कुंडलवाडी : कोरोनाचा तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता जनतेने , व्यापारी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कुंडलवाडी नगरपालिका येथे सार्वजनिक बैठकीत नगरपालिका उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या उपस्थित घेण्यात आला . बिलोली तालुक्यात कोरोना बाधिताची संख्या दोन आकड्यांच्या जवळ येऊन पोहोचली आहे . त्यात येथील पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली . त्यामुळे नगरपालिका प्रशासन , पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग , सर्व व्यापारी , नागरिकांची बैठक आज नगर पालिकेत मुख्याधिकारी यांनी आयोजित केली होती . यात सर्वांचे विचार ऐकून या बैठकीत स्वयंघोषित पाच दिवसांचा जनता कयूं घेण्याचा निर्णय घेण्यात आला . १० ते १४ जुलैपर्यंत या कालावधीत घेणार असून यात कृषी दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत तर मेडिकल , दवाखाने पूर्णवेळ चालू राहणार असून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत . आवश्यक कामा व्यतिरिक्त जनतेने घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी जी . एस . पेंटे यांनी दिला







0 comments:
Post a Comment