जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

29 March 2020

नांदेड : एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड:कोव्हीडच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती , मजूर , हमाल , रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी , अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या . कोरोनाच्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी चालू असलेल्या स्थितीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला त्यावेळी त्यांनी सुचना दिल्या . यावेळी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , माजी राज्यमंत्री डी . पी . सावंत , अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ आदी या वेळी उपस्थित होते . या स्थितीत परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याबाबत महत्वाच्या सूचना केल्या . जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून संपर्क करणाऱ्यांची तात्काळ दखल त्यांना वेळेत मदत करावी . जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल यासाठी तालुकास्तरावर रक्तदान करता येईल अशा प्रयत्न करावा . जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी चालू असलेल्या मदत केंद्रातील सोयी बाबत महत्वाच्या सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या .

नांदेडातील आयआयबी ची सामाजिक बांधिलकी - कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत एक दिवसाचा पगार

नांदेड - नांदेड सह राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या बळावर वेगळा ठसा उमटवत गुणवंत परंपरा कायम ठेवली आहे त्याच बरोबर आयआयबी ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अग्रेसर राहिली आहे . त्या वाटचालीत पुढे पाऊल टाकत नुकतेच संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटात आपल्या वतीने सरकारला या कोरोना च्या लढाईत अल्पशी मदत म्हणून संपूर्ण आयआयबी टीमचं एका दिवसाचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी टीम आयआयबी ने संकल्प केला आहे आजच्या घडीला संपूर्ण जगासमोर कोरोना विषाणू चे महाभयंकर संकट आ वासून उभे असून केंद्र व राज्यसरकार शासकीय स्तरावर अंत्यन्त परिणाम कारक उपाययोजना अमलात आणित असून समाजातील प्रत्येक घटकाने शासकीय सूचनांचे पालन करावे जेणेकरून आपण कोरोना च्या संकटाला यशस्वी रित्या परतवून लावू शकतो असे असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केला सर्वांनी मिळून सामूहिक योगदान देत कोरोनाचे संकट परतवून लावलं पाहिजे - दशरथ पाटील आयआयबी च्या संपूर्ण टीम चा एक दिवसाचा पगार रुपये 293290 / - मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत हा आमच्या टीमचा खूपच स्तुत्य उपक्रम असून मदतीच्या या व्यस्थापनाच्या आवाहनास आमच्या सर्व सहकारी बांधवानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी उत्साह वाढविला आज पर्यंतही आयआयबी ही ज्ञानदानासोबत सामाजीक बांधीलकी नेहमीच जोपासत आली आहे . त्या नुसार संपूर्ण टीम ने अनोख्या संकल्पने नुसार माझे एक दिवसाचे Payment CM Relief Fund करता . . . धन्यवाद | | B ज्याच्या मुळे मी सामाजीक हिताकरता आर्थिक दृष्ट्या पात्र झालो ही भावना व्यक्त केली धन्यवाद सर्व आयआयबी यन्स श्री दशरथ पाटील , व्यवस्थापकीय संचालक , आय आय बी , नांदेड - लातूर

28 March 2020

देशातील टोलवसुली बंद मात्र नांदेड जिल्ह्यात टोलवसुली चालुच

नांदेड:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत.केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी यांनी जाहीर केलंय.हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आहे.असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.तरी देखील नांदेड जिल्ह्यात मात्र केटी कंपनीने टोलवसुली चालूच ठेवले आहे.यामुळे अन्य राज्यातुन वाहतूक करणाऱ्या गाड्या येत आहेत या कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे जिल्ह्यातील सर्व टोलवसुली बंद करण्यात यावे असे जनतेतून मागणी होत आहे.

बरबडा : हिप्परगा येथील तो बाधित भागातून आलेला संशयित करोना रूग्ण निगेटिव्ह

बरबडा: नायगाव तालुक्यातील मौजे हिपरगा येथील संशयित करोना रूग्ण नांदेड येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आलेला तो संशयित करोना रुग्णांना तपासणी नंतर ' निगेटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदिकीय आरोग्य अधिकारी डॉ . पबितवार व गच्चे यांनी दिली आहे . मौजे हिपरगा येथील संशयित करोना रुगणास नांदेड येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले असता त्यांची तपासणी केली असून ' तो ' रुग्ण निगेटिव्ह निघाला असल्याची माहिती देण्यात आली आहे . तो रूग्ण बाधित भागातून म्हणजे विशाखापट्टणम येथून आला होता . बरबडा तसेच परिसरात बाधित भागातून आलेल्या नागरिकांची संख्या 850 आसपास आली असून त्याना घराबाहेर 14 एप्रिल पर्यंत पडू नका असे सांगण्यात आले आहे, सर्दी , खोकला , ताप , श्वास त्रास यासारखे आजार आल्यास संबंधित आरोग्य विभागाशी संपर्क करा असे कळविण्यात आले आहे .

26 March 2020

देगलूर : चैनपुर येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू ; ऐन पाडवा सणावर गावात शोककळा

देगलूर:तालुक्यातील चैनपुर येथील दोन शाळकरी विद्यार्थी गावालगत असलेल्या शेततळ्यात पोहायला गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि . 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली . ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना । घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे . चैनपुर वन्नाळी च्या रोडवर पांणद रस्त्याच्या बाजूला मधुसूदन शिवराम औटी यांचे शेत तळे आहे . गावातील किरण यादवराव पाळेकर व बजरंग जमनाजी कायेतवाड ( वय 14 ) हे दोघे खानापूर येथील एका खाजगी शिक्षण संस्थेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होते . बुधवार दि . 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते दोघे औटी यांच्या शेततळ्यात पोहायला गेले होते . त्या शेततळ्यात बाहेरून मोटारीने पाणी सोडल्याने पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात जमला होता . हा अंदाज त्या दोन विद्यार्थ्यांना न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला . चारच्या सुमारास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या शेततळ्याच्या काठावर कोणाचे तरी कपडे असल्याचे आढळून आले असता जवळ गेल्यानंतर शेततळ्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले . लागलीच त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना सांगितली . गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले . पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती समजताच तात्काळ त्यांनी उप पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना पाठवून त्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले . ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे 

रात्री व्हॉटसअॅप वर फोटो वायरल जागले ते वाचले झोपले ते कायमचे झोपले

लातूर येथील सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला  असून तो जन्मल्यावर ' लागलीच  बोलू लागला . ' आज रात्री जो झोपेल तो सकाळी उठणारच नाही , तो मरेल . जो रात्रभर जागा राहील तोच वाचेल , " अशी अफवा रात्रभर वणव्यासारखी फसरली . पुणे , मुंबई , नांदेड येथुन येथील नागरिकांना असे फोन आल्याने नागरिकांनी रात्री घराबाहेर पडत रात्र जागून काढली. कोरोनाच्या भीतीने नागरिकांची आधीच झोप उडाली आहे . संचारबंदी मुळे कोणालाही घरा बाहेर फिरता येत नाही . त्यात अशा अफवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण रात्री पसरले होते . नागरिकांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका . आज पंतप्रधान व मुख्यमंत्री जे सांगत आहेत त्या गोष्टीवर विश्वास ठेवून घरी बसा . बाळ जन्मल्यावर लगेच बोलेल या फक्त अफवा आहेत . सोशल मीडियावर ही कोणतीही पोस्ट टाकण्याअगोदर त्याची शहानिशा करा . नागरिकांत भीती निर्माण होईल , अशा गोष्टी सोशल मिडीयावर टाकू नका .जो तो आपआपल्या नातेवाईकांना संपर्क साधून यासंदर्भात सांगून जागे राहण्यास सांगत होता . या गोष्टी वर विश्वास ठेवून येथील लोकांनी रात्रभर जागरण केले ,. कोणता नातेवाईक चुकू नये , म्हणून यादी करून फोनवर सांगितले , बिलोली तालुक्यातील  अनेक गावे सुध्दा रात्र जागून काढली .

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले . एक ठार , दोघे गंभीर जखमी

 नांदेड : राज्यात कोरोनाची धास्ती असतानाच आज भर दुपारी झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर पुन्हा हादरले . झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत हा थरार आज दिनांक २५ रोजी घडला देगलूर नाका भागातील खुदबेई नगर चौकात आली जर्दावाला आणि गौस इनामदार यांच्यात सकाळी वाद झाला होता . हा वाद तात्पुरता मिटल्यानंतर दुपारी पुन्हा वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला या गोळीबारात अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद ( वय ३० ) हा जागीच ठार झाला . तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला . यावेळी अली जर्दावाले यांनीही बचावासाठी गोळीबार केला . यात गौस इनामदार हा गंभीर जखमी झाला या हाणामारीत तलवार आणि पिस्तुलाचा सर्रास वापर करण्यात आला . भरदुपारी घडलेल्या थरारणे नांदेड शहर हादरले जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर , अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड , उपविभागीय पोलिस अधिकारी ( इतवारा ) धनंजय पाटील , उपविभागीय पोलिस अधिकारी ( शहर ) अभिजीत फस्के , इतवारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे , नांदेड ग्रामिणचे पंडीत कच्छवे , स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी भेट दिली अली जर्देवाला आणि गैस इनामदार यांच्यात जागेचा वाद गेल्या अनेक वर्षंपासून सुरू आहे . या वादातून दोघात अनेकवेळा हाणामारी झाल्या आहेत विविध कारणावरून दोघांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत . आज झालेल्या वादातून एकाचा बळी गेला असून दोघे अत्यवस्थ आसल्याचे सांगण्यात आले .

