बिलोली : कोरोनाबाधित आजी - नातवाच्या संपर्कातील २ भाडेकरु तर आरळी व चिंचाळा प्रत्येकी एक असे पुन्हा ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले . चार पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील तब्बल ६३ संशयितांचे स्वब पाठविण्यात आले . दरम्यान , मुदखेडमधील एका खाजगी डॉक्टराचा अहवाल पॉझिटिव्ह आला . या डॉक्टराच्या संपर्कातील सुमारे १०० जणांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु होती . बिलोली शहरातील कोरोना बाधित आजी - नातवाच्या संपर्कात आलेल्या शहरातील २ भाडेकरु , चिंचाळा येथील कृषिसेवा चालक व आरळी येथील रुग्ण यांच्या संपर्कात आल्याने संपर्कातील ४ जण पॉझिटिव्ह निघाले होते . सदर ४ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील तब्बल ६३ कुटुंब , मित्रपरिवारांना क्वारंटाईन करुन त्यांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी दिली . बाधित रुग्ण आढळलेल्या आरळी , चिंचाळा व शहरातील गांधीनगर क्षेत्र सील करण्यात आले असून सर्व नागरिकांची नगरपरिषद व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली . बिलोलीतील ईदगाह गल्लीच्या मयत पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील ३ जणांचे पाठविलेले स्वब निगेटिव्ह आले , मात्र मुलाचा अहवाल संदिग्ध असल्याने तो पुन्हा पाठविला .
08 July 2020
Home »
» बिलोलीतील तब्बल 63 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले







0 comments:
Post a Comment