जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

31 July 2020

बिलोली तालुक्यातील पाच पॉझिटिव्ह तर शहरातील दोन रूग्णाचा समावेश

बिलोली:कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे.दररोज पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे.काही दिवस अगोदर बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील एकाच दिवशी ११ रूग्ण पॉजिटिव निघाले होते.तर आज आलेल्या 5 वाजताच्या अहवालानुसार बिलोली तालुक्यातील कासराळी येथील तिन पुरुष वय 13,15,41 मिनकी येथील 1 पुरुष वय 53 बिलोली एक पुरुष वय 40 बिलोली शहरातील इंद्रानगर येथील 1 पुरुष वय 26 1 स्त्री वय 16 या सर्व रूग्णाचा समावेश आहे.बिलोली तालुक्यातील रूग्णाची संख्या पाहून बिलोली तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती मात्र आजच्या अहवालात शहरातील नव्या ठिकाणी रूग्ण सापडल्या मुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विकास हणमंत गायकवाड दहावीत 90.40 % गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल शाळेत सत्कार

 देगलूर: जिल्हा परिषद हायस्कूल खानापूर ता देगलूर येथील शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल या वर्षी 87.09 % लागला आहे एकूण 31 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यापैकी विशेष प्राविण्यासह 08 विद्यार्थी , प्रथमश्रेणीत 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 06 विद्यार्थी व तृतीय श्रेणीत 03 विद्यार्थी प्रावीण्य मिळवले आहेत विकास हणमंत गायकवाड हा विद्यार्थी 90.40 % गुण मिळवून प्रथम आलेला आहे . कु.कारेगावे संतोषी मारोती ही विद्यार्थीनी 80.80 % गुण मिळवून शाळेतून द्वितीय आली आहे . तर कु.गजभारे गौतमी सुधाकर ही विद्यार्थिनी 78.40 % गुण मिळवून शाळेतून तृतीय अालेली आहे ग्रामीण भागात असूनही या शाळेने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे , त्याबद्दल जि.प.सदस्या & शिक्षण समिती सदस्या जि.प.नांदेड सौ अनुराधा अनिल पाटील खानापूरकर , श्री अनिल पाटील खानापूरकर रेल्वे बोर्ड सल्लागार समिती नांदेड तथा चेअरमन से स सोसायटी खानापुर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्र . रामराव यन्नलवार , सरपंच प्र.श्री भगवानराव विभुते , शिक्षणप्रेमी नागरीक माजी उपसरपंच श्री अनंत पाटील मा सरपंच & सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री . पंडितराव वाघमारे उपसरपंच प्रतिनिधी श्री राजेश्वररावअटकळे सर , मा . उपसरपंच मधुकरराव यन्नलवार सर , स्थानिक समितीचे सर्व सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक श्री पडलवार बी.बी सर व सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

30 July 2020

नांदेडमध्ये काँग्रेसच्या चौथ्या आमदाराला कोरोना

 नांदेड : नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे . हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार # माधवराव जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत . जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत . मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे . माधवराव जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोनाबाधित आमदार ठरले आहेत . 

याआधी काँग्रेसच्याच तीन आमदारांना कोरोनाची लागण झाली होती . कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच मोहन हंबर्डे यांनी कोरोनावर मात केली आहे . तर विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही मुंबईतच उपचार सुरु आहेत .

29 July 2020

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्टीची स्थापना करा....

बिलोली (ता.प्र):  राज्यातील मातंग समाज गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणापासुन बऱ्याच प्रमाणात वंचित राहिलेला आहे.आजही  मातंग  समाजाची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने  मातंग समाजाचा शैक्षणिक विकास अद्याप झालेला नाही. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी समाजाची शैक्षणिक उन्नती होणे अत्यंत  गरजेचे आहे.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी याचप्रमाणे मातंग समाजाच्या विकासासाठी साहित्य रत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना करण्यात यावी . अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातील सामाजिक संघटना व मातंग समाजाची आहे.  आर्टीची स्थापना झाल्यामुळे मातंग समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल . व व्हिजन 2019 अंतर्गत दिलेल्या वचनाची पुर्तता होईल . तरी राज्य शासनाने साहित्य रत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  मातंग समाजातील विद्यार्थ्यांना  शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात  आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा.   याच उदांत हेतुने मा. तहसिलदार साहेब बिलोली यांच्या मार्फत दिगांबर काचमोडे लोहगावकर  , साहेबराव दावलेकर बडुर   , मुकिंदर कुडके बिलोली यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली  आहे. 

बिलोली तालुक्यात सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह तब्बल ११ जण कोरोनाबाधित

बिलोली : तालुक्यातील सगरोळी या गावात गत तीन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला . ' त्या ' बाधित रुग्णांच्या संपर्कातील ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह तब्बल ११ जण कोरोनाबाधित झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले . सगरोळी येथील त्या बाधिताला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार करुन हैद्राबाद येथे पाठविले असता त्यांचा स्वब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील १४ जणांचे स्वब अहवाल तपासणीसाठी पाठविले होते . 
त्यातील ११ व्यक्ती हे कोरोनाबाधित आढळून आले तर अन्य निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली . बिलोली शहरापाठोपाठ कोरोनाने ग्रामीण भागातही पाय पसरल्याने तालुका आरोग्य प्रशासनासह गावकऱ्यामध्ये चिंता वाढली असून यावर तातडीने उपाय योजना करून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर हे आरोग्य कर्मचाऱ्यासह सगरोळीत दाखल झाले . बाधित क्षेत्रातील सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करुन ग्रामपंचायत , शिक्षण संस्था , सामाजिक कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्या मदतीने उपाययोजनेचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे . ग्रामीण भागातील सर्वात मोठी सगरोळी ग्रामपंचायत असून मोठी बाजारपेठ आहे . या गावाशी परिसरातील दहा ते पंधरा गावांचा संबंध नेहमीच येत असतो . तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना अगदी निवांत असलेल्या गावात आता कोरोनाचा शिरकाव झाला असल्याकारणाने सदर गावासह परिसरात चिंता वाढली आहे . बिलोली तालुक्यात आतापर्यंत तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाली होती . त्यापैकी ३१ जणांनी कोरोनावर मात केलीतर ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह ११ बाधित रुग्ण कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत .

28 July 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता रुजू

नांदेड:डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांची अचानक बदली करण्यात आली. या रिक्त पदावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला.सन 2017 साली नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्यावर मोठी नाराजी होती.बऱ्याच लोकप्रतिनिधीकडून त्यांच्याविषयी मत नकारात्मक होते.तसेच शासनाने नांदेड येथे कोरोनाच्या मृत्यूचा वाढता आकडा याबद्दल नाराजी दर्शविली होती.सदरचा ठपका त्यांच्यावर शासनाने ठेवत डॉ.चंद्रकात मस्के यांची बदली कोल्हापूर येथे झाली.त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड येथील अतिरिक्त पदभार डॉ.सुधीर देशमुख यांच्याकडे शासनाने दिला,असून ते सोमवार दि.27 जुलै रोजी दुपारी रुजू झाले. पदभार स्वीकारल्याबद्दल आधार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय कदम यांनी डॉ.देशमुख यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

27 July 2020

भाजपचे स्विकृत नगरसेवकास अटक

बिलोली: तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवकाने बनावेट कागदपत्रे तयार करून पद लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या पंढरी लिंगन्ना पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी दिली.आरोपी पंढरी पुपलवार याने पद मिळविण्यासाठी एका सेवाभावी संस्थेचे बनावट दस्तावेज सादर केले होते. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये 4 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपी पंढरी पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आले. पंढरी लिंगन्ना पुपलवार यांनी नामनिर्देशन निवडणुकीवेळी नागपूर येथील विश्वभुषण युवक कल्याण सेवा व सांस्कृतिक संस्था भगवाननगर, नागपूर यांचे सहसचिव म्हणून बनावट दस्तावेज सादर केला होता. त्या आधारे स्विकृत नगरसेवकपदाचा लाभ घेतला होता. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी तक्रार केली होती. यावरून दि.4 जुलै 2020 आरोपी पंढरी लिंगन्ना पुपलवार याच्याविरुद्ध कलम 420,467,468,471 अन्वये गुन्हा दाखलझाला होता.