25 March 2020

अशोक चव्हाण यांनी ५५ हजार खाटांची व्यवस्था केली आहे

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मेहनतीने ही तयारी केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्यावरील संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने पुरती तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील.या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी कोणत्याही क्षणी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

24 March 2020

कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी

मुंबई |  चीनमधल्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाने हजारो जणांचे प्राण घेतले आहेत. आणखी हे संकट जात नाही तोवरच चीनमधून दुसरी धक्कादायक बातमी आली आहे. चीनमधल्या यूनाना प्रांतातून एका व्यक्तीचा हंता विषाणूने मृत्यू झाला आहे.चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त वाचल्यानंतर नेटकऱ्यांच्या आणि वाचकांच्या पोटात गोळा आला आहे.हंता विषाणू हा करोनाइतका घातक विषाणू नाहीय. करोनानुसार हा संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. कोरोनाप्राणे हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो.एखाद्या व्यक्तीला हंताचा संसर्ग झाल्यास ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत.



देगलुर : मुंबईहून आलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा देगलूरच्या विलगिकरण कक्षात उपचार चालू

देगलूर - नवी मुंबई ( वाशी ) येथील महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी सोमवार रोजी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल झाला . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास देखरेखीखाली विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले . दि . १६ मार्च रोजी नवी मुंबई येथून खासगी बसने नांदेड येथे हा विद्यार्थी आला व नांदेड येथून देगलूर मार्गे तो मरखेल पासून जवळच असलेल्या बेन्नाळ ( ता . मुखेड ) येथे आपल्या गावी पोहोचला व त्यास ताप , सर्दी , खोकला व जुलाब झाल्याने तो दि . २३ मार्च सोमवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःहून देगलूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला . त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी क्रांती शिलेदार यांनी तपासणी करून त्यास अधिक उपचारासाठी विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले . व त्याच्यावर दोन दिवस उपचार करण्यात येणार असून त्याचा आजार कमी न झाल्यास त्याचे टेस्टिंग कीट द्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . संभाजी पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले .

धर्माबाद तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या ६३६ जनांची तपासणी

 धर्माबाद दि . २४ मार्च  - दुबई , सौदी परदेशातून आलेल्या १४ व पुणे , मुंबई , हैद्राबाद , लातुर , औरंगाबाद आदी भागातुन आलेल्या ६२२ असे एकूण ६३६ जनांची तपासणी करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . शेख एकबाल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अशोक खंदारे , यांनी सांगितले आहे . . . कोरोना जगात थैमान घातले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे . या वातावरण मुळे जे बाहेर गावी नौकरी , रोजगार , शिक्षणासाठी म्हणुन बाहेर गावी व दुबई , सौदी परदेशात , हैद्राबाद , पुणे , मुंबई , शहरी होते ते आप आपल्या गावी परत येत असुन शहरात व गावा गावात अशा वर्कर , आरोग्य सेविका आरोग्य सेवक मार्फत माहिती घेऊन तपासणी केली जात आहे . तर काही जन । बाहेरुन आलेले व्यक्ती स्वत : होऊन तपासणी केली जात आहे . . . सौदी अरेबिया व दुबई हुन आलेले शहरातील ८ व ग्रामीण मधील ६ असे एकूण १४ आलेले असुन त्यांची तपासणी केली आहे . हैद्राबाद , पुणे मुंबई हुन आलेले शहरातील ४९ व ग्रामीण भागातील ५७३ असे एकूण ६२२ आलेले प्रवाशी असुन त्यांची तपासणी केली आहे . रोजच्या रोज आले त्याची तपासणी केली जात असुन आणखी येतच असल्याचे आरोग्य विभागानी सांगितले आहे . जे कोणी बाहेर गावाहून येत असतील त्यांनी कळवावे व तपासणी करून घ्यावी . बाहेर गावाहून आलेल्या लोकांनी कमीत कमी पंधरा दिवस फिरु नये असे डॉ . वेणुगोपाल पंडित यांनी सांगितले आहे . 

23 March 2020

घराबाहेर पडण्यावर बंदी , राज्यात संचारबंदी लागू , मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

  मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे . त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे , अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली . राज्यातील विमानतळेही बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे . तेही लवकरात लवकर बंद होतील असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला . केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील . अन्नधान्य औषधं , बेकरी , पशुखाद्य , पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील . त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील , असेही उद्धव ठाकरे म्हणाले . " मी विनंती करुनही , सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे . " राज्यातील सर्व मंदिरं प्रार्थनास्थळ बंद ठेवावी . मंदिरांमध्ये केवळ पुजारी , मौलवी असतील , असेही ते म्हणाले . त्याशिवाय रेल्वे , बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे . जर आवश्यकता असेल तर चालक अधिक2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे . बस खासगी वाहनेही बंद , जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका , होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार सध्या आपण कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे . टर्निंग पॉईंटवर आलो आहे . हीच ती वेळ आहे " आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे , तसंच ते महाराष्ट्रात घालेल " , असेही उद्धव ठाकरे म्हणाले . सरकार आपलं आहे , आपल्यासाठी काम करतंय काल जनतेने निश्चयाने घरात राहून जनता कर्म्युला प्रतिसाद दिला . 

22 March 2020

बिलोली तालुक्या सहित खेडेगावातून मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद ठेवण्यात आला

बिलोली: तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात कडकडीत व काटेकोरपणे जनता कर्फ्यू चे पालन करण्यात आले. तसेच ग्रामीण खेडेगावातून ही मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद ठेवण्यात आला. तसेच बिलोली तालुक्यातील नागणी हे गाव तेलंगणाच्या सीमेवरती आहे नागणी या गावात खूप मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारण तेलंगणा राज्यातील प्रवासी महाराष्ट्र राज्यात येऊ नये. म्हणून या गावात चेक पोस्ट उभारण्यात आलेले आहे. तसेच तेलंगणातील प्रवासी आल्यास त्यांची. चौकशी करण्यात आली. खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता.व नागणीच्या सर्व गावकऱ्यांनी माननीय पंतप्रधान यांनी सांगितलेले जनता कर्फ्यूचे संपूर्ण गाव काटेकोरपणाने पालन केलेले दिसत आहे. नागणी गावातील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष चेअरमन व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकर वर एक दिवस अगोदरच कोरोना वायरस या विषयी जनजागृती केली. व त्यांच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी कडकडीत बंद चे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहेत. अशाप्रकारे सर्व गावकऱ्यांनी ठरवले,तर कोरोना वायरस  हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही..

महाराष्ट्र लॉकडाऊन! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या संवेदनशील टप्प्यात आपण आहोत. त्यामुळे लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे. महाराष्ट्र लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूची दुकानं खुली राहतील. यामध्ये धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील.

21 March 2020

बिलोली नगरपरिषदेच्या वतिने संतुर हॅण्डवाश चे वाटप

बिलोली : येथील नागरीकांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये म्हणून दक्षतेच्या आवाहनासोबत  संतुर हॅण्डवाश चे वाटप करण्यात आले.बिलोली येथील भास्कर नगर येथे नगरपरिषदेच्या वतिने मोफत संतुर हॅण्डवाश चे वाटप करण्यात आले.सध्या राज्यात कोरोनाचा कहर झाला असून या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या आजारापासून आपण दूर राहू शकतो़ हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते़ त्यामुळे आपण हात व्यवस्थित हॅण्डवाश ने स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही.यावेळी नगराध्यक्ष पती मा.नगराध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी, उपनगराध्यक्ष श्री मारुती पटाईत,माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ राधा मारुती पटाईत,विरोधी पक्ष नेता श्री अनुप अंकुशकर,श्री अमजद चाऊस,श्री नितीन देशमुख,कार्यालय अधिक्षक श्री एस. एन.चौहान,श्री विनायक जाधव,धर्मराज जाधव,प्रदीप ढिलोड,व इतर कर्मचारी उपस्थित होते......

