जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 August 2023

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार तर कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर...


नांदेड: येथील पत्रकारितेतील निर्भीड व्यक्तिमत्व, शोध बातमीत ज्यांचा हातखंडा जबरदस्त असणारे व आंबेडकर चळवळीत सामाजिक तसेच समाज प्रबोधनावर बातम्या प्रकाशित करून बहुजन, कामगार, शेतमजूर, कष्टकरी, समाजाच्या प्रश्नावर अन्यायाला वाचा फोडणारे, स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलेले दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नावर अन्यायाला वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक शंकर सिंह ठाकुर व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसाचे संपादक मारोती शिकारे या दोघांच्याही कार्याची दखल घेऊन त्यांची दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा सन २०२३ यावर्षीचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार" व "महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार" जाहीर झाला आहे.
   हा फेलोशिप पुरस्कार दिल्ली येथे दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी देशातील व विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनांक्षर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
   यापूर्वीही पत्रकारितेतील कार्य व सामाजिक कार्य यांची नोंद घेऊन त्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार व जिल्हास्तरीय अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता सन २०२३ मध्ये पण त्यांच्या शिरोपेचात नवीन पुरस्काराचे तुरे लावण्यात आले आहेत. हा फेलोशिप पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शंकर सिंह ठाकुर व मारोती शिकारे यांच्यावर राजकीय, सामाजिक, मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

0 comments:

Post a Comment