जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 August 2023

ओमप्रकाश देवडा को-ऑपरेटिव बँके शाखा भोकर येथे ग्राहक वृद्धी सप्ताह साजरा.

भोकर ता प्र:ओमप्रकाश देवडा को-ऑपरेटिव बँक शाखा भोकर येथे दिनांक 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान ग्राहक वृद्धी सप्ताह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे तालुका उपाध्यक्ष कमलाकर बरकमकर ज्येष्ठ सदस्य संभाजी कदम यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाखा अध्यक्ष अनिल चिंतावार, शाखा अधिकारी के. व्ही .आर शास्त्री कर्मचारी आर. एम. बंगरुळे ,व्ही. व्ही बिटोडे ,अपेक्षा भुमकर, सारिका येलेकर, नंदकुमार तावडे ,गिरीश खरवडकर आदींची उपस्थिती होती तदनंतर बँकेचे ग्राहक कसे वाढवता येतील व ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवून ग्राहकांचा,वेळ वाचवून तत्पर सेवा कशी देता येईल व जास्तीत जास्त फायदा कसा होईल,त्याचं बरोबर व्यापारी,नोकरदार,छोटे मोठे उद्योग धांदेवाले यांचा विश्वास संपादन कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तर शाखा अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

27 August 2023

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांचं प्लॅनिंग, स्वागताला २१ जेसीबी आणले, पोलिसांचा एक निर्णय अन्...

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली मध्ये सभा पार पडणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे हे मुंबईहून नांदेड विमानतळावर दाखल होऊन हिंगोलीला पोहोचले आहेत. नांदेडमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी प्लॅनिंग केलं होतं.शिवसैनिकांनी केलेल्या संपूर्ण प्लॅनिंगवर पोलिसांच्या एका निर्णयानं पाणी फेरलं. यामुळं शिवसैनिकांचा हिरमोड झाला. नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून असा निर्णय घेतला गेल्याची टीका केली आहे.शिवसैनिकांची जंगी स्वागताची तयारी पण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज हिंगोलीत सभा होणार आहे. यासभेला नांदेडमार्गे जाण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड विमानतळावर येणार होते. त्यामुळं शिवसैनिकांकडून ठाकरेंच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. नांदेडच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी २१ जेसीबी आणण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी याला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना वेगळा निर्णय घ्यावा लागला.जेसीबी परत पाठवण्याची वेळ
पोलिसांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबींच्या वापराला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना सर्व जेसीबी माघारी पाठवावे लागले. पोलिसांनी विमानतळाबाहेरील जेसीबीद्वारे करण्यात येणाऱ्या स्वागताला परवानगी नाकारली. यामुळं जेसीबी परत पाठवण्यात आले.दबावामुळं परवानगी नाकारल्याचा आरोप
नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नांदेड विमानतळावर येणार आहेत. याच कारणातून परवानगी नाकारल्यात आल्याचा आरोप शिवसेनेने सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे.

26 August 2023

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे विस्तारीकरण

भोकर:राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे काल विस्तारीकरण करण्यात आले.या विस्तारीकरणात भोकर येथील कापड असोशिएशन चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक,डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे विद्यमान संचालक व पत्रकार सारंग मुदडा,सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार राजेश चंद्रे,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार रमाकांत जोशी,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार विनय दुर्केवार या ४ नुतन पत्रकार बांधवांचा समावेश करण्यात आला असून सहसचिव, सहसंघट,सल्लागार व सदस्यपदी उपरोक्त बांधवांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,पदाधिकारी प्रा.आर.के. कदम,विजयकुमार चिंतावार,कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,गजानन गाडेकर,विशाल जाधव,संदेश कांबळे यांसह विशेषतः जेष्ठ पत्रकार उत्तम कसबे व पत्रकार सुभाष नाईक यांची उपस्थिती होती.
सर्व उपस्थितांनी नुतन पदाधिकारी पत्रकार बांधवांचे स्वागत, सत्कार व अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...
उत्तम बाबळे,संपादक
मराठवाडा महासचिव आणि सर्व सन्माननिय पदाधिकारी बांधव राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर

16 August 2023

महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांची बदलीचे औचित्याने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने कर्तव्यपुर्ती गौरव करण्यात आला

भोकर: पोलीस ठाण्यात गेली २ वर्ष अतिशय उत्कृष्ट व न्यायीक कर्तव्य सेवा बजावणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांची पोलीस ठाणे गंगाखेड जि.परभणी येथे बदली झाली आहे.या औचित्याने आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने कर्तव्यपुर्ती गौरव पाठवणी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पो.उप.नि.दिगांबर पाटील, ताईंचे पती अरुण बर्डे,पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वांनी पो.उप.नि.राणी भोंडवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्याना पुढील कर्तव्य सेवेसाठी आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के.कदम,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार,कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,सहसचिव विठ्ठल सुरलेकर, पदाधिकारी गजानन गाडेकर, अंबादास बोयावार,विशाल जाधव,पोलीस नायक सय्यद मोईन यांसह आदी जणांची उपस्थिती होती.

