जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 December 2023

भोकरच्या सर्व चौका मद्ये सिसी टीव्ही कॅमेरे लाऊन उमरी रोड वर होणारी भाजीपाला बिट इतर ठिकाणीं भरविणे बाबद तहसीलदारांना निवेदन

भोकर: शहरात वावरत असताना हया गोष्टी च सामना सामान्य माणसाच्या अधीन येत आहे . आणि दिवसात छोटे मोठे अपघात होत आहेत लहान मुले सायकल चालवत असताना त्यांच्या अपघाताची माहिती पण मिळत आहे पण अपघात करणाऱ्या लोकांचा शोध लागत नाही लवकर त्या वेळी जर कॅमेरे असतील तर गुनेगरास लवकर प्रशासन अधिकारी काबीज करतील. आणि भोकर उमरी रोड वर बीट भरत असलेल्या जागेच्या व्यातेरिक्त रस्त्याच्यावर गाडी किंवा माणूस जायला सुध्दा जागा राहत नाही जर काही गैर प्रकार घडला तर त्यास जबाब दार प्रशासन असेल का. असा प्रश्न पडतो.. आणि भोकरच्या सर्व शासकीय कार्यालय येथे सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे याचं कारण अस की कर्मचारी वेळेवर न येत असल्या मुळे नागरिकांची हेळसांड होत आहे त्यांची परेषणी होत आहे तसेच विश्वकर्मा नगर मध्ये साचलेले कचरा तत्काळ दुसऱ्या ठिकाणीं उचलून नेण्यात यावा .. अन्यथा. शिव भीम सेने च्य वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . चंद्रकांत मुस्तापुरे तालुका अध्यक्ष शिव भीम सेना

भोकर मध्ये श्री अयोध्या अक्षता कलश पुजन पदयात्रा संपन्न श्रीराम मंदिर लोकार्पणपुर्व पवित्र अक्षतांचे घरोघरी होणार वाटप


भोकर : श्री अयोद्या धाम येथून भोकर शहरात दाखल झालेल्या अक्षता व कलशाचे पुजन करण्यात येऊन श्रीरामाच्या जयघोषात दि.३० डिसेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्याने बहुसंख्य महिला,पुरुष आणि श्रीराम भक्त सहभागी झालेली भव्य अक्षता कलश पुजन पदयात्रा संपन्न झाली.

दि.३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री अयोध्या धाम येथून शहरात दाखल झालेल्या पवित्र अक्षता कलशाची पदयात्रेचा श्री विश्वकर्मा मंदीर दसरा हनुमान मंदिर परीसर येथून प्रारंभ करण्यात आला व ही पदयात्रा आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदीर जिनिंग,श्री बालाजी मंदीर,म.गांधी चौक मार्गे श्री राम मंदीर येथे पोहचली आणि श्रीरामाचा जयघोषात करत निघालेल्या या पदयात्रेचा तेथे समारोप करण्यात आला.या भव्य पदयात्रेत श्री दत्तसंस्थान कैलास गडाचे महंत उत्तमबन महाराज,महंत परमेश्वर महाराज,शहरातील प्रतिष्टीत नागरीक,महिला,अयप्पा स्वामी भक्त,श्रीराम भक्त यांसह बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.

श्रीराम जन्मभूमी अयोध्येला श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीची दि.२२ जानेवारी २०२३ रोजी बालस्वरुपात प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.याप्रसंगाचे औचित्य साधून या दिवशी संपुर्ण देशभरात प्रतिदिवाळीसम सण-उत्सव साजरा होणार आहे.याच अनुषंगाने श्री अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशातील अक्षतांचे भोकर तालुक्यातील गाव,वस्ती,तांडे व शहरातील घरोघरी वाटप होणार असून त्यामध्ये हिंदू समाजाकडुन भोकर तालुका अयोध्येसारखा सजविण्यात येणार आहे.यानिमित्ताने भोकर मध्ये विहिंप,बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाजाकडून भव्य अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सदरील पदयात्रे दरम्यान पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोघांचा आपघातात मृत्यूभोकर उमरी रोडवरील मातुळ येथे घडली हृदयद्रावक घटना

भोकर : प्रतिनिधी
तालुक्यातील हाडोळी येथील संजय बाबाराव जाधव (४२) आणि शामराव माणिकराव मिरासे (५२) हे दोघेजण हाडोळी येथुन आपल्या एका नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असतांना भोकर उमरी रोडवरील मोघाळी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला( क्र.एम.एच २६ बि.एल ७६४२ ) हायवा टिपर (क्र.एम.एच २६ बी.ई २२६१) ने जोराची धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय बाबाराव जाधव व शामराव माणिकराव मिरासे यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घडली आहे.
आपघात होताच जवळपास च्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आसता हायवा चालकाने हायवा रस्त्याच्या खाली सोडून पोबारा केला.या घटनेची माहिती मिळताच भोकर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिगांबर पाटिल व पो.काॅ मोईन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह भोकर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवुन दिले. पोलिसांनी तात्काळ हायवा चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.एकाच गावातील दोन व्यक्तींचा आपघाती मृत्यू झाल्याने हाडोळी गावावरती शोककळा पसरली असुन गावांसह परिसरात मध्ये हळहळ व्यक्त होत आहे..
रात्री अपरात्री चोरुन रेती, मुरूम, या गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या हायवा गाड्यांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चढाओढ सूरु झाली आहे. या चढाओढीत अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रात्रीला बेफाम वेगात गाड्या पळवण्यात येत आहेत. अश्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा संताप व्यक्त होेत आहे. आजचाही अपघात याचाच परिपाक आसल्याचा ग्रामस्तात संताप व्यक्त होत आहे.

भोकर मध्ये पॅथॉलॉजी लॅब मधून होतेय रुग्णांची फसवणूक पँरा मेडिकल कौन्सिलच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ

भोकर:( प्रतिनिधी) शहरात विविध ठिकाणी बोगस पॅथॉलॉजी लॅब द्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक करुन लूट केली जात आहे आता हे लोण तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही पसरू लागले असून प्रशिक्षित मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट नसताना बिनधास्त रक्त चाचण्यांचा अहवाल देउन आर्थिक लूट केली जात आहे..यात माञ महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना दिसुन येत आहे.
पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रक्तचाचणी करत असताना सर्वप्रथम तो मान्यताप्राप्त पदवी व पदविकाधारक आहे का? त्याची महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलकडे नोंदतो केलील आहे का? लॅब धारक या क्षेत्रात निष्णात आहे का? रक्त चाचणीचे प्रमाणित रिपोर्ट त्यांना देता येतो का? कोरे लेटर पॅड देण्याचा एम.डी.पॅथॉलॉजिस्ट यांना अधिकार आहे का ? शहरातील अनेक पॅथॉलॉजिस्टकडे एमडी पथोलॉजिस्टचे कोरे लेटरप्याड आहेत. ते डॉक्टर कुठे असतात खरेच ते एम डी आहेत का? हे मात्र रामभरोसेच ! असे अनेक प्रश्न पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भाने सामोरं येतं आहेत.
पी एम सी रजिस्ट्रेशन व महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना भोकर तालुक्यात आनेकजन चार – दोन दिवस कुठे तरी प्रॅक्टिस करुन तर काही यूट्यूबचा आधार घेऊन बिन्धास्त व्यवसाय करत डॉक्टरांशी हातमिळवणी करून अवास्तव शुल्क आकारत रूग्णांना गंडवत आहेत. यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे वचक नसल्यामुळे दिवसागणित पॅथॉलॉजीची संख्या बळावत आहे. यातून कधी कुण्या रुग्णांच्या जीवावर बितेल हे मात्र येणारा काळच सांगणार आहे..
लॅबोरटरी सेवा मेडिकल कौन्सिल कौन्सिल कायदा 2011, 19 जुलै 2012 ,व 2016 चा अधिनियम क्रमांक 6 तसेच 30 जानेवारी 2016 अन्वये 18 ऑक्टोबर 2017 पासून सरकारने स्वतंत्रपणे पँरा वैद्यकीय परिषद अस्तित्वात आणले आहे या अधिनियमाखाली कलम 26 (1) अंतर्गत स्वतः स्पष्ट तरतूद केली आहे.
पँरामेडिकल कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल अशा स्वतंत्रपणे क्लिनिकल लॅब चालवणारा टेक्निशनवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 2011 च्या कायद्यानुसार अपराध व व सारथी मधील कलम 31, 32 ,33 व यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद अस्ताना बोगस लॅब चालकांवरती गुन्हे दाखल होत नाहीत. वैद्यकीय विभागाचे आधिकारी हातमिळवणी करून आहेत की काय असा चिंतेचा प्रश्न सामोर येत आहे.
भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बळवलेल्या या अनधिकृत पथोलॉजींची कसून चौकशी करून संबधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बसपाचे डॉ कैलास कानिंदे यांनी जिल्हा अधिकारी नांदेड ,जिल्हा शल्य चिकीत्सक नांदेड , जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड , उपविभागीय अधिकारी भोकर ,तहसीलदार भोकर वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर , तालुका अधिकारी भोकर यांच्याकडे एका निवेदना व्दारे केली आहे. संबंधीत वरिष्ठ आधिकारी यावर कोणती कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंजि.विश्वंभर पवार व आदींचा केला भव्य सत्कार

