बिलोली (ता.प्र): राज्यातील मातंग समाज गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणापासुन बऱ्याच प्रमाणात वंचित राहिलेला आहे.आजही मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने मातंग समाजाचा शैक्षणिक विकास अद्याप झालेला नाही. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी समाजाची शैक्षणिक उन्नती होणे अत्यंत गरजेचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी याचप्रमाणे मातंग समाजाच्या विकासासाठी साहित्य रत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना करण्यात यावी . अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातील सामाजिक संघटना व मातंग समाजाची आहे. आर्टीची स्थापना झाल्यामुळे मातंग समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल . व व्हिजन 2019 अंतर्गत दिलेल्या वचनाची पुर्तता होईल . तरी राज्य शासनाने साहित्य रत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा. याच उदांत हेतुने मा. तहसिलदार साहेब बिलोली यांच्या मार्फत दिगांबर काचमोडे लोहगावकर , साहेबराव दावलेकर बडुर , मुकिंदर कुडके बिलोली यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे.
29 July 2020
Home »
» मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्टीची स्थापना करा....







0 comments:
Post a Comment