देगलूर : शुक्रवारी शहरातील सहाजण व ग्रामीण भागातील एक असे सात जण कोरोना बाधित झाले आहेत . शुक्रवारी सायंकाळपर्यंत बाधितांची संख्या ४२ वर गेली आहे . शहरातील बालाजी झेंडा भागातील रहिवासी कृषी विक्रेता ( ५० ) व त्यांची पत्नी ( ४८ ) हे दाम्पत्य बाधित झाले , त्याशिवाय नागोबा मंदिर परिसरातील ६० वर्षीय महिला बाधित , भायेगाव रोड भागात राहणारे ५५ वर्षीय व्यक्ती आनंदनगर भागातील एक २८ वर्षीय महिला रफाई कॉलनी भागातील ४७ वर्षीय व्यक्ती बाधित झाले . ग्रामीण भागात भूतनहिप्परगा येथील ७० वर्षीय व्यक्ती बाधित झाल्याचे सांगण्यात आले . दरम्यान बाधित कृषी व्यापाऱ्याच्या संपर्कातील १२ जणांना खानापूर एमआयडीसी भागात , भूतनहिप्परगा येथील बाधिताच्या संपर्कातील दहा तर रफाई कॉलनी भागातील एक असे २३ जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . आकाश देशमुख यांनी दिली . आजपर्यंत देगलूर तालुक्यात ४२ व्यक्ती बाधित झाले असून दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण उपचारानंतर चांगले होऊन घरी परतले आहेत . ३७ जणावर देगलूर , नांदेड व औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले .







0 comments:
Post a Comment