जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

26 December 2020

बिनविरोध ग्रामपंचायतींना आमदार अंतापुरकर देणार पाच लाखाचा निधी

बिलोली: होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत गावातील ईच्छुक उमेदवारांची वाढती संख्या यातून निर्माण होणारी गटबाजी,दुरावा,वेळ व पैशाची नासाडी हे सर्व टाळण्याच्या दृष्टीने तसेच गावात असलेले सलोख्याचे वातावरण कायम राहवे एकजुटीनं गावचा विकास साध्य करता यावा यासाठी म्हणून गावच्या एकजुटीने शक्य असलेल्या ग्राम पंचायतीची निवडून बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी केली आहे.सोबत देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघातील ज्या ग्रामपंचायती गुणागोविंदानं बिनविरोध निघतील अशा ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी पाच लाख रूपये निधी देणार असल्याचे सांगितले आहे.बिलोली तालुक्यात ७३ पैकी ६४ तर देगलुर तालुक्यात 91 पैकी 85 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत यामध्ये गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न करावेत असेही मत व्यक्त केले आहेत.

21 December 2020

बिलोली घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकला

नांदेड | बिलोली शहरातील एका मुकबधीर मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या प्रकरणी आरोपीस अटक करून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून घटनेचा निषेध केला .बिलोली शहरातील साठेनगर येथे एका मुकबधीर मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती . या घटनेचा जिल्हाभर निषेध करण्यात येत आहे . परंतू मुख्य आरोपी अजूनही सापडले नसून पोलीसांनी फक्त संशयास्पद म्हणून एकाला आरोपी म्हणून पकडले आहे . या घटनेत इतर आरोपी असण्याची शक्यता आहे . याप्रकरणी आरोपीस तात्काळ पकडण्यात यावे , घटनेचा योग्य तपास तात्काळ लावावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध महामोर्चा काढण्यात आला . या महामोर्चात कॉग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , भाजप यासह इतर संघटनांनी पाठींबा दिला होता . यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मान्यवरांनी आप - आपले मनोगत व्यक्त केले.आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी त आली .

12 December 2020

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत भाजपा जिल्हा पदाधिकारी यांची पिडीत कुटुंबाला भेट.

बिलोली :शहरात दि. ९ डिसेंबर रोजी एका मुकबधिर युवतीवर बलात्कार करून तीचा खून करण्यापर्यंत कांही नराधमांची मजल गेली आहे.हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून महाराष्ट्र सारख्या संतांच्या भुमीत हा निंदनीय प्रकार झाला आहे.प्राथनीय अवस्थेत एका संशयीत आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे जरी खरे असले तरी संशयीत हा संशयीतच न राहता पोलिसांनी खऱ्याखुऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करावे आरोपी संशयीतच न राहता खऱ्याखुऱ्या आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करा. - असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांनी केले आहे.
दि.12 रोजी खा.चिखलीकर यांनी बिलोली शहरात पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन देऊन मी तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली.त्याच प्रमाणे उदरनिर्वाहासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तात्पुरती आर्थिक मदत देऊ केली लगेच जिल्हा परिषद सदस्या तथा महीला मोर्चा महानगराध्यक्षा डाँ.मिनलताई पाटील खतगावकर,जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड मा.आमदार अविनाश घाटे,यांनीही आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पा.खतगावकर, जिल्हा सरचिटणीस माधव पा.ऊच्चेकर,श्रावन पा. भिलवंडे,ता.अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे,माजी नगराध्यक्ष सुभाष पवार,यशवंत गादगे, उमाकांतराव गोपछडे, तालुका सरचिटणीस शिवकुमार कोदळे, ता.ऊपाध्यक्ष मारोती पाटील दगडे, महेंद्र तुकडे,बालाजी पाटील दुगावकर,आनंदराव पाटील बिराजदार, भाजपा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष साईनाथ शिरोळे,खैसर पटेल, राजु गादगे,साहेबराव अंजनिकर यांच्यासह बहुसंख्य भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी केंद्रिय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसा निमित्त बिलोली ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

बिलोली:भारतीय राजकारणातील अष्टपैलू व्यक्तित्व,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद चंद्र पवार यांचा वाढदिवसा निमित्त आज दि.12 डिसेंम्बर रोजी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

भारतीय राजकारणातील अष्टपैलू व्यक्तित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या 80 वा वाढ दिवसा निमित्त बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णाना फळ वाटप करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलाश शेडके,डॉ. झहीम सिद्दीखी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नागनाथ पाटिल सावळीकर,माजी.प.स.सभापती व्यंकट पांडवे,शहर अध्यक्ष अर्जुनराव अंकुशकर,युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रणजित पाटिल हिवराळे, नगरसेवक अनुप अंकुशकर,माजी उपाध्यक्ष न.प.गौसोदिन कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यक शेख मोहसीन अहेमद,युवक काँग्रेस  जिल्हा सचिव संतोष उत्तरवार,तालुका अध्यक्ष सादीख पटेल,युवक अध्यक्ष विधानसभा आनंद गुडमलवार,संतोष पाटिल शेखापुरे, महाराज,विनोद सोनकांबळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

10 December 2020

बिलोली शहरातील मूकबधिर मुलीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खुन

बिलोली: शहरातील झोपडपट्टी भागातील एका मूकबधिर मुलीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खुन केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी मुलीच्या चुलत भावाच्या फिर्यादी वरून आरोपी विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. बिलोली शहरातील झोपडपट्टी भागात राहणारी 27 वर्षीय युती दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी स्वच्छालयासाठी जवळील जिल्हा परीषद शाळेच्या मागील परीसरात गेली असता आरोपीने तिच्या एकटे पणाचा फायदा घेत.तिच्यावर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खुन केला.या प्रकरणी मयत मुलीच्या चुलत भावानी दिलेल्या फिर्यादी वरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या कडे आहे परंतु घटनेची गाभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 302,376,(2) (1) , 354,354 D या प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आहे.

23 November 2020

इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 2 डिसेंबरपासून सुरु होणार

 नांदेड  : - जिल्ह्यातील कोविडची स्थिती , त्यादृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन , शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबींवर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केंद्रीत केले . सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता स्थगित करण्यात आल्या असून त्या 2 डिसेंबरपासून सुरु करण्यात येतील , असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संयुक्त दिलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले . नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या 858 शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 70 शाळा आहेत . इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण 8 हजार 115 शिक्षक आहेत . शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले . शिक्षकांचे नाव , त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करुन अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य , शिक्षणाधिकारी प्राथमिक , शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली . प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी . आर . कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र अंबेकर यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली . शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या . जिल्ह्यातील 2 हजार 282 शिक्षकांची अँटीजन टेस्ट करण्यात आल्या असून 4 हजार 982 शिक्षकांची तपासणी करणे सुरु आहे . यापैकी 927 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे . तर 2 हजार 702 जणांची चाचणी सुरु आहे . आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे . उर्वरित तपासणी करुन घेण्यात येत आहे . येत्या 1 डिसेंबरपर्यंत सर्व स्थिती सुरळीत करून 2 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येईल , असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर , सभापती संजय बेळगे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सांगितले आहे .

03 November 2020

शासनाने निश्चित केलेल्या दराने एन -95 मास्कची खरेदी व विक्री करण्याचे आवाहन

नांदेड दि . 3 : - शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत जनतेने मास्कची खरेदी करावी . ऑक्टोंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या विक्री किंमतीत एन -95,3 व 2 प्लाय मास्कची विक्री औषध विक्रेत्यांनी करावी . कोणता औषध विक्रेता जास्त किंमतीत मास्कची विक्री करत असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयास करावी , असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ( औषधे ) मा . ज , निमसे यांनी केले आहे . सध्या देशात व राज्यात कोविड -19 चा संसर्ग सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत . सध्या अनलॉकडाऊन प्रक्रीया सुरु असून शासनाने टप्प्या - टप्याने दैनंदिन व्यवहार , दळणवळण वाहतूक यांना परवानगी दिली आहे . परंतु खबरदारी म्हणून शासनाने सामाजिक अंतर राखणे , हात वारंवार स्वच्छ धुणे , गर्दी टाळणे , गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे इत्यादी बाबी बंधनकारक केल्या आहेत . त्यामुळे सामान्यांना मास्क वापरणे व त्याची खरेदी करणे शक्य व्हावे याकरीता शासनाच्या 20 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या निर्णयानुसार एन -95 , 3 व 2 प्लाय मास्क यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत . त्यामुळे सर्व घाउक , किरकोळ उत्पादकांना शासन निर्णयानुसार मास्कची विक्री निश्चित केलेल्या विक्री किंमतीस विक्री करणे बंधनकारक केले आहे . मास्कचे दरपत्रक दुकानाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे शासन निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी प्रशासनाच्यावतीने औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे . त्यानुसार औषध निरीक्षक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करत आहेत . तपासणीत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्ती विरुध्द प्रशासनाच्यावतीने कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल , असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ( औषधे ) मा.ज निमसे यांनी केले आहे .

