जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

31 May 2020

जिल्ह्यात दोन रुग्ण वाढले ; एकास डिस्चार्ज

मुखेड:- मुंबईहून परतलेल्या तालुक्यातील भेंडेगाव येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. , त्यांच्यावर मुखेड शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुखेड शहरातील दोन संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नांदेड शहरातील एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.मुखेड तालुक्यात आजवर पाच रुग्ण कोरोना संक्रमित झाले असून, यातील तिघांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आज आलेल्या तपासणी अहवालात मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील मुंबईत परतलेल्या दोघांना कोरोनाचा संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील भेंडेगाव येथील एक कुटुंब खाजगी बसने मुंबईहून आले होते. त्याच खाजगी बसमधील लातूर येथे एक रुग्ण कोराना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्या खाजगी बस मध्ये आलेल्या प्रवाशांना मुखेड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचे अहवाल रविारी प्राप्त झाले.
भेंडेगाव येथील 32 वर्षीय व 27 वर्षाच्या दोन नागरिक कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यातील एका कोरोना बाधित रुग्णांची पत्नी व त्याची मुलगी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुखेड शहरातील कोविड सेंटरमध्ये काम करणारे एक डॉक्टर व नर्स यांचे अहवाल कोरोशा संक्रमित आले होते. त्याच्या संपर्कात आलेले 24 जणांचे अहलवा निगेटिव्ह आले असून या डॉक्टर व नर्सची प्रकृती चांगली असल्याने त्यांना लवकरच सुट्टी मिळणार असल्याचेही आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
——
चौकट
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 146 झाली. तर 104 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात चार जणांची प्रकृती गंभीर असून यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

30 May 2020

आई आणि मुलगा झाले कोरोनामुक्त

मुखेड:– मुंबई येथून परलेल्या तालुक्यातील रावणकोळा येथील आई व मुलास कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नऊ दिवसांच्या उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाकडून पुष्पगुच्छ देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे मुखेड तालुक्यात केवळ दोनच कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.तालुक्यातील रावणकोळा येथील मुंबईहून परतलेल्या आई व मुलाच कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली. परिणामी दि. 21 मे रोजी त्यांना मुखेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने दि. 22 मे रोजी संक्रमित आले. त्यानंतर त्यांना नऊ दिवस मुखेड येेथे उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्यांना आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सुट्टी देण्यात आली. यापूर्वी या दोन संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 रुग्णाचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले होते.दोन दिवसापूर्वी पहिल्या संक्रमित रुग्णास सुट्टी दिली होती. त्यानंतर आज दुस-या दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यावेळी नोडल ऑफिसर डॉ. नागेश लखमावार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, जयश्री संगेवार, कैलास तेलंग यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

29 May 2020

भोकर तालुका कोरोना मुक्त

भोकर:- मुंबईहून भोकरला आलेला एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. कोरोना बाधित रुग्ण संसर्गातून मुक्त झाला आहे. शुक्रवार दि.29 मे रोजी कोविड केअर सेंटर मधून सुट्टी देण्यात आली. आरोग्य विभागाकडून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

भोकर येथील रहिवासी असलेल्या तरुणास मुंबई येथे डाक खात्यात नोकरी होती. या तरुणाची बदली नांदेड येथे झाले असल्याने ते दि.1 मे रोजी भोकर येथे आला. व त्या नंतर चौदा दिवस तो होम कॉरंटाईन होते. 18 मे रोजी तो नांदेड येथे डाक खात्यात रूजू होण्यासाठी गेला असता, त्यास वरिष्ठांनी कोरोनाची टेस्ट करण्याबाबत सल्ला दिला होता. या टेस्ट नंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.

सदरील रुग्णावर भोकर येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात आले. या रुग्णाची तब्येत आता ठणठणीत झाली असल्याने यास सुट्टी देण्यात आली. या वेळी या रुग्णावर उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राहुल वाघमारे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.सद्यपरिस्थितीत भोकर तालुका कोरोना मुक्त आहे.

मुखेडच्या एका महिला रूग्णाचा मृत्यू दिवसभरात 5 रूग्णाची भर 9 रुग्णांना सुट्टी

 मुखेड: येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली. मयत महिला ही मुखेड येथील आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 झाली आहे. यामध्ये आज सांयकाळी 5-00 पर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे पुढील भागातील आहेत . मिल्लत नगर भागातील 32 वर्षांचा 1 पुरुष रुग्ण , लोहार गल्ली भागातील 28 वर्षे वयाचा 1 पुरुष रुग्ण , मुखेड येथील गोळी गल्ली येथील 40 वर्ष वयाची 1 स्त्री रुग्ण व कळमनुरी जि . हिंगोली येथील 38 वर्ष वयाचा 1 पुरुष रुग्ण तर 35 वय वर्षाची 1 स्त्री रुग्ण यांचा 5 रुग्णात समावेश आहे . यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत . मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे मृत्यू झाला आहे . कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 38 हजार 466 , घेतलेले स्वब 3 हजार 751 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 238 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या -05 , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 143 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 143 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 8 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 99 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 36 , स्वब तपासणी चालू रुग्ण संख्या 209 एवढी आहे .

