जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

25 November 2023

गुन्हे शाखेचे खंडेराय यांची निखील हंकारे यांनी घेतली सदिच्छा भेट

स्थानिक गुन्हे शाखा(LCB) नांदेड च्या पोलीस निरीक्षक पदी जिल्ह्याचे भूमिपुत्र उदय खंडेराय यांची निवड झाल्याबद्दल, पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे भोकर तालुकाध्यक्ष तथा शिवा संघटनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत स्वामी मुस्तापूरे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नांदेड जिल्हा महासचिव निखिल भाऊ हंकारे यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खंडेराय यांच्याशी संवाद साधताना भोकरच्या कायदा व सुव्यवस्थेविषयी चर्चा करून भोकर तालुक्याकडे लक्ष देण्याची विनंती हंकारे यांनी केली.

भोकर तालुक्यात कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासन दबाव आणत असून अवैध धंदे बंद करण्याच्या तक्रारी केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्याची जणू मोहीमच स्थानीक पोलिसांनी उघडली असे चीत्र तालुक्यात निर्माण झाले असून पोलीसांच्या या जुलमी अत्याचाराविषयी विशेष लक्ष घालण्याची विनंतीही खंडेराय यांच्याकडे करण्यात आल्याचे हंकारे यांच्याकडून संगण्यात आले.

0 comments:

Post a Comment