भोकर प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी पाटील गौड आणि ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२८ डिसेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात येऊन पुढील सेवाकार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उत्तर व दक्षिण नांदेड जिल्ह्याच्या ६ जणांची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नुकतीच नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.त्या नवनियुक्त विशेष निमंत्रित सदस्यांत उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार, भोकर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख, किनवटचे माजी नगराध्यक्ष खान इसाखान सरदारखान यांचा समावेश आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी भोकर येथील धडाडीचे युवा नेतृत्व बालाजी पाटील गौड यांची ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी व युवा उद्योजक आनंद डांगे यांची ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.उपरोक्त सर्वांच्या नवनियुक्तीच्या संदर्भाने त्यांचा यथोचित सत्कार करण्याच्या हेतूने भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका शाखा भोकर च्या वतीने भोकर येथील संपर्क कार्यालयात दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता इंजि.विश्वंभर पवार,बालाजी पाटील गौड व आनंद डांगे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांचे सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंजि.विश्वंभर पवार, बालाजी पाटील गौड आणि आनंद डांगे यांचा भव्य सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी त्यांना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम यांनी त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम यांची नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल तर बालाजी पाटील गौड व आनंद डांगे यांनी ओबीसी विभागाच्या उपरोक्त पदांवर नियुक्ती केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,संपर्क प्रमुख ना.धनंजय मुंडे,ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांसह आदींचे ऋण व्यक्त केले.तर नवनियुक्त सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठांचे आभार मानले आणि पक्ष संघटन वाढीसह जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष माधव देशमुख,जिल्हासरचिटणीस अहेमद करखेलीकर,श्याम देशमुख,रवी गेंटेवार,गणेश देशमुख,पंकज देशमुख भोशीकर,सतीश पाटील मातुळकर,राजू कोरटे,श्याम बोडेवार, ॲड.शेख सलीम,सिद्धू पाटील चिंचाळकर, प्रतीक कदम,फईम अहेमद पटेल,शेख जब्बार,तुकाराम महादावाड,बाळासाहेब नांदेकर,शंकर गाढे,राजू पांचाळ,महेंद्र दुधारे, विलास गुंडेराव,विजय पाटील सोळंके,मोहम्मद मझरोद्दीन,गजानन पाटील सोळंके,साहेबराव वाहूळकर, सचिन नांदेकर,नामदेव जाधव, अब्दुल मोईझ अब्दुल खदिर,सय्यद सुलतान,पुंडलिक गायकवाड यांसह आदींची उपस्थिती होती.सदरील सत्कार सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने ही नवनियुक्त सदस्य व पदाधिकारी यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या..

29 December 2023

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तालुका स्तरावर शिबीर कार्यालयाचे आयोजन

नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट ही महिना सुरू होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपाईमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घेऊन शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

कंधार तालुक्यासाठी 3 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 3 मे, 4 जून असे राहील तर धर्माबाद 5 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 5 एप्रिल, 7 मे, 7 जून 2024. किनवट तालुक्यासाठी 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 12 मार्च, 10 एप्रिल, 10 मे, 10 जून. मुदखेड तालुक्यासाठी 15 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 मार्च, 16 एप्रिल, 15 मे, 14 जून. माहूर तालुक्यासाठी 17 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 18 मार्च, 18 एप्रिल, 17 मे, 18 जून. हदगाव तालुक्यासाठी 19 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 20 मार्च, 22 एप्रिल, 22 मे, 21 जून. धर्माबाद तालुक्यासाठी 22 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 22 मार्च, 24 एप्रिल, 24 मे, 24 जून. हिमायतनगर तालुक्यासाठी 25 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 26 मार्च, 26 एप्रिल, 28 मे, 26 जून. किनवट तालुक्यासाठी 30 जानेवारी, 29 फेब्रुवारी, 28 मार्च, 30 एप्रिल, 30 मे, 28 जून 2024  याप्रमाणे तालुका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून इंजि.विश्वंभर पवार यांची नियुक्तीतसेच माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायक कदम यांसह अन्य चौघांची ही झाली नियुक्ती


नांदेड : नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उत्तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार व भोकर नगर परिषदेच्या लढवय्या माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख यांसह अन्य चौघांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर राज्य शासनाने नियुक्ती( नामनिर्देशित) केली असून या सर्वांच्या नियुक्तीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

प्रत्येक जिल्हास्थानी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते व त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी शासकीय निधी वाटपाचे नियोजन केल्या जाते.त्यामुळे जिल्हा नियोजन समितीस एक प्रकारे विशेष महत्त्व आहे व या महत्त्वपुर्ण निर्णायक समितीवर विद्यमान सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती (नामनिर्देशित) दिल्या जाते.सद्या राज्यात भाजपा,शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) या पक्षांच्या महायुतीचे सरकार सेवारत आहे.या सरकारच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) एक भागीदार पक्ष आहे.तसेच या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार हे विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर सेवारत आहेत.त्यामुळे प्रत्येक जिल्हा स्थानी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीवर या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मरणोत्तर देहदानाच्या संकल्पाने ‘भोसले दांपत्य’ करणार नववर्षाचे स्वागतत्यांच्या स्तुत्य निर्णयाचे विविध स्तरातून होत आहे अभिनंदन!

 नादेड : नांदेड जिल्हा आरोग्य विभागातील हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड येथे प्रयोगशाऴा वैज्ञानिक अधिकारी म्हणून सेवारत असलेले संजय व्यंकटराव भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनिता भोसले दोघे ही रा.नांदेड या दांपत्यांनी नवीन वर्षाेचे स्वागत एका अभिनव आणि सुंदर कल्पक भावनेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.या दांपत्याने मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केेेली असून दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी प्राध्यापक व विभाग प्रमुख,शरीररचना विभाग डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्याकडे रितसर नोंदणी प्रक्रिया केली आहे.