 

पांडुरणा येथे सैनिकांचा सन्मान करुन साजरा केला स्वतंत्र दिवस

[ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ]

भोकर: तालुक्यातील पांडुरणा येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन सैनिकांच्या उपस्थित मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला असुन पांडुरणा गावातील जि. प. प्रा. शाळा येथील ध्वजारोहण सीआरपीएफ चे माजी सैनिक साहेबराव नामदेव वने यांच्या हस्ते करण्यात आला तर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण भारतीय सेनेचे माजी सैनिक मेजर हायुन पठाण यांच्या हस्ते करण्यात आला.
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कडून सैनिकांचा सन्मान व वृक्षारोपण करण्यात आले.
ध्वजारोहण झाल्यानंतर भोकरचे उपविभागीय अधिकारी अनुपमसिंग यादव यांच्या हस्ते शहिद जवान स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
 त्या नंतर भारत मातेच्या रक्षणासाठी आपले अमूल्य योगदान देणाऱ्या पांडुरणा गावचे भुमिपुत्र माजी सैनिक मेजर हायुन पठाण , माजी सैनिक साहेबराव वने,माजी वनरक्षक किशन राजेमोड, आरोग्य विभातील सुग्रीव डाकोरे या सह गडचिरोली येथे राज्य राखीव दलात कर्तव्यावर असलेले सूर्यकांत राजेमोड, शिवानंद हल्लेवाड, संतोष डाकोरे आणि शहिद जवान बालाजी डाकोरे व मारोती राजेमोड यांच्या कुटुंबीयांचा सन्मान कमलाकर बरकमकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय पांडुरणा यांच्या वतीने करण्यात आला.
संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सव अभियान वर्षभरापासून राबविण्यात येत आहे .
या मोहत्सवाचा समारोप मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अंतर्गत पांडुरणा गावातही गावचे सुपुत्र शहिद जवान बालाजी डाकोरे व मारोती राजेमोड यांच्या शिलाचे अनावरण गावच्या सरपंच सौ.गंगा बालाजी दासरवाड, व माजी सैनिक मेजर हायुन पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.व या वेळी पंचप्रण शपथही घेण्यात आली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव निमलवाड, गोविंद डाकोरे, संतोष दर्शनकर,रामधन राठोड ग्रामसेवक पानेवार,प्रतिष्ठित नागरिक खिरोजी गोविंदवाड,किशन डाकोरे,माजी सरपंच आनंदा लोखंडे, सुनिल मदनवाड,दगडु निमलवाड,मारोती राजेमोड, इम्रान जहागीरदार यासह सर्व सैनिकांचे कुटुंबीय जि.प.शाळेचे सर्व शिक्षक या सह गावातील आदी गावकर्यांची उपस्थित होते.

12 August 2023

भोकर ग्रामीण रुग्णालयातील चोरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील १ आरोपी अटकेत.

[ पोलिसांनी आरोपी कडून १९०००० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत ]

भोकर  : शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दि. २४.०७.२०२३ रोजी चोरी झाल्याची अज्ञात इसमाविरोधात तक्रार रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी भोकर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्यावरून आरोपी निष्पन्न करून त्यातील एका आरोपीस भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले व त्या आरोपी कडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
       ग्रामीण रुग्णालय भोकर यांना रूग्णालयात बसविण्याकरीता शासनाकडून जवळपास सात महिण्यापूर्वी ०१ मेट्रिक टन च्या दोन एअर कंडीशनर मिळाल्या होत्या परंतू त्या काही कारणास्तव त्या बसविण्यात आल्या नसल्याने त्या जश्या आल्या तश्याच बॉक्समध्ये एका रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या ते एअर कंडीशनर दि. २१ जुलै २०२३ ते २४ जुलै २०२३ या चार दिवसांत चोरीस गेल्याची तक्रार रुग्णालयातील अधिकारी एस. एन. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीसात गु.र.नं. २६३/२०२३ कलम ४५४,४५७,३८० भा. द. वि. कायद्या प्रमाणे अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यानुसार पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला त्याप्रमाणे तपासाची चक्रे फिरवित गोपनीय माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार व सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केले व यातील एक आरोपी नामे व्यंकट गोविंद निल्लेवाड (२५) समता नगर भोकर यास दि.06.08.2023 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर त्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून पी सी आर घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले व रुग्णालयातून चोरीस गेलेले २ एअर कंडीशनर असलेले ४ बॉक्स ज्याची अंदाजे किंमत रूपये १९०००० किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून ताब्यात घेतले आहे. सदरील गुन्ह्याचा तपास चालू असून यात अजुन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
       सदरील गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनीरीक्षक दिगंबर पांडुरंग पाटील हे करत असून यांच्यासह पो.हे. काँ. नामदेव जाधव, सोनाजी कानगुले ,पो.ना. सय्यद मोईन, पोलीस शिपाई प्रमोद जोंधळे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे.

