भोकर ता प्र:ओमप्रकाश देवडा को-ऑपरेटिव बँक शाखा भोकर येथे दिनांक 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान ग्राहक वृद्धी सप्ताह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे तालुका उपाध्यक्ष कमलाकर बरकमकर ज्येष्ठ सदस्य संभाजी कदम यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाखा अध्यक्ष अनिल चिंतावार, शाखा अधिकारी के. व्ही .आर शास्त्री कर्मचारी आर. एम. बंगरुळे ,व्ही. व्ही बिटोडे ,अपेक्षा भुमकर, सारिका येलेकर, नंदकुमार तावडे ,गिरीश खरवडकर आदींची उपस्थिती होती तदनंतर बँकेचे ग्राहक कसे वाढवता येतील व ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवून ग्राहकांचा,वेळ वाचवून तत्पर सेवा कशी देता येईल व जास्तीत जास्त फायदा कसा होईल,त्याचं बरोबर व्यापारी,नोकरदार,छोटे मोठे उद्योग धांदेवाले यांचा विश्वास संपादन कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तर शाखा अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.







0 comments:
Post a Comment