भोसले दांपत्य हे आरोग्य विभागात अगदी सामाजिक सेवाभावाने कर्तव्य बजावतात.’दान करावे तर ते दान इतरांच्या हयातीत महत्त्वपुर्ण व अजीवन उपयोगी ठरावे!’ अशी त्यांची उदात्त भावना आहे.आणि त्यात देहदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे, असे ते नेहमीच इतरांना सांगतात.केवळ सांगतच नाहीत तर या दांपत्याने स्वतः मरणोत्तर देहदान करण्याची रितसर प्रक्रिया करुन नववर्षाचे स्वागत करण्याचा अभिनंदनिय निर्णय घेतला आहे.भोसले दांपत्याचा हा स्तुत्य निर्णय सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे मत अनेकांतून व्यक्त होत आहे.त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी,अधिकारी व मित्र परिवाराने या संकल्पनेचे जोरदार स्वागत आणि कौतूक केले असून मरणोत्तर देहदान करणाऱ्या या दांपत्याचे येत्या प्रजाकसत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्याचे ठरविण्यात आले आहे.तसेत त्यांच्या या उदात्त संकल्पनेतून सर्व कर्मचाऱ्यांसह आदींना प्रेरणा मिळेल व मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा होईल अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत असून या दांपत्यांच्या मरणोत्तर देहदान संकल्पा बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.आकाश देशमुख,कार्यालयीन अधिक्षक कैलास सावळे,सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण,माधव पाटील शिंदे, चेअरमन सुभाष कल्याणकर,पप्पू देसाई नाईक,गणेश सातपुते, मोहन पेंढारे,माणिक गिते,सत्यजीत टिप्रेसवार,व्यंकटेश पुलकंठवार,माधव कोल्हे,चंद्रभान धोंडगे,सचिन दळवी,पांडुरंग बोरकर,बालाजी केंद्रे,शंकर दंतुलवार,कैलास कल्याणकर, रघुनाथ हुंबे,श्याम सावंत,किरण कुलकर्णी,गजानन अल्लापुरे, भारत हाम्पले,जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण जनसंपर्क कार्यालय, उमरी येथे सत्कार..

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे, तळागाळातील सामान्यांसाठी काम करणारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (मा.वि.) जिल्हा संघटक,
मा. दिगांबरराव गायकवाड नागठाणेकर यांनी जमिन अधिकार आंदोलन करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, अशा अनेक राज्यात जावून भूमिहीन लोकांचा लढा तिव्र करून हजारो लोकांना सरकारी जमिनी मिळवून दिले तसेच दलीत अत्याचार महिला अत्याचार बाल कामगार इत्यादी मानवी हक्कांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी लढवया कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून तेलंगणा राज्याच्या वतीने आज हैदराबाद येथे “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण जनसंपर्क कार्यालय, उमरी येथे नायगाव विधानसभेचे युवा नेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उमरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रल्हादराव पाटील इज्जतगावर, नायगांव विधानसभेचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, प्रकाश पाटील चिंचाळेकर, मोहनराव पाटील कारलेकर, बालाजी पाटील हातनीकर, बालाजी पाटील कारेगावकर, व्यंकटराव पाटील केसगिरे, बाबासाहेब पाटील नागठाणेकर, राजेश पाटील ढगे, बालाजी पाटील ढगे, शेख अजहर भाई, भाऊसाहेब राठोड, गोपीनाथ गोळेगावकर सह आदी जन उपस्थित होते..

कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे सत्कार..

दिगांबरराव गायकवाड नागठाणेकर..
यांना समाजरत्न पुरस्कार.. मिळाल्याबद्दल कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे सत्कार करतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य कांग्रेस कमिटी मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने 
आज कवळे गुरुजी जनसंपर्क कार्यालय उमरी येथे दिगांबरराव गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष संजयजी कूलकर्णी, कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, जेष्ठ नेते मल्लिकार्जुन चंदापुरे, माजी सभापती बापुराव पाटील करकाळेकर, शहराध्यक्ष किशोर पबितवार, आनंदराव पाटील भायेगांवकर, पंजाबराव पाटील कारलेकर, माधवराव पाटील इज्जतगांवकर, बालाजी पाटील इज्जतगांवकर, वसंतराव जाधव सह आदिजन उपस्थित होते

शालेय विद्यार्थ्यांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदविण्याचे साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने पूज्य साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. अशी माहिती कथामालेच्या बैठकीत अध्यक्ष तथा संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी दिली आहे.यावेळी डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, ईश्वरदास मोताळे आदींची उपस्थिती होती.
स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ साली स्थापन केलेल्या साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मराठवाडा स्तरावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कथाकथन स्पर्धेचे हे पाचवे वर्षे होय. मराठवाड्यातून आजवर उत्तम प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते.
स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा आहे.️
कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे. कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देण्यात येईल तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्य़ा स्पर्धकाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख दीड हजार रुपये, द्वितीय : एक हजार रुपये, तृतीय : पाचशे रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख दि.३ जानेवारी,२०२४ आहे. सहभागासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. https://forms.gle/8mgwTH9PCGrriuPb8
जिल्हास्तरीय स्पर्धा सोमवार दि. ८ जानेवारी, २०२४, तर विभागस्तरीय स्पर्धा सोमवार दि. २२ जानेवारी,२०२४ रोजी आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा नियोजनात ऐनवेळी काही बदल कराण्याचा अधिकार संयोजन समितीकडे असेल. स्पर्धेचे ठिकाण नावनोंदणी नंतर यथावकाश कळविण्यात येईल.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रेरित करावे. स्पर्धा यशस्वितेसाठी सहकार्य, सहभाग नोंदवावा असे आग्रहाचे आर्जवकथामालेचे जिल्हा संयोजक तथा प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश चौधरी, सहसंयोजक पद्माकर कुलकर्णी, विलास कोळनूरकर यांनी केले आहे.

27 December 2023

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमीत्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

भोकर – क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमित्त उद्या दिनांक २८ डिसेंबर रोजी प्रा. डॉ. कमलताई फोले यांच्या अध्यक्षतेखली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कमलताई फोले (वाणिज्य विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर) तर उद्घाटक संतोषजी टारपे (माजी आमदार, कळमनुरी) तसेच अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन देखील यादरम्यान होणार आहे.
जयंती सोहळ्याच्या नियोजन करण्याचे उद्देशाने दिनांक २५ रोजी डॉ. उत्तम वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी समाज बांधवांनी या जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. कमलताई फोले तसेच जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले.
“क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा” यांच्या १४८ व्या जयंती सोहळ्याची सुरुवात येथील बिरसा मुंडा चौक मुदखेड रोड येथून मूळ आदिवासी पारंपारीक व सांस्कृतिक प्रदर्शन मिरवणुकीने होणार असून यातील मुख्य आकर्षण म्हणजे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, किनवट तालुक्यातील पारंपारिक मूळ आदिवासी ढेमसा नृत्य, आदिवासी दंडार नृत्य व महिलांचे सांस्कृतिक कलाप्रदर्शन असणार आहे तसेच माऊली मंगल कार्यालयात आदिवासींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी सभापती शिवाजीराव देवतुळे, डॉ. अशोक माजळकर (जिल्हाध्यक्ष, अनुसूचित जमाती, नांदेड विभाग), माधवराव माजळकर (माजी सरपंच, समंदरवाडी), धोंडीबा भिसे (मा. संचालक, कृ. उ. बा. समिती, भोकर), हनुमंत वागतकर ( वाहतूक नियंत्रक, एस. टी. डेपो, भोकर), संजय धनवे (कोषाध्यक्ष), श्री शेषराव हुरदुके, आमदरी, श्री मारुती वागतकर, श्री रंगराव वागतकर, श्री राजू बुरकुले तसेच सौ. संध्याताई भुरके, श्रीमती अनुराधाताई मेंडके, सौ. सरस्वती भिसे, सौ. रुक्मीना पांडेवाड, सौ. प्रेमलता धनवे, सौ. भाग्यलक्ष्मी तायवाडे, श्रीमती सुनिता कोतवाल, सौ. शकुंतला वागतकर, सौ. सुमन डोखले, सौ. अंबिका वागतकर व शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह भोकर येथील सर्व विद्यार्थिनी यांचींही यावेळी उपस्थिती होती.