11 August 2023

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार तर कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर...


नांदेड: येथील पत्रकारितेतील निर्भीड व्यक्तिमत्व, शोध बातमीत ज्यांचा हातखंडा जबरदस्त असणारे व आंबेडकर चळवळीत सामाजिक तसेच समाज प्रबोधनावर बातम्या प्रकाशित करून बहुजन, कामगार, शेतमजूर, कष्टकरी, समाजाच्या प्रश्नावर अन्यायाला वाचा फोडणारे, स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलेले दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नावर अन्यायाला वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक शंकर सिंह ठाकुर व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसाचे संपादक मारोती शिकारे या दोघांच्याही कार्याची दखल घेऊन त्यांची दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा सन २०२३ यावर्षीचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार" व "महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार" जाहीर झाला आहे.
   हा फेलोशिप पुरस्कार दिल्ली येथे दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी देशातील व विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनांक्षर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
   यापूर्वीही पत्रकारितेतील कार्य व सामाजिक कार्य यांची नोंद घेऊन त्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार व जिल्हास्तरीय अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता सन २०२३ मध्ये पण त्यांच्या शिरोपेचात नवीन पुरस्काराचे तुरे लावण्यात आले आहेत. हा फेलोशिप पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शंकर सिंह ठाकुर व मारोती शिकारे यांच्यावर राजकीय, सामाजिक, मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

लाच प्रकरणी भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना दिली १ वर्षांची शिक्षा

एक जण पोलीस नायक तर दुसरा पोलीस पाटील असून उपरोक्त शिक्षेसह दोघांनाही लावला प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड 
भोकर : सन २०१६ मध्ये भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेल्या एका पोलीस नायकाने व लगळूद ता.भोकर येथील तत्कालीन पोलीस पाटलाने एका गुन्ह्यातील आरोपीस लॉकअप मध्ये टाकण्याची भिती दाखवून आणि लवकर जामीन करुन देतो असे सांगून पारितोषण म्हणून ५ हजार रुपयांची लाच घेतली होती. सबळ पुराव्यांनी ते दोषी सिद्ध झाल्यावरुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. वाय.एम.एच.खरादी यांनी दि.११ ऑगस्ट रोजी उपरोक्त दोघांनाही १ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लगळूद ता.भोकर येथील शेतकरी दिगांबर गणपत बागडे यांच्या विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात त्यांना अटक करुन लॉकअप मध्ये टाकण्याची भिती दाखवून व लवकर जामीन करुन देण्याचे सांगून त्या गुन्ह्यांचे तपासणीक पोलीस नायक शिवराज विश्वांबर टरके यांनी दिगांबर बागडे यांना पारितोषणापोटी ५ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबद दिगांबर बागडे यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड यांच्याकडे रितसर तक्रार केली होती.यावेळी पंचासमक्ष तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले व लोकसेवक लगळूदचे तत्कालीन पोलीस पाटील संजय उमाकांत राजुरे यांनी तक्रारदार यांच्या कडून ५ हजार रूपये घेऊन शिवराज टरके यांना देऊन जामीन करून घेण्याचा पाठपुरावा करतांना दि.२९ जुलै २०१६ रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग,नांदेड च्या पोलीस पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.तसेच तत्कालीन पोलीस नायक शिवराज टरके व पोलीस पाटील संजय राजुरे यांच्या विरुद्ध भोकर पोलीसात गु.र.नं.१७२/२०१६, कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याच्या सखोल तपासाअंती लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड चे तपासिक अंमलदार दयानंद मुरलिधर सरवदे यांनी विशेष खटला क्र.०६ /२०१६, शासन वि.शिवराज टरके व ईतर असे दोषारोपपत्र भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात मा.न्यालयाने सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षिदार तपासले.तसेच आरोपीचे वकील व सरकारी अभियोक्ता ॲड.सौ.शैलजा अनिल पाटील यांच्यात झालेला युक्तीवाद आणि सबळ पुराव्यांवरून उपरोक्त दोन्ही लोकसेवकांनी सरकारी परिश्रमिके शिवाय पारितोषण म्हणून स्वतःसाठी पैशाच्या स्वरुपात लाभ तथा लाच मिळविण्याची कृती केल्याचे सिद्ध झाले. यावरुन ते दोघे दोषी ठरल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.वाय.एम.एच.खरादी यांनी दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस नायक शिवराज विश्वांबर टरके व पोलीस पाटील संजय उमाकांत राजुरे यांना कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्ये १ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास साध्या कारावासी शिक्षा सुनावली आहे.तर न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून प्रदिप कंधारे यांनी काम पाहिले आहे.