मिलतनगर, लोहारगल्ली, हिंगोली येथील दोन व मुखेड येथील चाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 143 इतकी झाली आहे. तसेच आज कोविड के अर सेंटर यात्री निवास येथील 8 व मुखेड येथील एका रुग्णास रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरेानामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 99 इतकी तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 36 एवढी राहिली आहे. तसेच दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

—–
मयत महिलेवर नांदेड येथे अंत्यसंस्कार
शुक्रवारी मरण पावलेल्या कोरोनाबाधित महिलेवर नांदेड येथील गोवर्धन घाट येथील स्मशानभूमित सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
——
प्रशासनाकडून अपूर्ण माहितीचा सपाटा सुरुच

जिल्हा प्रशासनाकडून कोरेानाची माहिती देताना टप्पे पाडले जात आहेत. सकाळी अपूर्ण माहिती दिली, की सायंकाळी प्रेसनोट काढायची, त्यात ही बर्‍याच वेळा माहिती पूर्णपणे मिळत नाही. कोरोनाबाधित महिला मरण पावली. मात्र त्या महिलेचे वय किती, कधी मृत्यू झाला, कधी रुग्णालयात भरती केले. स्वॅब कधी पॉझिटीव्ह आला, याबाबत प्रशासनाकडून माहिती दडविली जात आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी रुग्ण वाढले; हिंगोलीच्या दोन रुग्णांचा समावेश

नांदेड:- कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5 ने वाढली आहे. या संबंधीचा अहवाल शुक्रवार दि.29 मे रोजी वाढली आहे. यामध्ये दोन हिंगोलीचे दोन रुग्ण नांदेडमध्ये आढळले आहेत,त्यांच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सकाळी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 97 अहवाल निगेटिव्ह,2 अहवाल हे अनिर्णित आले ,तर 5 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या 143 इतकी झाली आहेत, कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 90 इतकी झाली आहे. गुरूवारी नांदेड शहरातील लोहारगल्ली येथे 1रुग्ण आढळला आहे. तसेच 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज सापडलेले पाच रुग्णांमध्ये मिलतनगर येथे 32 वर्षीय पुरुष,28 वर्षीय लोहरगल्लीमधील पुरुष,40 वर्षीय मुखेडमधील महिला,तर हिंगोली जिल्ह्यातील कसबे येथिल 38 व 35 वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोहार गल्लीत आढळला आणखी एक रुग्ण , बिलोलीच्या एका रुग्णाला सुट्टी , आता पर्यंत 90 बरे होऊन घरी .

 नांदेड दि . 28 | नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 28 मे , 2020 रोजी सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 49 अहवालापैकी 47 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत . यात एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे . या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे . हा रुग्ण 35 वर्ष वयाचा असून तो लोहार गल्ली नांदेड भागात राहतो . जिल्ह्यात आज डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील दोन रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील एक रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील एक रुग्ण असे एकूण चार रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण वयवर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे . गुरुवार 28 मे रोजी सांयकाळपर्यंतची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण- 1 लाख 37 हजार 540 , घेतलेले स्वब 3 हजार 621 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 132 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वब संख्या -01 , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 138 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 141 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 7 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 90 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 41 , स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 192 एवढी आहे .काल बुधवार 27 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 73 स्वब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील . तर गुरुवार 28 मे रोजी 119 रुग्णांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील . एकुण 138 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 88 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . 41 रुग्णांपैकी 06 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत . सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल . आज दिवसभरात 1 पॉझिटिव रुग्णांची भर दिवसभरात 4 रुग्णांना सुट्टी एकूण रुग्ण संख्या 138 वर . आत्तापर्यंत 90 बरे होऊन घरी 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार . 7 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू . 43 रुग्णांवर उपचार सुरू . दोन महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक

28 May 2020

अमोल जेठे यांच्या सामाजिक उपक्रमास उत्तम प्रतिसाद

नांदेड : - विद्यार्थी काँग्रेस चे नांदेड़ जिल्हाउपाध्यक्ष अमोल जेठे यांनी कोरोनाच्या या महामारीत सर्व विद्यार्थी आपापल्या घरात अडकुन पडलेले असताना एक विद्यार्थी उपयोगी आगळा वेगळा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या डोक्याचा तान  थोड़ा कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे .. त्यांनी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाची शासनमान्य प्रस्थापित मराठी व इंग्रजी भाषेतील सर्व पुस्तके pdf द्वारे ते विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून  पोहचवत  आहेत.त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील व शहरातील अनेक विद्यार्थी व पालक ह्यांनी आमोल जेठे यांच्याशी संपर्क साधुन आपापल्या पाल्यासाठी ही पुस्तके विषय द्वारे मागुन घेत आहेत ... त्यामुळे अनेक विद्यार्थी घरबसल्या मोबाइल किंवा कंप्यूटर च्या सह्याने आपल्या इयतेतिल पुस्तके घर बसल्या वाचत आहेत .. जेठे हे नेहमीच विद्यार्थी काँग्रेस च्या माध्यमातून असे विविध सामाजिक कार्यक्रम जोपासत असल्यामुळे त्यांच्या या महत्वपूर्ण कामाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे .. !