मानली ना हार मी’ या कवितासंग्रहास कवयित्री शांता शेळके पुरस्कार कवयित्री सुचिता दामोदर गायकवाड यांना सदरील पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

 कणकवली : येथील कवयित्री सुचिता दामोदर गायकवाड यांच्या ‘मानली ना हार मी’ या कवितासंग्रहास सन २०२१-२२ या वर्षातील कवयित्री शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार झाला होता.सदरील पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले असून कवयित्री सुचिता गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते तो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सुगावा प्रकाशन,पुणे या नामांकित प्रकाशन संस्थेने ‘मानली ना हार मी’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची या कवितासंग्रहास प्रस्तावना आहे.तसेच सुप्रसिद्ध समीक्षक,विचारवंत,कवी यशवंत मनोहर यांची या कविता संग्रहाला पाठराखण लाभली आहे.मंचर जि. पुणे येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी राज्यातील महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवितासंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.मंचर येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे,सुप्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते सुचिता गायकवाड यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जिजाऊ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ॲड.सुनिल बांगर,शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायगुडे उपस्थित होते.
सुचिता गायकवाड यांच्या ‘साक्षीदार’ या पहिल्या कवितासंग्रहालाही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माता रमाई हे त्यांनी लिहिलेले चरित्रपर पुस्तक प्रकाशित असून ‘मानली ना हार मी’ या कवितासंग्रहातून त्यांनी स्त्रीवादी, ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक प्रश्न मांडले आहेत.तर प्रा.सुचिता गायकवाड यांना कवयित्री शांता शेळके पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव डी.एम. नलावडे,कार्याध्यक्ष डॉ.सूर्यकांत तायशेटे,उप कार्याध्यक्ष मोहन काणेकर,कै.सौ.इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्याम सोनुर्लेकर,एस.एम.हायस्कूल चे मुख्याध्यापक जी.एन. बोडके व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी पाटील गौड तर ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती.

 प्रतिनिधी
भोकर : आगामी लोकसभा व विविध निवडणूकीचा अनुषंगाने पक्ष संघटन वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने( अजित दादा पवार गट) पक्षांतर्गतच्या विविध विभाग कार्यकारिणीच्या पदाधिकारी नियुक्तीचे सत्र सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रदेश कार्यकारिणी,जिल्हा कार्यकारिणीसह आदी पदांकरीता अनेक पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती केली असून भोकर येथील धडाडीचे युवा नेतृत्व बालाजी पाटील गौड यांची प्रदेश उपाध्यक्षपदी व उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती केली आहे. सदरील नियुक्तीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 15 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात संपृक्तता मोहिम

 नांदेड दि. 27 :- जिल्ह्यातील पी. एम. किसान योजनेतील बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी याबाबत 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यात संपृक्तता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

या विशेष मोहिमेत आधार सिडींगसाठी पोस्ट खाते, सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा. तर ई-केवायसी करीता ग्रामस्तरी नोडल अधिकारी (व्हीएनओ) व सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गावासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्त असणार आहेत. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) म्हणून ग्रामपातळीवरील अधिकारी (कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक) नेमणूक करण्यात आली आहे.

बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थ्यांची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नविन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी अशी सर्व कामे आता गावातच पूर्ण होतील त्यासाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

26 December 2023

भोकर येथील श्रीमती विमल मधुकरराव जोशी यांचे वृद्धापकाळी दु:खद निधन

प्रतिनिधी

भोकर : भोकर येथील प्रख्यात पुरोहित स्व.मधुकरराव जोशी यांच्या पत्नी श्रीमती विमल मधुकरराव जोशी (९०) रा.जोशी गल्ली,इनामदार गल्ली परिसर भोकर जि.नांदेड यांचे दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अल्पश: आजारात वृद्धापकाळी राहत्या घरी दु:खद निधन झालं आहे.काही महिन्यांपासून त्याना हृदयविकाराचा आजार होता.

जि.प.के.प्राथमिक शाळा बेंबर ता.भोकर या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनंत मधुकरराव जोशी आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर चे पदाधिकारी तथा साधना टि.व्ही.चॅनलचे भोकर तालुका प्रतिनिधी पत्रकार रमाकांत मधुकरराव जोशी यांच्या त्या मातोश्री होत.स्व.मातोश्री विमल मधुकरराव जोशी यांच्यावर आज दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभूमी,भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,तीन सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
🌹🙏🌹🙏🌹
 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या सर्व पदाधिकारी बांधवांची विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!

25 December 2023

बुद्धाच्या विचारांचे तरंग निर्माण करण्यासाठी कँडल मार्च – महाथेरो बी . संघपालजी

भोकर – तथागत भगवान बुद्धांच्या मानवकल्याणांचे विचार तरंग निर्माण करून माणसा माणसात प्रेम , मैत्री , सलोखा , करुणा, प्रेमभाव रुजवण्यासाठी कँडल मार्च असते असे प्रतिपादन महाथेरो बी .संघपालजी मुंबई यांनी कँडल मार्च नंतर प्रवचनात उपासकांना उपदेश करताना बोलत होते.
भारतीय बौद्ध महासभा व महात्मा फुले नगर यांच्या वतीने आयोजित श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर समारोहाच्या पूर्वसंध्येला शनिवार (दि . २३ रोजी)रोजी सायंकाळी लुंबिनी बुद्ध विहार येथून प्रवर्जीत श्रामणेर भिक्खू संघा सह हजारो उपासक , उपासिकांनी हातात मेणबत्ती प्रज्वलीत करून तेरा मंगल , तेरा मंगल ! सबका मंगल होय रे च्या निनादात हा कँडलमार्च महाथेरो बी. संघपालजी , थेरो महवीरो , भन्ते बोधी धम्मो , भन्ते महानाम , जिल्हा शाखेचे सरचिटणीस रविकिरण जोंधळे , जि .संस्कार सचिव आप्पाराव येरेकार ,केंद्रीय शिक्षक युवराज मोरे ,तालुका अध्यक्ष बाबुराव सोनकांबळे तालुका कोषाध्यक्ष गोविंद गायकवाड , प्रसाद शहाणे, संघपाल पाटील,तालुका संघटक सुर्यमोहन जंगमे ,शहर अध्यक्ष साहेबराव मोरे , शहर सरचिटणी रवि महाबळे , शहर कोषाध्यक्ष श्रीधर घुले यांच्या नेतृत्वात कँडल मार्च प्रारंभ होऊन महादेव मंदिर , गांधी चौक , डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गो लुंबिनी बुद्ध विहार प्रांगणात विसर्जीत झाली. नंतर प्रवचनात महाथेरो बी . संघपाल यांनी कँडल मार्च यशस्वी करण्यामधे सहभाग असणारे तालुका , शहर , वार्ड , ग्राम शाखा सहभागी समता सैनिकदल , सामाजिक कार्यकर्ते , सहभागी उपासक , उपासिका , बालक , बालीका या सर्वांचे आभार मानुन डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीत वायफळ पैसा खर्च न करता तो पैसा एखाद्या उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजवंतास मदत करावे .बाबासाहेबांची जयंती डिजे वर नाचून नव्हे तर १८तास अभ्यास करून साजरी करण्याचे आवाहन केले .

