जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

26 February 2023

बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

सर्व सोयी-सुविधांमुळे सर्वांच्या सहकार्यातून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल
- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी

बिलोली:येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या सुसज्ज व सुदंर इमारतीत सर्वांच्या सहकार्याने चांगल्या वातावरणात न्यायदानाचे काम पार पडणार आहे. आधुनिक सोयी-सुविधांमुळे कामाचा दर्जा अधिक वाढणार असून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमूख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर, धुळयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आरेफ महमद साहेब, बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर, न्यायाधीश श्रीमती रामगडीया, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य बी.डी. साळुंखे, बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार पाटील, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव न्यायालयातील विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, पक्षकार आदीची उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते जेष्ठ विधीज्ञाचा सत्कार करण्यात आला.
बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य व सुसज्ज इमारतीचे क्षेत्रफळ 1912.91 चौ मीटर असून यात दोन मोठे कोर्ट हॉल, लोकअदालतीसाठी एक कोर्ट हॉल, दोन अभिलेख कक्ष दिवाणी व फौजदारी संचिकेकरीता, वित्त विभाग स्ट्रॉग रूम, मुद्देमाल कक्ष, महिला अभिवक्ता हॉल, कॅटींग, फायर सेफ्टी सिस्टिम, हायजेनिक सॅनिटरी सिस्टिम, सीसीटीव्ही, गार्डन, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, सोलार सिस्टिम आदी सोयी सुविधांनीयुक्त प्रशस्त अशा इमारतीचे अवलोकन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. वकील व न्यायाधीश या नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकांच्या सहकार्याशिवाय न्यायदानाचे काम अपूर्ण असून जेष्ठ विधी ज्ञानाच्या मार्गदर्शनाने न्यायदानाचे हे काम अधिक कार्यक्षमतेने करावे. तसेच न्यायालयीन कामकाज सुसह्य होण्यासाठी न्यायालयीन प्रशासन सर्व ते सहकार्य करेल असेही न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी सांगितले.हे न्यायालय उभारणीत अनेकांचे श्रेय असून अंदाजे 9 कोटी रुपये खर्च करुन ही आधुनिक इमारत सर्व सुविधेसह उभारली आहे. सध्या न्यायालयीन कामकाजात ई-कोर्ट सुविधा आली असून ई-कोर्ट सुविधा विधीज्ञांनी स्विकारली पाहिजे. त्यामुळे न्यायदानाचे काम कमी मनुष्यबळात व कमी वेळेत पार पडेल. तसेच वकीलांना स्वत:च्या कामकाजाची दैनंदिनी तयार होईल. हा बदल सर्वांनी सकारात्मकतेने स्विकारला पाहिजे. या बदलाची प्रक्रिया समजून घेतल्यास ज्ञान वृद्धी होवून याचे फायदे समजतील. येत्या 5 मार्चला याबाबत सर्व विधीज्ञासाठी प्रशिक्षण ठेवले असून अभिवक्त्यांनी या प्रशिक्षणाचा उर्त्स्फूतपणे लाभ घ्यावा असे आवाहन प्रमूख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर यांनी केले. नांदेड न्यायालयात 1276 प्रकरणे ई-फायलिंग झाले आहे. समाजातील सर्वासाठी न्याय ही संकल्पना असून अंतिम घटकापर्यंत न्याय पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही प्रमूख जिल्हा न्यायाधीश श्री. न्हावकर यांनी सांगितले.बिलोली न्यायालयाच्या कामकाजाचा विस्तार अधिक असून या नवीन इमारतीत संपूर्ण सुविधा उपलब्ध प्राप्त असल्यामूळे कामकाज अधिक गतीमान होवून सामान्य माणसाला सुलभपणे न्याय मिळण्यास मदत होईल. सध्या सर्व न्यायालयात प्रक्रीयेत ई-फायलिंगचे काम सुरु आहे. यासाठी सर्व तांत्रिक सुविधा मिळेपर्यत ऑॅनलाईन आणि ऑफलाईन काम सुरु असावे असे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य बी.डी. साळुंखे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश कोठलीकर यांनी सर्वाचे आभार मानले.सुरवातीला बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवंराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बिलोली अभियोक्ता संघाचे ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन न्यायाधीश श्रीमती हरणे मॅडम यांनी केले. तर आभार जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी मानले.   


23 February 2023

बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचेही होणार भूमीपूजन

 नांदेड, दि. 23:- बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन व नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवार 25 फेब्रुवारी रोजी होत आहे. बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन सकाळी 11 वा. न्यायालय संकुल, बिलोली येथे संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील, बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश-1 दिनेश ए. कोठलीकर यांची उपस्थिती राहील. बिलोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या नूतन इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ 1912.91 स्के. मी. आहे.याचबरोबर नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.30 वा. मामा चौक, कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए बांगर व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश मारुतीराव पुंड यांची यावेळी उपस्थिती राहील. जिल्हा व सत्र न्यायालयाची ही नूतन इमारत तळमजला व त्यावर सहा मजले याप्रमाणे आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 26515.56 चौ.मी असे आहे.