28 October 2020

कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करने-बिलोली कोरोना दक्षता समिती ची मागणी

बिलोली:मागील आठ महिन्या पासुन शहरातील नागरिक कोरोना महामारीमुळे हैरान झाली आहे व रोजगार ठप्प झाले आहे कोरोना काळातील नल कर व मालमत्ता कर नगर पालिकेने  माफ करण्याचे निवेदन कोरोना दक्षता समिती ने नगर पालिकेला लेखी निवेदना द्वारे करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्या पासुन लॉकडाउन करण्यात आला होता.मागील आठ महीण्यापासुन लॉकडाउन मुळे व्यापारी वर्ग व सर्व सामान्य रोज मजूरी करणाऱ्यावर त्यांची मार बसली असून सर्व सामान्य नागरिक कोरोनामुळे खुप अडचणीत आला असून जीवन जगने खुप अवघळ झाले आहे. मागील आठ महिन्या पासुन शहरातील नागरिक कोरोना मुळे अडचणीत आले असल्याने कोरोना  काळातील पाणी कर व मालमत्ता कर माफ करण्याची मागणीचे निवेदन मुख्यधिकारी व नगरध्यक्षा  यांना नगर परिषद  बिलोली यांना देण्यात आले यावेळी  कोरोना दक्षता समितीचे विजय कुंचनवार, मौलाना अहमद बेग,जेष्ठ पत्रकार ए. जी.कुरैशी,शेख सुलेमान,व्यापारी व पत्रकार शेख फारुख अहमद,मुकींनदर कुड़के,सय्यद रियाज़ आदि उपस्थित होते.

26 October 2020

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर

नांदेड  : - प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती , हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी केले . प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे . या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर . बी . चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली . यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे , कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री . गिरी , तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते .

24 October 2020

बहुभाषिक पत्रकार संघ बिलोली तर्फे 108 रुग्णवाहीका चालकांच्या गौरव

बिलोली :कोरोना महामारीचा काळात कोरोना रुग्ण असो की इतर  रुग्णाची व अनेकाना जीवदान देणारे कोविड काळात अतिशय उत्कृष्ट काम करणारे ग्रामीण रुग्णालयचा 108 चे चालक मिर्झा जफर बेग ईनामदार व मिर्झा तव्वसुल बेग यांच्या बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार महासंघाच्या वतीने  कोरोना योद्धा म्हणुन गौरव करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे  मार्च महीना पासुन ते आज पर्यत बिलोली तालुक्यातील रुग्णाना जीवदान देणारी बिलोली ग्रामीण रुग्णालयचे 108 ची सेवा ही लॉकडाउन ते कोविड काळात रुग्णासाठी जीवदान ठरले आहे.108 रुग्णवाहिकेतील चालक हे मागील 8 महीना पासुन आपली जीवाची पर्वा न करता व  डॉक्टर शिवाय उत्कृष्ठ सेवा देत आहे.कोविड रुग्ण असो की इतर कोरोना संक्रमित असो की गर्भवती महिला व  ह्रदय रोग व इतर आजाराचे रुग्णाना उत्कृष्ट अशी सेवा बजवनारे व रुग्णाना जीवदान देणारे 108चे चालक मिर्झा जफ़र बेग ईनामदार व मिर्झा तव्वसुल बेग यांच्या गौरव तसेच  पत्रकार संरक्षण समितिच्या नुतन अध्यक्ष पदी शेख सुलेमान शेख अहमद यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल यांच्या सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे होते तर प्रमुख पाहुणे मौलाना अहमद  बेग ईनामदार,लालु शेट्टीवार, जेष्ठ पत्रकार ए.जी.क़ुरैशी, बाबुराव इंगळे,माधव एडके,संदीप गायकवाड, लोकमत वार्ताहर शेख इलियास,यादव लोकडे हे होते.सूत्रसंचालन शेख ईरशाद आभार बालाजी नरहरे केले.  यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहमद,उपाध्यक्ष शेख युनुस कासराळीकर,बालाजी नरहरे,सल्लागार हाई पटेल आदि सदस्य  उपस्थित होते.

23 October 2020

जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर जेंव्हा उंबरठ्यातील आदिशक्तीला बोलते करतात ...

नांदेड दि . 23 : -जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची वस्तुस्थिती व पाहणी करण्याच्या उद्देशाने मुदखेड येथे दौऱ्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मुगट गावात उंबरठ्यावर अभ्यास करीत असलेल्या आदिशक्तींना भेटण्याचा मोह आवरता आला नाही . मुगट गावातील आरोग्य केंद्राची पाहणी करुन परतत असतांना त्यांनी एका घरासमोर गाडी थांबविण्यास सांगितले . गाडीतून उतरत त्यांनी एका घराकडे वळत दरवाजात अभ्यास करत असलेल्या दोन मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारुन त्यांचे भावविश्व मोकळे केले . यातील एकीचे नावे पुष्पा ज्ञानेश्वर कदम तर दुसरी दिपिका रामकिशन कदम . पुष्पा दहावीत तर दिपिका चौथीत शिकते . या दोन्ही मुलींचे आई - वडिल शेती करतात . शाळा कोविड 19 मुळे बंद असल्यामुळे या बहिणींची शाळा ओसरीवर सुरु होते . यातील एक दहावीत शिकत आहे तर दुसरी चौथीत घरी तिच्या फक्त भावाकडेच असलेला मोबाईल शिक्षणासाठी तिने जवळ ठेवलेला मोबाईलच्या माध्यमातून ती गणिताचा सराव करत असतांना कोणीतरी एक महिला आपल्या जवळ बसून बोलते आहे या कृतीमुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही आपली ओळख न देता मोकळा संवाद साधल्याने तिच्या स्वप्नांना आणखी बळ घेता आले .शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हिरमुसले आहेत . त्यांच्यात कुठेही नैराश्य येऊ नये , अभ्यासाप्रती कटिबद्धता वाढावी यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशी उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे एक अभियान आम्ही लवकरच सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले . मुगट गावात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींची अधिक संख्या असल्याने या गावची तशी वेगळी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असेही त्या म्हणाल्या . मुगट येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल पर्यंत शाळा असून एकुण 16 वर्ग , 14 शिक्षक तर 365 पटसंख्या आहे . यात मुलींची संख्या 188 आहे . 

22 October 2020

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध

नांदेड दि . 22 : - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोंबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो ( प्रति महिना ) याप्रमाणे मंजूर केले आहे . सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 94 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे . या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे . तालुका निहाय नियतन ( क्विंटलमध्ये ) पुढील प्रमाणे देण्यात आले आहे . नांदेड -193.5 , अर्धापूर- 39 , मुदखेड -33 , कंधार -73.5 , लोहा -147.5 , भोकर -86.5 , उमरी -54.5 , देगलूर -135.5 , बिलोली -105 , नायगाव- 130.5 , धर्माबाद 65 , मुखेड -198 , किनवट -454.5 , माहूर -209 , हदगाव -80 , हिमायतनगर -89 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे . 