24 December 2023

भोकर मुदखेड महामार्गावरील पांडूरणा घाटातील काम खोळंबले ,नागरीक त्रस्त

भोकर :(प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे पांडुरणा घाटात रस्त्याचे काम खोळंबले असून याचा दळणवळणावर मोठा परिणाम होत असताना दिसून येत आहे त्वरित या कामाची सुरुवात करावी अन्यथा जनआंदोलन करण्याची तयारी विविध पक्ष संघटनेकडून दर्शविण्यात आली आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात दळणवळणाला चालना मिळावी म्हणुन,भोकर मुदखेड या २२कि.मी.च्या माहामार्गासाठी सुमारे ११० कोटी रुपयांचा निधी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आसताना ऊपलब्ध करुन दिला होता. शारदा कंट्रक्शन कंपनीने मागील दोन वर्षाच्या कालखंडात हे काम जलदगतीने पूर्ण केले माञ पांडुरणा ते रिठ्ठा हा केवळ तीन किलोमीटरचा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे, वनविभागाच्या पूर्व परवानगीअभावी रखडलेले आहे अशी माहिती प्राप्त होते.काहीही असले तरी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत मात्र करावी लागत आहे.
 या महामार्गास तालुक्यातील साळवाडी (डोरली),पांडुरणा,रिठा आदी प्रमूख गावे जोडलेली आहेत. भोकर शहर जवळ असल्यामुळे या गावच्या लोकांची सतत या मार्गे वर्दळ असते. शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार प्रमूख रस्ता वनविभागाच्या परवानगी अभावी खोळंबले असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हात वर केले जात आहेत तर दूसरीकडे आधिक चौकशीत वनविभाग मात्र या कामासाठी परवानगी दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवन सांगतात. मग याप्रकरणी बांधकाम विभागाची धूळफेक कशासाठी असा प्रतिप्रश्न नागरिकात उपस्थीत होत आहे..
जिल्ह्यातील सर्वात मोठी तरकारीची बाजारपेठ भोकर येथे आसल्या कारणाने पांडुरणा, समंदरवाडी, गारगोटवाडी, बोरवाडी साळवाडी ( डोरली) या परिसरा बरोबरच मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री साठी हा मार्गे उपयोगी पडतो अशात या रस्त्यामुळे, व रस्त्यातील खंड्यामुळे दळणवळणावर परिणाम ओढावत आहे. शेतकऱ्यांकडून अथक घामाचे सडे आंथरून फळभाज्या व पालेभाज्याचे उत्पादन घेतले जाते तेच भाजीपाला बाजारपेठत वेळेवर पोहचत नसेल तर त्याचा काय फायदा! अनेकदा शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने तरकारी विकावी लागत आहे. रखडलेले हे काम कधी मार्गी लागेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, यांनी नागरिकांच्या हितार्थ याप्रकरणी आंदोलनं छेडण्याचा इशारा दिला आहे..

विश्वाला राग द्वेश मोहाची आग लागली आहे ती आग सद्धम्म जोपासून थांबवा – थेरो महावीरो

भोकर- विश्वाला राग द्वेश मोहाची आग लागली असून ती आग तथागताचा सद्धम्म जोपाल्यास शमवता येत असल्याचे पुज्य भदंत महावीरो थेरो यांनी प्रवर्जीत श्रामणेर संघाच्या भोजनदान प्रसंगी धम्मदेसना देताना सांगितले .
पंचशील बुद्ध विहार येथे शहीद प्रफुल्ल नगर भागातील उपासक , उपासिका यांच्या वतीने प्रवर्जीत श्रामणेर संघास भोजनदान देण्यात आले यावेळी पुज्य भदंत बी . संघपालजी महाथेरो , भन्ते बोधी धम्मो , भन्ते महानाम (प्रशिक्षक )यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना थेरो महावीरो म्हणाले की , पारमितांचे फार मोठा संग्रह बोद्धी सत्वाकडे असतो त्या पारमितांचे पालन करणे म्हणजे सद्धम्म होय , या सद्धम्माचा अभिप्राय समजून घेणे हे माणवाचे कर्तव्य असून मरण एक परीक्षा आहे ज्याला जीवनाचा उद्येश कळाला त्याला सुखाचे शांतीचे मरण लाभत असल्याचे सांगून या जीवनात प्रत्येकान प्रसन्न मनाने,सातत्याने सत्कर्म करण्याचे आवाहन केले .
याप्रसंगी पुज्य भदंत बी . संघपालजी महाथेरो यांनी आपल्या धम्मदेसनेत माणवाच्या जीवनातील शुद्ध तरंगाने अशुद्ध तरंग नष्ट होतात म्हणून शुद्ध तरंग अशुद्ध तरंगावर कसे परीणाम करतात याचे महत्व विषद करून बुद्धांच्या विचारांचे तरंग निर्माण करण्यासाठी पणती ज्योत मिरवणूकीत सहभागी होण्याचे आवाहन करून गाथेतून सर्वांना आशिर्वाद दिला . यावेळी तालुका अध्यक्ष बाबुराव सोनकांबळे शहर अध्यक्ष साहेबराव मोरे , केंद्रीय शिक्षक युवराज मोरे , वार्ड शाखाध्यक्ष डी.एस .गायकवाड ,डी . जे . सोनकांबळे ,राजीव खंडारे , गंगाराम इंगळे , संजू गर्जे , सुरेश जोंधळे , विकास क्षिरसागर आदीसह सोबतच नगरातील उपासक , उपासिका मोठ्या संखेने उपस्थित होते.

22 December 2023

भोसी येथे श्रमनेर भिक्कूच्या धम्मऱ्यांलीचे स्वागत व भोजनदान

भोकर / प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरु असलेल्या श्रामणेर तथा बौध्दाचार्य प्रशिक्षण वर्गाची धम्माच्या प्रचार प्रसारासाठी शनिवारपासून (दि.१६) सकाळी ६ वाजता मंगल मैत्रीची शहराच्या वेगवेगळ्या भागात काढल्या जात असलेल्या रॅलीतून तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे या मंगल गाथेतून राष्टीय एकात्मते बरोबर दृढ राष्ट्रभावनेचा संदेश दिला जात असल्याने शहरासह ग्रामीण भागात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. बौद्धांची मातृ संस्था भारतीय बौद्ध महासभेतर्फे श्रमणेर तथा बौध्दाचार्य प्रशिक्षणास शुक्रवारपासून (दि. १५) प्रारंभ झाला असून भन्ते बोधी धम्मो तपोवन बुद्धभूमी गोळेगाव, भन्ते महानाम | (प्रशिक्षक) यांच्या नेतृत्वात सहभागी

श्रामणेर संघातील ४६ भन्ते यांची तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रेच्या मंजुळ आवाजात निघनाऱ्या रॅलीतून धम्माच्या प्रचार प्रसाराबरोबर समता, शांतता, राष्ट्र भावना, देशाची दृढ एकात्मता सर्व नागरीकात रुजवली जात आहे. रॅली दरम्यान वार्डात घरासमोर रांगोळीची सजावट करून नागरीक श्रामणेर संघावर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करत आहेत.दि.२२ रोजी तालुक्यातील भोसी येथील बोद्ध उपासक उपासिकानी श्रमनेर संघास आदरपूर्वक निमंत्रित करून धम्माच्या नियमानुसार सर्व श्रमनेरांचे आदर तिथ्य करून भोजनदान दिले. आणि भोजनदाणा नंतर भंतेजी कडून धम्म प्रवचन सर्वन केले त्या वेळी भोसी येथील सर्व उपासक, उपासिका बालक, बालिका यांनी शुभ्रवस्त्र परिधान केल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते सहभाग या श्रमणेर संघ रॅलीत तालुका शाखेचे अध्यक्ष बाबुराव सोनकांबळे, कोषाध्यक्ष गोविंद गायकवाड, शहराध्यक्ष साहेबराव मोरे, डी.जे. सोनकांबळे, संजू गर्जे, श्रीधर घुले शाखेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह भोसी येथील सर्व उपासक, उपासिका यांनी सहभाग घेतल्याने मंगल मैत्री धम्म फेरी पाहणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.

ऋतुजा पाटील ठरली 'महाराष्ट्राचा महावक्ता'

भोकर - येथील शाहू परिवार आयोजित *'कै मा.आ. बापूसाहेब दे गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत'* संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय धुप्पा, जि नांदेड येथील कु. ऋतुजा पाटील हिने 'महाराष्ट्राचा महावक्ता' बनण्याचा बहुमान पटकावला असून तिला एकतीस हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक मिळालं आहे. स्पर्धेचा विषय 'आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या सुटतील काय?' असा होता. या स्पर्धेत दुसरे पारितोषिक भोकरच्या कु.धनश्री कदम तर तिसरे पारितोषिक गडहिंग्लजच्या पाटील संकेत कृष्णात शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज जि. कोल्हापूर यास दिले गेले स्पर्धेच्या सांघिक गटातून फिरता चषक राजर्षी शाहू महाविद्यालया लातूरच्या स्पर्धकांना मिळाला आहे. 

मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे शाहू परिवाराने केलेले उत्कृष्ट नियोजन! विद्यार्थ्यांसोबतच अनेक नामवंत मंडळींच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अतिशय व्यापक प्रमाणावर पार पडला. आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या काळात शाला-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा वैचारिक जागर निश्चित उपयुक्त ठरेल असे मत शाहूचे प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी व्यक्त केले. दै देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी बी आर पांचाळ, दै सकाळचे तालुका प्रतिनिधी बाबुराव पाटील, साहित्यिक चंद्रकांत चक्रावार यांनी सतत दोन दिवस परीक्षण करून निःपक्षपाती निकाल दिला. 