देगलूर : आज पासून मिर्जापूर येथील मारोती मंदिर बंद करण्याचा तेलंगणा शासनाचा निर्णय

देगलूर :शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध असलेले सलाबतपुर ( मिर्जापूर ) येथील मारोती मंदिर उदया दि . 21 मार्च शनिवार रोजी पासून ते पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तेलंगणा शासनाने घेतला आहे . कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगणा देवादाय धर्मदाय आयुक्त हैद्राबाद व सहाय्यक कमिशनर निजामाबाद यांचे आदेशानुसार सलाबतपुर ( मिर्जापूर ) येथील मारोती मंदिर दि . 21 मार्च शनिवार रोजी पासून ते पुढील आदेशपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . फक्त नित्य पुजा , नैवेद्य व आरती करण्यात येईल या व्यतिरिक्त अभिषेक . अन्नदान , सत्यनारायण पूजा व वाहनपुजा बंद राहील तसेच पाडवा , रामनवमी व हनुमान जयंती यादिवशी फक्त पुजा होईल मात्र भाविकांसाठी दर्शन बंद राहणार असल्याचे स्थानिक मंदिर अधिकारी के . रामी रेड्डी व मुख्य पुजारी अरविंद जोशी यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले .

20 March 2020

बिलोली : लाच प्रकरणातील उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले पोलीसांना शरण ; एक दिवसाची पोलीस कोठडी

बिलोली दि . 20 मार्च ,तालुक्यातील मांजरा नदी पात्रातुन अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करताना पकडलेले हायवा ट्रक सोडून देण्यासाठी दोन लाखाच्या लाच प्रकरणी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून फरार असलेले बिलोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांची दि . 20 मार्च रोजी एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली . तालुक्यातुन वाहणाऱ्या मांजरा नदी पाजातुन अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करित असताना पकडलेल्या दोन वाहनांवर शासनाचा दंड आकारण्यात आला होता . नियमानुसार आकारण्यात आलेला दंड भरूनही ट्रक सोडण्यासाठी बिलोलीचे तत्कालीन उप विभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी शामकुमार बोनिंगा यांच्या मार्फत 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . यात श्रीनिवास जिंकला याने भोसले व ट्रक मालकांत मध्यस्ती करून लाच घेण्यास व देण्यास सहकार्य केले होते . या लाच प्रकरणी तक्रार मिळताच लाच लुचपत विभागाच्या वतीने गत वर्षी आँगस्ट महिन्यात बिलोली बस स्थानक परिसरात सापळा रचून खाजगी इसम बोनिंगा यास लाच स्विकारताना रंगेहात पकडून कारवाई केली होती . या कारवाईची माहिती मिळताच उप विभागीय अधिकारी भोसले हे फरार झाले होते . या काळात अटकपूर्व जामिनासाठी भोसले यांनी प्रयत्न केले होते मात्र त्यांना जामिन न मिळाल्याने भोसले यांनी 18 मार्च 2020 रोजी लाच लुचपत विभागात हजर होऊन आत्मसमर्पन केले होते . भोसलेंच्या शरनागतीनंतर त्यांना दि . 20 मार्च रोजी बिलोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे . या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहूल साहेबराव पखाले करत आहेत .

अखेर निर्भयाच्या दोषींना दिली फाशी ७ वर्षांनी मिळाला न्याय

 नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह , पवन गुप्ता , विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले . एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे . निर्भया प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे . तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली . फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते . दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ' डेथ वॉरंट ' काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती . चालू वर्षात २२ जानेवारी , १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले ' डेथ वॉरंट ' कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते , पण शेवटी न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता या चारही नराधमांना फाशीची शिक्षा दिली आणि तब्बल 7 वर्षा नंतर पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला . या नराधमांच्या फाशी नंतर निर्भयाच्या आईने आनंद व्यक्त करत न्यायपालिका , पोलीस प्रशासन , शासन , राष्ट्रपती , पंतप्रधान व तमाम देशवासीयांचे आभार मानले

कोरोना विषाणूबद्दल बिलोली ग्रामीण रुग्णालयात कार्यशाळा.

बिलोली:कोरोना व्हायरस रोकण्यासाठी  खबरदारी म्हणुन  बुधवारी नागरीक , वैधकीय अधिकारी, डाक्टर्स  व  रुग्णालय कर्मचारी साठी  कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डा. नागेश लखमावार यानी कोरोनाबाबत मार्गदर्शन केले. कोरोना बद्दल संपुर्ण माहीती चे चित्ररुपी दाखवण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  जेष्ठ वैधकीय अधिकारी डा. बि. पी. अन्कुशकर , डाक्टर्स एसोसिएशन चे तालुका अध्यक्ष डा. लखमपुरे व डा.  तोटावाड  याँची प्रमुख  उपस्थीती  होती.येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत कार्यशाळेत  डा. नागेश लखमावार यानी कोरोना बाबत  प्रतिबंधक  उपाययोजना  सांगीतले. कोरोना ची लक्षणे  दाखवुन जनतेने घाबरुन न जाता  घरी व परिसरात कशी काळजी घ्यावी.  याबध्धल माहीती  दिली. वांरवार साबनाने हात धुवावे. आजारी व्यक्तीनी  मास्कचा वापर करावा.  गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळावे. लग्न सोहळा व प्रवास टाळावा. धार्मिक कार्यक्रमास जावु नये . बाजारपेठा बन्द ठेवावेत. अशी माहीती दिली.पुणे मुंबई  व इतर मेट्रो   शहरात कोरोना चे रुग्ण वाढत असल्यामुळे  मेट्रो शहरातुन  पुणे ,मुंबई, दिल्ली येथुन आलेल्या लोकाची खबरदारी  म्हणुन  ग्रामसेवकानी रजिस्टरला नोंदणी करावयाची आहे. अशा लोकाची तयार करुन  अहवाल तालुका आरोग्या अधिकारी याना  सादर करावी. आशावर्कर नी १४ दिवस देखरेख ठेवावी. यात सर्दी ,ताप, खोकला आढळुन आल्यास औषधउपचार करावा अशी माहीती दिली.यावेळी जेष्ठ वैधकीय अधिकारी डॉ. बी. पी. आन्कुशकर यानी ही मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातील सरकारी व खाजगी डाक्टर  रुग्णालयचे अधिकारी कर्मचारी नागरीक पत्रकार आदि ऊपस्थीत होते.

19 March 2020

बिलोली - करोना प्रतिबंध अभियान : ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने बसस्थानकात प्रवाशांची तपासणी


बिलोली दि . 19 मार्च,राज्यासह देशात कोरोणा विषाणूचे रूग्ण आढळून आल्यानंतर शासनाच्या वतीने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना आखण्यात येत आहेत . याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाच्या आदेशानुसार बिलोली ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने सिमावर्ती भागात असलेल्या बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे . सदर तपासणी येत्या 31 मार्च पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी दिली असून नागरिकांनी कोरोना बाबत भिती न बाळगता सुरक्षित रहाण्याचे अवाहन करण्यात आले आहे . बिलोली हा तालुका तेलंगणा राज्याच्या सिमेवर वसलेला आहे . या तालुक्यातील बरेचसे नागरिक कामानिमित्त लगतच्या तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रातील मुंबई , पुणे , औरंगाबाद अशा मोठ्या शहरात गेलेले आहेत . राज्यासह देशात कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून आले असून त्यातच महाराष्ट्रात पाँझीटीव्ह रूग्णांची संख्या जास्त असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत . नागरिकांच्या गर्दीमुळे या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने शासनाच्या वतीने गर्दी न होण्यासाठी अनेक निर्णय घेतले असून बसस्थानकांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची बसस्थानकातच तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते . नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ . विपिन ईटनकर यांच्या आदेशानुसार बिलोली ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने शहरातील बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून हैद्राबाद , मुंबई , पुणे इत्यादी मोठ्या शहरातुन येणाऱ्या प्रवाशांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे . दि . 19 मार्च पासून ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने बसस्थानकात वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांच्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून यात डॉ . तोटावार , डॉ . शेळके , डॉ . सौ नांदेडे , डॉ . कल्याणकर ( गव्हाणे ) डॉ . इरशाद , सोहेल रब्बानी , सौ . ठाकूर , सौ . पाटील , बसवंत बाचेवार यांच्यासह रूग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला . बस स्थानकात झालेल्या तपासणी मोहिमेत मुंबई , पुणे सह अन्य बाधीत शहरातुन आलेल्या 17 रूग्णांना बाहेर न फिरता पुढील 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येऊन त्यांच्या हातावर होम काँरनटाईन चा शिक्का मारण्यात आला . सदर मोहीम 31 मार्च पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी कोरोना विषाणूची भिती न बाळता सतर्क राहण्याचे अवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी केले आहे 

कोरोना विषाणूचा परिणाम काही रेल्वे गाड्या रद्द - काहींची वेळ बदलली

नांदेड | कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्याकरिता तसेच कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे दक्षिण मध्य रेल्वे ने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयानुसार नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत -
पुर्णतः रद्द करण्यात आलेले गाड्या

