[ पोलिसांनी आरोपी कडून १९०००० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत ]
भोकर : शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दि. २४.०७.२०२३ रोजी चोरी झाल्याची अज्ञात इसमाविरोधात तक्रार रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी भोकर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्यावरून आरोपी निष्पन्न करून त्यातील एका आरोपीस भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले व त्या आरोपी कडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
ग्रामीण रुग्णालय भोकर यांना रूग्णालयात बसविण्याकरीता शासनाकडून जवळपास सात महिण्यापूर्वी ०१ मेट्रिक टन च्या दोन एअर कंडीशनर मिळाल्या होत्या परंतू त्या काही कारणास्तव त्या बसविण्यात आल्या नसल्याने त्या जश्या आल्या तश्याच बॉक्समध्ये एका रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या ते एअर कंडीशनर दि. २१ जुलै २०२३ ते २४ जुलै २०२३ या चार दिवसांत चोरीस गेल्याची तक्रार रुग्णालयातील अधिकारी एस. एन. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीसात गु.र.नं. २६३/२०२३ कलम ४५४,४५७,३८० भा. द. वि. कायद्या प्रमाणे अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यानुसार पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला त्याप्रमाणे तपासाची चक्रे फिरवित गोपनीय माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार व सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केले व यातील एक आरोपी नामे व्यंकट गोविंद निल्लेवाड (२५) समता नगर भोकर यास दि.06.08.2023 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर त्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून पी सी आर घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले व रुग्णालयातून चोरीस गेलेले २ एअर कंडीशनर असलेले ४ बॉक्स ज्याची अंदाजे किंमत रूपये १९०००० किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून ताब्यात घेतले आहे. सदरील गुन्ह्याचा तपास चालू असून यात अजुन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
सदरील गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनीरीक्षक दिगंबर पांडुरंग पाटील हे करत असून यांच्यासह पो.हे. काँ. नामदेव जाधव, सोनाजी कानगुले ,पो.ना. सय्यद मोईन, पोलीस शिपाई प्रमोद जोंधळे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे.







0 comments:
Post a Comment