24 July 2020

कोरोना बाधित रुग्णांचा तपशील पहा..

नांदेड:शुक्रवारी आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांम्ये 32 पुरुष, 10 महिला आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नादेड-13, मुखेड-06, भोकर-02, देगलूर-02, धर्माबाद-02, कंधार-01, मुदखेड-01,लातूर-01, हिंगोली-01 व परभणी जिल्ह्यातील 2 असे 39 रुग्ण आहेत.

आरटीपीसीआर तपासणीव्दारे चाचणी

पत्ता—————–स्त्री/ पुरुष——वय
1) आंनद नगर———–पुरुष——–48

2) आंनद नगर———–पुरुष——–59

3) शक्तीनगर———–पुरुष———65

4) पांडुरंग नगर———स्त्री———–36

5) एमजीएम रोड———पुरुष——–43

6) सिडको————पुरुष———44

7) विसावा नगर——–पुरुष———21

8) राहुल नगर, तरोडा बु.—पुरुष——–67

9) दिलीपसिंग कॉलनी—-पुरुष———67

10) वजिराबाद———पुरुष———40

11) वजिराबाद———स्त्री———-48

12) हडको———–स्त्री———-60

13) हडको———–पुरुष———-64

14) ग्रा. रु.भोकर——पुरुष———–36

15) रिठा, भोकर——पुरुष———–57

16) मरखेल, देगलूर—स्त्री————04

17)शारदा नगर, देगलूर—पुरुष———-47

18) खैरका, मुखेड——स्त्री———–27

19)मुक्रमाबाद, मुखेड—-पुरुष———-12

20)मुक्रमाबाद, मुखेड—-पुरुष———-25

21)शिवाजी नगर,मुखेड —-पुरुष——–30

22) शिवाजी नगर,मुखेड —-स्त्री———60

23)शिवाजी नगर, मुखेड—–स्त्री———60

24)धनज, मुदखेड———–पुरुष——25

25)बालाजी गल्ली, धर्माबाद—-पुरुष—–78

26) धर्माबाद———–पुरुष———-52

27) मारोती मंदिर, कंधार—-स्त्री———37

28) चौंडी, परभणी——–पुरुष——–65

29) गंगाखेड, परभणी——पुरुष———60

30)गंगाखेड, परभणी——स्त्री———-53

31) अहमदपुर, लातूर——पुरुष———78

32) हिंगोली————स्त्री———-60

अंटीजेन्टस किटव्दारे तपासणी

33) सुंदर नगर,नांदेड.——-पुरुष——-53

34) भाग्यनगर, नांदेड——-पुरुष——–49

35) पद्मजा सिटी,नांदेड—–पुरुष——–63

36) गणेश नगर,सिडको—–पुरुष——–42

37) भावसार चौक, नांदेड—-पुरुष——–49

38)खतगाव, बिलोली——-पुरुष——-47

39)वसमत, हिंगोली——–पुरुष——–56

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 14.97 मि.मी. पाऊस

नांदेड:दि . 24 : - जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या गत 24 तासात सरासरी 14.97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 239.52 मिलीमीटर पाऊस झाला आहे . तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 375.93 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 42.18 टक्के एवढा पाऊस झाला आहे . जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी 8 वा . संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.13 ( 426.84 ) , मुदखेड- 6.67 ( 283.00 ) , अर्धापूर -4.33 ( 357.33 ) , भोकर 13.50 ( 401.73 ) , उमरी 8.00 ( 262.63 ) , कंधार -11.67 ( 284.17 ) , लोहा- 1.83 ( 345.49 ) , किनवट- 20.43 ( 433.39 ) , माहूर- 26.75 ( 389.75 ) , हदगाव -17.71 ( 373.43 ) , हिमायतनगर 10.33 ( 582.99 ) , देगलूर- 39.50 ( 386.77 ) , बिलोली 17.00 ( 341.40 ) , धर्माबाद -7.33 ( 380.98 ) , नायगाव 6.20 ( 332.60 ) , मुखेड- 42.14 ( 432.41 ) . आज अखेर पावसाची सरासरी 239.52 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 6014.91 ) मिलीमीटर आहे .

23 July 2020

पुढील काळात अशी असेल लॉकडाऊनची रुपरेषा

नांदेड:कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. मात्र शनिवारी व रविवारी अशी दोन दिवशी संचारबंदी पूर्णवेळ असणार आहे.मागच्या बारा दिवसांपासनू सुरु असलेली संचारबंदी आज रात्री बारा वाजता उठणार आहे. मागच्या बारा दिवसांच्या काळात प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे रस्त्यावर येणारी अनावश्यक वाहतुक थांबली, लोकांना दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच थांबले. बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर शुक्रवारपासून लॉकडाऊन उडणार आहे.सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्या सेवा हया गृहनिर्माण, आरोग्य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन येथे चालू असलेल्या कॅन्टीनचा सुध्दा वापर करता येईल. रेस्टॉरंटला खाद्यपदार्थाच्या होम डिलेव्हरीसाठी स्वयंपाकघर वापरण्यास मुभा असेल.
सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहणार आहे.
संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बालवाडी ते १२वी; शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं ऑनलाइन वर्गांचं वेळापत्रक

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले आहे. अशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे.कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

असे असेल वेळापत्रक :
१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) : सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाईल.

२) पहिली व दुसरी : सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाईल.

३) तिसरी ते आठवी : या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाईल.

४) नववी ते बारावी : या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाईल.दरम्यान राज्यात कोरोनाच्या संकटानं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येण्याऐवजी वाढताना दिसत असून, आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या तीन लाखांच्या वर पोहोचली आहे.

आजच्या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा माहिती

नांदेड:गुरुवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 56 इतकी आहे. हे रुग्ण कोणत्या भागातील आहेत, त्यांचे वय किती यासंबधी माहिती विस्ताराने प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये 37 पुरुष व 21 स्त्रींचा समावेश आहे. यात नांदेडमधील 26, उमरी 11 व देगलूर तालुक्यातील 5 सर्वाधिक आहेत. तसेच 15 रुग्ण गंभीर असून यात पाच महिला व दहा पुरुषांचा समावेश आहे.

पत्ता—————–स्त्री/पुरुष——वय
नांदेड शहर व परिसरातील रुग्ण

1)आयटीआय———–पुरुष———51

2) लेबर कॉलनी———पुरष———43

3)आंबेडकर नगर——–पुुरुष———04

4)आंबेडकर नगर——–स्त्री———-24

5)आंबेडकर नगर——–स्त्री———-45

6)हडको————-पुरुष———-40

7)हडको————-पुरुष———-55

8) गोकुळ नगर———पुरुष———-30

9) गोकुळ नगर———पुरुष———-69

10) चिराग गल्ली——पुरुष———–75

11) लिंबगाव——–पुरुष———–40

12) लिंबगाव——–पुरुष———–70

13) खोजा कॉलनी—-पुरुष———–50

14) वसंत नगर——-स्त्री———–40

15) शहिदपुरा——–स्त्री———–18

16) शहिदपुरा——–पुरुष———-57

17) सोमेश कॉलनी—-पुरुष———-55

18) चैतन्य नगर——स्त्री————25

19) छत्रपती चौक—–पुरुष———–43

20) पाठक गल्ली—–पुरुष———–20

21) पाठक गल्ली—–पुरुष———–20

22) पाठक गल्ली—–पुरुष———–21

23) पाठक गल्ली—–पुरुष———–57

24) वजिराबाद——-पुरुष———–62

25) जवाहर नगर—–पुरुष————75

26)बळीराम ——-पुरुष————-54
————
नांदेड तालुका वगळता जिल्हाभरातील रुग्ण
27)वाल्मिक नगर, मुखेड–पुरुष———-56

28) ओम गल्ली, तामसा–पुरुष———-50

29) पेवा, हदगाव——-पुरुष———-45

30)हदगाव———–पुरुष———–30

31)महादेव मंदिर, देगलूर–स्त्री———-45

32) सुगाव, देगलूर——स्त्री———–55

33)सत्यम नगर,देगलूर—-पुरुष———56

34) खाजाबाबा नगर, देगलूर–पुरुष——-55

35) देगलूर————–पुरुष——-47

36) मार्केट यार्ड, लोहा—-पुरुष———34

37) मार्केट यार्ड, लोहा—-स्त्री———65

38) फु लवळ, कंधार—–स्त्री———-15

39) फु लवळ, कंधार—–स्त्री———-40

40) फु लवळ, कंधार—–पुरुष———-09

41) फु लवळ, कंधार—–पुरुष———-25.

