मुखेड: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे लोकसहभागतून जमा केलेल्या निधीमधून ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.या ग्रंथालयाचे उद्धघाटन मुखेड कंधार मतदार संघाचे उमेदवार काँग्रेस चे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पा . मंडलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.मुखेड तालुक्यात जयंती निमित्ताने कुठे तरी पहिल्यांदाच ग्रंथालय सुरू करून खया अर्थाने जयंती साजरी करण्यात आली . त्यामुळे चोंडी या गावातील तरूणांचे आज तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे .तालुक्यात सर्वत्र जयंतीनिमित्ताने मोठ्या डिजी लावून , ढोल ताशा वाजवून नाचत गाजत गावात मिरवणूक काढून जयंती साजरी केली जाते . त्यात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जाते , मात्र चोंडी येथील तरूणानी अशा प्रकारचे कुठलेही खर्च न करता त्यांनी अनावश्यक खर्च टाळून , त्या पैशातून लोकशाहिर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अणाभाऊ साठे सामाजिक ग्रंथालया स्थापना करून आज तालुक्याला एक आदर्श घालून दिले .त्यामुळे नाचून गाजून डिजी लावून मिरवणूक काढून मोठेपणा दाखवण्यापेक्षा लिहून - वाचून मोठे व्हावे यासाठी या गावात ग्रंथालयाची सुरूवात करण्यात आली , असल्याचे गावातील जयंती मंडळाच्या तरूणानी सांगितले.तर गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी या ग्रंथालयाला प्रंचड विरोध्द करण्याचा प्रयत्न केले पण त्याच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही गावात ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन ते पुर्ण केले आहे .ग्रंथालयात स्पर्धा परिक्षा , पोलीस भर्ती , या बरोबरच अंवतर वाचणाचे पाचशे च्या वर पुस्तकी आणले आहे.आजून पुस्तकी आणार असल्याचेही त्यांनी सांगितले .यावेळी जयंती मंडाळाच्या प्रमुखांनी भाऊसाहेब पा . मंडलापूरकर यांच्या कडे ग्रंथालयासाठी चांगली रूम बांधून द्यावी अशी मागणी केली होती.त्यामुळे भाऊसाहेब मंडलापूरकर यांनी ते मान्य केले आणि पुढच्या जयंतीच्या अगोदर निधी मंजूर करून रूम बांधून देण्यासाठी पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांच्या कडे मागणी करून निधी मंजूर करून आणून देणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले .यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीती म्हणून काँग्रेस चे नेते भाऊसाहेब मंडलापूरकर , माधव पाटील उंद्रीकर , प्रा . विश्वनाथ कंधारे , उत्तमकुमार कांबळे , पत्रकार पवन जगडमवार , बसापूरे सर , रिपब्लीकन सेना चे अनिल शिरसे , भिम आर्मी वायवळे सर गावाचे सरपंच राजू पाटील , मा.सरपंच पांडूरंग कंधारे अदिचे प्रमुख उपस्थिती होती . तर या ग्रंथालयासाठी विशेष परिश्रम घेणारे जयंती मंडळाचे गावातील तरूण मनोहर नागराळे , गणपत कंधारे , ज्ञानेश्वर कंधारे रामेश्वर कंधारे , अविनाश कंधारे ,नवनाथ कंधारे,सुनिल नागमोड , अशोक कंधारे , वैभव कंधारे अदिने परिश्रम घेतले होते .
31 August 2020
Home »
» नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा - मनोहर नागराळे







0 comments:
Post a Comment