बिलोली : येथील नागरीकांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये म्हणून दक्षतेच्या आवाहनासोबत संतुर हॅण्डवाश चे वाटप करण्यात आले.बिलोली येथील भास्कर नगर येथे नगरपरिषदेच्या वतिने मोफत संतुर हॅण्डवाश चे वाटप करण्यात आले.सध्या राज्यात कोरोनाचा कहर झाला असून या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या आजारापासून आपण दूर राहू शकतो़ हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते़ त्यामुळे आपण हात व्यवस्थित हॅण्डवाश ने स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही.यावेळी नगराध्यक्ष पती मा.नगराध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी, उपनगराध्यक्ष श्री मारुती पटाईत,माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ राधा मारुती पटाईत,विरोधी पक्ष नेता श्री अनुप अंकुशकर,श्री अमजद चाऊस,श्री नितीन देशमुख,कार्यालय अधिक्षक श्री एस. एन.चौहान,श्री विनायक जाधव,धर्मराज जाधव,प्रदीप ढिलोड,व इतर कर्मचारी उपस्थित होते......
21 March 2020
Home »
» बिलोली नगरपरिषदेच्या वतिने संतुर हॅण्डवाश चे वाटप







0 comments:
Post a Comment