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव पा किन्हाळकर होते.प्रमुख पाहुण्यामध्ये माजी .प. स. सभापती शिरीषराव गोरठेकर,माजी . सभापती जि. प. नांदेड प्रकाशराव भोसीकर, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर जगदिश भोसीकर,माजी सभापती जी. प. नांदेड बाळासाहेब रावनगावकर, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लामकानीकर,नूतन विद्यालय उमरी चे सचिव तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड कैलासभाऊ गोरठेकर, संस्थथेचे पदाधिकारी यां सगळ्यांनी सर्वांचे मनापासुन अभिनंदन केले. पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती शाहूचे प्राचार्य संजय देशमुख यांनी दिली आहे.याकमी शाहू परिवाराच्या,उत्कृष्ट नियोजनाने,सर्वच सदस्यांनी अपार मेहनती ने कार्यक्रम यशस्वी करून दाखविला असे मत विजेत्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी काळवणे यांनी केले तर सुरेख सूत्रसंचालन जोंधळे राहुल, चव्हाण निलेश यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य संजय देशमुख यांनी मानले.

डॉ.मोहन चव्हाण यांची महाराष्ट्राच्या तांडा -वस्ती संपर्क अभियान संयोजकपदी निवड*


भोकर ,: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश तांडा वस्ती संपर्क अभियान संयोजकपदी डॉ मोहन चव्हाण(नांदेड) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
डॉ मोहन चव्हाण हे भोकर तालुक्यातील चीदगिरी येथील रहिवासी आहेत. ते भारतीय जनता पार्टीत गेल्या आनेक वर्षापासून सक्रीय असून महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे
डॉ.चव्हाण यांनी तांडा भागातील नागरिकांच्या समस्यांवर अनेकदा रस्त्यावर येऊन आवाज उठवला आहे. ते तांडा भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वीज यासारख्या मूलभूत सुविधां मिळावेत म्हणून प्रयत्नशील असतात. यांची निवड ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तमाम तांडा वस्तीतील नागरिकांना उमेद देणारी ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तांडा वस्ती संपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबविले जाणार आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

20 December 2023

अतिवृष्‍टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन

नांदेड, :- जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्‍या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्‍यावे. ई-केवायसी करण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याच्‍या आधार संलग्‍न बॅंक खात्‍यावर शासनाकडून रक्‍कम जमा करण्‍यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   

जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्‍ह्यातील 6 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. सद्यस्थितीत 3 लाख 50 हजार बाधित शेतकऱ्यांसाठी 250 कोटी रुपयाच्या रक्कमेच्या याद्या शासनाच्‍या ऑनलाईन पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधीत तलाठी यांनी अपलोड केल्‍या आहेत. ही माहिती अपलोड केलेल्‍या बाधित शेतकऱ्यांना वि. के. नंबर प्राप्‍त झाले असून हे नंबर संबंधीत गावाचे तलाठी यांच्याकडे उपलब्‍ध आहेत. बाधित शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडून वि. के. नंबर प्राप्‍त करुन घ्‍यावेत. 

ई-केवायसी होत नसल्‍याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्‍याअनुषंगाने शासन स्‍तरावर संपर्क केला असता, केंद्र शासनाच्‍या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्‍याने बायोमॅट्रीक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्‍याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्‍या लवकरच सोडवली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

भोकर अपर पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक पो.ना. समंदरे यांचा मुंबईत रेल्वे अपघात मृत्यू

आज सकाळी हिंदू दहनभूमी गोवर्धघाट नांदेड येथे त्यांच्यावर पोलीस इतमामात होणार अंत्यसंस्कार

प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाणे अंतर्गत सेवाकरत असलेले भोकर अपर पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले पो.ना.शिवराम श्रीपतराव समंदरे हे बहिणीस मुंबई येथे सोडण्यासाठी गेले असता दि.१९ डिसेंबर रोजी मुंबईतील एका रेल्वेस्थानकावर लोकल ट्रेनच्या अपघात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने नांदेड जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.तर आज दि.२० डिसेंबर रोजी सकाळी हिंदू दहनभूमी गोवर्धघाट नांदेड येथे त्यांच्या पार्थिवावर पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मूळचे देगलूर तालुक्यातिल रहिवाशी आहेत.

18 December 2023

धम्माच्या अनुसरणातूनच मानवाचे कल्याण होते-भन्ते बी. संघपाल

भोकर : केवळ धर्मांने काहीही होत नसून बुद्धाने सांगितलेल्या महान धार्मिक जीवन मार्गाचे अनुकरण करणे आवश्यक आहे तसेच ती बौद्धांची जबाबदारी असून यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होईल असे प्रतिपादन भन्ते बी. संघपालजी यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने भोकर येथे आयोजित दहा दिवसीय श्रामणेर शिबिरासाठी येथे आलेल्या पूज्य भदंत आणि बौद्धाचार्य शिबिरातील प्रशिक्षणार्थी भिक्खूंना श. प्रफुल नगरातील संबोधी परिसराच्या वतीने दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी भोजनदान देण्यात आले. यावेळी भोजनदानानंतर दिलेल्या धम्मदेसनेत ते बोलत होते.

17 December 2023

पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, विकास आडे ॲक्शन मोडवर"नो ॲडजस्टमेंट डायरेक्ट एफ आय आर"

भोकर- येथील अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी पोलिस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने कंबर कसली असून दररोज कार्यवाहीचा धडाका सुरू आहे काल दिनांक 15 डिसेंबर रोजी प्रतिबंधित गुटखा विक्रीस जाताना पकडला आणि कार्यवाही केली मात्र ज्यांची नियुक्तीच मुळात घातक अन्नपदार्थ विरोधातील कार्यवाहीसाठी आहे तो विभाग मात्र अद्यापही कोमात असल्याने यातले गौडबंगाल काय असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे
बिघडते सामाजिक स्वास्थ्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गुटखा पानमसाला सदृष्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली मात्र शेजारील राज्यातून छुप्या मार्गाने गुटखा येतो आणि भोकर सह अन्य शहरातही करोडो रुपयांचा गुटखा साठवून तो विक्री केला जातो. संबंधित अधिकाऱ्यांचे आशीर्वादाशिवाय इतक्या उघडपणे गुटखा विक्री होऊ शकणार काय,? असा सवाल उपस्थित होत आहे.
व्यसनाधीनतेमुळे देशाचा कणा असलेली तरुणाई पोखरली जात असून अलीकडे कर्करोगाचे प्रमाणही सपाट्याने वाढत आहे अनेकांना तर तारुण्यातच संपवले मात्र अन्न व औषधी प्रशासनाचे आशीर्वादाने अजून किती तरुणांना कर्करोगाने संपवले जाणार हे काळच ठरवेल. भोकर शहरात आणखी काही महाभाग असेच आपले दुकान चालवत आहेत यांच्याही मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सामोर यावे लागणार आहे तरच या विभागाच्या कथीत अधिकाऱ्यांची महिने”वारी” बंद होईल. आज मितीस पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, हे सध्या ॲक्शन मोडवर असून “नो ॲडजस्टमेंट ओन्ली ॲक्शन” अशी भुमिका घेत अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडल्याने गुन्हेगारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच वर्षानंतर नागरिकात पोलिसांचे कौतुक होत असताना पहावयास मिळते.
वास्तविकपणे सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नाठाळाच्या माथी वेळीच काठीचा घाव घालण्यासाठी शासनाची संबधित व्यवस्था नियुक्त असते परंतु ही व्यवस्था आपल्या पदाचा दुरुपयोग करुन श्रीखंड खाण्यासाठी करत असेल तर अपेक्षा कोणाकडून कराव्यात? हा यक्ष प्रश्न समोर आला आहे. अश्याच भ्रष्ट आधिकारी व कर्मचारी यांच्या हातमिळवणीतून, तालुक्यातील काल-परवाचे , कोपऱ्यातील पान टपरी चालक, नर्डेवाले, जत्रेतील गुडगुडीवाले आज करोडोंचे मालक, उंच माडीवाले गाडीवाले झाले असल्याचे दिसून येत आहेत. यात आधिकारी, कर्मचारी व व्यावसायीक मालामाल झाले परंतू कित्येकांचे संसार तुटले, देशोधडीला लागले तर तंबाखूजन्य गुटख्याने कित्येक कर्करोगासारख्या *जीवघेण्या* आजाराने बळी गेले त्याचे काय? शासन यासाठीच यांची नियुक्ती केली आहे का? असा सवाल उपस्थित होण्यावाचून रहात नाही. भोकरच्या दोन दबंग अधिकाऱ्यांनी
लोकहितासाठी राजकीय नेते व प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात मैदानात उडी घेऊन आपल्या अधिकाराच्या कक्षेत कारवाईचा तडाखा सुरू केल्याने प्रथमच भोकर तालुक्यातील नागरिकात पोलिसांबद्दल विश्वासहर्ता वाढली आहे. दरम्यानच्या काळातील पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