21 October 2020

येसगी पुलावरुन अवजड वाहनांना प्रतिबंध

नांदेड दि . 21 : - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्या रितील राष्ट्री य महामार्ग क्र .63 ( पुर्वीचा प्ररामा -2 ) वरील येसगी पुलावरील वाहनभार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे . या पुलावरुन अवजड वाहनांना मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हारदंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी अधिसूचनेद्वारे प्रतिबंधीत केले आहे . या अधिसूचनेनुसार संबंधित विभागांनी उपाययोजना करुन 5 नोव्हेंबर 2020 पासून 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत ( दोन वर्षासाठी ) राष्ट्री य महामार्ग क्र . 63 ( पुर्वीचा प्ररामा -2 ) वरील येसगी पूल क्षतीग्रस्तत झाल्या ने व पूलाचे काम करण्यानसाठी या पुलावरुन केवळ कार , जीप , हलके मालवाहू वाहन ( LCV ) इत्यारदी ज्या ची उंची 2.80 मीटर पेक्षा कमी आहे अशीच वाहने सोडणे व इतर जडवाहतूक बाजुच्या जुन्याा पुलावरुन वळविण्या ) स मान्ययता दिली आहे . संबंधित विभागाने वळन रस्यांधि साठी वापरण्यातत येणारा जुना पुल हा अरुंद असल्यायने या पुलावरुन एकावेळेस एकच अवजड वाहन ये - जा करेल याबाबतची दक्षता घ्याठवी . रस्याा ज च्याद आजूबाजूस असलेली काटेरी झुडपाची कापनी करावी . पुलाच्याय दोन्ही बाजूस सिग्नतल यंत्रणा / वाकीटॉकीचा वापर करावा . सुरक्षीततेच्या दृष्टीधकोणातून पुलाचे अलीकडील बाजुस व पलीकडील बाजुस पोलीस चौकी उभारुन त्या त आवश्याक तो पोलीस बंदोबस्तव ठेवावा . पुलाच्याी दोन्ही बाजूस वाहन क्षमता मर्यादेचे फलक , तसेच अधीक्षक अभियंता , संकल्पझ चित्र मंडळ , मुंबई यांनी त्यांजचे अहवालात शिफारस केल्याी नुसार पुलाच्याय दोन्ही बाजूस उंची बाबतचे फलक व हेवी डयुटी गॅन्ट्री लावण्यायत यावे पोलीस अधीक्षक , नांदेड यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 116 नुसार अधिसूचना जारी करुन बांधकाम विभागामार्फत आवश्यकक ते वाहतूक चिन्हालाचे फलक , वाहन चालकाच्या माहितीसाठी पुलाच्याब दोन्हीम बाजूस व आवश्याक त्या ठिकाणी लावणे बंधनकारक राहिल.या अधिसुचनेबाबतची माहितीबाबत लगतच्या सर्व जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन , प्रादेशिक परिवहन विभाग व इतर आवश्यबक सर्व संबंधित विभागास अधीक्षक अभियंता , सार्वजनिक बांधकाम मंडळ , नांदेड यांनी द्यावी . ही अधिसुचना अधिक्षक अभियंता , सार्वजनिक बांधकाम मंडळ , नांदेड यांचे कार्यालयामार्फत महाराष्ट्रद शासन राजपत्रात प्रसिध्दी चिी कार्यवाही करुन स्थानिक मराठी , हिन्दी इंग्रजी व ऊर्दु वर्तमानपत्रात सुध्दाअ प्रसिध्दी द्यावी , असेही अधिसूचनेत जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे .

तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्यास मुदतवाढ

 नांदेड: - सन 2020 मध्ये दिपावली उत्सव 14 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत साजरा होणार आहे . त्या अनुषंगाने तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीस मंगळवार 27 ऑक्टोंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . . नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याममार्फत व जिल्हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनिमय 2008 नुसार 7 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारण्याची मुदत देण्यात आली होती . परंतू तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीची मुदतवाढ आता 27 ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आली आहे . याव्यतीरिक्त 6 ऑक्टोंबर 2020 रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे . 

07 October 2020

" गाव तेथे स्मशानभूमी व दफनभूमी " साकारण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 नांदेड दि . 7 : - जिल्ह्यातील असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते . अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो ती जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात . यात तक्रारी होत असल्याने बऱ्याचवेळा हा प्रश्न जटिल होतो . नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी " गाव तेथे स्मशानभूमी , दफनभूमी " निर्माण करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला निर्देश दिले . " गाव तेथे स्मशानभूमी , दफनभूमी " ही संकल्पना साकारण्यासाठी शासन पातळीवर उपलब्ध असलेल्या योजनांचा सुयोग्य मेळ साधत लोकसहभागातून याचे नियोजन केले जाईल जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान ही योजना , लोकप्रतिनिधींच्या निधीतील काही वाटा यात अंतरभूत करण्यात येईल . प्रत्येक गावाच्या स्मशानभूमीची दुरावस्था होऊ नये , याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक रहावा यासाठी लोकसहभाग हा अत्यावश्यक करण्यात येईल .प्रशासकिय पातळीवरील याबाबतचे प्रस्ताव तात्काळ मंजूर व्हावेत यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून पंचायत समिती , महसूल विभाग , भूमि अभिलेख विभाग यांचा सुवर्णमध्य साधत प्रत्येक पातळीवर करावयाच्या प्रशासकिय कामांसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिल्यानुसार निश्चित कालबद्ध कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे ठरविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले . ग्रामपंचायतीच्या नावे काही लोकवाटा देण्यात आला असून हा लोकवाटा भरण्यास ज्या ग्रामपंचायती तयार आहेत त्यांचाच प्राधान्याने यासाठी विचार केला जाईल . हा लोकवाटा ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन भरल्यास सदर योजनेस अधिक पूर्णत्व येण्याबरोबरच प्रत्येक गावकऱ्यांनाही ही योजना आपली वाटेल या तत्वावर भर देण्यात आला आहे . काही गावात लोकवाटा रक्कम होण्यात फारच अडचण निर्माण होत असेल तर यासाठी ग्रामपंचायतींचा ग्रामनिधी व मा . खासदार , आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून ही तजविज करता येऊ शकेल . याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर रुपरेषा ठरविली जात असून लोकसहभागाला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल , असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी स्पष्ट केले . 

06 October 2020

सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान

 नायगाव: तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे . इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत : च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाखविले आहे . या बालविराला हा पुरस्कार आज डॉ . शंकरराव चव्हाण नियोजन भवनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे . या पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर , मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. काळम , सहाय्यक लेखा अधिकारी , जी आर धुमे , परिविक्षा अधिकारी बी.पी. बडवणे यांची उपस्थिती होती . भारत सरकार , केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जीवनरक्षा पदक पुरस्कार शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना घोषित झालेला होता . या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र , पदक व 1 लाख रुपयाचा धनादेश असे आहे . हा पुरस्कार ज्या मुलांनी शिक्षण , कला , सांस्कृतिक कार्य , नाविण्यपुर्ण शोध , सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे , त्यांना दिला जातो . त्यांच्या या धाडसाचे कौतुक व्हावे व समाजातील इतर बालकांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे.

05 October 2020

नांदेडला 30 एकरावर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम

नांदेड : नांदेडकरांसाठी एक मोठी बातमी असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये 30 एकटांवर भव्य आंतरराष्ट्रीय स्टेडियम होणार असल्याचा निर्णय जाहीर केला . युवकांना क्रीडा सुविधांसह चांगले प्रशिक्षकही मिळावेत यासाठी आग्रही भुमिका मांडत कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला .जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकाट , खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता आहे . जिल्ह्यातील क्रीडापटूंना यासाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे या निर्णयानंतर दिसून येत आहे . क्रीडा संकुल विकासाबाबत आज नांदेड येथील डॉ . शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ . मंगाराणी अंबुलगेकर , जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकाटी अधिकारी वर्षा ठाकूर , जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर , अधिक्षक अभियंता अविना er धोंडगे , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर माटावाट उपस्थित होते .या क्रीडा संकुलात सिन्थेटिक अॅथलेटिक्स मैदान , स्विमिंगपूल , बॅटमिंटन हॉल , फुटबॉल , हॉकी , कबड्डी , खो - खो , व्हॉलीबॉल , जिमनॅस्टिकसाठी हॉल , ज्यूदो कराटे , पॉवर लिफ्टींग , बास्केट बॉल , स्केटिंग , आर्चटी , तॉयक्कोंदो , कुस्ती अ eIT विविध खेळांचे अद्ययावत व प्रमाणित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असतील . याचबरोबर क्रीडापटूंच्या अंगी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसब यावे यादृष्टिने नियमित सराव शिबीर स्पर्धा घेण्यासाठी लागणाया अत्यावश्यक सेवा सुविधांचाही समावेश राहिल . नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत आता स्वतंत्र समिती तयार करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली . सदर तीस एकर जागा या नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत योग्यती प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांना दिले . 

