बिलोली:तालुक्यात काही दिवसापासून कोरोना बाधिताच्या संख्येत वाढ होत चालली आहे.बिलोली शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना वायरस ने थैमान घातले आहे.कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्यातील वाहनचालकाचा अहवाल दिनांक 7 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.तो नांदेड च्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्या वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर चालकांच्या संपर्कातील अख्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ लखमावार यांनी दिली आहे.बांधित वाहनचालक 4 जुलै रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांसह कर्मचार् यांच्या तसेच अन्य नागरीकांच्या संपर्कात आले होते.संपर्कातील सर्व संशयितांची तपासणी करून स्वॅब पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर लखमावार यांनी दिली आहे.पोलीस ठाण्यातील वाहनचालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कुंडलवाडी येथे खळबळ उडाली आहे.कुंडलवाडी येथील जवळील सर्व खेडेगावातील नागरीक बँकेला,शासकीय कामासाठी व इतर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात कुंडलवाडी येथे येत असतात त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
08 July 2020
Home »
» कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा वाहनचालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह







0 comments:
Post a Comment