15 December 2023

भोकर येथील विश्वकर्मा योजना नावनोंदणी महामेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-गणपत पिट्टेवाड


१७ डिसेंबर रोजी भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर आयोजित नावनोंदणी शिबीर व महामेळाव्यास नांदेडचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार…
भोकर : भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर यांच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी माऊली मंगल कार्यालय भोकर येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभ घेण्यासाठी नावनोंदणी शिबीर व मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांसह आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.तरी या मार्गदर्शन महामेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड पोमनाळकर यांनी केले आहे. 

बारा बलुतेदारांना रोजगार मिळावा,उद्योग क्षेत्रात भरारी घेता यावी यासाठी प्रभावी नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार,दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता माऊली मंगल कार्यालय भोकर येथे भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर च्या वतीने नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीर व महामेळाव्याचे उद्घाटन नामदार गिरीष महाजन हे करणार आहेत.तर याप्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, संघटनमंत्री संजय कोडगे,आ.राम पाटील रातोळीकर,आ. भिमराव केराम,आ.तुषार राठोड,आ.राजेश पवार,माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील,संतुकराव हंबर्डे,दिलीप कंदकुर्ते,देविदास राठोड, प्रणिताताई चिखलीकर,राजा खंडेराव देशमुख,बाळा साकळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थिती रहावे,असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर चे जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड यांनी केले असून सदरील नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी त्यांच्यासह ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष साहेबराव राठोड,संतोष मारकवार, माऊली पाटील चिंचाळकर,शिवाजी पाटील जाधव,रमेश मटकमवार,माधव पाटील शिंदे,श्रीकांत पाटील किन्हाळकर,नंदु ऱ्याकावार,बालाजी वाघमारे यांच्यासह भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

भोकर येथे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

भोकर/ (प्रतिनिधी)- येथील 
गटसाधन केंद्राच्या वतीने शहरातील कै. लक्ष्मणराव घीसेवाड विद्यालयात ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.१५ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. यात शहरी व ग्रामीण भागातील शाळांनी स्वयंस्फूर्तीने विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता.

या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष नागनाथरावजी घिसेवाड, तर प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अनंत चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सौ सुमन गोणारकर, दैं.सकाळचे बातमीदार बाबुराव पाटील , विमल इंग्लिश स्कूल चे संचालक ईश्वर नाईक,
ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे ,
 उप मुख्याध्यापक कैलास किनेवाड,सामाजिक कार्यकर्ते नागोराव शेंडगे, केंद्रप्रमुख जकियोदिन शेख,पत्रकार विजय चिंतावार ,कमलाकर बरकमकर,रमाकांत जोशी (बालाजी कदम, विठ्ठल सूर्लेकर , विशाल जाधव, आदी यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील अनेक शाळांनी विविध विषयांवर
आधारित प्रयोगाचे सादरीकरण केले.

प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक नुतन प्राथमिक शाळा भोकर ( विज्ञान फायर सेंसर ) व्दितीय क्रमांक- जि.प.हा. कीनी ( चंद्रयान प्रतिकृती ) तृतीय- क्रमांक , श्री शाहू महाराज विद्यालय भोकर ( चंद्रयान 3 ) तृतीय- जिल्हा परिषद प्रा.शाळा थेरबन (घरघुती सुक्ष्म दर्शक यंत्र)

माध्यमिक गटातून
प्रथम क्रमांक- श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर ( रोबोट ),
व्दितीय क्रमांक- जि.प.हा. किनी 
( गोबर गॅस एक पर्यावरण पूरक इंधन),
तृतीय क्रमांक - कै.लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर ( हायड्रोलिक जे.सी बी ) अनुक्रमे या शाळांनी वरील क्रमांक पटकावला आहे.
प्रयोगाचे निरीक्षण विज्ञान शिक्षक एच . जी . कुलकर्णी . आर जी लक्षटवार, एस. एस अंबेकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक एच . जी. कुलकर्णी तर सुरेख 
सुत्रसंचालन चंद्रकांत लोडखे यांनी केले शेवटी अभार प्रदर्शन सुधांशु कांबळे यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

भोकर पोलिसांनी २८ हजारांचा गुटखा पकडला

भोकर (प्रतिनिधि)…पोलीस स्थानक हद्दीत, काळया बाजारात विक्रीसाठी नेत असलेला गुटखा भोकर पोलीसांनी पकडुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कार्यवाहीने गुटखा माफियात खळबळ उडाली आहे.
याबाबत आधिक वृत असे की, महाराष्ट शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य पदार्थ हा मानवी आरोग्यास हानीकारक असुन ते मानवाने सेवन केल्यास त्यास दुर्धर आजार होऊन वेळ प्रसंगी मृत्यु ओढाऊ शकतो हे माहीती असतांना देखील जाणीव पूर्वक गुटखा ग्रामीण करण्याचा चंग काही गुटखा माफियानी उराशी बाळगला आहे.काल दि.१७ गुरुवार रोजी असेच ग्रामीण भागात दुचाकीवर गुटखा विक्री साठी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन दुपारी चार वाजता मुदखेड चौक परिसरात दबंग पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव,पोलिस हेड कॉन्स्टेबल मोईन, पोलिस कॉन्स्टेबल अर्किलवाड, पवार यांच्या पथकाने अचानक छापा टाकून सुमारे ५८३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कार्यवाही केली आहे.

14 December 2023

भोकर पोलिसांची धाडसी कारवाई; चोरीच्या सतरा दुचाकी जप्त

भोकर- शहरासह परिसरात झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांकडून धाडसी कारवाई करण्यात आली असून दोन अट्टल चोरटयांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ०८लाख ७०हजार रुपयांच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती असे की, दिवशी बू येथील विजय सोनकांबळे व नवीन गुद्देवाड हे दोघे तेलंगणा राज्य व भोकर पोलीस स्थानक हद्दीतून दुचाकी चोरी करून विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून यातील विजय सोनकांबळे या आरोपीस ताब्यात घेऊन आधिक चौकशी केली असता आरोपीने मोटर सायकली चोरून विकत असल्याची कबुली दिली यानुसार भोकर पोलिसांनी गु . र.नं.४१३/२३ भा. द वि ३७८ नुसार गुन्हा दाखल करून तपासाचे चक्री गतिमान केली तेव्हा या चोरट्याने तामसा येथून एक भोकर पोलीस स्थानक हद्दीतून दोन व नजीकच्या तेलंगाना राज्यातून चौदा दुचाकी चोरून मजूरवाडी तामसा येथील अल्ताफ शेख यांना विक्री केल्याची कबुली दिली. यानुसार पोलिसांनी तब्बल आठ लाख सत्तर हजार रुपयाच्या सतरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत दुसरा आरोपी नवीन गुद्देवाड हा मात्र पोलिसांना गुंगरा देण्यात यशस्वी झाला असून सदर आरोपीस अटक झाल्यास आणखी चोरीच्या गाड्या मिळून येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान दोन आरोपींना आज दि १३ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. चार दिवसाच्या पोलीस कोठडीत या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होणार आहेत.
सदर यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिगंबर पाटील फौजदार विकास आडे पोलिस अंमलदार दिलीप जाधव ,नामदेव जाधव, परमेश्वर कळणे,मोईन सय्यद, गुरुदास आरेवार यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या उत्तम कामगिरीचे नागरिकात कौतुक होत आहे.