हाथरस येथील घटनेचा मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने बिलोलीत तिव्र निषेध

बिलोली:मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने हाथरस येथे घडलेल्या 19 वर्षीय मुलीवर झालेल्या आत्याचार च्या विरोधात बिलोली तहसिल कार्यालय येथे आज दि 5 ऑक्टोबर रोजी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पिढीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी घटना घडू नये यासाठी कायदा पुन्हा कडक करण्यात यावा. सदरील घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी. तसेच उत्तर  प्रदेश सरकार व पोलीस प्रशासन याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. या पिडीत कुटूबीयांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आज तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला या वेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे बिलोली तालूका अध्यक्ष विजय भरान्डे,बिलोली तालुका प्रवक्ते साहेबराव दावलेकर,विद्यार्थी आघाडी बिलोली ता.उपाध्यक्ष गंगाधर बोईवार,सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके,सामाजिक कार्यकर्ते सखाहरी घायाळ,शामराव भरान्डे,बालाजी मोरे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

अर्धापूरात काँग्रेसचे धरने आंदोलन

अर्धापूर : भाजपा शाषीत सरकार लोकशाहीचा गळा घोटून हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत असल्याने उतरप्रदेशातील हाथरसमध्ये बलात्कार करुन पीडीत मुलीची चीभ कापून कमरेचे हाडे मोडली तरी योगी सरकारचे ऐकुन पोलिसांनी पीडीताचे प्रेत घरच्यांना हवाली न करता थेट रातोरात अंत्यविधी करुन घेतला , यामुळे देशभरात असंतोष पसरला असून सबंधीत आरोपींना फाशावर लटकवण्याची मागणी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केली सोमवारी शहरातील प्रज्ञाबौध्द विहारात आ अमरनाथ राजूरकर , माजी खा.तुकाराम रेंगे पाटील , आ माधवराव जवळगावकर आ मोहनराव हंबर्डे , आ रावसाहेब अंतापूरकर , जि प अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर , महापौर सौ मोहिनी येवनकर माजी महापौर मंगलाताई निमकर सभापती रामराव नाईक सरचिटणीस संजय देशमुख लहानकर सभापती सरीता बिरकिले , उपसभापती जोत्सा गोडबोले , अनिता इंगोले , रेखा चव्हाण , कविता कळसकर , मंगला धुळेकर उज्वलाताई इंगोले , जेसीका शिंदे , सभापती सौ.कांताबाई अशोकराव सावंत , मनिषा शिनगारे , युकाँचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कौंढेकर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे , शहराध्यक्ष राजेश्वर शेटे , मदन देशमुख , सौ प्रणीता सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती . तथागत भगवान गौतमबुद्ध व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रज्ञाबौध्द विहारात अर्धातास मौन पाळून धरणे आंदोलन केले . यावेळी आ राजूरकर म्हणाले कि , देशात लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरु असून दलितावर अत्याचारांच्या घटनात वाढ झाली तरी भाजपा शाषीत सरकार झोपीत आहे . आ.माधवराव जवळगावकर यांनी हाथरस प्रकरणी योगी सरकारने राजीनामा देण्याची मागणी केली ,

हाथरस येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बिलोलीत तीव्र निषेध

बिलोली | उत्तर प्रदेश मधील हाथसर येथे मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेचा देशभर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. त्या घटनेचा खटला फास्ट टँक कोर्टामध्ये चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी महिलांना शस्ञ बाळगण्याची परवानगी देण्यात यावी या प्रकरणातील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते धम्मदीप गावंडे, पॅंथर इंद्रजीत डुमणे गागलेगावकर, काशिनाथ मानेमोड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बिलोली मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी बाळू लोहगावकर, संदीप कांबळे, गौतम वाघमारे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी विचारे, धम्मपाल जाधव, शिवराज सुर्यकर, संदेश जाधव यांच्या सह आजाद समाज पार्टीचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

01 October 2020

कुंडलवाडी नगर परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ.सुरेखा जिट्टावार

बिलोली- तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.सौ.अरुणा कुडमुलवार यांना शासनाने जातवैधता प्रमाणापत्रा अभावी अपात्र केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सदस्यांमधून नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर केली . 
त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोट निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ . सुरेखा नरेंद्र जिट्टावार यांची निवड झाली असून त्यांनी भाजपच्या सौ.रेहाना बेगम पाशामिया यांना पराभूत केले आहे . कुंडलवाडी नगर परिषदेची पोट निवडणूक ही सदस्यामधून झाली नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते.आज झालेल्या सभेत सौ . जिट्टावार यांना 10 मते सौ रेहाना बेगम यांना 6 तर एक सदस्यांना कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार सौ सुरेखा जिट्टावार यांची निवड झाली आहे .या निवडणुकीत आ . अमरनाथ राजूरकर हे किंगमेकर ठरले असून शिवसेनेचे सुभाष साबणे , माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी , शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , प्रकाश मारावार , माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार , मनपानगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे .


29 September 2020

आरळी येथील युवकाचा लघुळ येथे वीज पडून मृत्यू

बिलोली: तालुक्यातील मौजे आरळी येथील शादुल शेख वय (16)हा मौजे लघुळ येथे आपल्या आजुळी गेला असता आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट व मेघ गरजेनेसह पाऊस आला व यात या युवकावर विज पडल्याने तो जागीच शेतामध्ये मृत्यू मुखी पडला सदरील युवकाचे वडील व भावाचा आरळी येथील ओड्यात आलेल्या पुरात वाहुन मृत्यू झाला होता.या कुटुंबात आई वडील दोन भाऊ असा परिवार होता यात आधी वडील व भाऊ आणि आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी समीर याचा मृत्यू झाल्याने आई पोरकी झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.सदरील युवक 16 वर्षाचा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे

28 September 2020

आमदार अंतापूरकर पोहोचले मंत्रालयात नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मंत्र्यांकडे केली मागणी

बिलोली:जनतेच्या प्रश्नांची व शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण असलेले देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर हे थेट मुंबईला मंत्रालयात पोहोचले.
देगलुर- बिलोली मतदारसंघात अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना पूर आल्याने हाता तोंडाशी आलेली शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे, घरात पाणी शिरल्याने घरांचे व घरातील अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी 
मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब व महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री विजयजी वङेटीवार साहेब यांना भेटुन तालुक्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली ओला दुष्काळ जाहीर करा अशी विनंती केली.व निवेदन दिले.

19 September 2020

सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक

नांदेड :जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे , सात जणांचा कोटोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तट 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत . शनिवार दि .19 रोजी 1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली , यात हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली . तसेच 332 जणांचा अहवाल कोटोना पॉझिटिव्ह आला आहे . यात आरटी - पीसीआर 18 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश आहे . 13 हजार 316 झाली आहे.यातील 297 बाधितांना सुट्टी देण्यात आल्याने एकूण कोटोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 54 झाली आहे , सध्या 3 हजार 845 झाली , तर 34 जणांची प्रकृती गंभीर आहे . सात जणांचा मृत्यू किनवट तालुक्यातील बोधडी खु येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी मृत्यू झाला , बिलोली   तालुक्यातील सगटोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी , बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 70 वर्षीय महिलेचा दि .18 टोजी , नायगाव तालुक्यातील लालवनडी 66 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , नांदेड येथील शाहू नगर येथील 46 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , पीपलगाव येथील 80 वर्षीय महिलेचा दि .19 टोजी , दत्त नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि .19 टोजी मृत्यू झाला . आतापर्यंत कोटोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 350 झाली आहे . 

पुराचा धोका : विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; गोदाकाठच्या ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा .. !

 नांदेड| गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे . त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असताना नांदेड मधील विष्णुपूरी धरणाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे . त्यामुळे गोदाकाठच्या ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . याच पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन त्यांनी याबाबत आढावा घेतला आहे . आपात्कालीन यंत्रणा सज्ज नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरासह मुदखेड , धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहते . याशिवाय बिलोली आणि नायगाव तालुक्यातील काही गाव प्रभावित होऊ शकतात . तसेच गोदावरी नदीकाठच्या जवळपास ३३७ गावांना अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . याकरता आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नदीकाठी तसेच शहरातील नदी घाटावर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहेत . सध्या जायकवाडी , माजलगाव , मासोळी मध्यम प्रकल्प आणि सिद्धेश्वर या धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे .पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होईल सध्या तरी नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे . पण , गोदावरीत विसर्ग वाढला आणि मोठा पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे . दरम्यान , रात्रीपर्यंत हा विसर्ग १ लाख ४८ हजार क्युसेकपर्यंत वाढेल तितक्याच वेगाने विष्णुपुरीतून विसर्ग केला जाईल . पण , पुढे तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण देखील १०० टक्के भरले आहे . त्यातूनही विसर्ग सुरु आहे . पोचमपाडच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक धोका नांदेड जिल्ह्याला बसणार आहे . 

