविध क्षेत्रात सेवाभावी कर्तव्याचे ठसा उमटविणाऱ्या भोकर येथील ‘सेवा समर्पण परिवारच्या’ वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दिवाळी निमित्त दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता सप्तसुरांची बहरणाऱ्या ‘दिवाळी पहाटच्या’ संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून इंडियन आयडॉल फेम ‘कु.शिवानी स्वामी’ यांच्या सुमधूर वाणीने विशेष रंगत येणार आहे.
भोकर शहरातील ऐतिहासिक कैलास गडावर माघील वर्षी दि.२२ ऑक्टोंबर २०२२ रोजी सेवा समर्पण परिवाराच्या वतीने आयोजित श्रोत्यांसाठीची ‘दिवाळी पहाट’ ही प्रसिद्ध गायक प्रा.प्रणव पडोळे निर्मित स्वरनिनाद गायन संचातील गायकांच्या सुरेल गायकीने व तालसौदर्याने सजलेल्या अद्वितीय सप्तसुरांच्या मंगलमयी संगीत अविष्काराने अक्षरशः बहरुन गेली होती.प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही याच ठिकाणी दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी पहाट साजरी करण्यात येणार आहे.सदरील दिवाळी पहाट संगीत मैफिलीचे उद्घाटन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते होणार आहे.तर या संगीत मैफिलीत इंडियन आयडॉल फेम कु. शिवानी स्वामी,संगीतरत्न प्रा.शिवदास स्वामी,प्रा.राजेश ठाकरे, प्रा.प्रणव पडोळे,शिवकांता पडोळे यांच्या अभिजात संगीताचा सुरेल नजराणा सादर होणार आहे. यावेळी दत्त संस्थानचे महंत उत्तमबन महाराज,जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, तहसिलदार राजेश लांडगे हे सहपत्नीक उपस्थित राहणार असून मुख्याध्यापक तथा साहित्यिक सुरेश दंडवते हे सदरील दिवाळी पहाट मैफिलीचे निवेदन करणार आहेत.तरी होऊ घातलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून सप्तसुरांचा स्वानंद घ्यावा,असे आवाहन सेवा समर्पण परिवार या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले


08 November 2023

बिलोली पंचायत समिती समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे

उपोषणास वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा 

बिलोली:ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना बिलोली शाखेच्या बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा बिलोलीच्या वतीने यापूर्वी शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राहणीमान भत्ता ( घरभाडे भत्ता) व भविष्य निर्वाह निधीचा ८.३३ टक्के हिस्सा आजपर्यंत शासनाने देऊ केले नसल्याने या प्रमुख मागणीसह ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक, वरिष्ठ अधिकारी सहकार्य करीत नसल्याने बिलोली तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दि. ३० ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने एक निवेदन सादर करीत राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी ८.३३ हिस्सा मिळावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.होते.

या निवेदनाची दखल जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधीतांनी न घेतल्याने ७ नोव्हेंबरपासून बिलोली पंचायत समिती कार्यालयासमोर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात तालुकाध्यक्ष अप्पाराव शिंदे, साहेबराव वाघमारे, सचिव खंडू जेठे, अलीम शेख, सुरेश सूर्यवंशी, लक्ष्मण होरके,हनमंत जाधव पाचपिंपळी, लक्ष्मण सूर्यवंशी कामरसपल्ली, हणमंत वाघमारे रामतीर्थसह बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत. या उपोषणास वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे ये वेळी वंचितचे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे, प्रवक्ते मुकिंदर कुडके, रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष गौतम गावंडे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गंगाधर इबितकर व कर्मचारी युनियन पदाधिकारी उपस्थित होते.

