भोकर प्र :- आद्य कवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती ही तैल चित्राची मिरवणूक भोकर शहरातील मुख्य रस्त्याने काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्त 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील वाल्मीक ऋषी मंदिरात असलेल्या मूर्तीची विधीवत जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर दुपारी 2 वाजता शहरातील मुख्य रस्ता असलेल्या मार्गाने तैल चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पुरातन महादेव मंदिर असलेल्या कोळी गल्ली (वाल्मीक नगर) येथून सुरुवात करण्यात येऊन तुकडोजी नगर, क्रांतिवीर लहुजी साळवे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक या मार्गाने जाऊन कोळी गल्ली (वाल्मीक नगर) येथील महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मंदिरा जवळ मिरवणूक आल्यावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येऊन तदनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या मिरवणुकीत शेकडो समाज बांधव व महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी संतुकराव घिसेवाड, व्यंकट घिसेवाड, पत्रकार विजय चिंतावार, मधुकर चारलेवाड, गणेश गोल्लेवाड, गोविंद फुजूलवाड, बालाजी रुमणवाड, दिगंबर रेड्डेवाड, लक्ष्मण भहिरवाड, बाबू वर्सेलवाड, प्रकाश मुदिराज, दिनेश कोटुरवार, अनिल बेरदेवाड,माधव गोल्लेवाड, साईनाथ नेमेवाड, मारोती पांडलवाड, यांच्यासह अनेक समाज बांधव व कार्यकर्त्यांनी मिरवणूक पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान देऊन मिरवणुकीला कुठेही गालबोट लागू न देता मिरवणूक शांततेत पार पाडली.







0 comments:
Post a Comment