जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

15 December 2025

महाराष्ट्र स्टेट इलेक्टिसीटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची कार्यकारणी जाहीर...

बिलोली: प्र.दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह बिलोली रोड नरसी येथे देगलूर विभागाची कार्यकारणी निवडीची बैठक कॉम्रेड.संजय टाक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीत 
प्रमुख पाहुणे कॉम्रेड शेख मोईनभाई तसेच कॉम्रेड बालाजी सक्करगे (सर्कल सचिव)
,कॉम्रेड उद्धव बंडेवाड (सर्कल उपाध्यक्ष)यांच्या 
उपस्थितीत घेण्यात आले.त्यावेळी देगलूर विभाग अंतर्गत सर्व पदाधिकारी सभासद उपस्थितीत होते,त्यात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेल्या कार्यकारणी त्यात अध्यक्ष कॉम्रेड.जी.एम.रेडस उपाध्यक्ष कॉम्रेड,डी.एस.शिंदे उपाध्यक्ष कॉम्रेड, जे.जे.वडजे सचिव कॉम्रेड,एस.बी.खिसेसहसचिव कॉम्रेड,नितीन बनसोडे,सहसचिव कॉम्रेड,एस.जी.नरोड कोषाध्यक्ष कॉम्रेड,मुंडकर प्रसिद्धप्रमुख कॉम्रेड,पी.जी.इंगळे तांत्रिक सल्लागार कॉम्रेड,आर.के.पाटील,कागणे, कॉम्रेड.दलीत कागडे विभागीय संघटक कॉम्रेड,यू.डी.गायकवाड,नितीन बनबरे,पवन वावधाने तांत्रिक सदस्य अविनाश पांडे, अदम सय्यद,हबीब बेग महिला प्रतिनिधी कॉम्रेड ज्योती गुरनाळे, कॉम्रेड.सुरेखा शिंदे, वरील सर्व पदाधिकारी यांचे एकमताने लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. यात कॉम्रेड संदीप नरोड यांनी एक ठराव मांडला की आपल्या विभागात संघटनेचे वार्ता फलक नाही ते लावण्यात यावे यावर सर्व उपस्थितानी एकमताने होकार दर्शिवले व त्यात आपल्या संघटनेचे सध्याचे सर्कल अध्यक्ष कॉम्रेड मोईन भाई यांनी यासाठी लागणारा खर्च म्हणून ५००० रुपये निधी देण्याचे जाहीर केले त्यावर सर्व सभागृहातील उपस्थित आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.यावेळी कॉम्रेड टाक साहेब कॉम्रेड उद्धव बंडेवार कॉम्रेड बालाजी सक्करगे कॉम्रेड मोईन भाई कॉम्रेड हेमंत कुमार राजूरकर कॉम्रेड खिसे पाटील कॉम्रेड संदीप नरोड कॉम्रेड जी.एम. रेडस कॉम्रेड वडजे साहेब कॉम्रेड उपस्थित सभासद यांनी आपले मत मत मांडले.या बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कॉम्रेड वरणघाटे यांनी केले.

16 October 2025

दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये

नांदेड:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येत आहे. 

लेखी परीक्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कालावधी मंगळवार 10 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह), माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी), परीक्षा कालावधी शुक्रवार 20 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 पर्यंत राहील. 

प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता 12 वीचा कालावधी शुक्रवार 23 जानेवारी 2026 ते सोमवार 9 फेब्रुवारी 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह), इयत्ता 10 वीचा कालावधी सोमवार 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) राहील. 

शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी- मार्च, 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोटार सायकल वाहनासाठी नवीन मालिका

 नांदेड  :- परिवहनेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26-CX ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज गुरूवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. या अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी) सुध्दा सादर करावा. मुदतीनंतर व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वा. दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

19 September 2025

येसगीच्या जुन्या नवीन पुलावरील वाहतुकीची 16 नोव्हेंबर 2021 रोजीची अधिसूचना रद्द

बिलोली :तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील येसगी जुन्या पुलावरुन 20 टन वाहन भारक्षमतेपेक्षा कमी भार असलेली वाहतुक सुरू करण्याबाबत व येसगी मांजरा नदीवरील येसगीनवीन पुलावरुन कसल्याही प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्याबाबतची 16 नोव्हेंबर2021 रोजी अधिसुचना रद्द करण्यात आली आहे. याबाबत अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे. पोलीस अधिक्षक नांदेडयांनी कायदा व सुव्यवस्थेच्याा अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. अधिक्षक अभियंतासार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी वाहतुक संबंधाने आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणेइत्यादी बाबतची कार्यवाही करावी. या अधिसुचनेबाबतची माहिती लगतच्या सर्व जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग व इतर आवश्यक सर्व संबंधित विभागास अधिक्षकअभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी द्यावी, असेही अधिसुचनेत स्पष्ट केले आहे.

