जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

28 July 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता रुजू

नांदेड:डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांची अचानक बदली करण्यात आली. या रिक्त पदावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला.सन 2017 साली नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्यावर मोठी नाराजी होती.बऱ्याच लोकप्रतिनिधीकडून त्यांच्याविषयी मत नकारात्मक होते.तसेच शासनाने नांदेड येथे कोरोनाच्या मृत्यूचा वाढता आकडा याबद्दल नाराजी दर्शविली होती.सदरचा ठपका त्यांच्यावर शासनाने ठेवत डॉ.चंद्रकात मस्के यांची बदली कोल्हापूर येथे झाली.त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड येथील अतिरिक्त पदभार डॉ.सुधीर देशमुख यांच्याकडे शासनाने दिला,असून ते सोमवार दि.27 जुलै रोजी दुपारी रुजू झाले. पदभार स्वीकारल्याबद्दल आधार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय कदम यांनी डॉ.देशमुख यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

0 comments:

Post a Comment