17 September 2020

कुंडलवाडीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

कुंडलवाडी :येथील नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेच्या माध्यमातून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 17 ते 21 सब्टेम्बर दरम्यान स्वंयस्फूर्त जनता कप ! पाळण्यात येत आहे , या कप ! ला पहिल्या दिवशी व्यापाऱ्यानी चांगला प्रतिसाद दिला आहे .... कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे.गेल्या एक महिन्यापासून कुंडलवाडी शहरात 70 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर 3 रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच परिसरातील गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत , हि वाढत चाललेली कोरोना रुग्णाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेच्या माध्यमातून 17 ते 21 सब्टेम्बर दरम्यान पाच दिवसाचा स्वंयस्फुर्त जनता कप ! पाळण्यात येत असून , पहिल्या दिवशी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जनता कप'ला प्रतिसाद दिला आहे तर एकीकडे ज्या नागरिकांसाठी जनता कयूं लागु करण्यात आली त्याच नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्यासारखे शहरात ना शारीरिक आंतर आहे , ना कुठल्याही मास्कचा वापर आहे कुठले ही काम नसताना विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत.याबाबीकडे नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे , अन्यथा कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला अपयश येईल हे मात्र निश्चित आहे

13 September 2020

नीटसाठी भारत सरकारच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना कोविड -19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना दिलासा

 नांदेड: - आज रविवार 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र होणाऱ्या नीट NEET ( UG ) 2020 च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . यात कोविड -19 पॉझिटिव्ह ( बाधित ) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच अटी व शर्तीनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल , असे म्हटले आहे . याबाबत दिनांक 11 सप्टेंबर रोजी नीटच्या सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात कोविड -19 प्रादुर्भाव लक्षात घेता नीटच्या परीक्षा सुरक्षित कशा होतील याबाबत सविस्तर चर्चा झाली . जे विद्यार्थी कोविड -19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर विचारविमर्श करण्यात आला . नीट परीक्षेबाबत जी प्रमाणीत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेवर अधिक भर देण्यात आला आहे . त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राला मास्क , हँडग्लोज ( हातमोजे ) , 50 एमएल पर्यंत सॅनिटायजरची लहान बॉटल , परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना किमान 6 फुटाचे एकमेकांपासून सुरक्षित अंतर स्वत : ची पारदर्शक पाण्याची बॉटल हे आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक असलेले साहित्य घेण्याबाबत सुचविले आहे . याबाबत वेळोवेळी नीटच्या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे .ज्या विद्यार्थ्यांना कोविड -19 ची बाधा झालेली आहे अथवा जे विद्यार्थी कोविड -1 -19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वत : च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे . संबंधित पालकांनीसुद्धा याबाबत योग्य ती खबरदारी घेत नॅशनल टेस्टींग एजन्सी यांनी सूचविल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या छायाप्रतीसह कोविड -19 बाधित असल्याचा रिपोर्ट / सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेऊन ते नीटच्या संकेतस्थळावर ईमेल करणे बंधनकारक आहे . याबाबत स्वतंत्र तारिख नंतर कळविण्यात येणार आहे . सदर ईमेल हा ncov19 @ nta . ac.in या ईमेल आयडीवर पाठवावा , नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक डॉ . विनीत जोशी यांनी केले आहे .

09 September 2020

नांदेडच्या कारागृहात ८१ कैद्यांना कोरोना लागण

नांदेड :जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून , कारागृह अधीक्षकांनी यास दुजोरा दिला . नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असून , शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत.अशातच नांदेडच्या जिल्हा कारागृहात अॅन्टीजेन तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्हा कारागृहात तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या तपासणीत पुढे आले आहे.यामुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . दोन दिवसापासून ही तपासणी जिल्हा कारागृहात सुरु होती . त्याचा एकत्रित अहवाल आज समोर आला . त्यात ८० कैदी आणि एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले . या सर्व कैद्यांचे कारागृहातच विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून , कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी यास दुजोरा दिला आहे . कारागृहात २ ९ १ कैदी असून , त्यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे . तर कोरोनाबाधीत कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे चांदणे यांनी सांगितले . 

03 September 2020

दहावी नंतर शासकीय सुविधांचा लाभ घेत पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा - प्राचार्य डॉ जी व्हि . गर्जे

 नांदेड : - येत्या पाच वर्षात राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित . त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , कॉम्पुटर , सिव्हिल , मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , प्रॉडक्शन , इलेक्ट्रॉनिक्स , डी.एम.एल.टी इत्यादी निवडून उज्वल भविष्याची सुरुवात करावी , असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ . जी . व्ही . गर्जे यांनी केले आहे . टाळेबंदीच्या काळात सुद्धा एच.सी.एल टेक्नॉलॉजी , आय . एस.टी.सी , बजाज प्रा.ली. , एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी , टाटा इंजिनीरिंग , जॉन डिअर , लोकेश मशीन , व्हेरॉक इंजिनीअरिंग , अदाणी इलेक्ट्रिकल्स , फोर्ब्स मार्शल , महिंद्रा अँड महिंद्रा , सुरोज बिल्डकॉम , फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स , व्हर्लपूल , अश्या अनेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मागणी होते आहे . ह्या कंपन्या विद्यार्थ्यांना ऑन - रोल देखील घेण्यास तयार आहेत . पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो तोही कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय . दहावी नंतर आय.टी. आय मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रात कनिष्ठ पातळीवर कामासाठी निवडला जाईल . तर पॉलिटेक्निक पदविका प्राप्त विद्यार्थी सुपरवायझरी लेव्हलवर निवडले जातात . त्यामुळे आय.टी.आय. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही असेही ते म्हणाले . यातच मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अनेक शासकीय योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत . एस सी व एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश मिळतो , डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा घेता येतो . खुल्या प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत निवास व भोजनासाठी शिष्यवृत्ती मिळते . तसेच वार्षिक 6 लक्ष उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ बी सी सवलतीचा फायदा मिळतो . व्हीजेएनटी , एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी निवास व भोजनासाठी दरवर्षी आर्थिक मदत शासनातर्फे मिळते . अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम , जैन , बौद्ध , पारशी , शीख आदी विद्यार्थ्यांना अधिकतम 25 हजार रुपये पर्यंतचे शिक्षण शुल्क माफ केले जाते . या शिवाय आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या होतकरु हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे ट्युशन फीस वेवर स्कीम अंतर्गत प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण शुल्क शासनातर्फे दिले जाते . ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाचे अट असते . या सर्व आर्थिक सोई - सुविधांचा लाभ घेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन करणे किंवा घरुनच आपल्या मोबाईलवरुन करणे बंधनकारक आहे . कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तांत्रिक शिक्षणाचा वाटा मोठा आहे त्यामुळे इतर पारंपारिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निकच्या तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल . त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेची निवड करत उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिले पाऊल टाकावे असे आवाहन प्राचार्य , डॉ . जी . व्ही . गर्जे यांनी केले आहे . 

ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ . शेंगुलवार स्वगृही परतले

बिलोली -तालुक्यातील कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत . विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा आज येथे संपन्न झाला . डॉ . सायन्ना शेंगुलवार यांची कुंडलवाडी शहर व परिसरावर मोठी पकड आहे . एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे . काँग्रेस पक्षात असतांना त्यांनी कुंडलवाडीचे नगराध्यक्षपद भुषविले होते . दरम्यानच्या काळात का स्थानिक कारणामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता . परंतु भाजपासारख्या धर्मांध व जातंध पक्षात ते फार काळ रमले नाहीत . जिल्ह्याच्या विकासाचे काहीही देणे घेणे नसलेल्या व भरकटलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहराचा विकास होऊ शकत नाही . याची त्यांना दरम्यानच्या काळात खात्री पटली . त्यामुळे त्यांनी भाजपाला अखेरचा जय श्री राम केला व काँग्रेस पक्षात प्रवेश केला . विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला . यावेळी बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर ,मनपाचे सभागृह नेते सरदार विरेंदसिंघ गाडीवाले , नगरसेवक विजय येवनकर , मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे , कुंडलवाडी चे नगरसेवक शेख मुख्त्यार , माजी नगरसेवक राजु पोतनकर , शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर भीम पोतनकर आदिंची उपस्थिती होती . 

