नांदेड | पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला होता . यातील सोयाबीन पिकाला मिळालेल्या विम्यामध्ये मंडळनिहाय तफावत आली आहे . एकाच तालुक्यात काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी विमा मिळाला आहे . या संदर्भात मुंबईत कृषी मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येवून जिल्हयातील शेतकऱ्यांना सर्व समावेशक पीकविमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु असे निसंदिग्ध ग्वाही जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली . त्यासोबतच पीकविम्याची तफावत दूर करण्यासाठी तात्काळ कारवाई करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या .पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या जिल्हयातील पीकविमा संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत . या तक्रारी दूर करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली . या बैठकीत बोलताना ना . चव्हाण पुढे म्हणाले की , पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2019 मध्ये मंजूर झालेल्या पीकविम्यात मोठी तफावत आहे . काही मंडळामध्ये योग्य तर काही ठिकाणी कमी पीकविमा मिळाला आहे . भोकर , धर्माबाद , हदगाव या तालुक्यांसह जिल्हयातील इतर तालुक्यातसुध्दा कमी अधिक प्रमाणात वेगवेगळया मंडळामध्ये पीकविम्याच्या रक्कमेत तफावत आली आहे .पीकविमा रक्कम देताना मंडळनिहाय ही तफावत निर्माण झाली आहे . या संदर्भात विमा कंपन्यांच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांना ही तफावत दूर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले . त्यासोबतच वाढीव निधी मिळणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी कृषी सचिव यांना पाठविण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या . पीकविम्या संदर्भात पुढील आठवडयात मुंबईमध्ये राज्याचे कृषीमंत्री , कृषी सचिव , कृषी आयुक्त व विमा कंपन्यांचे राज्यस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल . या बैठकीमध्ये सर्व समावेशक पीकविमा मिळवून घेण्यासाठी संबंधिताना आदेशित करण्यात येईल असे सांगतानाच नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या विमा रक्कमेतून बँकांनी कर्जाची वसुली करु नये असे पत्र देण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकाना त्यांनी सूचित केले . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ . विपिन इटणकर , माजी पालकमंत्री डी . पी . सावंत , आ . अमरनाथ राजूरकर , जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे , जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणवीस , तालुका कृषी अधिकारी भोकर , विठ्ठल गिते , जगदीश पाटील भोसीकर , भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम यांची उपस्थिती होती
07 March 2020
Home »
» शेतकऱ्यांना सर्व समावेशक पीकविमा मिळवून देण्यासाठी मुंबईत बैठक घेणार







0 comments:
Post a Comment