09 August 2023

डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ भोकरच्या अध्यक्षपदी अविनाश वाघमारे;तर सचिवपदी चंद्रकांत बाबळे

भोकर : विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यास्तव दि.८ ऑगस्ट रोजी भोकर येथे समाज बांधवांची एक महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली व या बैठकीत सर्वानुमते डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ भोकरच्या अध्यक्षपदी अविनाश वाघमारे,तर सचिवपदी चंद्रकांत बाबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात भोकर येथे दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी समाज भुषण संपादक उत्तम बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली समाज बांधवांची एक महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली.तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे,राजन्ना माहूरकर,के.वाय.देवकांबळे,दिलीप वाघमारे,अशोक निळकंठे,के.एम. गोणेकर,पांडूरंग सुर्यवंशी,शिवकुमार गाडेकर,सखाराम वाघमारे,गणपत सुर्येस्कर,बालाजी वाघमारे,अनिल डोईफोडे,श्याम वाघमारे,साहेबराव भालेकर,देवराव मनपुर्वे,बबलू काळे, राहूल शेळके,शंकर दिवटेकर यांसह बहुसंख्य समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.तसेच हा सोहळा साजरा करण्यासाठी डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ भोकरची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

उर्वरित जयंती मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे,उपाध्यक्षपदी गजानन गाडेकर,रवि किनीकर,सहसचिव साहेबराव झुंजारे,कोषाध्यक्ष सुभाष भालेराव,सहकोषाध्यक्ष शंकर देवकुळे,संघटक अजय गव्हाळे, सहसंघट आकाश भालेराव यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून उपरोक्त सर्व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून सर्व समाज बांधव असतील असे ठरविण्यात आले.यावेळी उपस्थितांनी नव नियुक्त सर्व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,बस स्थानका समोर भव्य आतिशबाजी करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

05 August 2023

मेरी मिट्टी मेरा देश' अभियान यशस्वीतेसाठी भोकर येथे ग्रामसेवकांची आढावा बैठक संपन्न

'भोकर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियान देशभर राबविले जात आहे.भोकर तालुक्यात ही हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून सदरील अभियान यशस्वीतेसाठी दि.४ ऑगस्ट रोजी भोकर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक व संबंधितांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे.हे अभियान उत्साही स्वरूपात व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांनी दिली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन,वीरों को वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याच अनुषंगाने दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती भोकर च्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक व संबंधितांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली आहे.प्रत्येक राज्यातील गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती,प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी आणि या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता 'मेरी मिट्टी मेरा देश' हे अभियान राबविण्यात येत आहे.त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील गावांत संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करणे,दोन मूठ माती घेऊन कलश तयार करून तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरा- वरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविणे,त्यासाठी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.हे अभियान दि.९ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जाणार आहे.'मेरी मिट्टी मेरा देश' या अभियानामध्ये प्रमुख पाच उपक्रमांचा समावेश असून त्यांची अंमलबजावणी व अभियान यशस्वीतेसाठी ही बैठक घेण्यात आली आहे.त्या ५ उपक्रमांत गावातील एका संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणे,त्यावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो,नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव,दिनांक,देशाचे पंतप्रधान यांचा संदेश,स्थानिक शहीद वीरांची नावे,'मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीरांना विनम्र अभिवादन' असे वाक्य त्या शिलाफलकावर नमूद करणे.तसेच देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून योग्य जागा निश्चित करून " वसुधा वंदन" म्हणून विविध देशी प्रजातींच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करणे,याच बरोबर ज्यांनी देशासाठी,स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान केले अशा सरंक्षण दल,निम संरक्षण दल,पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी किंवा माजी सैनिकांचा सन्मान करणे.तसेच स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी,शासकीय कार्यालये,ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सामुहिक प्रतिज्ञा घेणे.राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहन कार्यक्रम आयोजित करणे,यासह आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी उपरोक्त अभियान नियोजनबद्ध राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.याच अनुषंगाने भोकर येथे घेण्यात आलेल्या बैठकीस मार्गदर्शक म्हणून भोकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पं)एस.आर कांबळे,कृषि अधिकारी संदीप कोस्केवाड,एस.टी.शेटवाड,सिद्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.तर भोकर पंचायत समिती अंतर्गतच्या ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,नोडल अधिकारी,केंद्र प्रमुख यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.या आढावा बैठकीत उपस्थितांनी हे अभियान उत्साही स्वरूपात व नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही राबवू असे वरिष्ठांना आश्वस्त केले आहे.