01 September 2020

महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि . 1 : - “ वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली . आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले . लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले . सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दिप आता मालवला आहे " या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . नांदेड येथील डॉ . व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते . काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्पिाटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती . राष्ट्रसंत डॉ . शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु : खाचा डोंगर कोसळला आहे . या दु : खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या

संकलन केंद्रावर गणेश मुर्ती सुपूर्द करण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 नांदेड दि .  : - गेली सहा महिने कोरोनाच्या अदृश्य प्रादुर्भावाशी लढत जनतेने आयुष्यभर जपलेल्या गणेशोत्सव , मोहरम - ताजिया , बुद्धपौर्णिमा , बकरी ईद सारखे सण उत्सव अतिशय संयमाने भक्ती भावाला जपत पार पाडले आहेत . जो विवेक जिल्ह्यातील जनतेने दाखविला आहे त्याच विवेकाच्या बळावर काळजी घेत दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देवू यात . सद्य परिस्थिती आव्हानात्मक असून कोविड -19 ची लस उपलब्ध होईपर्यंत सर्वजण अधिक कर्तव्य दक्षता बाळगतील असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला . अनंत चतुर्थी निमित्त घरोघरी बसलेल्या गणपती बाप्पाला निरोप देतांना जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत . महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितरित्या आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तीभावपूर्ण विसर्जन करता यावे यासाठी स्वतंत्र केंद्राचीही निर्मिती केली आहे . या संकलन केंद्रावर जनतेने गणेश मुर्ती सुपूर्द कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले . आपल्या सर्वांच्या संयमी वागण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येईल . ज्या पद्धतीने गेली सहा महिने जिल्ह्यातील जनता शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करत आहेत त्याला तोड नसल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले . यावर्षी सर्वदूर सर्वत्र चांगला पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीही दुथडी भरुन वाहते आहे . तेथील पाण्याला प्रवाह आलेला आहे . सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन जे नियोजन केले आहे त्याला सर्व जनता भक्ती भावाने साथ देईल याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . 

31 August 2020

नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा - मनोहर नागराळे

मुखेड:  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे लोकसहभागतून जमा केलेल्या निधीमधून ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.या ग्रंथालयाचे उद्धघाटन मुखेड कंधार मतदार संघाचे उमेदवार काँग्रेस चे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पा . मंडलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.मुखेड तालुक्यात जयंती निमित्ताने कुठे तरी पहिल्यांदाच ग्रंथालय सुरू करून खया अर्थाने जयंती साजरी करण्यात आली . त्यामुळे चोंडी या गावातील तरूणांचे आज तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे .तालुक्यात सर्वत्र जयंतीनिमित्ताने मोठ्या डिजी लावून , ढोल ताशा वाजवून नाचत गाजत गावात मिरवणूक काढून जयंती साजरी केली जाते . त्यात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जाते , मात्र चोंडी येथील तरूणानी अशा प्रकारचे कुठलेही खर्च न करता त्यांनी अनावश्यक खर्च टाळून , त्या पैशातून लोकशाहिर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अणाभाऊ साठे सामाजिक ग्रंथालया स्थापना करून आज तालुक्याला एक आदर्श घालून दिले .त्यामुळे नाचून गाजून डिजी लावून मिरवणूक काढून मोठेपणा दाखवण्यापेक्षा लिहून - वाचून मोठे व्हावे यासाठी या गावात ग्रंथालयाची सुरूवात करण्यात आली , असल्याचे गावातील जयंती मंडळाच्या तरूणानी सांगितले.तर गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी या ग्रंथालयाला प्रंचड विरोध्द करण्याचा प्रयत्न केले पण त्याच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही गावात ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन ते पुर्ण केले आहे .ग्रंथालयात स्पर्धा परिक्षा , पोलीस भर्ती , या बरोबरच अंवतर वाचणाचे पाचशे च्या वर पुस्तकी आणले आहे.आजून पुस्तकी आणार असल्याचेही त्यांनी सांगितले .यावेळी जयंती मंडाळाच्या प्रमुखांनी भाऊसाहेब पा . मंडलापूरकर यांच्या कडे ग्रंथालयासाठी चांगली रूम बांधून द्यावी अशी मागणी केली होती.त्यामुळे भाऊसाहेब मंडलापूरकर यांनी ते मान्य केले आणि पुढच्या जयंतीच्या अगोदर निधी मंजूर करून रूम बांधून देण्यासाठी पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांच्या कडे मागणी करून निधी मंजूर करून आणून देणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले .यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीती म्हणून काँग्रेस चे नेते भाऊसाहेब मंडलापूरकर , माधव पाटील उंद्रीकर , प्रा . विश्वनाथ कंधारे , उत्तमकुमार कांबळे , पत्रकार पवन जगडमवार , बसापूरे सर , रिपब्लीकन सेना चे अनिल शिरसे , भिम आर्मी वायवळे सर गावाचे सरपंच राजू पाटील , मा.सरपंच पांडूरंग कंधारे अदिचे प्रमुख उपस्थिती होती . तर या ग्रंथालयासाठी विशेष परिश्रम घेणारे जयंती मंडळाचे गावातील तरूण मनोहर नागराळे , गणपत कंधारे , ज्ञानेश्वर कंधारे रामेश्वर कंधारे , अविनाश कंधारे ,नवनाथ कंधारे,सुनिल नागमोड , अशोक कंधारे , वैभव कंधारे अदिने परिश्रम घेतले होते .  



29 August 2020

सुदृढ आरोग्यासाठी दररोज एक तास खेळ आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर

 नांदेड दि . 29 : - चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते . हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत : च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी सांगितले . कोविड -19 च्या या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्यादृष्टिने व्यायाम करता येऊ शकतो , असे त्यांनी स्पष्ट केले . मेजर ध्यानचंद ( हॉकीचे जादुगर ) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो . त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल , नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे , शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्धन गुपीले नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर , डॉ . पालिवाल , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदि मान्यवर उपस्थित होते .नवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत . त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे . त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात " फिट इंडिया फ्रीडम रन " हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांच्या हस्ते " फिट इंडिया फ्रीडम रन ” फलेक्सचे रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला . या सायकल रॅलीमध्ये स्वत : जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने यांच्या बरोबर शासकीय अधिकारी , कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला . या रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल - आयटीएम कॉलेज आयटीआय - श्रीनगर - वर्कशॉपकॉर्नर - भाग्यनगररोड आनंदनगर - वसंतराव नाईक चौक ( नागार्जुना ) -अण्णाभाऊ साठे चौक - व्हीआयपी रोड - आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला . हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले तर आभार गुरुदिपसिंघ संधु यानी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर , राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख ,अनिल बंदेल , वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड , रमेश चवरे , सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदिंनी सहकार्य केले . 

डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझमा थेरपी उपचाराचा शुभारंभ

 नांदेड दि . 29 : - कोविड -19 च्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी येथील डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझमा थेरपी अर्थात उपचार पद्धतीची सुरुवात झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ . सुधिर देशमुख यांनी दिली . नांदेड जिल्ह्यातील कोविड -19 बाधित , मध्यम अशा स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा थेरपीने उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले होते . यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री याची आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली असून अधिष्ठाता डॉ . सुधिर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . धोडिंबा भुरके , डॉ . शीतल राठोड , डॉ . समीर , डॉ संज्योत गिरी यांच्या उपस्थितीत दोन रुग्णांना प्लाझमा ( रक्त ) देण्यात आला . वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे .

26 August 2020

कुंडलवाडीत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून 20 हजार रुपयांचे दागिने लुटले

कुंडलवाडी:शहरातील राम मंदिर भागातील गंगाधर बोधनकर यांच्या घरी आईस अज्ञात आरोपीने निराधाराचे पैसे आले सांगुन घरात प्रवेश करून सही करा असे सांगत चाकुचा धाक दाखवून कानातील ७ ग्रॅम सोन्याचे नागुल नावाचे दागिने अंदाजे किंमत २० हजार रुपयाचे जबरीने लुटून नेल्याची घटना दि .२४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे . या भरदिवसा घडलेल्या घटनेने शहर व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे . गेल्या तीनच दिवसांपुर्वी शहरातील महालक्ष्मी मंदिराजवळ मुरकुल कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ३ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना ताजी असतानाच २४ ऑगस्ट रोजी भर दुपारी चाकुचा धाक दाखवून २० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.याप्रकरणी गंगाधर पोशट्टी बोधनकर यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुरनं ९ ७ / २०२० कलम ३ ९ २ , भादवि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि सुरेश मांटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत . 

