जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

16 July 2020

कोरोनातून आज 27 व्यक्ती बरे 11 बाधितांची भर तर एका महिलेचा मृत्यू

 नांदेड दि . 16 : - जिल्ह्यात आज 16 जुलै रोजी सायं . 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 27 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . तर नवीन 11 बाधित व्यक्तींची भर पडली असून वाजेगाव येथील 63 वर्षाच्या एका बाधित महिलेचा शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला . या महिलेस उच्च रक्तदाब , श्वसनास त्रास , मधुमेह व श्वसनाचे आजार होता . आजच्या एकूण 219 अहवालापैकी 186 अहवाल निगेटिव्ह आले . जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 743 एवढी झाली आहे . यातील 439 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 40 एवढी झाली आहे . . आज बरे झालेल्या 27 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 17 , बिलोली कोविड केअर सेंटर येथील 4 , किनवट कोविड केअर सेंटर येथील 2 , हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1 , डॉ . शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1 , जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयातून 2 बाधितांचा समावेश आहे . नवीन बाधितांमध्ये वाजेगाव येथील 40 वर्षाचा 1 पुरुष , कंधार तालुक्यातील विकासनगर येथील 24 वर्षाचा 1 पुरुष , किनवट तालुक्यातील सिध्दार्थनगर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष व 50 वर्षाची 1 महिला , देगलूर तालुक्यातील भायेगावरोड येथील 60 वर्षाचा 1 पुरुष ,देगलूर तालुक्यातील गोजेगाव येथील 29 वर्षाचा 1 पुरुष , देगलूर बापुनगर येथील 32 व 65 वर्षे वयाच्या 2 महिला तर मुखेड तालुक्यातील अशोकनगर येथील 55 वर्षाचा 1 पुरुष , मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 44 वर्षाचा 1 पुरुष लोहा तालुक्यातील मोंढा परिसरातील 72 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे . आज रोजी 264 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती गंभीर आहे . यात 10 महिला बाधित व 12 पुरुष बाधित आहेत .

0 comments:

Post a Comment