बोरगाव सरपंच पदी सौ. रायभोळे यांची बिनविरोध निवड

भोकर प्र: तालुक्यातील बोरगाव (सुद्धा)येथे सरपंच सौ. आशाताई संतोष गागदे यांनी राजीनामा दिल्या मुळे दि.८ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव येथे पिटाशीन अधिकारी श्री कंधारे, ग्रामसेवक सौ. नुनंचे यांच्या उपस्थितीत सौ. धम्मशीला दिलीप रायभोळे यांची सर्वानुमते सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी पोलीस जमादार भीमराव राठोड, व पोलीस पाटील कापसे यांची उपस्थिती होती.
प्याॅनल प्रमुख गीतेश बोटलेवाड, दत्ता दिगांबर सूर्यवंशी यांच्या समवेत उपसरपंच दत्तात्रय केदोबा दसरवाड, सदस्य, सुभाष दिगांबर पुरी, प्रदीप संभाजी जाधव सौ. कलावतीबाई लाला हुबेवाड, सौ. सविता बालाजी मुपरवाड, सौ वंदना उमेश पुरी, माजी सरपंच सौ.आशाताई संतोष गागदे, सौ. किसनाबाई शंकरराव लुंगारे यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित सरपंच सौ. रायभोळे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील लुंगारे,पुंडलिकराव कांबळे, माधव सूर्यवंशी, दिलीप रायभोळे, दत्ता सूर्यवंशी, शिवानंद शिंदे, संतोष गागदे, बंडू चिट्टेबोईवाड, उमेश पुरी, आनंद कांबळे, बाळू बोटलेवाड, बंडू कोंडापल्ले, मारोती हुबेवाड (माजी सरपंच )गोपीनाथ सूर्यवंशी, मारोती गंगाराम हुबेवाड आदींची उपस्थिती होती

02 November 2023

सर्वच शासनकर्त्यांनी मराठा समाजास झुलवत ठेवलय,आता हे जमणार नाही-शिवाजी पाटील किन्हाळकर

आंदोलनास भोकर तालुक्यातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी,असे विनंतीपर आवाहन ही त्यांनी केले आहे.

प्रतिनिधी. अंबादास बोयावार 
भोकर : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करुन सरसकट आरक्षण द्यावे या मागणीवर ठाम असून त्यांच्या आंदोलनास संबंध राज्यासह भोकर तालुक्यातून ही उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. परंतू सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजास झुलवत ठेवलय, आता हे जमणार नाही. कारण मराठा समाज आता सावध झालेला आहे.हा लढा पुढे चालूच ठेऊ,या लढ्याचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी, असे विनंतीपर आवाहन भोकर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी त्यांना केले आहे.
भोकर तालुक्यातील अनेक गावांतून साखळी उपोषणे,अमरण उपोषणे,धरणे आंदोलन,रास्ता रोको आंदोलन यासह शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा दिला जात आहे.भोकर तहसिल कार्यालया समोर मराठा समाज आंदोलकांनी साखळी उपोषण सुरु केले असून याच ठिकाणी बालाजी पाटील कदम बटाळकर व नागेश पाटील जाधव या दोघांनी बेमुद्दत अमरण उपोषण सुरु केले आहे.उपोषणकर्ते बालाजी पाटील कदम यांची प्रकृती बिघडली होती.त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला होता.परंतू यावेळी जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,गणेश पाटील कापसे, विठ्ठल पाटील धोंडगे यांसह आदींनी विनंती केल्यावरुन त्यांनी काल औषधोपचार घेतला.

याप्रसंगी साखळी उपोषणात प्रतिदिन सहभागी असलेले शिवाजी पाटील किन्हाळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,महाराष्ट्र निर्मिती पासून सत्तेत आलेल्या सर्वच शासनकर्त्यांनी आज पर्यंत मराठा समाजास केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. आमची मते,आमचा पैसा घ्यायचा व सत्तेत आले की सर्व आश्वासने विसरुन जायचे आणि आमच्याच पैशाचा गैरमार्गाने खर्च करायचा.परंतू ज्यांनी यांना सत्तेत पाठविलं त्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे डोळेझाक करायची. मराठा समाजाची परिस्थिती आज सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या खुपच बिकट झालेली आहे.त्यामुळे मराठा समाजास आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे.यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज लोकशाही मार्गाने लढा देत आहे.मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने ४० दिवसांत हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते.परंतू ते पाळले गेले नसल्याने पुन्हा आंदोलन सुरु करावे लागले आहे.राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.या आंदोलना दरम्यान त्यांची प्रकृती खालावत आहे.याबाबद शिवाजी पाटील किन्हाळकर म्हणाले की,अशा प्रकारचे त्यागी नेतृत्व अपवादात्मक लाभते.असे अनेक शासनकर्ते येतील जातील,आपली मागणी आज ना उद्या पुर्णत्वास येईलच.परंतू त्यांना काही झाले तर समाजाची खुप मोठी हानी होईल.यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी,अशी आम्ही विनंती करतोत. तसेच समाजाची मागणी पुर्णत्वास येईपर्यंत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत राहू.हिंसक आंदोलनाचे आम्ही समर्थन करत नसून हा मार्ग कोणीही अवलंबू नये.कारण शांतताप्रिय मराठा समाज हा कधीही हिंसक आंदोलन करु शकत नाही,आरक्षण विरोधी भूमिकेचे काही लोक आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असून समाजाने त्यांच्या गैर मनसुब्यांना उधळून लावावे व लोकशाही मार्गानेच शांततेने आंदोलन करावेत,असे विनंतीपर आवाहन ही त्यांनी यावेळी केले