वेळ बदलण्यात आलेल्या गाड्या


18 March 2020

*कोरोना जनजागृती कि पैशाची उधळपट्टी*

सध्या सर्वत्र कोरोनाबद्दल भीतीग्रस्त वातावरण झाले असून राज्य सरकार ही स्थिती अत्यंत चांगल्याप्रकारे हाताळत आहे आणि ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे मात्र दररोजचे वर्तमानपत्र बघितले असताना त्यामध्ये एकाच पेजवर पाच-पाच सहा-सहा नगरपालिकेच्या/ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वतीने जनजागृतीपर मोठ्या मोठ्या जाहिराती येत आहेत . मुळात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगळी जाहिरात केली पाहिजे का हा येथे महत्त्वाचा प्रश्न आहे . राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाने सर्व वर्तमानपत्रात जनजागृती केली तर ती एक वेळ समजू शकतो मात्र एकाच पानावर तोच मॅटर वेगवेगळ्या अस्थापना च्या नावाने जाहिरात म्हणून प्रकाशित केल्या जात असल्याने ही जनजागृती आहे की मार्च एंड ची उधळपट्टी हे कळायला मार्ग नाही . जाहिरातीवर निरर्थक पैसे खर्च केल्यापेक्षा याच पैशाने जनतेसाठी मास्क अथवा इतर उपाय किंवा इतर प्रकारे जनजागृती करता येणे शक्य आहे जसे की लाऊड स्पीकरवरून रिक्षा द्वारे गावांमध्ये जनजागृतीपर माहिती फिरवणे कारण अशा प्रकारे केलेली जनजागृती ही प्रत्येक नागरिकापर्यंत जाते सध्याच्या युगामध्ये मीडियाचे महत्त्व कमी झाले असून पेपर वाचणार वाचकांची संख्या खूप कमी झालेली आहे . त्यामुळे अशा प्रकारच्या आस्थापनानी प्रिंट मिडिया ला दिलेल्या जाहिराती नेमक्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळे नेमकी किती लोक जागृत झाले हाही संशोधनाचा विषय होऊ शकतो . 

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

नांंदेड:विशेष सर्वसाधारण सभेत एकूण १८ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला . जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा झाली . जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थ समितीच्या महिला सभापतींना अर्थसंकल्प मांडण्याचा बहूमान उपाध्यक्षा पदमा सतपलवार यांना मिळाला ' कोरोना ' च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना सर्वसाधरण सभेसाठी एक तासाचा अवधी जाहीर केला त्यामुळे ' वंदे मातरम ' गितानंतर लगेच सभागृहाच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली . मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे , सभापती संजय बेळगे रामराव नाईक बाळासाहेब रावणगावकर सुशीला बेटमोगरेकर , अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . सुधीर ठोंबरे , मुख्यलेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे उप मुख्य कार्यकारी नईम कुरेशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती . मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतन राबविण्यात आलेल्या दुर्गाबाळ गणेश महोत्सव राज्यभरासाठी नांदेड पॅटर्न ठरला शासन स्तरावरून महिलादिनी यशोदामा अंगत - पंगत अभियानाच्या स्वरुपात राज्यभर लागू करण्यात  आला माजी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . काकडे , उपाध्यक्ष समाधान जाधव , सभापती मधुमती कुंटुरकर , दत्तु रेड्डी आदी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उद्दिष्ठ्य पुर्ण जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी सोनखेड ( ता . लोहा ) व शंकरनगर ( ता . बिलोली ) येथील महिला अत्याचारप्रकरणी निषेधाचा ठराव मांडला जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी अनुमोदन दिले . ग्रामीण नागरिकांच्या मुलभुत विकासासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सोयीसुविधा पुरविण्यात येतात . गावखेड्यांसह वाडी - तांड्याचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून इमारत दळणवळण रस्ते बांधकाम , पाटबंधारे , पाणीपुरवठा , कृषि विकास , शिक्षण , आरोग्य , पशुसंवर्धन , वनसंवर्धन , मागासवर्गीय कल्याण , महिला व बालकल्याण विभागामार्फत तरतुद करण्यात येते . गतवर्षीच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उद्दिष्ठ्य पूर्ण करण्यात आल्याचे उपाध्यक्षा तथा अर्थसमिती सभापती पदमा सतपलवार यांनी जाहीर केले . मुलभुत सोयीसुविधांच्या विकासावर भर - यंदाच्या मुळ अर्थसंकल्पात सहा कोटी रूपयांचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला . यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी ५० लाख रूपये , पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सर्वक्षण करण्यासाठी दोन कोटी पंचवीस लाख ,इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थांना स्वसंरक्षण , आरोग्य , स्वच्छता दोन दिवसीय कार्यशाळेसाठी नव्याने तरतुद करण्यात आली आहे . दारिद्रय रेषेखालील गरोदर मातांच्या संस्थापक प्रसुतींचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा कार्यकर्तीस प्रति प्रसुतीस शंभर रुपये मानधन कोरोना आजाराविषयी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रसिद्धी आणि प्रचारासाठी तरतुद , आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि शेतीधारक शहीद जवानांसाठी प्रत्येकी २१ हजार रूपये सानगह अनुदान . मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसह अपंगांचे कल्याण व पुनर्वसन महिला व बालकल्याण विभागमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी स्वउत्पन्नातून विहीत टक्केवारीप्रमाणे तरतुदींचा समावेश आहे . अर्थसंकल्पीय तरतुद २०२० - २१ विभागाचे नाव प्रस्तावित अंदाजित तरतुद रुपये बांधकाम ( दक्षिण उत्तर ) - तीन कोटी ९९ लक्ष रुपये शिक्षण विभाग - ८९ लाख ५३ हजार रुपये बाजार ( माळेगाव ) यात्रा - ७२ लाख रुपये आरोग्य व कुटुंब कल्याण - एक कोटी रुपये पाणीपुरवठा विभाग - एक कोटी २४ लाख रुपये महिला व बालकल्याण विभाग - ८३ लाख २० हजार रुपये समाजकल्याण विभाग - एक कोटी ३४ लाख रुपये अपंग कल्याण विभाग - ८५ लाख ३० हजार रुपये कृषि विभाग - ९७ लाख ७१ हजार रुपये पशुसंवर्धन विभाग - ४६ लाख रुपये जसंधारण - २९ लाख २० हजार रुपये परिवहन - दोन कोटी रुपये

देगलुर : रानडुकराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

देगलूर दि . 18 मार्च , तालुका प्रतिनिधी - देगलूरहुन काठेवाडी गावाकडे जाणाऱ्या भगनरे दाम्पत्याच्या दुचाकीस रानडुकराने जोराची धडक दिली . या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि . 16 मार्च रोजी दहाच्या सुमारास कुशावाडी होटल रस्त्यावर घडली . तालुक्यातील काठेवाडी येथील बाबुराव सखाराम भगनूरे ( वय 55 ) व त्यांच्या पत्नी छायाबाई बाबुराव भगनूरे ( वय 50 ) हे दोघे सोमवारी रात्री देगलूर येथील एक कार्यक्रम आटोपून काठेवाडी येथे जात असतानाच कुशावाडी ते होट्टल दरम्यान रानडुकराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली . या धडकेत दोघेही मोटारसायकल वरुन खाली पडले . छायाबाई भगनूरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . तर बाबुराव भगनूरे यांना ही गंभीर दुखापत झाली . त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना नांदेडला पाठविण्यात आले होते . मात्र पत्नीच्या अंत्यविधीसाठी ते गंभीर अवस्थेतच काठेवाडी येथे मंगळवारी परतले .दुपारच्या सुमारास मयताच्या पार्थिवावर काठेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . दरम्यान या अपघाताची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा तपास जमादार माधव पल्लेवाड हे करित आहेत .