02 August 2023

सजीव शब्द साहित्य संपदेचे श्रीमंत धनी अण्णा भाऊ साठे - उत्तम बाबळे

भोकर बस आगारात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा

भोकर : विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य संपदेतील प्रत्येक शब्द,ओळ सजीव आहे.त्या सजीव शब्दांनी त्यांच्या साहित्यातील 'फकिरा' सह अनेक नायक, नायीकांना अजरामर केले आहे.ती सजीव शब्द साहित्य संपदा आज जगातील अनेक देशांत विविध भाषेतून भ्रमण करत आहे.म्हणूनच अण्णा भाऊ साठे हे सजीव शब्द साहित्य संपदेचे श्रीमंत धनी आहेत, असे प्रतिपादन साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, भोकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने दि.१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेल्या जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आगार भोकर येथील अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या वतीने आगारात दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांची,तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जळबाजी गायकवाड,नामदेव वाघमारे,शाहीर के.वाय.देवकांबळे,सौ.राजश्री ब्राम्हणे-भालेराव,सेवानिवृत्त कर्मचारी हैबते,सायलू काळे,शिवकुमार गाडेकर,संतोष सुर्यवंशी,दिवटे यांसह आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भोकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत, यशवंत पाल्यांचा 'फकिरा' ही कादंबरी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर जळबाजी गायकवाड,के.वाय. देवकांबळे यांनी प्रकाश टाकला.तर अध्यक्षिय समारोप आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांनी केला.तसेच प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,महान साहित्यिक तथा संयुक्त महाराष्ट्राचे अग्रणी नेते अण्णा भाऊ साठे यांनी उगीच नाही म्हटलं होतं की,'यह आझादी झुठी है,देश की जनता भुखी है !' त्यांनी सत्य वदन केल्याचा प्रत्यय देश स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पुर्ण झाल्यावर ही पदोपदी येत आहे. आजही देशात महिला,गरीब, शोषित,पिडीत,दलित,वंचितांवरील अन्याय अत्याचार होणे थांबले नाहीत.मणिपूर मध्ये महिला भगिणींची नग्न धिंड काढल्याची घटना अगदी ताजी आहे,ही निषेधार्थ व लज्जास्पद बाब आहे.यामुळेच प्रश्न पडतो की खरच येथील काही नागरिकांना लोकशाहीत स्वातंत्र्य मिळाले आहे काय ? म्हणूनच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी उद्गारलेल्या उपरोक्त शब्द,ओळी व त्यांची साहित्य संपदा आजही सजीव असल्याचे तुम्हा आम्हास मान्य करावेच लागणार आहे.असे ही ते म्हणाले.संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक,सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.एस.चटलावार यांनी केले.तर सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी भोकर आगारातील पाळी प्रमुख एन.जी. ठाकूरवाड,यु.जी.शकदम,जे.ए. सुर्यवंशी,आर.एस.पवार,आर.एन.गजभारे,एन.एस.पोतरे,एम.व्ही.मोरे,बी.पी.शिवेवार,एम.पी. वन्ने,एस.एम. सोनकांबळे,एस.डी.ससाने,आर.बी.सोनटक्के,एन.एच.वाघमारे,डी.बी.मेकाले,पी.डी.संत्रे,व्ही.के.ढवळे यांसह आदींनी परिश्रम घेतले.या सोहळ्यास आगारातील चालक,वाहक,यांत्रिकी यांसह बहुसंख्य महिला,पुरुष कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.