42)बालाजी नगर, नायगाव–पुरुष———52

43) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———09

44) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———21

45) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———24

46) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———25

47) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———45

48) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———48

49) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———71

50) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-23

51) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-42

52) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-42

53) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-47

54) सेलू, परभणी——-पुरुष———-53

55) गंगाखेड, परभणी—-पुरुष———-55

56)वसमत, हिंगोली—-पुरुष———–55

नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची शिर्डी येथून बदली

नांदेड:नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे नांदेडवरून बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. अवघ्या पाच महिन्यांच्या काळात दुसर्‍यांदा बदली झाली आहे. बदलीने म्हाडच्या इमारत दुरुस्ती सीओ म्हणून गेले आहेत.
नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अरूण डोंगरे यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. पाच महिन्याच्या आत त्यांची बदली झाली आहे. याचसोबत अनुप कुमार यादव यांची सेलटॅक्स कमिशनर, परिमल सिंघ कुटुंबकल्याण, डॉ. किरण यादव यांची सीईओ रायगड असे आदेश निघाले आहेत.

कै.विवेकानंद केरळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन

शहरातील युवकांनी शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..! 
नांदेड_दि 23 | कालवश . विवेकानंद ( पप्पु ) केळकर यांच्या 12 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 23 जुलै 2020 रोजी दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महारक्तदान शिबिराचे पपू केळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते , पण कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यात दि . 12 पासून ते 23 जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू आहे , त्यामुळे हा कार्यक्रम दि 23 जुलै 2020 ऐवजी ( 29 जुलै 2020 रोजी नांदेड शहरातील श्रीनगर भागातील राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली , हॉटेल मधुबन समोर , घेण्यात घेणार असल्याचे पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे . व सध्यास्थितीत कोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता राज्य आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे , तरी सदरली महारक्तदान शिबरास शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन , आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याचे आवाहन पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने करण्या आले आहे .रक्तदान श्रेष्ठ दान !! 29 जुलै बुधवार 2020 ठिकाण : राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली , हॉटेल मधुबन समोर , श्रीनगर नांदेड ... 
संपर्क:किरणभाऊ हाटकर 
08149817358

रात्रीतून मृत्यू संख्या वाढली;मृत्यू संख्येत बिलोली तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश

नांदेड:कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे.जिल्ह्यात रात्रीतून पाच रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.नांदेड जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला होता. तर रात्रीतून सकाळपर्यंत पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत. यामध्ये बिलोली तालुक्यातील कोल्हेगाव येथील 17 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय रुग्णांचा रात्री साडे आठ वाजता मृत्यू झाला.लोहा येथील 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मध्यरात्री मृत्यू झाला.मुखेड येथील वाल्मिक नगर भागात राहणाऱ्या 56 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.देगलूर तालुक्यातील सुगावा येथील 55 वर्षीय रुग्णाचे पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 55 झाली आहे.मरण पावले सर्व जण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय रुग्णालयात उपचार घेत होते. असे सांगण्यात आले.

किनवट तालुक्यातील पर्यायी पुल वाहुन गेल्याने अनेक गावांचासंपर्क तुटला

किनवट:किनवट माहूर तालुक्यात मागच्या चौविस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील घोटी येथील पर्यायी पुल वाहून गेला आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यताील काही गावांचा संपर्क तुटला.
किनवट तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळात रात्रीतून चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये किनवट-62, इस्लापुर-56, मांडवी-22, बोधडी-44, दहेली-24, जलदरा-52 तर शिवणी मंडळात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिवणी शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी येथे तयार करण्यात आलेला घोटी वाहून गेला आहे.
सदरचा पर्यायी पुल असून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून तात्पुरत्या स्वरुपातत शारदा कंस्ट्रक्शन कंपनीने हा पुल तयार केला आहे. या पुलाचे काम निकृष्ट केल्याने पुल वाहून गेला असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. सदैवाने यात जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

आ. राजूरकरांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांसह सर्वांचे अहवाल प्राप्त

नांदेड:काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद अमरनाथ राजूकर यांचा अहवाल सोमवारी रविवारी पॉझिटीव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी, आमदार माधवराव जवळगावकर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह काही अधिकारी व काही पदाधिकार्‍यांचे रॅपीड कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
 आमदार राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यानंतर नांदेड येथे कोरोनाची रॅपीड टेसट केली, असता ते व त्यांची कन्या कोरोना पॉझिटीव्ह आली होती. राजूरकर यांची टेस्ट पॉझिटीव्ह येण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली होती. या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ. लहाने, भोकर अतिरक्त पोलिस अधीक्षक श्री. पवार आदींची हजेरी होती. त्यांनतर राजूरकर हे जिल परिषदमधील शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या बंगल्यावर गेले होते. या बंगल्यावरील शिपाई मात्र कोरोना पॉझिटीव्ह आला होता.
 त्यानंतर सर्व अधिकारी व पदाधिकारी व संपर्कात आलेल्या काहींनी स्वतः होम क्वॉरंटाईन करून घेतले होते. अशा सर्वांचे रॅपीड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ. लहाने, भोकर अतिरक्त पोलिस अधीक्षक श्री. पवार, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंढेकर, दिनकर दहिफ ळे, बालाजी पांडागळे, संदीप मुंडे आदींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये दमदार पाऊस

नांदेड:- श्रावण सरी सगळीकडे कोसळू लागल्या आहेत. मागच्या चौवित तासात जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस झाला, असून सर्वाधिक पाऊस किनवट,माहूर हदगाव व हिमायतनगर तालुक्यात झाला आहे.यंदाचा पावसाचा मौसम सुरुवातीपासून चांगला राहिला आहे. अवघ्या दीड महिन्यांच्या काळात चाळीस टक्के पाऊस झाला आहे. सदरचा पाऊस पिकांना ही पोषक ठरला आहे. 
त्यामुळे पिकांची वाढ चांगली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये सर्वाधिक 50.29 मिलीमीटर पावसाची नोंद किनवट तालुक्यात, माहूर तालुक्यात 46.25, हिमायतनगर तालुका 43.67, हदगाव तालुक्यात 29.43, भोकर तालुक्यात 29.25 व त्यानंतर मुदखेड तालुक्यात 21.38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र बाकीच्या सर्व तालुक्यात नगण्य पाऊस झाला आहेकिनवट शहरात 62, इस्लापुर-56, मांडवी-22, बोधडी-44, दहेली-24, जलदरा-52, तर शिवनी मंडळात तब्बल 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मदखेड तालुक्यातील बारड शिवारात-45, हदगावमध्ये 37, पिंपरखेड- 36, तळणी-41 व आष्टी मंडळात 32, हिमायतनगर-38,सरसम-53,जवळगाव-40, भोकर-24, किनी-33, मोगली-38, मातुळ-22, उमरी तालुक्यातील शिंद्धीमध्ये 36, माहूर-41, वानोळा-54, वाई-48 व सिंद्धखेड42 अशी पावसाची नोंद झाली आहे.

शिफारशीवर बॉस होण्याच्या स्वप्नांवर पाणी!