25 August 2020

बिलोली तलाठी संघटनेचे अध्यक्षपदी श्री तोटावाड यांची बिनविरोध निवड

बिलोली  - ता.प्र.  - बिलोली तालुक्यात सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री तोटावाड एल.जी. यांच्या अध्यक्ष खाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत तलाठी सोनवणे यांनी तलाठी संघाच अध्यक्ष डावरगावे व सचिव शेख यांच्या बंदली नायगाव येथे झाली आसता येथील या जागाची रिक्त झाल्याने हि जागा भरण्यात यावा आसा मुद्दा तलाठी सोनवणे यांनी या बैठकीत विचार मांडला आसता सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एकमताने मंडळ अधिकारी श्री तोटावाड एल.जी.व सचिवपदी मेहञे आर.एस. यांची बिनविरोध निवड करण्यात आली व तसेच सर्व तलाठी समावातून अध्यक्ष व सचिव यांना शाल व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आली.यावेळी नरवाडे भा.जा.पा.तालुका अध्यक्ष ,गिरी तलाठी,सोनुले तलाठी,पवन ठकरोड तलाठी,देशमुख तलाठी,आत्तार,अर्शद,काळे,पञकार तथा माजी नगर सेवक लक्ष्मण शेट्टीवार,शेखअतिक शेख चाँद ईत्यादी उपस्थिती होती.

17 August 2020

राज साहेब मला माफ करा .. !सुसाईड नोट लिहून ; किनवटच्या मनसे शहर प्रमुखाने केली आत्महत्या

 नांदेड| राज साहेब मला माफ करा . आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण सुरू आहे . आणि हे दोन्ही माझ्या जवळ नाही . " जय महाराष्ट्र , जय राज साहेब , जय मनसे " अशी सुसाईड नोट लिहून नांदेड मधील किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . सध्या राजकारणात घराणेशाही बरोबरच धन - दांडग्या लोकांचीच अधिक गर्दी आहे . जाती - पातीच्या राजकारणात समाज कार्यातून सर्व - सामान्य , अल्पसंख्याक समाजातून पुढे येण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचे अनेक प्रकरण समोर येत असताना किनवट येथील मनसेचे शहराध्यक्ष सुनील आनंदराव ईरावार यांनी आज रविवार रोजी पैसा आणि जात या समीकरणात आपला टिकाव लागत नसल्याने हताश होऊन आत्महत्या केली आहे . अत्यंत मनमिळाऊ , कुशाग्र बुद्धी व अत्यंत संयमी असलेल्या सुनील ईरावार यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

15 August 2020

वसंतराव चव्हाणाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द

नायगाव :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द आहेत . त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा साजरा होणारा वाढदिवस कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे . त्यामुळे कार्यकर्ते व हितचिंतकांनी वाढदिवसाला प्रत्यक्षात न भेटता , कोणतेही हार - तुरे न आणता घरातच सुरक्षित राहून वाढदिवसानिमित्त सुरक्षित अंतर राखून अभिष्टचिंतन करावे , असे आवाहन माजी आ.वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेआहे १५ ऑगस्ट हा माजी आ.वसंत चव्हाण यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे यंदाही मित्रमंडळाच्या वतीने विविध धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार होता . परंतु राज्यातील परिस्थिती बघता कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे . नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे . वाढदिवसानिमित्त नायगाव येथील पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन करून हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता आपल्या घरीच सुरक्षित राहून अभिष्टचिंतन करावे .विनाकारण घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहा , मास्क चांगले वापरा , स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी , असे आवाहन माजी आमदार वसंत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्ते व हितचिंतकांना केल्याचे मित्रमंडळाने कळविले आहे .


14 August 2020

कुंडलवाडीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळले

बिलोली:गेल्या महिनाभरापासून कोरोनामुक्त असलेल्या कुंडलवाडी शहरात १२ ऑगस्ट रोजी कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असुन शहरातील नरागल्ली भागातील एक व्यक्ती कोरोना बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले . त्यांच्या संपर्कातील १७ जणांचे स्वंब तपासणीसाठी पाठवण्यात आले असुन त्यांचा अहवाल १४ रोजी प्राप्त होणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . बालाजी सातमवाड यांनी दिली . कोरोना बाधीत व्यक्ती अर्जापूर येथील महाविद्यालयाच्या संस्थेतील पदाधिकारी आहे . गेल्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुंडलवाडी शहरात एक पोलीस कर्मचारी , एक पोलीस अधिकाऱ्यांसह अन्य एक जण कोरोना बाधीत झाले होते .त्यानंतर गत महिनाभरापासून कुंडलवाडी शहर कोरोनामुक्त ऑगस्ट रोजी शहरातील नरागल्ली भागातील रहिवासी तथा अर्जापूर येथील । महाविद्यालयाच्या संस्थेतील एक - पदाधिकारी अँटीजेन रॅपीड टेस्टद्वारे पॉझिटीव्ह आढळून आले असून । नरागल्ली भागास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषीत केले आहे . तसेच या भागात आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे - आदेश तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.बाधीत - व्यक्तीच्या संपर्कातील ८ जणांची अँटीजेन रॅपीड टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आले असुन संपर्कातील आणखी १७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असुन त्याचा अहवाल १४ ऑगस्ट रोजी प्राप्त होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ . बालाजी सातमवाड यांनी दिली . शहरात १२ ऑगस्ट रोजी नरागल्ली भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने कोरोनामुक्त कुंडलवाडीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी पॉझिटीव्ह व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली ? नेमका संसर्ग कुठुन झाला ? या सर्वबाबीवर प्रशासनाकडे आजघडीला नेमके उत्तर नसले तरी येत्या काळात हे शोधून काढणे प्रशासनाचे काम आहे . असे झाल्यास शहरात पुन्हा एंट्री झालेली कोरोनाची साखळी तटेल असे मत नागरिकांनी व्यक्त केले


11 August 2020

आज पासून दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत बदल ; जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांचे आदेश

नांदेड: जिल्ह्यातील दुकानांना सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी वेळ दुकाने उघडी ठेवण्यासाठी होती . त्यात आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी थोडासा बदल करुन सकाळी 9 ते सायंकाळी 7 दुकाने उघडी ठेवता येतील , असे आदेश जारी केले आहेत . नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर वेगवेगळे अनेक आदेश लागू झाले . त्यानुसार सुरुवात 14 मार्च 2020 पासून झाली . त्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या तरतुदीचा आधार घेण्यात आला . पुढे हळूहळू लॉकडाऊनमध्ये बदल झाला त्यात आज दि .11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी 19 जुलै 2020 रोजी दिलेल्या आदेशात थोडासा बदल केला आहे .आजपर्यंत शनिवार , रविवार वगळता आठवड्याच्या पाच दिवस दुकाने , आस्थापना सुरु ठेवण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता . आज त्यात थोडासा बदल करुन सकाळी 9 ते सायंकाळी 7 अशा वेळेत दुकाने आणि आस्थापना सुरु राहतील . शनिवार आणि रविवार पूर्ण बंद राहील . साथरोग नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या सूचना पाळत आपली दुकाने सुरु ठेवायची आहेत , असे डॉ . विपीन यांनी आपल्या आदेशात म्हंटले आहे . साथरोग प्रतिबंधक नियमानुसार कोणताही गैरप्रकार झाला तर त्याविरुध्द कायदेशीर कारवाई होईल , असेही या आदेशात नमुद आहे . 


07 August 2020

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड:नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा स्वब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे . चिखलीकर यांच्या सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . यापूर्वी खासदार चिखलीकर यांच्या चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत .नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्याचसोबत आतापर्यंत माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण , आमदार मोहन हंबर्डे , आमदार अमरनाथ राजूरकर , आमदार माधवराव पाटील जवळगाकवर यांच्यासह भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगाकवर , महानगराध्यक्ष प्रवीण साले आदींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे . वरील राजकीय मंडळीनी कोरोनावर मात केलेली आहे . खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून खासदार चिखलीकर हे सुद्धा औरंगाबाद येथेच आहेत . गुरुवारी रात्री खासदार चिखलीकर यांचा स्वब कोरोना पॉझिटीव्ह आला , असून त्यांच्यावर सुद्धा औरंगाबाद येथेच उपचार सुरु आहेत , असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले .


निवासी शाळांकडून निकालाची परंपरा यंदाही कायम- तेजस माळवदकर

नांदेड:सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या धरतीवर सुरु करण्यात आलेल्या निवासी शाळेच्या माध्यमातून निकालाची उज्जव परंपरा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे . यंदाही निवासी शाळांचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल आला आहे , अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली . सामाजिक न्याय विभागाच्या चार निवासी शाळा नांदेड जिल्ह्यातील हदगाव , माहूर , उमरी व नायगाव येथे आहेत . यात हदगाव येथील अनुसूचित जाती मुलींच्या शाळेतील 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यामध्ये पुजा मोहन चुंगरराव हिने 91.80 , आश्विनी संतोष मुरमुरे हिने 91.20 , मिनाक्षी शंकर कदम हिने 90. 60 टक्के गुण मिळविले . माहूर येथील मुलींच्या शाळेतील 38 मुलींनी यश मिळविले.पुजा सुधाकर मारेराव हिने 82.80 , पुजा विजय डाकोरे हिने 82.40 टक्के , निकिता अविनाश सावते हिने 82.20 टक्के घेतले . उमरी येथील मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.आहेत . यात दत्ता प्रसाद पवार याने 88.40 , गंगाधर तुपसाखरे याने 85.80 , राहुल बुद्धवाड याने 77.80 तर नायगाव येथील शाळेतील 34 मुले उत्तीर्ण झाले . यात सुशीलकुमार गजभारे याने 93 टक्के , बुद्धभूषण मारोती कांबळे याने 89. 20 तर सुरेश संदीप सोनटक्के याने 87.60 टक्के असे गुण मिळविले . या यशाचे श्रेय अभ्यास करणारे विद्यार्थी , या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर अथक मेहनत घेणारे मुख्याध्यापक व शिक्षकांना जाते तेजस माळवदकरः समाजकल्याण सहाय्यक आयुक्त 


05 August 2020

त्या वादावर माझ्या बाजुने पडदा टाकतो :आमदार राजेश पवार

नायगाव :तालुक्यातील नावंदी येथील मोहनलाल ठाकुर यांच्याशी भाजपचे आमदार राजेश पवार यांनी भ्रमध्वनीवरील चर्चेदरम्यान अर्वांच्च भाषेचा वापर केला . या प्रकाराची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे . या प्रकरणी राजेश पवार यांनी खुलासा करत या प्रकरणी माझ्या तोंडून त्याला समजावण्याच्या भरात नाने चुकीचे बोलले गेले . त्यामुळे या वादावर माझ्याबाजुने पडदा टाकतो , असे राजेश पवार यांनी जाहीर केले . ते म्हणलो , की एक लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासकीय बैठका आणि लोकोपयोगी अभियान , या व्यतिरिक्त इतर जाहीर समारंभांना जाणे मी सध्या जाणीवपूर्वक टाळत आहे , लोकप्रतिनिधी गावात गेल्याने लोक जमा होतात आणि गर्दी होवून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो . यामुळेच मी गावांच्या भेटी कोरोनाच्या प्रसार काळात स्थगित केल्या होत्या , मात्र लोकांशी फोन द्वारे संपर्क साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याकरिता मी आणि माझे कार्यालय सतत कार्यरत आहे . अश्या पार्श्वभूमीवर मला परवा एका नागरिकाने मला फोन केला , मी त्याना वारंवार काय अडचण आहे असे विचारुनही ते मला गावात या अशी मागणी करू लागले आणि आता आला नाहीत तर यापुढे ही पुन्हा गावात येवू नका असे बोलले , त्याच्या या बोलण्यावर ते असे जनुनबुजुन करित असल्याचा माला संशय आला आणि संतापून माझ्या तोंडून त्याला समजावण्याच्या भरात अनवधानाने चुकीचे बोलले गेले . लोकप्रतिनिधी असले तरी देखील तो माणूस च असतो आणि कधी तरी भावनेच्या भरात चुकीचा शब्द निघून जातो मतदारसंघाचा आमदार म्हणजेच पालक या नात्याने मात्र मतदारसंघातील सर्व नागरिक हे मला माझ्या कुटुंबांसारखेच आहेत , याची मी आपणा सर्वांना खात्री देतो आणि या वादावर माझ्याबाजुने पडदा टाकतो . 

 माझ्या विरोधकांनी आणि अवैध धंदे करणाऱ्यानी असे किती हि षड्यंत्र माझ्या विरुध्द या पुढे ही रचले तरि सुद्धा मी संयमाने मतदारसंघातील लोकोपयोगी विकास कामे आणि मतदारसंघातल्या सोयीसुविधा याबाबत प्रशासनासोबत चालू असलेला पाठपुरवठा चालुच राहणार आणि गोरगरीब , शेतकरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध आणि मतदार संघातिल अवैध धंद्या विरुद्ध माझा लढा या पुढेही चालूच राहणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले . 


पोलीस अधीक्षक मगर यांच्याकडून महत्वाची सूचना

नांदेड:उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दि .5 रोजी आहे . या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजूकर टाकू नये , पुढील दक्षता म्हणून ओन्ली अडमिन असे सेटिंग करावे , असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे . मंगळवारी दि .4 आगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे , की आयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन बुधवारी होणार आहे.राम मंदिर उभारणी संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे . या निकालाचा आदर करण्यात यावा.त्यामुळे कुणाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह पोस्ट करू नये , अशा आक्षेपार्ह पोस्ट करणारावर नांदेड सायबर सेलची करडी नजर असणार आहे . दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला . पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते , की काही लोक धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंवा नकळत पोस्ट करू शकतील . त्यामुळे व्हाट्स अपचे ग्रुप चालविणाऱ्या अडमीन चालकांनी व्हाट्स अपच्या सेटिंगमध्ये जाऊन मॅनेज सेन्ट सेटिंग ओन्ली अडमीन असा अवलंब करावा , असे आवाहन मगर यांनी केले .

शिक्षकाच्या मुलाची युपीएससी परीक्षेत यशाला गवसणी

नायगाव : -केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवार दि . 4 रोजी जाहीर झाला.नायगाव तालुक्याच्या शेळगांव ( गौरी ) येथील योगेश अशोक बावणे यांनी यूपीएससी परीक्षेत 63 वा रँक मिळविला . योगेश बावणे यांचे वडिल हे जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक आहेत . योगेश बावणे हे नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील असून त्यांचे शालेय शिक्षण शेळगांव गौरी येथील जिल्हा परिषदेत झाले आहे . तर उच्च माध्यमिक शिक्षण हे कै.रामचंद्र पा.मा.विद्यालय शेळगांव गौरी येथे झाले . शेळगांव गौरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन योगेश अशोक बावणे यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन करत गावाचे नाव जिल्ह्याभरात रोषण केले . या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे . 


04 August 2020

बिलोली तालुक्यातील 17 पॉझिटिव्ह

बिलोली : शहरापाठोपाठ कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असून गत आठवड्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे . २ ऑगस्ट रोजी बिलोली शहरात ७ , येसगीत ८ तर कार्ला फाटा येथे १ असे तब्बल १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले . कासराळी , मिनकीनंतर येसगी , कार्ला गाव कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे . त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . आता तालुक्याची संख्या ६० वर केली आहे . बिलोली तालुक्यातील येसगी व बिलोली येथील त्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची रॅपिड किटद्वारे चाचणी केली असता तब्बल १६ जण बाधित आढळून आले . त्यांना कोविड सेंटर येथे दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्वांचे कोरोना स्वब तपासले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली . गत २ महिन्यांत केरुर , चिंचाळा , आरळी , नागणी , कुंडलवाडी , सगरोळी व मिनकी पाठोपाठ येसगी व कार्ला येथेही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे .उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरोग्य चमूद्वारे दारोदारी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे . आजारी व्यक्तींना वेळीच औषधोपचार व सल्ला दिला जात आहे . सदर बाधित रुग्ण आढळून आलेली गावे कंटेन्मेंट झोन करुन कोरोनाला गाव , शहराबाहेर करण्यासाठी तहसीलदार , विक्रम राजपूत , तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर , मुख्याधिकारी डॉ.ओमप्रकाश गोंड , तलाठी , ग्रामसेवक , पोलीस पाटील , गावसमिती आदी सहकार्य करीत आहेत .