जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 July 2020

स्वीकृत नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

बिलोली:कुंडलवाडी नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्यपद मिळविण्यासाठी एका नगरसेवकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळविल्याच्या कारणावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.स्वीकृत सदस्य पंढरी लिंगन्ना पुपलवार यांनी दि.19 जानेवारी 2018 रोजी स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीवेळी नागपूर येथील विश्वभुषण बहुउद्देशीय युवक कल्याण सेवा व सांस्कृतिक संस्था भगवाननगर यांचे सहसचिव म्हणून बनावट दस्तावेज सादर करून घेतले होते.याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी सेवाभावी संस्थेचे धर्मादाय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्याकडून प्रमाणित प्रती हस्तगत केत्या होत्या

याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी लेखी तक्रार दिल्यावरून आरोपी पंढरी लिंगन्ना पुपलवार याच्याविरुद्ध दि.4 जुलै रोजी गु.र.नं.83/2020,कलम 420,467,468,471 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि.सुरेश मांटे हे करीत आहेत.

0 comments:

Post a Comment