नांंदेड:विशेष सर्वसाधारण सभेत एकूण १८ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला . जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा झाली . जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थ समितीच्या महिला सभापतींना अर्थसंकल्प मांडण्याचा बहूमान उपाध्यक्षा पदमा सतपलवार यांना मिळाला ' कोरोना ' च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना सर्वसाधरण सभेसाठी एक तासाचा अवधी जाहीर केला त्यामुळे ' वंदे मातरम ' गितानंतर लगेच सभागृहाच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली . मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे , सभापती संजय बेळगे रामराव नाईक बाळासाहेब रावणगावकर सुशीला बेटमोगरेकर , अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . सुधीर ठोंबरे , मुख्यलेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे उप मुख्य कार्यकारी नईम कुरेशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती . मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतन राबविण्यात आलेल्या दुर्गाबाळ गणेश महोत्सव राज्यभरासाठी नांदेड पॅटर्न ठरला शासन स्तरावरून महिलादिनी यशोदामा अंगत - पंगत अभियानाच्या स्वरुपात राज्यभर लागू करण्यात आला माजी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . काकडे , उपाध्यक्ष समाधान जाधव , सभापती मधुमती कुंटुरकर , दत्तु रेड्डी आदी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उद्दिष्ठ्य पुर्ण जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी सोनखेड ( ता . लोहा ) व शंकरनगर ( ता . बिलोली ) येथील महिला अत्याचारप्रकरणी निषेधाचा ठराव मांडला जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी अनुमोदन दिले . ग्रामीण नागरिकांच्या मुलभुत विकासासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सोयीसुविधा पुरविण्यात येतात . गावखेड्यांसह वाडी - तांड्याचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून इमारत दळणवळण रस्ते बांधकाम , पाटबंधारे , पाणीपुरवठा , कृषि विकास , शिक्षण , आरोग्य , पशुसंवर्धन , वनसंवर्धन , मागासवर्गीय कल्याण , महिला व बालकल्याण विभागामार्फत तरतुद करण्यात येते . गतवर्षीच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उद्दिष्ठ्य पूर्ण करण्यात आल्याचे उपाध्यक्षा तथा अर्थसमिती सभापती पदमा सतपलवार यांनी जाहीर केले . मुलभुत सोयीसुविधांच्या विकासावर भर - यंदाच्या मुळ अर्थसंकल्पात सहा कोटी रूपयांचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला . यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी ५० लाख रूपये , पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सर्वक्षण करण्यासाठी दोन कोटी पंचवीस लाख ,इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थांना स्वसंरक्षण , आरोग्य , स्वच्छता दोन दिवसीय कार्यशाळेसाठी नव्याने तरतुद करण्यात आली आहे . दारिद्रय रेषेखालील गरोदर मातांच्या संस्थापक प्रसुतींचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा कार्यकर्तीस प्रति प्रसुतीस शंभर रुपये मानधन कोरोना आजाराविषयी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रसिद्धी आणि प्रचारासाठी तरतुद , आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि शेतीधारक शहीद जवानांसाठी प्रत्येकी २१ हजार रूपये सानगह अनुदान . मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसह अपंगांचे कल्याण व पुनर्वसन महिला व बालकल्याण विभागमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी स्वउत्पन्नातून विहीत टक्केवारीप्रमाणे तरतुदींचा समावेश आहे . अर्थसंकल्पीय तरतुद २०२० - २१ विभागाचे नाव प्रस्तावित अंदाजित तरतुद रुपये बांधकाम ( दक्षिण उत्तर ) - तीन कोटी ९९ लक्ष रुपये शिक्षण विभाग - ८९ लाख ५३ हजार रुपये बाजार ( माळेगाव ) यात्रा - ७२ लाख रुपये आरोग्य व कुटुंब कल्याण - एक कोटी रुपये पाणीपुरवठा विभाग - एक कोटी २४ लाख रुपये महिला व बालकल्याण विभाग - ८३ लाख २० हजार रुपये समाजकल्याण विभाग - एक कोटी ३४ लाख रुपये अपंग कल्याण विभाग - ८५ लाख ३० हजार रुपये कृषि विभाग - ९७ लाख ७१ हजार रुपये पशुसंवर्धन विभाग - ४६ लाख रुपये जसंधारण - २९ लाख २० हजार रुपये परिवहन - दोन कोटी रुपये







0 comments:
Post a Comment