20 February 2023

मंत्री पदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे

नांदेड : मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. विशेष म्हणजे या बाबीची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.एवढेच नव्हे तर मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.

17 February 2023

ग्रामीण महिला व मुलींनी वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड  :- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा मार्फत ग्रामीण महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गंत 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन पुरवण्यात येतील. इच्छूक लाभार्थ्यांनी त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 मार्च 2023 पर्यंत तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर सादर केलेले अथवा अपूर्ण असलेले प्रस्ताव मंजूर करण्यांत येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत

विहित नमुन्यातील अर्ज (लाभार्थी फोटोसह), नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असावे. (ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र), मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. सदर महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील किंवा त्यांचे सन 2021- 22 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे, लाभ धारकांकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, शिलाई मशिन विक्री / हस्तांतर न करण्याचे हमीपत्र असावे, लाभधारकांस 90 टक्के अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल (पाच हजार रुपयांच्या मर्यादेत), आधार कार्ड सत्यप्रत, बँक पासबुकाची ठळक छायांकित प्रत, वस्तू खरेदीची जीएसटीसह पावती, शिलाई मशीन सह लाभार्थींचा पोस्टकार्ड रंगीत साईज फोटो, लाभार्थी निवडीबाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत, प्राप्त सर्व प्रस्ताव सन 2022- 23 या आर्थिक वर्षापूरतेच तसेच उपलब्ध निधीच्या मर्यादेत राहतील, लाभार्थी निवड करण्याचा अधिकार कार्यालयाने राखून ठेवला आहे असे महिला बाल विकास विभागाच्या वतीने कळविले आहे.

नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ग्रामपंचायत समिती सदस्यावर गुन्हा दाखल

नांदेड :- बिलोली तालुक्यातील संगरोळी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा  (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) व इतर यांचे विरुध्द जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे फौजदारी गुन्हा क्रमांक 0057/2023 नोंद झाला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.             

शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांनी पिंजारी-177 (इतर मागास वर्ग) या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे दाखल केले होते. या प्रकरणात समितीने पोलीस दक्षता पथकामार्फत सखोल चौकशी केली असता शेख मेहताबी लालशा (माहेर) यांनी त्यांचे माहेर मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील नसताना बनावट, खोटे कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करुन तेथील मुळ रहिवासी (माहेर) असल्याचे दर्शविले. दक्षता पथकाच्या चौकशी दरम्यान मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील ज्येष्ठ नागरीकांनी ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा (माहेर) ह्या तेथील रहिवासी नसल्याचा जवाब दिला.  दक्षता पथक चौकशीनुसार मौजे आळंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चौंडे यांनी शेख मेहताबी लालशा  (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांना आळंदी गावातील रहिवासी दर्शविण्यासाठी व जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी बनावट, खोटे मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, ओळखपत्र, रहिवास प्रमाणपत्र व जन्म-मृत्यु अनुउपलब्धता प्रमाणपत्र सादर केले असल्यामुळे ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी त्यांच्या स्वाक्षरीने शेख मेहताबी लालशा (माहेर) यांना खोटे व बनावट प्रमाणपत्र निर्गमित केल्याबाबत समितीच्या दक्षता पथकास  लेखी जबाब दिला. 
                                                                                                                                                                                                                                                           
 
शेख मेहताबी लालशा  (माहेर) यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी वरील नमुद खोटी व बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे आधारे उपविभागीय अधिकारी बिलोली जि.नांदेड येथून पिंजारी (इ.मा.व.) जात प्रमाणपत्र प्राप्त केले. सदर जात प्रमाणपत्र आधारे त्यांनी सगरोळी ता.बिलोली, जि.नांदेड येथील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 राखीव जागेवर लढविली. त्या सदस्य पदावर दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी निवडून आल्या. जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्यांचा प्रस्ताव समितीस दि. 26 डिसेंबर 2020 दाखल केला होता. समितीच्या निदर्शनास वरील वस्तुस्थिती निदर्शनास आल्याने समितीने त्यांचे पिंजारी जात प्रमाणपत्र दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अवैध ठरविले आहे.   शेख मेहताबी लालशा (माहेर) व त्यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे व इतर विरुध्द भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यास समितीच्या पोलीस निरीक्षक पक्षता पथकास आदेशीत करण्यात आले.  या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दक्षता पथक यांनी समितीतर्फे फिर्यादी देऊन दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा नोंदविला. या गुन्हयाचा तपास विमानतळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.जाधव, पोलीस उपनिरीक्षक व इतर हे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांचा संशयास्पद स्कॉर्पिओवर गोळीबार; ट्रक- जीप आडवी लावूनही मोटारसायकलला उडवत स्कॉर्पिओचा रात्रभर चालला थरार

