जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

03 July 2020

बिलोलीतील 9 अहवालातील 7 निगेटिव्ह 2 अहवाल येणे बाकी

बिलोली(ता.प्र):देशासह राज्यात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.तसेच जिल्हासह तालुक्यात व ग्रामीण भागात देखील कोरोनाने हात पसरले आहे.नांदेड जिल्ह्यातदेखील रुग्णामध्ये दररोज वाढ होत चाललेली आहे त्याच प्रमाणे मागील काही दिवसांत बिलोली तालुक्यातील केरूर येथील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.त्या युवकांची वैद्यकीय अधिक्षक डॉ नागेश लखमवार यांनी अवघ्या सात दिवसाच्या कमी वेळात योग्य उपचार केल्यामुळे त्या युवकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला सोडण्यात आले.त्यामुळे बिलोली वासीयानी मोकळा श्वास घेतला होता मात्र बिलोली शहरातील एका कृषिसेवा केंद्र चालकाची मुलगी व जावई कर्नाटकातून बिलोली येथे आले होते.ते परत कर्नाटक मध्ये गेल्यानंतर तेथे त्यांच्या अहवाल कोरोना  पॉझिटिव्ह आल्याने कृषी केंद्र चालकाच्या कुटुंबातील व्यक्तींना होम क्वारंटाईल करण्यात आले होते .त्यांच्या स्वॅब घेऊन नांदेड येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते . पाठवलेल्या ९ जणांपैकी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ जणांवर अहवाल तपासल्या जात असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागेश लाखमावार यांनी सांगितले.९ जनांपैकी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे शहर व तालुक्यातील अनेकांनी थोडासा मोकळा श्वास घेतला परंतु अजुन दोन स्वॅब चा अहवाल येणे बाकी आहे त्यामुळे सर्व नागरीक त्या दोन स्वॅब च्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. 

 ""बिलोली शहरातील एका कृषिसेवा केंद्र चालकासह इतर आठ जनांचे स्वॅब परीक्षणासाठी नांदेडला पाठवण्यात आले होते त्या पैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांच्या स्वॅबची तपासणी चालू आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागेश लखमावार

0 comments:

Post a Comment