29 August 2025

जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी

नांदेड:महाराष्ट्रात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत तर सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे. या स्थितीत महाराष्ट्राच्या एका जिल्हयात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नांदेड जिल्ह्यात भयानक पाऊस कोसळला आहे. त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कंधार व माळाकोळी मंडळात सर्वाधिक 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, CRPF, नांदेड महानगरपालिका व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालियनला बोलवण्यात आले. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, आसना नद्यांना पूर आला आहे.जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. नांदेडच्या उमरी रेल्वे स्टेशन अधीक्षक यांचा मृत्यू झाला. विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले आहेत. 1 लाख 20 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. उमरी तालुक्यातील बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे सर्व 16 दरवाजे उघडले आहे. लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले आहेत. लाखो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. जिल्हाभरात अनेक जनावर दगावल्याची भीती आहे.


14 June 2025

तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा उद्धट कारभार; विद्यार्थी त्रस्त



बिलोली : तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी व उद्धट वर्तणुकीमुळे नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या विविध शैक्षणिक सवलतींसाठी आवश्यक असलेली जात, उत्पन्न, नॉन-क्रिमिलिअर, रहिवासी अशा प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.

मात्र, कार्यालयातील एक कर्मचारी विद्यार्थ्यांना माहिती देताना उद्धट भाषेत उत्तर देत आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळतात, तर काही वेळा फॉर्म किंवा कागदपत्र तपासणीसाठी टेबलवर पाठवून परतवताना दिसून येत आहे. त्यातच विशेषता क्लर्क, अवल कारखून, यांनी जरी टेबल पास केले तरी तीन नंबर टेबल वर असलेल्या कर्मचारी मात्र पैसे घेतल्या शिवाय कोणतेही काम किंवा प्रमाणपत्र देण्यासाठी तयार नसतो. जो पर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तो पर्यंत तुम्हाला कोणतेही काम करून मिळणार नाही अशी काही यांची ख्याती आहे.15 दिवस उलटून सुद्धा काहीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत मात्र पैसे दिल्यानंतर एका दिवसात तुम्हाला हवा तो प्रमाणात मिळून जाईल, तुम्ही जर पैसे देणार नाही तर तुम्हाला नको ते कारण सांगून तुम्हाला वापस पाठवतो.अलीकडेच एका शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रमाणपत्राच्या फक्त शेवटचा टेबल पास करण्यासाठी त्याच्याकडून 500 रुपयाची मागणी केली गेली होती मात्र या गोष्टीकडे कोणी लक्ष देताना दिसून येत नाही. कोणतीही दखल घेतली गेली नाही. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांची बेफिकिरी आणखी वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना सेवा मिळावी, अशी मागणी सर्व सामान्य नागरीकांकडून होत आहे.


23 April 2025

25 एप्रिलला सरपंच पदाची सोडत ; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

 नांदेड दि. 23 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार 25 एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान नांदेड जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. 

नांदेड जिल्‍हयातील सर्व 16 तालुक्‍यामध्‍ये शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्‍तरावर प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार यांच्याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता सोडत कार्यक्रम संबंधित तहसिलदार यांच्‍या अधिपत्‍याखाली संबधीत तालुक्‍यांच्‍या उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पुढील प्रमाणे पार पडणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्‍यांनी सदरचे सोडतीस उपस्थित राहण्‍याचे जिल्‍हाधिकारी नांदेड यांचेकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र. पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदासाठी हे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. आरक्षणासाठी सोडत पुढीलप्रमाणे असेल. नांदेड व अर्धापूर तालुका उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार नांदेड व अर्धापूर यांच्या कार्यालयात अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. भोकर व मुदखेड तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या नियंत्रणात भोकर व मुदखेड येथे तहसिल कार्यालयात अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या नियंत्रणात हदगाव व हिमायतनगर तहसिलमध्ये अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. किनवट व माहूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या नियंत्रणात किनवट व माहूर येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. धर्माबाद व उमरी तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या नियंत्रणात तहसिल धर्माबाद व उमरी येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., बिलोली व नायगाव खै. तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार बिलोली तहसिलदार नायगाव खै. तहसिलसाठी अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., देगलूर व मुखेड तहसिलसाठी उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्या नियंत्रणात तहसिलदार देगलूर व मुखेड येथे अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा., कंधार व लोहा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या नियंत्रणात तहसिल कंधार व लोहासाठी अनुक्रमे सकाळी 10 व दुपारी 3 वा. आरक्षणाची सोडत निघणार आहे. सर्व सोडती 25 एप्रिल रोजी सकाळी 10 व दुपारी 3 वा. त्या-त्या तहसिलमध्ये होणार आहेत.