बिलोली :संशयीत स्कार्पीओ पोलीसांच्या तावडीत सापडू नये यासाठी नरसी येथून सुसाट निघाली होती. मात्र ती थांबवण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी पाठलाग केला. बिलोली व कुंडलवाडी पोलिसांनी प्रयत्न केले मात्र चालकाने गाडी थांबवण्याचे नाव घेत नसल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी गाडीच्या टायरवर गोळी झाडली. तरीही ती स्कार्पीओ नरसीच्या दिशेने निघाली शेवटी तळणी येथे संशयास्पद मुंबई पासींगची स्कार्पीओ व एक आरोपी ताब्यात घेण्यात आला.रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे गुरुवारी रात्री पेट्रोलींग करत असतांना बिलोली रोडवरील नरसी येथील शासकीय विश्रामगृहासमोर एम एच ०४ पासींगची स्कार्पीओ गाडी उभी असल्याचे दिसले. त्यांनी गाडी बाजूला घेण्यासाठी सांगितले. सदरच्या वाहण चालकाने गाडी बाजूला घेण्याचे सोडून बिलोलीच्या दिशेने सुसाट वेगात पळ काढला. गाडी बाजूला घेण्याऐवजी पळ काढल्याने संशय आला त्यामुळे दिघे यांनीही स्कार्पीओचा पाठलाग केला पण सापडत नसल्याने याची माहिती बिलोली पोलीसांना दिली.बिलोली पोलिसांनी बिलोली येथे स्कार्पीओ अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही गुंगारा देवून कुंडलवाडीच्या दिशेने पळ काढला होता. कुंडलवाडी पोलिसांनी संशयित स्कार्पीओ थांबवण्यासाठी चक्क रोडवर ट्रक आडवा लावला होता. तरीही सुसाट स्कार्पीओ चालकाने तेवढ्याच वेगात पुन्हा मागे वळवून बिलोलीच्या दिशेने निघाला. कुंडलवाडी बिलोली रोडवर बिलोली पोलिसांनी ११२ क्रमाकांची मोटरसायकल आडवीलावून थांबवण्याचा प्रयत्न केला पण आडव्या लावलेल्या मोटारसायकला उठवून स्कार्पीओ परत नरसीच्या दिशेने निघाली.यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी स्कार्पीओ थांबवण्यासाठी टायरवर डोळी झाडली पण ती टायरला लागली नाही. त्यामुळे स्कार्पीओ नरसीकडे धूम ठोकली. सुसाट स्कार्पीओ नरसीकडे येत असल्याने रामतीर्थ पोलिसांनी नरसी चौकात नाकाबंदी केली मात्र सदरची स्कार्पीओ नरसीकडे न येता बिलोली नरसी रोडवर असलेल्या तळणी गावात घुसवली परंतु स्कार्पीओ चालकाचा अंदाज चुकल्याने स्कार्पीओ एका खड्ड्यात अडकली.मागावर असलेल्या रामतीर्थ पोलिसांनी तातडीने तळणी येथे गेले यावेळी एका आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असून अन्य काहीजन अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून मिळणार

प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करण्याची सुविधा झाली बंद

नांदेड :- इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्वपूर्ण टप्पा असतो. पालक व समाज घटकांचे या परीक्षेकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी घटना मंडळाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होवून परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. परंतू विद्यार्थ्याचे हित लक्षात घेवून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी 11 वा. तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वा. परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वा. तसेच दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 असून सुधारित वेळ सकाळी 11 ते दु.2.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1.30 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.40 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 6 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 6.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5.30 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.40 याप्रमाणे राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

07 February 2023

अर्चित चांडक यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली

बिलोली: उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची बदली नागपूर सहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाल्याचे मंगळवारी आदेश निघाले. चांडक यांची बदली झाली असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली असून. असंख्य नागरिक चांडक यांच्या बदलीचे आदेश समाजमाध्यमातून फिरवत आहेत. त्यामुळे अवैध धंदे करणारे अच्छे दिन येणार म्हणून सुखावले असून. एक दिड वर्षापासून तंगीथ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची नागपूर येथे बदली झाली असल्याने नायगाव व बिलोली तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यासाठी मंगळवार हा दिवस अतिशय आनंदाचा ठरला आहे. सहायक पोलीस अधीक्षक म्हणून अर्चित चांडक यांनी नायगाव तालुक्यात दमदार कामगिरी केली, मटका, गुटखा व अवैध दारु विक्रेत्यांना सळो की पळो करुन सोडले होते. गुटखा व अवैध दारु विक्री बाबत सतत मोहीमच राबवून धाडसी कारवाया केल्या होत्या. नायगाव तालुक्यातील ठाणेदारांनी अवैध धंद्यांना कितीही पाठबळ दिले असले तरी हि माहिती चांडक यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर कारवाई निश्चितच होत होती.

