जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 July 2020

बिलोलीत आजी - नातुचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

बाहेरगावाहून आले पॉझिटिव्ह करून गेले
बिलोली :  शहरातील एका कृषिसेवा केंद्र चालकाची मुलगी व जावई कर्नाटकातील औरादहुन 24 जुन रोजी बिलोली येथे आले होते.ते काही दिवस बिलोलीतील गांधी नगर येथे राहुन परत गावी गेल्यानंतर त्याच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कृषी केंद्र चालकाच्या कुटुंबातील व्यक्तींना बिलोली नगरपरिषदेच्या कोवीड केअर सेंटर येथे कॉरंटाईन करुन त्यांचा स्वॅब नांदेड ला पाठविण्यात आले होते.त्यामधील ९ जणांपैकी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आले.असल्यामुळे बिलोलीवासीयानी मोकळा श्वास घेतला होता मात्र ३ जूनच्या रात्री 10.30 वाजता आजी व नातुचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.लखमावार यांनी सांगितल्यानंतर बिलोली शहरासह तालुक्यात देखील खळबळ उडाली आहे.मे महिन्यात बिलोली तालुक्यातील केरूर येथील एका रूग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता तेव्हा व जुन महिन्यात बिलोली येथील महाराष्ट्र बँकेतील अधिकारी पॉझिटिव्ह आल्यावर नागरीकामध्य्े भितीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु त्यानंतर नागरिक मात्र मास्क न वापरता सोशल डिस्टन्स चे पालन न करता बेभान पणे वागत आहेत.विशेषता Sbi बॅकेत दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा मात्र नागरिकांकडून फज्जा होत आहे. बॅकेच्या मुख्य द्वारात नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे.विशेष म्हणजे, सुरक्षित अंतरावर नागरिकांनी उभे राहून तोंडाला मास्क लावुन टप्प्या टप्याने आपले काम करवून घेणे अपेक्षीत आहे. मात्र येथे उलटच कारभार सुरू असून ‘सोशल डिस्टन्सिंग’ला धुडकावून काम चालत आहे.असच जर चालु राहील तर ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरीकांनी स्व:त काळजी घेणे खुप महत्त्वाचे आहे.
 

0 comments:

Post a Comment