नायगाव बाजार : नायगावात कोरोना बाधित रुग्णांची नवीन आकडेवारीत वाढ झाली असून एकूण बाधित संख्या आता नऊ झाल्याची माहिती तहसीलदार सुरेखा नांदे यांनी दिली . येथील जुन्या गावातील बोमनाळे गल्लीमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल ६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते . त्यातील १६ जण कोविड केअर सेंटरमध्ये तर सात जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते . ७ जुलै रोजी यातील १८ जणांचे स्वब आले . यातील १० जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ८ जणांचा अहवाल ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला . यातील सात जण हे जुन्या गावात तर एक जण बळवंतनगरमध्ये राहणारा आहे . ही माहिती समजताच तहसीलदार सुरेखा नांदे , नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी भोसीकर , वैद्यकीय अधीक्षक एच . आर . गुंटूरकर , तलाठी राठोड , नगरपंचायतचे अधीक्षक एस . एस . जाधव , रामेवर बापुले , तहसील , नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७.३० पर्यंत पाहणी करून हा भाग सील केला .







0 comments:
Post a Comment