विशेषतः सामाजिक कार्यकर्ते व प्रामाणिक नागरिकांची चांडक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध होते त्यामुळे बिलोली उपविभागातील अवैध धंद्याची माहिती त्यांना मिळत होती. आजपर्यंत कारवाई करतांना त्यांनी त्या त्या ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्याऐवजी दुसऱ्या ठाण्यातील कर्मचाऱ्याचा कारवाई करण्याच्या कामात मोठ्या खुबीने वापर करुन घेत असत.चांडक यांनी केलेल्या अनेक धाडसी व मोठ्या कारवायापैकी बिलोली तालुक्यातील रेती घाटावर केलेली कारवाई आजही नागरिक विसरले नाहीत. महसूल विभागाने कागदी घोळ करुन केलेली कारवाई निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला असला तरी जनतेत चांडक हे आजही हिरोच राहीले आहेत. त्यांचा एक दिड वर्षाचा काळ अतिशय चांगला गेला असून. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर अवैध धंदे बंद झाले पाहिजेत ही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी अवैध धंदे बंद राहण्याबरोबरच अवैध धंदे करणाऱ्यांचे अर्थिक कंबरडे मोडण्याकडे लक्ष दिले होते.

त्यामुळे नायगाव तालुक्यातील ठाणेदारांनी चांडक यांची चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र मंगळवारी चांडक यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली आदेश प्राप्त होताच एवढे दिवस चांडक यांची धास्ती घेतलेल्या बिलोली व नायगाव तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला असून अवैध धंदे करणाऱ्यांना आता मैदान मोकळे झाले आहे.


04 February 2023

केसीआर यांच्या सभेची जय्यत तयारी, दुसरीकडे सभा उधळून लावण्याचा 'मनसे'ने दिला इशारा

नांदेड- तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांच्या सभेची जय्यत तयारी सध्या नांदेडमध्ये सुरू आहे. त्यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) चे अनेक नेते, मंत्री, खासदार, आमदार या सभेच्या तयारीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. उद्या रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी ही सभा होणार असतानाच 'मनसे'ने ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.मनसे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत बीआरएस आणि त्यांचे मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. बाभळीच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोष देवून बीआरएसचा महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेशा करणार आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील सभेने हा श्रीगणेशा होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या निष्काळजीचा फायदा घेत कर्नाटक- बेळगाव सीमावरती भागातील गावांचा प्रश्न व तसेच सीमेवरील गावांचा आणि मराठी भाषिकांवर अन्याय व तसेच पाणी प्रश्नापासून ते रेल्वे प्रश्नापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका स्थानिक नेत्यांच्या माथी ठेवून, बीआरएस पक्षाच्या वतीने सोडवण्याचे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन नांदेड येथून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करीत आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील एकही राजकीय पक्ष विरोध करण्यास तयार नसून मूग गिळून गप्प बसल्याची टीका जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी केली आहे.गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रात ५० टक्के भाग ह्या नदी खोऱ्याने व्यापला आहे. गोदावरी खोऱ्यातील भौगोलिक क्षेत्र पाहता उपलब्ध पाण्याच्या झालेल्या वाटपाबाबत केंद्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती बच्छाव यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने १९८० मध्ये दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राला गोदावरी खोऱ्यातील ४९ टक्के भौगोलिक क्षेत्र असताना प्रत्यक्षात पाणी वाटप ३१ टक्के हिस्सा देण्यात आला. तसा अहवाल दिला असताना देखील बीआरएस सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्राबद्दल दुटप्पी भूमिका घेणाऱ्या सरकारचा मनसेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात गोदावरी खोऱ्याचे भौगोलिक क्षेत्र केवळ २३ टक्के असताना आंध्रास पाणी वाटप ३० टक्के वाटा देण्यात आला, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र विरोध करण्यात येत असून महाराष्ट्रातील जनतेच्या यामुळे भावना दुखावलेल्या असल्याचे मनसेने म्हटले आहे. तेलंगणातील बीआरएस हा सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्यास नांदेड येथून प्रारंभ करणार आहे. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे पहिली सभा आयोजित करण्यात आली आहे.आंध्र व तेलंगणा सरकार नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळी पाणी प्रश्नाबाबत दुजाभाव करणाऱ्या बीआरएस पार्टीचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा तीव्र निषेध करून बाभळी पाणी प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत नांदेडमध्ये पाय ठेवू देणार नाही. काळे झेंडे दाखवूनवून त्यांची नांदेड जिल्ह्यात होणारी पहिली सभा उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.