जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

13 July 2020

उपचारासाठी सिकंदराबाद येथे गेलेल्या महिलेचा स्वगृही परतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह

बिलोली : उपचारासाठी सिकंदराबाद येथे गेलेल्या महिलेचा स्वगृही परतल्यानंतर स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला . ही माहिती गुगलवरुन स्थानिक प्रशासनाला समजताच सदर महिलेला रुग्णवाहिकेद्वारे आणून बिलोलीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले . कर्करोगाचे निदान करण्यासाठी ३० जूनला सदर ४६ वर्षीय महिला सिकंदराबाद येथे गेले होती . तेथे तिचा स्वब घेण्यात येवून तपासणीसाठी पाठविण्यात आला . महिला उपचार करुन गावाकडे परतली . स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला . तेलंगणाच्या आरोग्य विभागाने महिलेची माहिती गुगलवर टाकली . ही माहिती बिलोलीच्या आरोग्य विभागाला कळताच एका टीमने गुजरी येथून सदर महिलेला बिलोलीत आणले आणि कोविड सेंटरमध्ये दाखल केले . महिलेचा स्वब पुन्हा पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांनी दिली . बाधित महिलेची प्रकृती सद्य : स्थितीत चांगली असून तिचा स्वब रॅपिड अँटीजेंट टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात येणार आहे , अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी दिली . 

0 comments:

Post a Comment