नांदेड:कोरोनाच्या महामारीत कुठल्याही निवडणुका होणे नाही. मुदत संपलेल्या महापालिका,नगरपालिकांवर प्रशासनाचे प्रशासक आले, असताना ग्रामपंचायवर पालकमंत्र्यांच्या शिफ ारशीनुसार प्रशासक नेमण्याचा प्रकार नियमबाह्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ठरविले आहे. त्यामुळे शिफ ारशीवर बॉस होण्याचे स्वप्न पाहणार्‍या गावातील काही मोहरक्यांच्या स्वप्नांवर पाणी फे रले आहे.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेशग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदेश दिले होते.यासाठी त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची शिफ ारस ग्राह्य धरावी, असे सूचित केले होते. या आदेशाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच समाजसेवक अण्णा हजेरी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर काहींनी न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शिफ ारशीनुसार प्रशासक न नेमता सरकारी कर्मचारी नेमण्यात यावा आणि जिथे सरकारी कर्मचारी नसेल तिथे खासगी व्यक्तीची नेमणूक करता येईल, असे आदेशात म्हटले आहे. अशा नेमणुकीय भाजपच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला होता. एका याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात दि. 23 रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळयांचे लक्ष असणार आहे. निर्णय सरकार विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार काय याकडे लक्ष असणार आहे.

मानवहित लोकशाही पक्षाच्या जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी अंकुश वाघमारे यांची निवड

बिलोली:(ता प्र)तालुक्यातील शंकरनगर येथील युवा कार्यकर्ता सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे अंकुश वाघमारे यांची जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.मानवहित लोकशाही पक्ष हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या संकल्पनेतुन लहुजी- शाहू -फुले -आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्रातील समाज बांधवांचा उध्दार करण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्याच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी तसेच मानवाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 'अंकुश वाघमारे रामतिर्थकर' यांची मानवहित लोकशाही पक्ष नांदेड जिल्हा युवा उपध्यक्ष पदि निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल आ. रावसाहेब अंतापूरकर,ब्रम्हानंद कांबळे आदींनी अभिनंदन केले.

बिलोलीतील गळा दाबून खुन प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

बिलोली : शहरातील छोटीगल्ली येथील १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा नोंदविला . २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती . पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला . त्यासाठी दोन दिवस घेतले . अखेर बुधवारी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक वाडेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली . त्यानुसार आरोपी आफजल शाह , मौला शाह , बुरान शाह , हानिफाबी सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नगमा गौस सय्यद असे मयत मुलीचे नाव असून ती १४ वर्षांची होती . १३ वर्षांपूर्वी तिला तिच्या आईने सोडून दिले होते . त्यावेळी तिने मामाकडे जाण्याऐवजी वडील , काका , : आजी , आजोबाकडे राहण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय तिला महागात पडला . नगमाला मागील २ वर्षांपासून विविध कारणांनी शिवीगाळ करणे , लाकडाने मारहाण करणे , हाताला गरम चटके देणे , तिच्यावर अत्याचार करणे असे विविध प्रकार सुरु होते . शेवटी या घटनांचा परिणाम खुनात झाला . आरोपींनी २० जुलै रोजी नगमाला जबर मारहाण करुन तिचा खून केल्याचा आरोप आहे . घटनेनंतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले . उर्वरित पळून गेले . याप्रकरणी शेजारी राहणारे फिर्यादी बनले व त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली . अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत .

22 July 2020

कोरोनाच्या रुग्णांंचा पत्ता,वय विस्तृत माहिती

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 56 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या 48 झाली, असून एकूण रुग्णंसंख्या 1 हजार 74 एवढी झाली.
———-
पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय
1)राजनगर————-पुरुष———55

2) पाठक गल्ली——–पुरुष———-25

3) दत्त नगर———–पुरुष———-40

4) भावसार चौक——-पुरुष———-60

5) दिलीसिंग कॉलनी—-स्त्री———-52

6) देगलूर नाका——-पुरुष———-55

7) गीता नगर———स्त्री———–43

8) आनंद नगर——–स्त्री———–18

9) आनंद नगर——–स्त्री———–80

10) आनंद नगर——–पुरुष———-07

11) राजक कॉलनी——स्त्री———–45

12) विष्णपुरी——–पुरुष———–29

13) हडको ———पुरुष———–62

14)उमरी, अर्धापुर—-पुरुष———–50

15)मंजुळा नगर, भोकर-पुरुष———–56

16)घोटा, हि.नगर—–पुरुष———-70

17)माळाकोळी——-स्त्री———–63

18) कंधार———पुरुष———–52

19)विजयगड,कंधार–पुरुष———–06

20)विजयगड,कंधार–पुरुष———–30

21)विजयगड,कंधार–पुरुष———–38

22)विजयगड,कंधार—-स्त्री————60

23)मोची गल्ली,देगलूर–पुरुष———–67

24)मोंढा, देगलूर——पुरुष———–39

25)उजिरु,देगलूर——पुरुष———–48

26)लाईन गल्ली, देगलूर–पुरुष———-14

27)लाईन गल्ली, देगलूर–पुरुष———-25

28)लाईन गल्ली, देगलूर–स्त्री———–42

29)लाईन गल्ली, देगलूर–स्त्री———–45

30)भुतहिरगा,देगलूर—–स्त्री———–35

31) देगलूर———–पुरुष———-35

32)शांतीनगर, देगलूर—-स्त्री———–40

33) अंबुलगा, मुखेड—-पुरुष———-80

34)नवापेठगल्ली, मुखेड-पुरुष———-18

35) पाखादेवडी, मुखेड–पुरुष———-08

36) पाखादेवडी, मुखेड–पुरुष———-14

37) पाखादेवडी, मुखेड–पुरुष———-35

38) पाखादेवडी, मुखेड–स्त्री———–38

39)मुक्रमाबाद, मुखेड—पुरुष———-63

40)मुक्रमाबाद, मुखेड—स्त्री———–23

41)होळकर नगर, मुखेड–पुरुष———-85

42)मैन मार्केट,मुखेड—-पुरुष———-12

43)मैन मार्केट,मुखेड—-पुरुष———-18

44)मैन मार्केट,मुखेड—-स्त्री———–60

45) फु ले मार्केेट, मुखेड–स्त्री———–35

46) मेन रोड, मुखेड—-पुरुष———–55

47)कोलंबी,नायगाव———पुरुष——17

48)कोलंबी,नायगाव———पुरुष——23

49)कोलंबी,नायगाव———स्त्री——-75

50)फु ले कॉलनी, नायगाव—–पुरुष——39

51)नायगाव————–पुरुष——-58

52) नायगाव————-पुरुष——-27

53)नर्सी, नायगाव———पुरुष——–57

54) शेळगाव, हिंगोली——पुरुष——–62

55) वसमत,हिंगोली——-पुरुष——–37

56)मोती नगर, पुसद——पुरुष———-72

बिलोलीत १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून खुन

बिलोली : शहरातील छोटी गल्ली येथील एका १४ वर्षीय मुलीला तिचे वडील , सावत्रआई , आजोबा , आत्या यांनी दगड , काठीने बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळला . ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली . घटनेनंतर मारेकरी गायब झाल्याने संतप्त शेजारच्यांनी आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली . मयत नगमा गौस सय्यद दीड वर्षांची असताना १३ वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून तिला सोडून आईने सासरच्या मंडळींशी असलेला संबंध तोडला होता , तेव्हापासून ते मृत्यूच्या दारेत लोटण्यापर्यंत १४ वर्षीय नगमास दररोज छळण्यात येत होते . उपाशी ठेवणे , शिवीगाळ करणे , लाकडाने मारहाण करणे , हाताला गरम चटके देणे आदी प्रकार नगमाला सहन करावे लागले . आजोबा अफजल शाह मौला शहा हे जादूटोणा व करणी करत असल्याच्या भीतीने पोलिसात कोणीही यासंदर्भात तक्रार दिली नाही . यातच २० जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान घरातील मंडळींनी नगमाला बेदम मारहाण करुन तिचा खून केला.आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या दफनविधीची तयारीही सुरु केली होती . शेजाऱ्यांनी ही कैफियत पोलिसांसमोर मांडली . ही कुणकुण लागताच मयताची आत्या , आजीने पळ काढला , अन्य जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले . शेजारच्या मंडळींनी एकवटून ह्या घटनेची फिर्याद पोलिसात देवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली . २१ जुलै रोजी दुपारी १२ च्या दरम्यान मयताचे शवविच्छेदन करुन पोलिसांनी तिचा दफनविधी केला . याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मसूद देसाई , महेमूद चाऊस , राजू पवार , सादीक पटेल , दिलीप उत्तरवार , वलिओद्दीन फारुखी , कौसर शहा , अमजद चाऊस , बासीदखान यांच्यासह दोनशेहून अधिक शहरवासियांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 

