कुंडलवाडी: शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे . १० ते १४ जुलै पर्यंत या ठिकाणी कप ! लागू करण्यात आला . शुक्रवार आणि शनिवारी या जनता कर्म्युला चांगला प्रतिसाद दिला असल्याची प्रतिनिधींनी कळविले आहे . कुं डलवाडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ठाण्यातील २४ जणांचे स्वॅब ८ जुलै रोजी तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्याचा अहवाल ९ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला असून २४ पैकी एक पोलीस अधिकारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपत वाडेकर यांनी दिली . दि .७ जुलै रोजी शहरातील ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने त्या बाधित पोलीस कर्मचा याच्या संपर्कातील २४ जणांचे स्वॅब ८ जुलै रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.९ जुलै | रोजी रात्री उशिरा अहवाल प्राप्त | झाला असून २४ पैकी १ कर्मचाऱ्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे . बाधित कर्मचाऱ्यास बिलोली कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले असल्याचे डॉ . वाडेकर यांनी सांगितले.तसेच दि .१० जुलै रोजी बाधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ . बालाजी सातमवाड यांनी दिली . बाधित पोलीस अधिकाऱ्याचे घर सील करण्यात आले असून राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे . दरम्यान शहरात १० जुलै ते १४ जुलैपर्यंत जनता कर्म्यु लागू करण्यात आला आहे.जनता कर्यु च्या पहिल्या दिवशी सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने १०० टक्के कडकडीत बंद होती.तर रस्ते ही निर्मनुष्य झाल्याचे चित्र पहावयास मिळाले . .







0 comments:
Post a Comment