जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 August 2023

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे विस्तारीकरण

भोकर:राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे काल विस्तारीकरण करण्यात आले.या विस्तारीकरणात भोकर येथील कापड असोशिएशन चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक,डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे विद्यमान संचालक व पत्रकार सारंग मुदडा,सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार राजेश चंद्रे,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार रमाकांत जोशी,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार विनय दुर्केवार या ४ नुतन पत्रकार बांधवांचा समावेश करण्यात आला असून सहसचिव, सहसंघट,सल्लागार व सदस्यपदी उपरोक्त बांधवांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,पदाधिकारी प्रा.आर.के. कदम,विजयकुमार चिंतावार,कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,गजानन गाडेकर,विशाल जाधव,संदेश कांबळे यांसह विशेषतः जेष्ठ पत्रकार उत्तम कसबे व पत्रकार सुभाष नाईक यांची उपस्थिती होती.
सर्व उपस्थितांनी नुतन पदाधिकारी पत्रकार बांधवांचे स्वागत, सत्कार व अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...
उत्तम बाबळे,संपादक
मराठवाडा महासचिव आणि सर्व सन्माननिय पदाधिकारी बांधव राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर

0 comments:

Post a Comment