""बिलोलीत घडलेल्या त्या घटनेची तक्रार शहरवासीयांना केली असुन, घरच्या मंडळींना आम्ही ताब्यात घेतले आहे.अन्य ३ जण फरार झाले आहे.तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.""राम केंद्रे , सपोनी बिलोली

21 July 2020

देगलूर तालुक्यातील चौदा पॉझिटिव्ह रूग्ण

देगलुर:कोरोना विषाणू ने जगभर थैमान घातले.नांदेड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी एक देखील पॉझिटिव्ह रूग्ण नहुता मात्र आजच्या घडीला पॉझिटिव्ह चा आकडा जवळपास एक हजार एवढा झालेला आहे या मध्ये बरेच रूग्ण बरे झाले व काहीचा मृत्यू झालेला आहे जिल्हासह तालुक्यात देखील रूग्णाची संख्या वाढत चाललेली आहे.वाढत चाललेल्या रूग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी लॉकडाऊन लावले आहे तरीदेखील रूग्ण संख्येत वाढ होत आहे.या मध्ये देगलूर तालुक्यातील देखील रूग्णाची संख्या वाढत जात आहे आज आलेल्या अहवालात बिलोली तालुक्यातील कासराळी येथील एक महिला(५५) तर देगलूर तालुक्यातील चौदा रूग्णाचा समावेश या यामध्ये
 सिईओ निवासस्थान परीसर 1 पुरुष वय वर्ष (४०)
लाईन गल्ली येथील 5 पुरुष रूग्ण वय वर्ष 13,13,20,20,48,
मरखेल पोलीस स्टेशन 1 पुरुष वय(32) 
बाहेगाव रोड 1 महिला वय (21), 
नागोबा मंदिर 1 पुरुष वय (15), 
शेलगाव  1 पुरुष वय (23),
 कोटेकल्लुर 3 पुरुष वय 5,10,48,
भुतनहिप्परगा 1 पुरुष वय (35) या रूग्णाचा समावेश आहे.

जि. प. सभापतींच्या बंगल्यावरील शिपाई पॉझिटीव्ह; जि.प.अध्यक्ष बंगल्यावर मुक्कामी

नांदेड:आमदार अमरनाथ राजुरकर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने संपर्कात आलेल्या काहींनी धास्ती घेतल्याचे समजत. यातच एका जिल्हा परिषद सभापतींच्या बंगल्यावर काही विश्रांती घेतली होती. या बंगल्यावरील एका शिपाई कोरेाना पॉझिटीव्ह आला आहे. तर शनिवारच्या बैठकीस राजूकर यांच्यासमवेत हजर असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले, असून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी कधी नव्हे पहिल्यांदा शासकीय बंगल्यावर मुक्काम हलविला आहे.आ. राजूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर आज दुपारी ते उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर राजूरकर व काही सहकारी हे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या बंगल्यावर काही वेळ बसले होते. राजूरकर हे पॉझिटीव्ह आल्यानंतर येथील बंगल्यावरील कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली. यात एक तरूण कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे.मंगाराणी अंबुलगेकर शासकीय बंगल्यावर…
शनिवारच्या बैठकीत अमरनाथ राजूरकर हे हजर राहिल्याने त्या बैठकीतील सर्व अधिकारी हे होम क्वॉरंटाईन झाले आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर या सुद्धा होम क्वारंटाईन झाल्या. मात्र त्यांनी शासकीय बंगल्यावर मुक्काम हलविला आहे.

20 July 2020

आज नव्या 51 रुग्णांनची भर, 3 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 986

नांदेड दि.२०जुलै: आज सोमवार रोजी संध्याकाळी प्राप्त माहिती नुसार ५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण रुग्ण संख्या ९८६ झाली आसून आजवर एकुुुण ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात ५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कासराळी बिलोली २ महिला (वय ४८, ७२), समता नगर मुखेड २ पुरुष (वय ३२,५०), व १ महिला (वय ४८), शारदा नगर देगलूर १ महिला (वय ४२), मोंढा मार्केट यार्ड लोहा १ पुरुष (वय ६७), सिद्धार्थ नगर नायगाव १ पुरुष (वय २६), कोलंबी नायगाव १ पुरुष (वय ५५), विजय सुलेमान कंधार १ पुरुष (वय ६७), शिवाजी नगर ता. मुखेड १ पुरुष (वय ५६), व १ महिला (वय ४९), मुक्रामाबाद मुखेड ४ पुरुष (वय १, २९, २९, ३८) व २ महिला (वय ३, २५), बामणी ता. मुखेड १ पुरुष (वय २९), भोकरदन जालना – १ पुरुष (वय ५५), खाजाबाबा देगलूर १ पुरुष (वय ४५), शिवाजीनगर मुखेड १ महिला (वय ४५), विष्णुपूरी नांदेड १ पुरुष (वय २४) व ३ महिला (वय २३, ३०, ३५), छत्रपती नगर नांदेड १ पुरुष (वय ४२), जुना मोंठा नांदेड १ पुरुष (वय ६५), वजिराबाद नांदेड १ पुरुष (वय ७४), शहीदपुरा नांदेड १ पुरुष (वय ४१), हिंगोली नाका १ महिला (वय ६५), जुना कौठा नांदेड १ पुरुष (वय ५२), वजिराबाद नांदेड १ पुरुष (वय ५३).

नांदेड शहरातील ANTIGEN TEST KITS तपासणीतून आढळून आलेले रुग्ण


गोकुळनगर २ पुरुष (वय १७, ३६) व २ महिला (वय ३२, ३७), खालसा कॉलनी १ महिला (वय २ महिने), साईनगर १ महिला (वय ९ महिने), पाठक गल्ली ५ पुरुष (वय २०, २३, २७, ४५, ४८) व २ महिला (वय ५५), देगलूरनाका १ पुरुष (वय ४२), तरोडा नाका १ पुरुष (वय ४१), गणेशनगर १ पुरुष (वय ४०), लातूरफाटा १ पुरुष (वय ३८), शिवाजी नगर १ पुरुष (वय ५४), व १ महिला (वय ११)

तर ३ जणाचा मृत्यू झाला आहे  हिंगोली नाका नांदेड ६४ वर्षीय महिला, नायगाव येथील २६ वर्षीय महिला, देगलूरनाका ६५ वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*आज एकूण १५ रुग्ण बरे झाले आहेत.

*कोरोना बाधीत एकूण संख्या : ९८६
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ५१५
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण : ४२२
मृत्यू पावलेले एकूण रुग्ण : ४९

कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी 23 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ

नांदेड दि . 20 : - कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार 23 जुलै 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे . तर आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून ( मिशन बिगीन अगेन ) नुसार जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार यादिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी मुभा देण्यात आली आहे . नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या विचारात घेता जिल्हपयात कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हाणून अटी व शर्तीच्या अधिन राहून संपूर्ण नांदेड जिल्हूयात 12 जुलै 2020 रोजी मध्यात्री पासून ते 20 जुलै 2020 च्यास मध्यजरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्याकत आली होती . परंतु नांदेड जिल्ह यात कोरोना विषाणू बाधित रुग्णत संख्याज झपाटयाने वाढ होत असल्याने या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यांच्याब अनुषंगाने संचारबंदीत वाढ करणे आवश्यसक होते .साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना दिनांक 14 मार्च 2020 अन्वये प्रादुर्भाव रोखण्यारसाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यिक आहे त्या करण्याससाठी सक्षम प्राधिकारी म्हधणून तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्हाकदंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 3 ) अन्वकये संपूर्ण नांदेड जिल्हकयात 20 जुलै 2020 रोजी मध्यौरात्री पासून ते दिनांक 23 जुलै 2020 च्या ( मध्यहरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ केली आहे . या संचारबंदीच्या कालावधीत यापुर्वीच्या दिलेले आदेश , निर्देश व अतिरीक्त निर्देश जशास तसे लागु राहतील . शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत ( Mission Begin Again ) अन्वये राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसेच यापुर्वीच्या आदेशातील निर्देशानुसार नांदेड जिल्हायात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून खालील प्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहे . संपुर्ण नांदेड जिल्हरयात पुढील प्रमाणे बाबी प्रतिबंधित राहतील सर्व शाळा , महाविद्यालय शैक्षणिक , प्रशिक्षण संस्थार व शिकवणी वर्ग इ . बंद राहतील . तथापि ऑनलाईन , आंतर शिक्षण यास मुभा राहील . हॉटेल / रेस्टॉतरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्याद सेवा हया गृहनिर्माण , आरोग्य , पोलीस , शासकिय अधिकारी आरोग्यस सेवा कर्मचारी पर्यटकांसह अडकलेल्याय व्यहक्ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल . तसेच वरील सेवेसाठीच बसस्टॉरप , रेल्वे स्टेशन येथे चालू असलेल्यान कॅन्टीरनचा सुध्दा वापर करता येईल . रेस्टॉररंटला खाद्यपदार्थाच्याट होम डिलेव्ह रीसाठी स्व यंपाकघर वापरण्याीस मुभा असेल . सर्व सिनेमा हॉल , शॉपींग मॉल , व्यावयामशाळा व जलतरण तलाव मनोरंजन पार्क , थिएटर बार आणि सभागृह , असेंब्लीश हॉल व इतर तत्स्म ठिकाणे बंद राहतील . सर्व सामाजिक , राजकीय , खेळ , करमणूक , शैक्षणिक , सांस्कृतिक , धार्मिककार्ये , इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल . सर्व धार्मिक स्थळे , पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील . तसेच धार्मिक कार्यक्रम , परिषदा इत्या दीवर बंदी राहील . जिल्ह्यात सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये मात्र यामधून अत्यालवश्यक सेवेकरिता नेमण्यावत आलेले अधिकारी , कर्मचारी व वैद्यकिय कारणास्तरव रुग्ण व त्यांनच्या सोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील . यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्याणस अशा व्याक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्याअत येईल . आरोग्य सेतूचा वापर करावा आरोग्य सेतुचा वापरामुळे कोव्हिड -19 आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वारीत सूचना मिळते व त्याचा फायदा व्यक्तीस व समाजाला सुध्दा होतो . त्यामुळे अॅन्ड्राइड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्ये आरोग्ये सेतू अॅप डाऊनलोड करावे शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी आपल्या व इतरांच्या सुरक्षितेसाठी आरोग्या सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील . नांदेड जिल्हायातील सर्व नागरिकांनी आरोग्यं सेतु अॅप डाऊनलोड करुन त्या चा नियमित वापर करावा , असे आवाहन जिल्हार प्रशासनाच्यावतीने करण्यायत आले आहे . आरोग्याच्याश दृष्टीवने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्ठा नागरिक , अनेक व्यागधी असणारे व्यक्तीन , गरोदर माता , दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी काळात अत्या वश्यक काम , आरोग्य कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही . त्यांरनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे . , नांदेड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्या ने आदेशातील परिशिष्टन 03 मध्येह नमुद प्रमाणे आस्था पने व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्थाीपनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्याशत आली आहे . परंतु सर्व शासकिय व खाजगी दवाखाने सर्व औषधी दुकाने वैद्यकिय अत्यावश्यकक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये हे पुर्णवेळ चालू राहतील .जिल्हययातील सर्व शासकीय कार्यालय , बँकेचे सर्व व्यववहार पुर्वी दिलेल्या निर्देश अटी शर्तीनुसार कार्यालयीन वेळेत चालू राहतील . क्रीडा कॉम्प्लेक्सव आणि स्टेहडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्याळयामासाठी मोकळी राहील . तथापि या ठिकाणी प्रेक्षक आणि ग्रुप अॅक्टीव्हिटीजसाठी मुभा राहणार नाही . सर्व शारीरिक व्याायाम व त्याहसंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील . सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस दुचाकी वाहन 1 व्यतक्तीज , तीन चाकी वाहन 1 अधिक 2 व्यवक्ती , चार चाकी वाहनासाठी 1 अधिक 2 व्यक्तींकना मुभा राहील . नांदेड जिल्हयांतर्गत बससेवा जास्तीसतजास्तु 50 टक्के क्षमतेनुसार सुरु करण्या स मुभा देण्यातत येत आहे . परंतु सामाजिक अंतर व स्व च्छमतेची उपाययोजना करणे आवश्यजक राहील . सर्व दुकाने , बाजारापेठ सुरु ठेवण्यातस मुभा देण्यातत येत आहे . परंतु उक्ता दुकाने , बाजारपेठच्याय ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्यावत येत नसल्याजचे दिसून आल्याीस दंडात्मवक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल . वरील बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुंवचा पुरवठा तसेच अत्यावश्याक वैद्यकीय सेवांना मुभा राहील . निर्गमीत केलेल्या 4 जून 2020 रोजीच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्थाय ( विद्यापीठे , महाविद्यालये , शाळा ) या ठिकाणचे कर्मचारी यांना फक्त 2 अध्यापना व्यातिरिक्तर इतर कामाकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्तदरपत्रिकांचे मुल्यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्यालसाठी मुभा राहील . जिल्हायातील मंगल कार्यालयाच्यार ठिकाणी केवळ लग्नठसंमारंभाच्यां आयोजनाची मुभा 7 व 8 जून 2020 रोजी आदेशातील नियम व अटींच्याण अधिन राहून राहील . तसेच 7 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये निवास व्योवस्थाी असलेले हॉटेल , अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्यासाठी दिलेली मुभा उक्तल आदेशात नमुद नियम व अटींच्याज अधिन राहून लागु राहील . वरील दुकाने / आस्थाहपनाच्या ठिकाणी उपाययोजना बंधनकारक राहिल कामाच्याद ठिकाणी , दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्डठवॉश , सॅनिटायझरचा वापर करणे . एका वेळेस दुकानात 05 पेक्षा जास्ती ग्राहकास प्रवेश राहणार नाही . दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्याण चेह - यावर मास्कज असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्यलथा 1 हजार रुपये एवढा दंड संबंधितांकडून आकारण्याचत येईल . मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूला , ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निजंतुकीकरण करणे ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशांची देवाण - घेवाण आरबीआयच्याश सुचनेनुसार ई - वॉलेटस व स्वा ईप मशीनव्दारे करण्यास भर द्यावा . वरील नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यारस तसेच उपाययोजनेचे भंग केल्यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्यानत येईल . परिशिष्ट -2 सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे . सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास रु . 1000 / - दंड आकारण्या त येईल . सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळावेत . लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी ५० पेक्षा जास्त आमंत्रित असु नयेत तसेच , लग्नव सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 या कालावधीतच पार पाडणे आवश्येक असेल . अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये . दारु , पान , गुटखा , तंबाखू इ . चे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्यषथा कायदेशिर कारवाई करण्यानत येईल . सर्व दुकाने ही दोन ग्राहकामध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस ५ पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना थर्मल स्क्रीनींग हॅडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे . कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा . दरवाज्याचे कडी कोंडी इ . चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे . सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे . तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात . रेड झोनव्यवतिरिक्तम भागात व प्रतिबंधित क्षेत्रात हवाई , रेल्वे व मेट्रो प्रवास , आंतरराज्यय मार्ग वाहतूक शैक्षणिक संस्थाग , आदरातिथ्यब हॉटेल्सफ शॉपिंग मॉल्स प्रार्थनास्थरळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे , 65 वर्षे वयावरील व 10 वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये - जा , आंतर जिल्हाज बससेवेला परवानगी राहणार नाही . रेड झोनव्यवतिरिक्तन भागात दारुची दुकाने , वैद्यकिय सुविधा पुरविणारे दवाखाने , क्ली निक ( ओपीडी ) , टॅक्सीन , कॅब , रिक्शाअ 1 अधिक 2 व्याक्तीव , चार चाकी वाहने 1 अधिक 2 व्यक्तीला , दुचाकी वाहने 1 व्यक्ती , जिल्हांवतर्गत बससेवा , औद्योगिक आस्था पना ( शहरी ) व ( ग्रामीण ) , शहरी भागातील सीटू बांधकाम , इतर खाजगी बांधकाम स्थळे , शहरी एकल विक्रेता दुकाने , ई - कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूश , ई - कॉमर्स अंतर्गत अत्याावश्यगक नसलेल्या वस्तू , खाजगी कार्यालये , शासकीय कार्यालये ( शंभर टक्के उपस्थिती ) , कृषिविषयक कार्य , बँक आणि वित्तल , कुरियर व पोस्टकल सेवा , केश कर्तनालय दुकाने , स्पा , सलून , प्रेक्षकांव्यणतिरिक्त स्टेयडियम घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट , दुय्यम निबंधक , प्रादेशिक परिवहन , उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रेड झोनव्यमतिरिक्तआ भागात सुरु राहण्यास परवानगी आहे तर प्रतिबंधीत क्षेत्रात याबाबींना परवानगी राहणार नाही .रेड झोनव्यथतिरिक्त व प्रतिबंधित क्षेत्रात मालाचा पुरवठा , अत्या वश्यबक सेवा पुरविणारी दुकाने , वैद्यकिय अति तात्काळ सेवांची हालचाल या सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे . आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यपक कायदेशिर व दंडात्मक कारवाई करण्यातस पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यागत आले आहे . महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्ते पथके गठीत करावीत नगरपालिका हद्दीत , नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तग पथके गठीत करावीत गावपातळीवर , ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे . वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांचेकडे सादर करावीत संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्यास अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्याक्ती , संस्थाी अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यानत येईल . तसेच यापुर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मअक कार्यवाही सुध्दाव करण्यात येईल . सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्य क साधने व सुविधांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्दि कठोर कारवाई करावी तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्याच कृत्यावसाठी कुठल्यारही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्दअ कुठल्यानही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . हा आदेश दि . 19 जुलै 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे .

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त होम क्वारंटाईन

नांदेड:- कोण कधी कोरोना पॉझिटिव्ह निघेल याचा नेम नाही. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण,आमदार मोहन हबर्डे यांचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. सोमवार दि.20 जुलै रोजी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांचा स्वब पॉझिटिव्ह आल्यानंतर जिह्यातील अधिकाऱ्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे हदगाव मतदार संघाचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह सर्व बडे अधिकारी होम क्वारटाईन झाले आहे,होम क्वारटाईन झाले तरी अधिकाऱ्याकडून वर्क फ्रॉम होमच आहे.आमदार अमरनाथ राजूरकर हे काही दिवस मुंबईत होते.मुंबईवरून आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या शनिवारच्या बैठकीत हजेरी लावली होती.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ डॉ.शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खलाळ आदींची उपस्थिती होती. या बैठकीस काही आमदार मंडळी सुद्धा हजर होती.सोमवार दि. 20 रोजी आमदार राजूरकर व त्याच्या धाकट्या कन्येचा रॅपिड टेस्टद्वारे घेण्यात आलेला अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राजूरकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व अधिकारी हे अलर्ट झाले,असून पुढील दक्षता म्हणून स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.हे सर्व अधिकारी दोन दिवसानंतर स्वब देणार असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील कॉग्रेसचा एक आमदार कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड: सामान्यांसह नांदेड जिल्हयातील बडया राजकारण्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता.यात नव्या नावाची भर पडली, असून सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे सर्वात निकटवर्तीय असलेल्या एका आमदारास कोरोनाची लागण झाली आहे. असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील पडदा आडून सुत्र हालविणारे अशोक चव्हाण यांचे विश्वासू अशी राज्यभर ओळख त्या आमदाराची आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी ते मुंबईवरून आले होते. यानंतर त्या आमदार महोदयांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस सुद्धा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत हजेरी लावली होती.सोमवारी सकाळी रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात ते आमदार व त्यांची कन्या या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या आमदाराने शनिवारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस हजेरी लावल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण व इतर अधिकार्‍यांनी सुद्धा स्वतःला क्वॉरंटाईन करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह उपमहापौर, माजी महापौर व नगरसेवकांना सुद्धा कोरोना झाला आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा कोरोनाशी रुग्णालयात दोन हात करत आहेत.

19 July 2020

नांदेड मध्ये आज ६६ नवे रूग्ण

नांदेड दि.१९जुलै : आज रविवार (ता.१९) रोजी संध्याकाळी प्राप्त माहिती नुसार ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण रुग्ण संख्या ९३५ झाली आसून आजवर एकुुुण ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत | एअरपोर्ट नांदेड – १ महिला (वय ६५), श्रीनगर नांदेड – १ पुरुष (वय ५७) व १ महिला (वय ५०), सराफा चौक नांदेड – १ महिला (वय ४०), पिरबुऱ्हान नांदेड – १ पुरुष (वय ३३), सोमेश काँलनी – ५ पुरुष (वय ४७, १२, ३, १७, ४८), व  ६ महिला (वय ३७, १८, १०, ३०, ६५, ४०), विष्णुनगर नांदेड – १ पुरुष (वय ४०), शहीदपुरा – २ पुरुष (वय १०,१७), व जुना मोंढा नांदेड – २ महिला (वय २६,४५), खालसा कॉलनी – १ पुरुष (वय ३२), पाठक गल्ली सराफा नांदेड – २ महिला (वय ३०,५४), देगलूर नाका नांदेड – १ पुरुष (वय ३०), मालवतकर कॉलनी जुना कौठा नांदेड – १ पुरुष (वय ५३), गोविंद नगर नांदेड – १ महिला (वय ४८), विष्णुपूरी नांदेड – १ महिला (वय ४९), गाडीपुरा नांदेड – १ पुरुष (वय ५५) व १ महिला (वय ५२), विष्णूपुरी नांदेड – १ पुरुष (वय २६), कोल्हेबोर ता. बिलोली – १ पुरुष (वय ६०), खैरका ता. मुखेड – २ महिला (वय ५५, ६०), रावी ता. मुखेड – १ पुरुष (वय ७१), मानसपुरी कंधार – १ महिला (वय ३५), फुलवळ ता. कंधार – ३ पुरुष (वय १२, २१, ६५) आणि ५ महिला (वय १४, १५, १५, १८, ३०), वसमत हिंगोली – १ पुरुष (वय ३४) आणि १ महिला (वय ५२) श्रीनगर हिंगोली – १ महिला (वय ६०)

*तर २ जणाचा मृत्यू झाला आहे | देशमुख काँलनी नांदेड ६५ वर्षीय महिला आणि मानवत जि. परभणी  ६४ वर्षीय पुरुष यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

*आज एकूण २४ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोना बाधीत एकूण संख्या : ९३५
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ५००
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण : ३८९
मृत्यू पावलेले एकूण रुग्ण : ४६

अवैध रेती वाहतूक करणारे चार अॅटो जप्त

बिलोली: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी 13 जुलै रोजी 20 तारखेपर्यंत जिल्हात लॉकडाऊन लावण्यात आले आहे.यामध्ये सामान्य माणूस परवानगी शिवाय बाहेर पडल्यास त्यांच्यावर योग्य ति कारवाई करण्यात येत आहे व त्यांच्या कडून दंड आकारण्यात येत आहे.परंतु या लॉकडाऊनचा असर रेती माफियांवर काही दिसुन येत नाहीये दिनांक 13 जुलै रोजी रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून त्यावर  तहसील प्रशासनाने कारवाई केली होती.तरीदेखील रेती वाहतूक करणे काय थांबेल अस वाटत नाहीये बिलोली तालुक्यातील नागणी येथील माजंरा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅाली अॅटो दौलापुर शिवारात तलाठी पवन ठकरोड यांनी रात्री दिड वाजता जाऊन पकडले आहे.

नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड: जिल्ह्यात लॉकडाऊन हे येथील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे करावे लागले आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे की थांबवाये याचा निर्णय अद्याप तरी घेतला नाही. लॉकडाऊन यशस्वी झाला किंवा अपयशी पडला, याचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. त्यास वेळ लागतो.सध्या येणारे रूग्ण हे मागच्या काळातील आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या निर्णयावर बोलणे योग्य राहिल, असे डॉ. इटनकर यांनी सांगितले.परंतु लॉकडाऊन जाणीवपूर्वक घेतला गेलेला नाही. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचा उद्देश आहे.नागरिकांनी स्वतःहून काळजी घेतली, तर शिवाय घरातील पन्नास वर्षांवरील काळजी घेतल्यास मृत्यूदर कमी होईल, तरी काही लक्षणे आढळून आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, वैद्यकीय टीम सेवेसाठी येऊन जाईल, वेळेत उपचार घेतले, तर दहा दिवसांमध्ये रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे डॉ. इटनकर म्हणाले.नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले. लॉकडाऊन संदर्भात प्रशासन मुडमध्ये नव्हते. आर्थिकदृष्टया सक्षम लोकांची काळजी नाही.परंतु ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे. त्यांचा प्रश्न आहे. अशांना शासन राशन देत आहे. काम करून पोट भरतात. तरी लोकांमधील गांभीर्य आले की नाही, याबाबत विचार करून निर्णय घेऊ असे इटनकर यांनी सांगितले.

18 July 2020

दे-धक्का करोना 94 बाधित

नांदेड:आज दिनांक 18/07/2020 रोजी सायंकाळी 05.00 वाजता कोरोना विषाणू संदर्भात खालीलप्रमाणे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येत आहे . आज दिनांक 18/07/2020 टोजी नायगाव कोविड केअर सेंटर येथीत 2 रुग्ण , डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुटी येथील 2 रुग्ण तसेच जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयातीला रूग्ण असे एकूण 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 476 एवढी झाली आहे .आज दि .18 / 07 / 2020 टोजी विष्णूनगट नांदेड येथीत 67 वर्षीय पुरुषाचा उपचाटा दरम्यान मृत्यू झाला आहे . सदरील रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुटी नांदेड येथे उपचार सुरू होते . सदर रुग्णास उच्च रक्तदाब , मधुमेह व श्वसनाचे आजार इत्यादी आजार होते . त्यामूळे आतापर्यंत जिल्ह्यात कोटोना मुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 44 एवढी झाली आहे . सदर 44 मृत्यूपैकी 38 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरित 6 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत . आज दिनांक 18/07/2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 359 अहवालापैकी 254 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले . तसेच आज रोजी एकूण 94  तपासणी 66 द्वारे - Antigen test Kits तपासणी द्वारे 28 ) रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 869 एवढी झाली आहे . त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील तपासणीद्वारे तपासणी प्रक्रीयेवाटे 108 तपासणी पैकी 28 रुग्ण पड़ीटीक आदळून आलेले आहेत .

देगलूर तालुक्यात शुक्रवारी 7 बाधित

देगलूर : शुक्रवारी शहरातील सहाजण व ग्रामीण भागातील एक असे सात जण कोरोना बाधित झाले आहेत . शुक्रवारी सायंकाळपर्यंत बाधितांची संख्या ४२ वर गेली आहे . शहरातील बालाजी झेंडा भागातील रहिवासी कृषी विक्रेता ( ५० ) व त्यांची पत्नी ( ४८ ) हे दाम्पत्य बाधित झाले , त्याशिवाय नागोबा मंदिर परिसरातील ६० वर्षीय महिला बाधित , भायेगाव रोड भागात राहणारे ५५ वर्षीय व्यक्ती आनंदनगर भागातील एक २८ वर्षीय महिला रफाई कॉलनी भागातील ४७ वर्षीय व्यक्ती बाधित झाले . ग्रामीण भागात भूतनहिप्परगा येथील ७० वर्षीय व्यक्ती बाधित झाल्याचे सांगण्यात आले . दरम्यान बाधित कृषी व्यापाऱ्याच्या संपर्कातील १२ जणांना खानापूर एमआयडीसी भागात , भूतनहिप्परगा येथील बाधिताच्या संपर्कातील दहा तर रफाई कॉलनी भागातील एक असे २३ जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . आकाश देशमुख यांनी दिली . आजपर्यंत देगलूर तालुक्यात ४२ व्यक्ती बाधित झाले असून दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण उपचारानंतर चांगले होऊन घरी परतले आहेत . ३७ जणावर देगलूर , नांदेड व औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले .

17 July 2020

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे

नांदेड:- अनेक दिवसांनत गुरुवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला होता. त्यानंतर मात्र शुक्रवारी दणकण कोरोनाच्या रुग्णांची संख्या थेट 32 वाढली, सोबत तीन रुग्णांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 775 इतकी झाली आहे.शुक्रवार दि. 17 जुलै रोजी पंजाब भवन 2, नायगाव5, मुखेड 14, डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालय 8 व संदर्भीत 1 असे 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 255 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात 182 अहवाल निगेटीव्ह आले तर 32 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील 70 व हिंगोली येथील 66 वर्षीय व कंधार तालुक्यातील फु लवळ येेथील अशा तिन्ही पुरुषांचा कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यातील रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————-स्त्री/पुरुष——–वय

1)खासला कॉलनी ——-पुरुष———59

2)देगलूर नाका———-पुरुष———60

3) प्रकाश नगर———-पुरुष———31

4)प्रेमनगर————-पुरुष———31

5)प्रेमनगर————-पुरुष———49

6)विष्णुनगर———–पुरुष———36

7)दुलेशान रहेमान नगर—-पुरुष———38

8) पावडेवाडी नाका—–पुरुष———-37

9) फु लवळ———–पुरुष———13

10) कंधार———–स्त्री———–43

11) काकांडीवाडी, मुखेड–पुरुष———44

12) मुखेड———–स्त्री———–65

13)कुंटुर, नायगाव——पुरुष———-05

14)कुंटुर, नायगाव——पुरुष———-05

15)कुंटुर, नायगाव——पुरुष———-08
16)कुंटुर, नायगाव——पुरुष———-08

17)कुंटुर, नायगाव——पुरुष———-38

18)कुंटुर, नायगाव——स्त्री———–25

19)पटेल नगर, धर्माबाद–स्त्री———–74

20)गुजराती कॉलनी,धर्माबाद-स्त्री———52

21)गुजराती कॉलनी,धर्माबाद-पुरुष———46

22) धर्माबाद———-पुरुष———–45

23)कासराळी,बिलोली—पुरुष———–31

24)गुजरी, बिलोली—–पुरुष———–32

25) नागोबा मंदीर—–स्त्री————-60

26)बालाजी झेंडा, देगलूर–स्त्री———–48

27)बालाजी झेंडा, देगलूर–पुरुष———–50

28)टाकळी,देगलूर——-पुरुष———-55

29)आनंदनगर, देगलूर—-स्त्री———–28

30) देगलूर————पुरुष———-47

31) देगलूर————पुरुष———-70

32) हिंगोली———–पुरुष———-40

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न सन्मान मिळावा-आ.रावसाहेब अंतापुरकर

देगलूर: दि.१७ जुलै, २०२० - लोकशाहीर आणि साहित्यरत्न दिवंगत श्री. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची ०१ ऑगस्ट, २०२० रोजी सांगता होत आहे.  आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदि विविधांगी साहित्याव्दारे त्यांनी शोषित-वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडली.  मुंबईतील वास्तव्यात कामगार-श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यात त्यांनी सहभागी होत आपल्या शाहिरीव्दारे मोठी जनजागृती घडवली.  "फकिरा" या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.  त्यांना "भारतरत्न" पुरस्काराव्दारे सन्मानित करण्यात यावे, अशी भावना आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर यांनी सर्वांच्यावतीने व्यक्त केली आहे.  यासंदर्भात त्यांनी *मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.  केंद्र सरकारकडे, राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, अशी शिफारस या पत्रात माननीय  आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.

बँक व्यवहाराबाबत संचारबंदीचे सुधारित आदेश

नांदेड  दि . 17 : - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी संचारबंदीबाबत आज सुधारित आदेश निर्गमीत केले आहेत . या सुधारित आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली बँकेची ठोक QUdøR ( Bulk transation for essential servies ) चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे . यापूर्वीच्या आदेशात नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील त्याव्यतिरिक्त बॅकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणतेही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहिल असे निर्देश दिले होते .