भोकर:( प्रतिनिधी) शहरात विविध ठिकाणी बोगस पॅथॉलॉजी लॅब द्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक करुन लूट केली जात आहे आता हे लोण तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही पसरू लागले असून प्रशिक्षित मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट नसताना बिनधास्त रक्त चाचण्यांचा अहवाल देउन आर्थिक लूट केली जात आहे..यात माञ महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना दिसुन येत आहे.
पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रक्तचाचणी करत असताना सर्वप्रथम तो मान्यताप्राप्त पदवी व पदविकाधारक आहे का? त्याची महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलकडे नोंदतो केलील आहे का? लॅब धारक या क्षेत्रात निष्णात आहे का? रक्त चाचणीचे प्रमाणित रिपोर्ट त्यांना देता येतो का? कोरे लेटर पॅड देण्याचा एम.डी.पॅथॉलॉजिस्ट यांना अधिकार आहे का ? शहरातील अनेक पॅथॉलॉजिस्टकडे एमडी पथोलॉजिस्टचे कोरे लेटरप्याड आहेत. ते डॉक्टर कुठे असतात खरेच ते एम डी आहेत का? हे मात्र रामभरोसेच ! असे अनेक प्रश्न पॅथॉलॉजी लॅबच्या संदर्भाने सामोरं येतं आहेत.
पी एम सी रजिस्ट्रेशन व महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना भोकर तालुक्यात आनेकजन चार – दोन दिवस कुठे तरी प्रॅक्टिस करुन तर काही यूट्यूबचा आधार घेऊन बिन्धास्त व्यवसाय करत डॉक्टरांशी हातमिळवणी करून अवास्तव शुल्क आकारत रूग्णांना गंडवत आहेत. यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे वचक नसल्यामुळे दिवसागणित पॅथॉलॉजीची संख्या बळावत आहे. यातून कधी कुण्या रुग्णांच्या जीवावर बितेल हे मात्र येणारा काळच सांगणार आहे..
लॅबोरटरी सेवा मेडिकल कौन्सिल कौन्सिल कायदा 2011, 19 जुलै 2012 ,व 2016 चा अधिनियम क्रमांक 6 तसेच 30 जानेवारी 2016 अन्वये 18 ऑक्टोबर 2017 पासून सरकारने स्वतंत्रपणे पँरा वैद्यकीय परिषद अस्तित्वात आणले आहे या अधिनियमाखाली कलम 26 (1) अंतर्गत स्वतः स्पष्ट तरतूद केली आहे.
पँरामेडिकल कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल अशा स्वतंत्रपणे क्लिनिकल लॅब चालवणारा टेक्निशनवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 2011 च्या कायद्यानुसार अपराध व व सारथी मधील कलम 31, 32 ,33 व यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद अस्ताना बोगस लॅब चालकांवरती गुन्हे दाखल होत नाहीत. वैद्यकीय विभागाचे आधिकारी हातमिळवणी करून आहेत की काय असा चिंतेचा प्रश्न सामोर येत आहे.
भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बळवलेल्या या अनधिकृत पथोलॉजींची कसून चौकशी करून संबधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बसपाचे डॉ कैलास कानिंदे यांनी जिल्हा अधिकारी नांदेड ,जिल्हा शल्य चिकीत्सक नांदेड , जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड , उपविभागीय अधिकारी भोकर ,तहसीलदार भोकर वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर , तालुका अधिकारी भोकर यांच्याकडे एका निवेदना व्दारे केली आहे. संबंधीत वरिष्ठ आधिकारी यावर कोणती कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.







0 comments:
Post a Comment