17 March 2020

देगलूरात मौलवी कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; व्हिडीओ क्लिप काढून व्हायरलची दिली धमकी

देगलुर दि . 17 मार्च , तालुका प्रतिनिधी शहरातील हुजूरगंज मज्जीद मध्ये अरबी भाषा शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अरबी शिकविणाऱ्या मौलवी कडून जबरी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली असून त्या नराधमावर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे . सध्या देशात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तथा मन सुन्न करणाऱ्या निंदनीय घटना घडत आहेत या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून अतिशय तीव्रपणे निषेध व्यक्त करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे . असे असतानाही कुकर्म घटनेचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे . शहरातील साधना नगर भागातील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी अरबी भाषा शिकण्यासाठी हुजूर गंज मज्जीद ( पाण्याच्या टाकीजवळ ) मध्ये दररोज सकाळी व सायंकाळी जात होती . तिथे शेख एजाज शेख नबी ( 27 ) रा . पाळा तालुका मुखेड हा मौलवी अरबी भाषा शिकवीत होता . एक ते दीड वर्षापूर्वी सदरील मौलवी हा आपल्या रूममधून त्या अल्पवयीन मुलीस काही पुस्तके आणण्यास पाठवून दिले त्यानंतर लगेचच तो हि त्या मुलीच्या पाठीमागे जाऊन रूमचे आतुन कडी लावून तिच्या तोंडात हात रुमाल कोंबून तिच्यावर जबरी बलात्कार केला . सदरील कुकर्म घटनेची व्हिडिओ शूटिंग स्वत : च्या मोबाईल मध्ये करून घेतली . त्यानंतर सदरील व्हिडिओ शूटिंग व्हायरल करतो असे ब्लॅकमेलिंग करून वारंवार पीडितेवर अत्याचार करीत असे याकामी नराधम मौलवी शेख एजाज यास शफी मौलाना रा . भायगाव रोड व शेख मुनीर छोटेमिया रा . दर्गा रोड हे दोघे मदत करीत असे . दरम्यानच्या कालावधीत पीडित मुलगी आजारी पडत असल्यामुळे तिच्या आईने तब्येतीविषयी विचारपूस केली असता त्या पीडितीने तिच्यावर घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची वाचा फोडली . मुलीच्या वडिलांनी मौलवी शेख एजाज यास सदरील घटनेविषयी विचारपूस केली असता तुमच्या मुलीचे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत तुमची बदनामी वाचवायची असेल तर माझ्यासोबत लग्न लावून द्या असे म्हणून सदरील मुलीसोबत विवाहबद्ध झाला विवाहानंतर दोन ते तीन महिन्यांनी त्या मुलीस मौलवी शेख एजाज व त्याच्या घरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली . असहाय्य झालेल्या पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी रविवार दि 15 मार्च रोजी देगलूर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्यासमोर घडलेल्या घटनेची कैफियत मांडली पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून . मौलवी शेख एजाज व त्याच्या दोन साथीदारा विरुद्ध पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक पुनम सूर्यवंशी या करीत आहेत .

सौदी अरेबियातून आलेल्या युवका मुळे देगलूर तालुक्यात कोरोनाची धास्ती संशयित रूग्णाची रिपोर्ट निगेटीव्ह

देगलूर दि . 17 मार्च , तालुका प्रतिनिधी तालुक्यातील तडखेल येथील एक 22 वर्षीय युवक सौदी अरेबियातून नुकताच स्वगृही परतल्याने कोरोना च्या संशयाने गावक र्यांसह प्रशासनाची पाचावर धारण बसली होती . मात्र त्या युवकाची रविवार दि 15 मार्च रोजी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर कोरोना चे कोणतेही लक्षणे आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला . तडखेल येथील एक युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता . कोरोना व्हायरसच्या भितीमुळे तो सौदी अरेबियातून 3 मार्च रोजी ( मंगळवारी ) हैदराबाद येथे येवून तो तडखेल येथे आला . सध्या जगभरात असलेली कोरोना व्हायरसची भिती तडखेलच्या ग्रामस्थात ही होती . या युवकास अनेकवेळा खोकलताना काही ग्रामस्थांनी पाहिले . असेच दहा दिवस उलटून गेले . मात्र एका जागरूक नागरिकांनी ही बाब शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली . शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी तहसीलदार अरविंद बोळंगे , वैदयकिय अधिक्षक संभाजी पाटील , पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्या युवकास रुग्णवाहिकेतून आणण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले . परंतु डॉक्टरांचे पथक गावात गेले तर ग्रामस्थात भितीचे वातावरण होईल असा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाल्यामुळे त्यांनी त्या युवकाशी फोनवरून संपर्क साधून ॲटोत देगलूर येथे येण्याच्या सुचना दिल्या . देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तो युवक आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी व चौकशी करण्यात आली . त्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकाश देशमुख यांनी सांगितले . मात्र तरीही खबरदारी म्हणून दोन दिवस त्या युवकास उपजिल्हा रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले होते . मात्र आपल्याला काहीच त्रास नाही असे सांगत तो युवक आपल्या गावी गेला . आरोग्य विभागाचे कर्मचारी दोन तीन दिवस तडखेल येथे जावून त्याची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले .अफवेवर विश्वास ठेवू नका सौदी अरेबियातून आलेल्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे नसल्याचे दिसून आले आहेत . फक्त तो बाहेर देशातून आल्यामुळे त्याची प्राथमिक तपासणी केली . त्यास खोकला , ताप व घशाला कोरड येणे आदि कोणतीच लक्षणे आली नाहीत . त्या युवकास दुरुन पहाण्यासाठी नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती . दोन तास त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते . त्यास रुग्णवाहिकेतून त्याच्या गावी सोडण्यात आले . गावातील नागरिकांनाही त्याच्याकडे संशयित रुग्ण म्हणून पाहू नये असे सांगण्यात आले . कोरोना व्हायरसची लक्षणे आठ दिवसातच दिसून येतात . मात्र त्यास सौदी अरेबियातून येवून बारा ते तेरा दिवस उलटले . त्यामुळे तो पुर्णपणे तंदुरुस्त आहे . खबरदारी म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी तीन दिवस तडखेल येथे जावून त्याची तपासणी करणार आहेत . कोणत्याही ही गावी बाहेरच्या देशातून कोणता नागरिक आल्यास तसे आम्हाला कळवावे त्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे . तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकिय अधिक्षक संभाजी पाटील यांनी केले आहे .

एनएसयूआय ( NSUI ) व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची कुलगुरूंकडे मागणी

नांदेड दि . 17 - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्व शैक्षणिक बंदचे आदेश देण्यात आले आहेत . हा बंद 31 मार्चपर्यंत असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयातील उन्हाळी सत्र परीक्षा ह्या दि . 24 मार्चपासून घेण्यात येणार आहेत . परंतु सर्व महाविद्यालये , खाजगी शिकवणी क्लास , महाविद्यालयातील अभ्यासिका , सरकारी अभ्यासिका , खाजगी अभ्यासिका या बंद करण्यात आल्या आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत व पुरेसा वेळ मिळत नाही . यामुळे उन्हाळी सत्रातील परीक्षा 10 एप्रिलनंतर घेण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाठी वेळ मिळेल व त्यांचे होणारे नुकसान टळेल , या मागणीचे निवेदन कुलगुरू यांना एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शंकर बाजीराव शिंदे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( शहर ) कन्हैया कदम यांच्या वतीने सोमवारी देण्यात आले . यावेळी अजिम शेख , प्रसाद पवार , सचिन वडजे , आकाश खानसोळे , निखिल पाटील , सलमान बाबाशीर , विश्वा मंगनाळे तसेच एनएसयूआय व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९ वर -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१६ : राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन असून त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली ५१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आहे. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे.  दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत  फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण कोरोना बाधित आढळले असून इतर ७ जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील  १लाख ८९ हजार ८८८  प्रवासी तपासण्यात आले आहेत.राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे 

16 March 2020

*सगरोळीत संकल्प दिन साजरा*

 सगरोळी:संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्मदिवस प्रतिवर्षी संकल्प दिन म्हणून संस्थेतील सर्व विभागात उत्साहाने साजरा केला जातो . यावर्षी आयोजित या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील संचालक श्री गिरीशजी बापट व लातर येथील विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राचे प्रमुख पद्मभूषण डॉ श्री अशोकजी कुकडे उपस्थित होते . सैनिकी विद्यालयाचे मुखपत्र क्षात्रतेज या वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . याशिवाय विविध पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला गत वर्षी घेण्यात आलेल्या संकल्पाचा मागोवा घेऊन यावर्षीसाठी नवीन संकल्प घेण्यात आला . नूतन संकल्प कार्यकर्त्यांमधील व्यावसायिकता यासाठी आवश्यक बाबींचे विस्तत विवेचन श्री बापट यांनी केले तर गतवर्षीचा संकल्प व्यसनाधीनता व त्याचे गंभीर परिणाम याविषयी डॉ कुकडे यांनी विद्यार्थी व कार्यकर्त्यांना संबोधित केले .

भोकर येथे भारत प्रभात पार्टीची बैठक संपन्न

 भोकर: येथील शासकीय विश्राम ग्रहात भारत प्रभात पार्टी ची राज्य कमेटीची बेठक बोलवण्यात आली होती.सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. बैठकीत वर्षा रानी ,नामेवाड, शे शफीक, किशन कांबळे, महेश गजभारे, कु मधु पाटील ,आदी  पदाधिका-याची निवड करण्यात आली असुन उद्याची भोकर ची न पा ची निवडणुका संपुर्ण ताकतीशी लढविणार असे आव्हाहण करण्यात आले..प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया भारत प्रभात पार्टी साईनाथ शिनगारे बिजुरकर


*माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील' म्हणणारा आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी*

नाशिक: जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे


शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या गळ्यात विधानसभा उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.

नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे पेठ विधानसभेचे (सदस्य) आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी सापडले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 32 वर - प्रशासनासमोर मोठे आव्हान

  नांदेड : सध्या जगभरात कोरोना ने थैमान घातले असून भारतातही या विषाणूचा प्रभाव आता वाढताना दिसून येत आहे . देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत . सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 32 च्यावर पोहोचला आहे . तर आतापर्यंत आपल्या देशात कोरोना विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे . मागच्या पंधरा दिवसापासून कोरोनाने भारतात पाय पसरवायला झपाट्याने सुरुवात केली आहे . तर एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 32 च्यावर पोहचला आहे . तर याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णयही राज्यसरकार कडून घेण्यात आला आहे . तर आज औरंगाबादमधील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त नुकतेच ऐका वृत्त संस्थेने दिलं आहे . त्यामुळे आता सद्य स्थितीस राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण झाले असल्याने , भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त बाधित रुग्णांच राज्य महाराष्ट्र ठरतंय एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येतं 12 ने भर पडली असताना आज पुन्हा एक कोरोनाग्रस्त वाढला आहे . त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान राज्य सरकार आणि प्रशासनासमोर आवासून उभं टाकल आहे . - कोविड - 19 नेमकं काय आहे ? कोविड हा कोरोनाव्हायरस म्हणूनही ओळखला जातो . तो विविध प्रकारच्या विषाणूंचा एक मोठा समूह आहे . प्राणी व मानवात त्याचा प्रसार होऊ शकतो . कोरोना विषाणंमळे सामान्य सर्दीपासून गंभीर स्वरुपाचा श्वसनाचा आजारही होऊ शकतो . चीनमध्ये सापडलेल्या या नव्या कोरोना विषाणमळे श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे त्यालाचं कोवीड - 19 असेही म्हटले जात आहे . कोरोना हा विषाणू असून तो सामान्यता प्राण्यांमध्ये आढळतो क्वचितप्रसंगी मानवाला त्याची लागण होते पण त्यानंतर संसर्गाने तो इतरांमध्येही पसरु शकतो . कोवीड विषाण वातावरणात किती काळ टिकू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही वातावरण भौगोलिक स्थिती तापमान यावर हा विषाणू काही तास ते अनेक दिवस टिकू शकतो , असे दिसून आले आहे . - कोरोनाची लक्षणे : - डोकेदुखी - खोकला - शिंका येणे - धाप लागणे - सर्दी - घसा खवखवणे ताप - अस्वस्थ वाटणे - थकवा जाणवणे - निमोनिया - श्वसनास त्रास . अशी घ्या खबरदारी : - सर्दी , खोकला , ताप , श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीपासून दूर राहा . - एखादी व्यक्ती शिंकत अथवा खोकलत असल्यास किमान दोन मीटरचे अंतर ठेवा . - आजारी व्यक्तीशी अथवा कुणाशीही हस्तांदोलन टाळा . - गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क किंवा रुमालचा वापर करा . - शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास वेळोवेळी हात धुवा . - हात साबण , अल्कोहोल , हॅण्डवॉश , सॅनिटायझरने धुवावेत . - किमान 20 सेकंद आपले हात , तळहात , स्वच्छ साफ करावे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस , शाळा , महाविद्यालय , व्यायामशाळा पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे:डॉ. विपीन इटणकर

नांदेड | कोचिंग क्लासेस , शाळा , महाविद्यालय , व्यायामशाळा , मंगल कार्यालये , सिनेमागृहे , नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी दिले .येथील जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस , व्यायाम शाळा , मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते . या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खळ , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर , बा . क . जि . प . उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस . व्ही . शिंगणे , जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी श्रीमती आर . पी . काळम , उपशिक्षणाधिकारी ( मा ) माधव सलगर , कोंचिग क्लासेस , व्यायामशाळा , मंगल कार्यालय चालक / मालक यांच्यासह विविध अधिकारी ,प्रतिनिधी उपस्थित होते . महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च , 2020 पासून लागू केला असून सदरील कायद्याची दिनांक 14 मार्च , 2020 पासून महाराष्ट्र कोव्हीड - 19 उपाययोजना नियम 2020 लागू केलेली आहे . त्यानुसार महानगरपालिका , सर्व नगरपालिका , सर्व नगर पंचायत क्षेत्रातील , सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या , सर्व सरकारी व खाजगी शाळा , तसेच महाविद्यालय , आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे याच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था दिनांक 31 मार्च , 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले .करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक , सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रिडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले . नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना ( अत्यावश्यक किराणा समान , दुध , भाजीपाला , औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून ) दिनांक 31 मार्च , 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी  विपीन इटणकर यांनी सांगितले . कोणत्याही व्यक्तीस , संस्था , संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल , अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या .मागील 14 दिवसांत ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे , त्यांनी स्वत : याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020 - 26127394 , एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020 - 27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462 - 249279 संपर्क साधावा . करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे . त्यास मज्जाव , प्रतिबंध , अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल .

14 March 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी ; जिल्हा प्रशासन सुसज्ज - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर

नांदेड दि . 14 : - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी , याबाबत जिल्हा प्रशासन सुसज्ज असून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करुन विषाणुंच्या संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी केले . जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते . या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन । खल्लाळ , अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्तराम राठोड , जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ . चंद्रकांत मस्के , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर , जि . प . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बालाजी एम शिंदे , डॉ . शं . च . शा . वै . म . नांदेड वैद्यकीय अधिक्षक डॉ . वाय एच . चव्हाण , डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय डॉ . एस . आर . मोरे , बा . क . जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस . व्ही . शिंगणे , मनपा नगर सचिव तथा विधी अधिकारी संधू अजितपालसिंग , जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी श्रीमती आर पी काळम , अन्न व औषध प्रशासन अधिकारी सहा आयुक्त , टी सी . बोरकर , जि . प . शिक्षणाधिकारी शाखा अधिकारी राजन रेड्डी , उपशिक्षणाधिकारी , डी . डी . सिरसाट , सहायक समाज कल्याण आयुक्त टी . एल . मालवदकर यांच्यासह विविध अधिकारी , प्रतिनिधी उपस्थित होते . जिल्हाधिकारी डॉ . विपीन म्हणाले , आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणुबाधीत रुग्ण आढळत आहेत . विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत . त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखल्या आहेत . जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा , 2005 लागु असल्याने Incident Commander म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . एन . आय . भोसीकर 9890130465 व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बालाजी शिंदे 9970054408 यांना संनियंत्रक म्हणून घोषित करण्यात आले आहे . त्यानुसार प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त अधिकारी , कर्मचारी यांना यांचेशी समन्वयाने व जिल्हा प्रशासन यांचेकडील आदेशानुसार पुढील प्रमाणे दर्शविलेली कामे पार पाडावीत असेही निर्देशीत केले . प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी सांगीतले की , मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली व्हीडीओ कॉन्फरन्स व औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या दिनांक 17 फेब्रुवारी , 2020 व दिनांक 09 मार्च , 2020 रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत आजची आढावा बैठक घेण्यात येत असल्याचे सांगीतले . गृह विभाग पोलीस अधिक्षक परदेशातून आलेल्या नागरीकांची माहिती हॉटेल मॅनेजर , नातेवाईक यांचेकडून प्राप्त करुन घेऊन जिल्हा रुग्णालयास कळविण्यात यावी . कोरोना विषाणु संसर्गाबाबत Social Media च्या माध्यमातुन अफवा , गैरसमज पसरविणा - यावर योग्य ती कार्यवाही सायबरसेल मार्फत तसेच अफवावर नियंत्रण ठेवण्यात यावे . ज्या हॉटेलमध्ये विदेशी नागरीक व परदेशावरुन येणारे नपागरीक मुक्कामी असतील त्या ठिकाणी भेटी देऊन खात्री करण्यात यावी . गर्दीच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणावर स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करावी व त्यांचे सहकार्य घ्यावे परदेशी नागरीक अथवा परदेशातुन प्रवास करुन आलेले भारतीय नागरीक या बाबत संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी यांना । यांना माहिती वेळोवेळी देण्यात याव्यात . शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये यापासून परावृत्त करण्यात यावे . आपल्या अधिनस्त अधिकारी , कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवण्यात यावा . पोलीस विभागाचे नियंत्रण कक्षाचा फोन क्रमांक 02462 - 234720 असा आहे . पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9689609999 असून दत्तराम राठोड अतिरिक्त पोलीस अधिक्षक नांदेड भ्रमणध्वनी क्रमांक 7774077100 संपर्कासाठी असेल असे सांगीतले . नांदेड शहर व तालक्यांमध्ये कोरोना विषाणपासन संसर्ग रोगासंदर्भात संशयित रुग्णास ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या शाळा कॉलेज मंगल कार्यालय व इतर कुठलीही शासकीय , निमशासकीय इमारतीमध्ये ठेवण्यास विरोध करणाऱ्या नागरीकांना या संदर्भात सविस्तर माहिती देऊन त्यांना यापासून कुठलाही इतरांच्या आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यावे , असे निर्देश देण्यात आले . कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्दती SOP तयार करण्यात यावा . कारोना विषाणुवर उपाययोजना करण्यासाठी पुरेसा औषधी साठा , मास्क उपलब्धता , कारोना विषाणु संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचेवर निदान व उपचार स्वॉप तपासणीस्तव पाठविण्यासाठीची सुविधा उपलब्ध आहे . शासकीय व खाजगी सुसज्ज शहरात व तालुकास्तरावर दवाखान्याची माहिती काढण्यात यावी कोरोना विषाणचा संसर्गा बाबत आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन माहिती पुस्तिकांचे वितरण व प्रचार प्रसिध्दी करण्यात आली आहे स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी व औषधीसाठ्यासह सुसज्ज तयार आहे . असे आरोग्य विभागाल सूचना दिल्या कॉरटाईन आणि आयसोलेशन युनिट स्थापन करण्यात आले आहेत वैद्यकीय महाविदयालय स्तरावर मास्क तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे . महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा कोरोना विषाण संसर्ग रोगापासन घ्यावयाची दक्षता व काळजी या संदर्भात माहितीची घ्यावयाची दक्षता व काळजी या संदर्भात माहितीची जनजागृती करण्यात येत आहे . वॉर्डनिहाय स्वच्छता ठेवण्यात येत असून शहरातील केरकचरा साचणार नाही तसेच सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता ठेवण्यात आली आहेत . नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहील यादृष्टीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे . कार्यक्षेत्रातील रेल्वे परिसर , बसस्टॅण्ड , मॉल , चित्रपटगृहे / नाट्यगृहे , स्वयंचलित जिने , येथे स्वच्छता ठेवण्याबाबत सुचित केले . संशयित रुग्णासाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे . कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्यावयाची दक्षता व काळजी संदर्भात शहरातील दर्शनी भागात मोठे फलक लावण्यात आली आहेत . कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्यावयाची दक्षता व काळजी संदर्भात माहितीची जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी , पं . स . यांचे अधिनस्त आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात यावे . शाळा सुरु होण्यापूर्वी एकत्रित प्रार्थना घेण्यात येऊ नये . परंतु वर्गामध्ये या रोगापासून संरक्षिततेच्या दृष्टीने हात धुणे , स्वच्छता पाळणे इत्यादी बाबी सांगण्यात यावेत . शाळा संपल्यानंतर वर्गातील मुलांना गर्दी न करता सोडण्यात यावे . शाळेकडून कुठल्याही प्रकारच्या सहली , सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत . कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्यावयाची दक्षता व काळजी संदर्भात शहरातील दर्शनी भागात मोठे फलक लावण्यात यावेत , अशी सुचना जिल्हा परिषदेला देण्यात आली . कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून घ्यावयाची दक्षता व काळजी संदर्भात माहितीची जनजागृती करण्यात आले आहे . तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी . तहसिलदार , गट विकास अधिकारी , पं . स . यांची संयुक्त बैठकीव्दारे आवश्यक ते नियोजन करुन तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे . तालुकास्तरावर विविध संस्था , संघटना व व्यक्तींकडून प्राप्त होणारी परदेशी नागरीकांची माहिती संकलीत करण्यात येवून जिल्हा आरोग्य अधिकारी , जि . प . नांदेड यांचेकडे तात्काळ माहिती कळविण्यात येत आहे . तालुकास्तरावर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्या ठिकाणी निदान करणेसाठी मंगल कार्यालय किंवा शाळा खोलीची माहिती पाठविण्यात यावी . तालुक्यात कोणतेही सामाजिक कार्यक्रमापासून गर्दी होणार नाही . शाळेचे गॅदरीग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी . तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरविल्या जाणार नाहीत व ज्यांनी अफवा पसरवत आहेत त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व तसा अहवाल सादर करावा . दिनांक 15 मार्च 2020 रोजी कोचिंग क्लासेस , सिनेमागृह व मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक यांची बैठक ठेवण्यात यावी जेणे करुन त्यांना कोरोना विषाणु पासून संसर्क रोगापासून बचाव करणे शक्य होईल . नांदेड शहरामध्ये तसेच तालुकास्तरावर रामनवमी व गुढी पाडवा निमित्त व इतर कार्यक्रमामुळे मिरवणुक काढण्यात येणार असल्यास त्यांचे संयोजकाशी चर्चा करुन त्यांना मिरवणुक न काढण्यासाठी परावृत्त करण्यात यावे अशी सुचना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली . . .औषध विक्रेते यांनी मास्क विक्री जास्त भावाने करीत असल्यास , औषधाची साठेबाजी , संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे इ . बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ IC यांना माहिती देण्यात यावी व संबंधितावर कार्यवाही करावी . कोरोना विषाणुपासून संसर्ग रोगाबाबत जास्तीत जास्त दक्षता घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे . औषध विक्रेताची बैठक घेण्यात येऊन मास्क ची विक्री एमआरपी रेटने विक्री करणे बाबत व मास्कचा साठा असतांना नसल्याचे सांगत असल्यास त्याबाबत खातरजमा करण्यात येऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी . अशी सुचना अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली . कोरोना विषाणुपासून संसर्ग झाल्याचे संशयित रुग्ण आढळून आल्यास रुग्णांना ठेवण्यासाठी समाज कल्याण विभागाकडील निवासी शाळा व कॉलेज , सामाजिक न्याय भवन आहेत त्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी माहिती त्वरीत सादर करावी माहूर . हदगाव उमरी , नायगाव तालुक्यात निवासी शाळा आहेत . त्या उपलब्धतेचा अहवाल सादर करावा , याची दक्षता समाज कल्याण विभागाने घ्यावी . कोरोना विषाणुपासून संसर्ग झाल्याचे संशयित रुग्णांना उपचारास्तव ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडील शाळा , निवासी शाळा असल्यास याबाबतची माहिती प्राप्त करुन घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आले . नांदेड क्लब , नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वीमिंग पुलावर येणा - या व्यक्तींना कोरोना विषाणु संसर्ग रोगापासून बचाव होण्यासाठी प्रवेश बंदीचे आदेश त्वरीत काढण्यात यावेत . मा मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांनी आदेशित केल्यानुसार कोरोना विषाणपासून संसर्ग रोगाबाबत बचाव करणेस्तव येणा - या खर्चासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी विनंती अधिष्ठाता , शासकीय वैदयकीय महाविद्यलय नांदेड यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केली . तसेच जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागांनी कार्यवाही पार पाडावी . यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा व विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी , असेही निर्देश यावेळी दिले .

13 March 2020

*भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने उद्या भारत प्रभात पार्टीची बैठक*

भोकर!दि.१४ मार्च २०२० रोजी भोकर येथे भारत प्रभात पार्टीची  आढावा बैठक घेण्यात येणार असून ,सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.भोकर नगरपरिषद सदस्यत्वाचा निवडणुकीचा कार्यकाळ संपत आला आहे.भोकर मध्ये काँग्रेस-भाजपा ह्या दोन पक्षात प्रामुख्याने लढत आजपर्यंत होते त्यात उडी घेणार आहे भारत प्रभात पार्टी(दिल्ली) शाखा महाराष्ट्र प्रदेश  ही काही महिन्यापूर्वी खाली महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा लढून आता सर्वच निवडणूक लढवण्यासाठी उडी घेणार असून त्यात येणाऱ्या आगामी निवडणूक संदर्भात किती जागा लढवणार ह्यावर चर्चा होणार आहे तसेच कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करता येते का त्यासाठी चर्चा होणार आहे तरी आपली उपस्थिती अनिवार्य आहे असे आव्हान तालुका अध्यक्ष रामेश्वर चर्लेवाड व शहर अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे तरी सर्व दि १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वाजता ,भोकर शासकीय विश्रामगृह येथे  उपस्थित राहावे भोकर नगरपरिषद मध्ये निवडणूक लढू इच्छिणारे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा ह्यावेळी  उपस्थित राहणार आहेत 

सदरील बैठक मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणाऱ्या पैकी
डॉ.नितीन पवार पुणे (महाराष्ट्र राज्य महासचिव),हेमंत खरात साहेब मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील (नाशिक), सौ.दीपा संजय आवळे सांगली (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा, महिला आघाडी), संजय नरवाडे(मराठवाडा अध्यक्ष), संजय बिलोलीकर महाराष्ट्र सो मि जि प्र साईनाथ शिनगारे
(मराठवाडा,कार्याध्यक्ष),बालाजी आरकटवार (मराठवाडा उपाध्यक्ष),वर्षाराणी नामवाड(मराठवाडा अध्यक्षा), कु.जोत्सना राऊत(शॉर्ट फिल्म,अभिनेत्री),कु. मधू पाटील(महाराष्ट्र अध्यक्षा, युवती आघाडी) बापूराव आडे (नांदेड जिल्हाध्यक्ष),साईनाथ शिनगारे बिजुरकर।जिल्हा उपाध्यक्ष) हे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे आयोज रामेश्वर चर्लेवाड (तालुका अध्यक्ष,भोकर), लक्ष्मण गायकवाड(शहराध्यक्ष, भोकर) व कुणाल पवार(ता.सचिव) आदीजण करणार आहेत.