अ . पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडीया भोकर तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत मुस्तापुरे

भोकर :चंद्रकांत मुस्तापुरे .स्वामी.यांची निवड. संस्थापक तथा.राष्ट्रीय अध्यक्ष.. मा. श्री. ज्ञानेश्वर.शि.साळोखे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
मा श्री. किशोर.ना.शितोळे
यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली
चंद्रकांत मुस्तापुरे स्वामी. यांचे काम बघून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांची ओळख आहे यांचे काम बघून
राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना निवड करण्यात आलेली आहे
 अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया सुरक्षा परिषद दिल्ली च्या वतीने अ . पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडीया भोकर तालुकाध्यक्ष चंद्रकांत विठ्ठलराव मुस्तापुरे.स्वामी. यांची निवड करण्यात आली .
भोकर येथील चंद्रकांत मुस्तापुरे.स्वामी.
यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा बसेश्वर मित्रमंडळ भोकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

01 November 2023

एल.आय.सी. विठ्ठल पन्हाळे यांची सेवापूर्ती

भोकर:-भारतीय जीवन विमा निगम शाखा भोकर चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री विठ्ठल पन्हाळे यांच्या 34 वर्षाच्या सेवेचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला.
भोकर शाखेचे विकास अधिकारी व्ही . एच. पन्हाळे यांनी 24/10/1989 रोजी एलआयसी शाखा भोकर मध्ये रुजू होऊन ,त्यांनी एल.आय.सी. शाखा भोकर चा आर्थिक स्तर उंचावून त्यांच्या कार्यकाळात 210 एजंटला व्यावसायिक मार्गदर्शन करून त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांची आर्थिक उन्नती साधून त्यांचे जीवनमान उंचावले.
त्यांच्या सेवापूर्तीसाठी ग्रामीण भागातील एजंट व त्यांचा चाहता मित्रपरिवार व नातेवाईकनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्यांच्या प्रदीर्घ कार्याच्या कर्तव्यनिष्ठ कार्याचा गौरव करताना शाखा अधिकारी श्री देशमुख साहेबांनी आपल्या मनोगतातून "श्री पन्हाळे साहेबांची सेवापुर्ती म्हणजे, एल.आय.सी. शाखा भोकरला न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली"अशी खंत मनोगतातून व्यक्त केली. ह्यावेळी त्यांचे विमा प्रतिनिधी व मित्रपरिवार नातेवाईक, ऑफिस कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना त्यांच्या मनोगतातून मांडल्या या कार्यक्रमास नांदेडचे विकास अधिकारी ग्रँड साहेब,पुरमवार साहेब, अडकिने, धर्माबाद चे शाखाधिकारी दुबले सर ,ऑफिस कर्मचारी व शंभर विमा प्रतिनिधी आणि विकास अधिकारी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित राहून त्यांचा सापत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाखा अधिकारी श्री देशमुख सर,उपशाखा अधिकारी अडमोलवाड सर, व्यंकटराव ढवळे ,आनंदराव ढवळे, सोळंके, भोजराम बागडे, गणेश कोरंटलू ,बालाजी कदम, कासारपल्ले, वरवटे विजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.