12 December 2023

भोकर जवळील सुधा तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली..

भोकर प्रतिनिधी :- भोकर शहरापासून जवळच असलेल्या सुधा तलावात दि.११ डिसेंबर च्या दुपारी अडीच वाजता एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
घटनेचे वृत असे की दि.११ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी सुमारे अडीच वाजताच्या दरम्यान सुधा तलावालगत गुरे चारण्यासाठी नेलेल्या गुरख्यांना मृतदेह तरंगत असल्याचे दिसल्याने गुराखी लोकांनी याची पोलिसांना माहिती कळवली. यावरून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, फौजदार विकास आडे, पोलीस अंमलदार भीमराव जाधव, गुरुदास अरेवार, मंगेश क्षीरसागर आदी पोलिस आधिकारी व कर्मचारी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन स्थानीक मच्छीमारांच्या मदतीने तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यावेळी मृतदेहाचे दोन्ही हात हे पाठीमागे बांधण्यात आलेले होते. त्यामूळे ही आत्महत्या केलेली नसून तो घातपात असल्याचा पोलिसाकडून संशय व्यक्त केल्या जात आहे. सदरील मृतदेह हा ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्यात आले असून पोलीसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मयताच्या हातावर तेलगु भाषेत आई तर इंग्रजी भाषेत सनी, सिंधू नरेश, प्रिया अश्या नावाचे ट्याटू ने गोंदलेली नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असावे असे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सदरील इसमाची ओळख पटविण्यासाठी मृतदेह हा डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील शवगृहात ठेवले जाणार असल्याचे कळते.

05 December 2023

दहा रुपयांचे नाणे अधिकृतच न घेतल्यास होणार कायदेशीर कारवाई

नांदेड :-  जिल्ह्यातील काही शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका 10 रुपयांचे नाणे व्यवहार करण्यासाठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा असून हे नाणे स्विकारण्यास नकार देणारे विक्रेते, संबंधीत व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणी प्रस्तृत करते. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालिन असल्याने, निरनिराळया डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यत 14 डिझाईन्समधील 10 रुपयांची नाणी दिली आहेत. त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनामार्फत कळविण्यात आले आहे. ही सर्व नाणी वैध चलनात आहेत.

सर्व शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, व्यापारी विक्रेते यांनी 10 रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर केला पाहिजे. याचबरोबर बँकानी आपल्या शाखेच्या बाहेर बँनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. बँकांनी ग्रामीण भागातील यंत्रणाचा पुरेपुर वापर करुन नागरिकांपर्यत हा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

01 December 2023

दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित - विठ्ठलराव मंगनाळे

भोकर,प्रतिनिधी 
  जागतिक दिव्यांग दिन दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील सभागृहात दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे, यांनी मध्यमांसमोर जाहीर केले आहे.
जिल्हा परिषद नांदेड येथील सभागृहात दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार असून प्रति वर्षी प्रमाणे या ही वर्षी जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सदर दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यातील दिव्यांग बांधवाना सतत मदत करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल, गौरव करून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग दिना निमित्त सर्व दिव्यांगाणा जागतिक दिव्यांग दिना निमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी श्री आउलवार साहेब हे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड जिल्हा प्रमुख व सुधाकरराव शेवाळे दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती लाभणार आहे. त्या मुळे ३डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान मंगनाळे यांनी केले आहे.

संविधान समता बंधुत्व आणि स्वातंत्र न्यायावर आधारित आहे ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडावा

भोकर: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, समता ,बंधुत्व स्वातंत्र न्यायावर आधारित आहे म्हणून आज महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडून निघून जावे असे प्रखर मत बहुजन युथ पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब जाधव यांनी व्यक्त केले
    मौजे नांदा पट्टी मैसा येते तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संतोष वाटोरे सर होते यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारानी पूजन करण्यात आले पुढे बोलताना पॅंथर नेते भैय्यासाहेब जाधव म्हणाले वर्ण व्यवस्थेने स्त्रियांना शूद्र समजून त्यांना स्वातंत्र्य नाकारले चूल आणि मूलच सांभाळायचं शिक्षणाची दारे बंद होती हजारो वर्षापासून आम्हा गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलित वंचित समाजावर एका वर्गाकडून प्रचंड अन्याय अत्याचार होत होते त्यांचा अन्याय अत्याचार सहन करूनही आम्ही गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून पाठिंबा दिला आहे बाबासाहेबांसारखा महान कायदे पंडित कुणीच नव्हता त्यांनीच भारताचे संविधान लिहून पूर्ण केलं संविधान वाचवण्यासाठी ओबीसी एसटी एससी भटक्या विमुक्त बांधवांनी संघटित झाले पाहिजे यावेळी नांदेड जिल्हा बहुजन युद्ध पॅंथरचे अध्यक्ष भीमराव बुकतारी ,शुभांगी मुनेश्वर, अनिल शिरसे, अंकुश सावते शाहीर बाबुराव गाडेकर यांनीही आपले विचार मांडले अध्यक्षीय समारोप डॉक्टर संतोष वाटोळे सर यांनी केले

भोकर येथे समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेचा उद्या शुभारंभ

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व खासदार प्रतापराव पाटील यांची उपस्थिती राहणार- बाळासाहेब पाटील रावणगावकर

 प्रतिनिधी भोकर : भोकर येथे नव्याने सुरु होत असलेल्या समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.चा उद्या दि.१ डिसेंबर २०२३ रोजी शुभारंभ सोहळा संपन्न होणार असून सदरील सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी दिली असून सदरील सोहळ्यास बँकचे शेअर होल्डर,शेतकरी, व्यापारी यांसह बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकरी,व्यापारी,सुशिक्षित तरुण,लघु उद्योजक, यांसह सर्वसामान्य लोकांना स्वावलंबी बनविण्यापाठी व त्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने भोकर शहरात नव्यानेच समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.ची भोकर तालुक्यातील भुमिपुत्रांनी एकत्र येऊन स्थापना केली आहे.सदरील बँकेचा उद्या दि.१ डिसेंबर २०२३ रोजी शुभारंभ करण्यात येत असून सकाळी ११:०५ वाजता नांदेड रोड भोकर येथील मुख्य कार्यालय व कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरातील समर्थ अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.भोकर शाखा कार्यालयाचा प.पू. श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज ( दत्तसंस्थान,मठ पिंपळगांव) यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.तद्नंतर माऊली मंगल कार्यालय भोकर येथे शुभारंभ सोहळ्याचे आयोजीत करण्यात आले असून संदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगांवकर,माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,माजी आमदार अमरनाथ राजूरकर,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,सिने अभिनेते यथा माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे,माजी सभापती आप्पाराव सोमठाणकर, जिल्हा उपनिबंधक व्ही.आर.देशमुख,सहाय्यक निबंधक एम.एल.चौधरी यांसह आदिंची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास शेअर होल्डर,शेतकरी,व्यापारी यांसह नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन समर्थ अर्बन को.ऑ.बँक लि.चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर,उपाध्यक्ष आनंद ढवळे पाटील,संचालक शामसुंदर कदम,माधवराव पोमनाळकर,रावसाहेब लामकाणीकर,ॲड.शिवाजी कदम,आत्रीक मुंगल,डॉ.मनोज गिमेकर,मारोतराव भोंबे,शिवाजी सोळंके,शेख शब्बीर शेख मुराद,अंबादास जाधव,दिगंबर लोलपवाड,सौ.वसुंधरा कदम, सौ.उज्वला जाधव,शाखाधिकारी पी.आर.सुर्यवंशी यांनी केले आहे.