जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

08 May 2023

देगलुरात तीन ठिकाणीघरफोडी; चोरांचा धुमाकूळ

देगलूर :पोलिसांना मुखेडातील दोन मोटर सायकल चोरटे नुकतेच हाती लागले असतानाच शहरात पुन्हा भुरटे चोरटे सक्रिय होऊन पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण केले आहे. शहरातील भक्तापूर रोडवरील सद्गुरुनगर मध्ये गुरुवारी (ता. ४) तीन घरांचे कुलूप फोडून चोरट्यांनी काही वस्तू लंपास केल्याचे समोर आले आहे. सदगुरु नगर मधील मोतेवार आणि मोखेड या दोन शिक्षकांच्या घरासह भूताळे यांचे घरात चोरी झाल्याचे उघड झाले आहे.देगलुरात पुन्हा चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. घराला कुलूप लावलेले असले की ते घर त्या दिवशी फोडलेच समजा असा शिरस्ता चोरट्यांनी टाकला असल्याने शहरात भीतीचे सावट पसरलेले आहे. शहरातील भक्तापूर रोड हा सध्या तेलंगणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने व नॅशनल हायवेवर टोलनाका सक्रिय झाल्याने भक्तापूर रोड मार्गे तेलंगणात जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील नव्या वसाहतीमध्ये बाहेरील राज्यातील नागरिकांची ही वर्दळ वाढलेली आहे. या गोंधळाचा फायदा भुरटे चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील भक्तापूर रोडवरील सद्गुरुनगर मध्ये गुरुवारी (ता. ४) तीन घरांचे कुलूप फोडून चोरट्यांनी काही वस्तू लंपास केल्याचे केले. सद्गुरुनगर मधील मोतेवार गुरुजी व त्यांचे भाडेकरू बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे मध्यरात्री कुलूप फोडून घरात प्रवेश केला. ते सध्या बाहेरगावी गेले असल्याने घरातील काय काय वस्तू गेल्या याचा तपशील मात्र हाती आला नाही. शिळवणीचे रहिवाशी भूताळे यांच्या घरालाही कुलूप दिसल्याने चोरट्यानी त्यांचेही घर फोडले. तर सेवानिवृत्त शिक्षक मोखेडे गुरुजी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील कपाट फोडून कपडे व इतर वस्तू इतरत्र फेकल्या गेले. एकाच परिसरात एकाच दिवशी तीन-तीन घरे फोडल्याने सद्गुरुनगर मधील रहिवाशात सध्या भीतीचे सावट पसरलेले आहे..

07 May 2023

नांदेडमध्ये खळबळ! टीव्हीचा आवाज बंद न झाल्याने आला संशय; दरवाजा उघडताच दिसलं भयंकर

नांदेड :जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रिठ्ठा गावात एका २५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा देखील आढळून आल्या आहेत. माधव सकीरगे असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी भोकर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माधव सकीरगे हा मागील काही महिन्यांपासून रिठ्ठा गावात एकटा राहत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या आई वडिलाचे निधन झाले आहे. गवंडी काम करुन तो स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. शनिवारी सायंकाळी तो कामावरून घरी परतला. रात्रभर त्याच्या घरातून टीव्हीचा आवाज येत होता.

मात्र हा आवाज सकाळपर्यंत बंद न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यामुळेच शेजारी राहणारे काहीजण त्याच्या घरी गेले असताना त्यांना माधवचा मृतदेह आढळून आला. याबद्दल तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी मृत तरुणाच्या तोंडावर आणि शरीराच्या काही भागावर मारहाणीच्या जखमा पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळेच या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत भोकर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.