जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 July 2020

नांदेड लॉकडाऊन करण्यासाठी महापौर दिक्षा धबाले यांची जिल्हाधिकार् या कडे मागणी

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसांगणिक रुग्ण संख्या वाढत आहेश या पार्श्वभूमिमवर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांनी दि. 15 जुलैनंतर लॉकडाऊन करण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. सदरची मागणी पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार जवळपास निश्चित मानले जात आहे.कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता इतर जिल्ह्याप्रमाणे लॉकडाऊन लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीत तशी चर्चा झाली होती. यास अशोक चव्हाण यांचा हिरवाकंदील आहे.दरम्यानच्या काळात व्यापार्‍यांशी सुद्धा संवाद जिल्हाधिकार्‍यांनी साधला आहे. मात्र व्यापार्‍यांकडून विरोध दर्शविण्यात आला होता.

लॉकडाऊन न करता नियम कडक करण्याच्या आदेश देण्यात आले आहे. या सगळया घडामोडीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी लॉकडाऊन लावण्यासंबंधी केलेली मागणी पाहता, सदरची प्रशासनास गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. महापौरांनी केलेल्या सूचनांचे पालन प्रशासनास करावे लागते. तसे ही पाहता कोरेानाची परिस्थिती चिघळत आहे. त्यामुळे दीक्षा धबाले यांनी पत्र देऊन लॉकडाऊनसंबंधी केलेल्या४ सूचनांचा विचार करता 15 जुलैनंतर लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता अधिकारी-कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत.


0 comments:

Post a Comment