जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 July 2020

इंधन दर वाडीच्या निषेधार्थ बिलोली तालुका कॉग्रेस कमिटीचे धरणे आंदोलन

बिलोली - आतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती फारच कमी झाले आहेत.असे असतानासुध्दा केंद्र सरकारकडुन पेट्रोल , डिझेल व इंधनाचे दर वेळोवेळी वाढवुन जनतेची लुट चालवल्याचा निषेध व्यक्त करुन ही लुट थांबवुन पेट्रोल , डिझेल व इंधनाची दरवाढ त्वरित मागे घ्यावी , अशी मागणी करीत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतिने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन , निदर्शने करण्यात आली.दरम्यान तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले . पेट्रोल , डिझेल व इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात आली होती . परंतु केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले.त्यातच लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोलमडले असुन मोदी सरकारतर्फे सतत पेट्रोल , डिझेलचे भाव वाढविले जात आहे.यामुळे जनतेची चांगलीच कोंडी होत आहे.काही भागात चक्क पेट्रोल पेक्षा डिझेल अधिक भावाने विकला जात आहे.याचा परिणाम प्रत्येकाचा उत्पादन खर्च वाढणार तसेच वाहतुक खर्चही वाढणार आहे.पेट्रोल , डिझेल व इंधन दरवाढ कमी करुन आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सदर दरवाढ कमी करुन जनतेला दिलासा द्यावा व दरवाढ मागे घ्यावी.अन्यथा रस्त्यावर उतरुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार , असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदर एकदिवशीय धरणे आंदोलनात आ.रावसाहेब अंतापुरकर काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर , माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी , उपसभापती शंकर यंकम , प्रकाश पाटील बडुरकर , अल्पसंख्याकचे माजी तालुकाध्यक्ष वलिओद्दिन फारुखी , उपनराध्यक्ष मारोती पटाईत , सचिव पांडुरंग रामपुरे , नगरसेवक जावेद कुरेशी , गटनेते नागनाथ तुम्मोड , जनार्दन बिराजदार , पंचायत समिती सदस्य हानमंत इंगळे , दिलीप पांढरे , नितीन देशमुख आदी सहभागी होते .

0 comments:

Post a Comment