09 March 2020

होळी का पेटवली जाते ? जाणून घेवू या याच्या पाठीमागचा शास्त्रीय कारण व पर्यावरण पूरक गोष्टी !

देशभरात आज होळीला उत्साहात सुरुवात झाली आहे . आजच्या दिवशी अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी पेटवण्यात येते . जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे . साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे . शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा . यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या . पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या , गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात . गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते . त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं . हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे . थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते . या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा ; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता . परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे . आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते , तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक , टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते . 

शेफर्ड टायगर फोर्स इंडिया या धनगर समाजच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी पदी नाशिक चे प्रेम आगोणे यांची निवड

नाशिक : धनगर समाजाची राष्ट्रीय संघटना शेफर्ड टायगर फोर्स इंडिया या संघटनेमधे महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा नेते प्रेम आगोणे हे सामाजिक चळवळीत गेली 8 वर्ष पासून कार्यरत आहेत . धनगर आरक्षण मुद्दयावर अनेक आंदोलन मोर्चे बांधणी च काम प्रेम आगोणे यांनी महाराष्ट्रभर केलेलं आहे . शेफर्ड टायगर फोर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेश चे युवा नेतृत्व धामू पाल यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या सहमतीने प्रेम आगोणे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून निवड केली .धनगर समाजाच्या विविध मुद्यावर काम करणारी ही संघटना उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , गुजरात , राजस्थान , दिल्ली , उत्तराखंड , हरियाणा , बिहार या राज्या मधे कार्यरत आहे . आता या संघटनेची महाराष्ट्र राज्यच्या वतीने युवा नेते प्रेम आगोणे यांना राष्ट्रीय अध्यक्ष धामू पाल जबाबदारी सोपवली प्रेम आगोणे महाराष्ट्र प्रदेश

08 March 2020

जागतिक महिला दीना निमित्त रेल्वेविभागात महिलांची प्रभात फेरी योग शिबीर

नांदेड | आज दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दीना निमित्त नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात सकाळी महिला कर्मचाऱ्यांनी प्रभात फेरी काढली . श्री उपिंदर सिंग , विभागीय रेल्वे व्यवस्थापक , नांदेड तसेच इतर अधिकारी या प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते . तसेच महिला दिनाचे औचित्त साधून नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयातील सभागृहात महिलांकरिता योग्य शिबीरियाचे आयोजन करण्यात आले होते . तसेच महिला कर्मचाया करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . नांदेड शहरातील आणि रेल्वे च्या तज्ज्ञ महिला डॉक्टर करवी महिला कर्मचाऱ्यांची अयोग्याची तपासणी करण्यात आली . ज्यात शुगर , बी . पी . , इ . सी . जी . आणि इतर हि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या . उपिंदर सिंग , विभागीय रेल्वे व्यवस्थापक या प्रसंगी म्हणाले कि महिलांचे कामाप्रमाणेच आपल्या आरोग्य कडे हि लक्ष दिले पाहिजे .

07 March 2020

शेतकऱ्यांना सर्व समावेशक पीकविमा मिळवून देण्यासाठी मुंबईत बैठक घेणार

नांदेड | पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला होता . यातील सोयाबीन पिकाला मिळालेल्या विम्यामध्ये मंडळनिहाय तफावत आली आहे . एकाच तालुक्यात काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी विमा मिळाला आहे . या संदर्भात मुंबईत कृषी मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येवून जिल्हयातील शेतकऱ्यांना सर्व समावेशक पीकविमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु असे निसंदिग्ध ग्वाही जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली . त्यासोबतच पीकविम्याची तफावत दूर करण्यासाठी तात्काळ कारवाई करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या .पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या जिल्हयातील पीकविमा संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत . या तक्रारी दूर करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली . या बैठकीत बोलताना ना . चव्हाण पुढे म्हणाले की , पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2019 मध्ये मंजूर झालेल्या पीकविम्यात मोठी तफावत आहे . काही मंडळामध्ये योग्य तर काही ठिकाणी कमी पीकविमा मिळाला आहे . भोकर , धर्माबाद , हदगाव या तालुक्यांसह जिल्हयातील इतर तालुक्यातसुध्दा कमी अधिक प्रमाणात वेगवेगळया मंडळामध्ये पीकविम्याच्या रक्कमेत तफावत आली आहे .पीकविमा रक्कम देताना मंडळनिहाय ही तफावत निर्माण झाली आहे . या संदर्भात विमा कंपन्यांच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांना ही तफावत दूर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले . त्यासोबतच वाढीव निधी मिळणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी कृषी सचिव यांना पाठविण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या . पीकविम्या संदर्भात पुढील आठवडयात मुंबईमध्ये राज्याचे कृषीमंत्री , कृषी सचिव , कृषी आयुक्त व विमा कंपन्यांचे राज्यस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल . या बैठकीमध्ये सर्व समावेशक पीकविमा मिळवून घेण्यासाठी संबंधिताना आदेशित  करण्यात येईल असे सांगतानाच नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या विमा रक्कमेतून बँकांनी कर्जाची वसुली करु नये असे पत्र देण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकाना त्यांनी सूचित केले . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ . विपिन इटणकर , माजी पालकमंत्री डी . पी . सावंत , आ . अमरनाथ राजूरकर , जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे , जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणवीस , तालुका कृषी अधिकारी भोकर , विठ्ठल गिते , जगदीश पाटील भोसीकर , भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम यांची उपस्थिती होती

सिडको परिसरात सायकलीवरुन प्रवास करून आलेल्या आठ जणांचा सत्कार

नविन नांदेड | शहीद के नाम पाचशे किलो मिटर सायकलवरून प्रवास करून आलेल्या आठ सायकलस्वाराचा सत्कार सिडको येथे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व सो . मिरजकर यांनी केला .औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशन द्वारे आयोजित 24 मार्च या दिवशी फाशी दिल्या गेलेल्या भगतसिंग , सुखदेव , व राजगुरू या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने नांदेड पोलिस दलातील आठ सायकल स्वार कर्मचारी यामधे अंजना शिंदे , नितीन भुताले , साईनाथ सोनसळे , महारुद्र लोहार , कृष्णा केंगार , संतोष सोनसळे , अमोल बळेगावकर , आणि सुनिल यादव हे सर्वजण शहिदो के नाम 500 किलोमीटर मधील टप्पा पार करत आज सिडको नांदेड येथे आगमन झाले . या निमित्ताने माजी उपमहापौर आणि नगरसेवक विनय गिरडे पाटील , VCI Computer च्या संचालिका राजश्री मिरजकर , विद्यादान कोचिंग क्लास चे  मधुकर गायकवाड , आकाशवाणी केंद्राचे राजीव मिरजकर पत्रकार सारंग नेरळकर यानी त्याच्या या कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढावा म्हणून त्याच स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

03 March 2020

रूपालीताई चाकणकर यांचा नांदेड दौरा

नांदेड | महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर ह्या पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व महिला सक्षमीकरणासाठी दि . 3 मार्च 2020 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . नांदेड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण व शहराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहील .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर हे प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मराठवाड्याच्या व नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यापुर्वी त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र कोकण व विदर्भ या विभागाचा दौरा केला आहे . दि . 29 तारखेला त्या औरंगाबाद जिल्ह्यापासून आपल्या दौऱ्याची सुरूवात करून 1 तारखेला परभणी 2 तारखेला हिंगोली जिल्ह्याचा दौरा आटपून दि . 3 तारखेला नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत . दि . 3 तारखेला सकाळी 9 वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व शहरातील इतर महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सकाळी 10 वाजता स्थानिक लग्नास उपस्थित राहतील . त्यानंतर दु . 12 वाजता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नांदेड ( कदम हॉस्पीटल ) येथील महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील व जिल्हा आढावा बैठक घेतील . त्यानंतर महिला भेटीगाठी व संवादानंतर पत्रकार परिषद घेतील . त्यानंतर सोनखेड तालुका लोहा येथील अत्याचार पिडीत मुलीच्या कुटुंबियाची भेट देऊन लोहा येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करून लातुरकडे प्रयाग करतील . कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उपस्थित रहावे असे आवाहन नांदेड वाघाळा महापालिकेच्या माजी उपमहापौर शीलाताई कदम व प्रदेश सदस्या अॅड . कल्पना पाटील डोंगळीकर व नांदेड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा इंजि . प्रांजली रावणगावकर यांनी केले आहे .