27 May 2020

दिलासादायक : नांदेडात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला उतरती कळा , आज पुन्हा 7 रुग्णांना सुट्टी , आतापर्यंत 86 बरे होऊन घरी .

 नांदेड:जिल्ह्यातील आज प्राप्त झालेल्या एकूण 149 अहवालापैकी 144 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून आज एकही नवीन रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नाही . आजपर्यत नांदेड जिल्हयातील कोराना रुग्णांची एकूण संख्या 137 एवढी आहे . बुधवार 27 मे रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोविड सेंटर येथील 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत 137 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर उर्वरीत 44 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील दोन महिला ( वय -52 व 55 वर्षे ) रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . बुधवार 27 मे रोजी कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 36 हजार 132 , घेतलेले स्वब 3 हजार 502 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 85 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वब संख्या- निरंक , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 137 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 140 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 7 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 86 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 44 , स्वब तपासणी चालू रुग्ण संख्या 122 एवढी आहे . काल मंगळवार 26 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 122 स्वब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील . तर बुधवार 27 मे रोजी 42 रुग्णांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील . एकुण 137 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 86 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . 44 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे . सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू अॅप " डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . .

नांदेड जिल्हा : कोरोना विषाणू संसर्गाबाबत बुधवार 27 मे रोजी सायं . 5 वाजेपर्यंतची 
आकडेवारी 
• एकूण संशयित – 3 हजार 511 ,
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या -3 हजार 197 ,
 • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1 हजार 682 ,. •अजून निरीक्षणाखाली असलेले . 221 , ·
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 45 . 
•घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3 हजार 152 , • आज घेतलेले नमुने - 42 ,
 • एकुण नमुने तपासणी -3 हजार 502 , 
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -137 ,. 
•पैकी निगेटीव्ह - 3 हजार 85 , 
•नमुने तपासणी अहवाल बाकी -122 ,. •नाकारण्यात आलेले नमुने - 14 , 
• अनिर्णित अहवाल 140 , 
•कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 86 , 
•कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - 7 , 
▪जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 36 हजार 132 जणांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत , अशी माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे .

मुखेड तालुक्यात पतीने चिरला पत्नी-मुलाचा गळा

मुखेड:– एका दारूडया पतीने दारूच्या नशेत पत्नी व एक वर्षाच्या लेकराच गळा चिरून निर्घून खून केला. ही खळबळजनक घटना मंडलापुर येथे बुधवार दि.27 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तानाजी भुताळे (30) हा मुळचा देगलूर तालुक्यातील येडूर या गावचा रहिवासी असून मागच्या दोन महिन्यांपासून तो सासरवाडी असलेल्या मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे राहत होता. सतत दारू पिऊन राहत असल्याने मयत महिला वैशाली तानाजी भुताळे (23) व एका वर्षाचा मुलगा आदेश यांना घेऊन माहेरी आली. त्यांच्यासोबत तानाजी भुताळे हा सुद्धा मंडलापुर येथे दोन महिन्यांपासून वास्तव्य करत होता. मात्र येडूर येथे जाण्यास सतत तो तगादा लावत. परंतु त्याचे दारूचे वेसन सुटत नव्हते. त्यामुळे तानाती भुताळे याचे सासरे केरबा कांबळे यांनी सासरी घेऊन जाण्यास नकार दिला.सदरचा राग मनात धरून बुधवारी सकाळी सासू व सासरे हे शेतात जाताच तानाजी भुताळे याने पत्नी व एक वर्षाच्या मुलगा यांच्या गळयावर धारदार शस्त्राने वार करत ठार मारले. मोठा गोंधळ उडाल्याने काही लोक हे घटनास्थळाकडे धउवले असता, मारेकरी तानाजी भुताळे हातात शस्त्र घेऊन पळून जात असताना गावातील श्रावण नरबागे व राजू पाटील यांनी पाहिले, त्याचा पाठलाग करून तानाजी भुताळे यास झाडाला बांधले ठेवले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. मुखेड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आई व मुलाचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांनी दिली.

सूचनाः यासंबंधी सविस्तर वृत्त थोडया वेळात

जिल्ह्यात रात्रीतून दोन खुनाच्या घटनांची नोंद

नांदेड/बिलोली:-लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याच्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढण्याच्या घटनांमध्ये वेगाने नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. मंगळवारच्या रात्री जिल्ह्यात दोन जणांचा खून झाल्याची नोंद आहे. एक घटना बिलोली तालुक्यातील अटकाळी व तर नांदेड तालुक्यातील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

रविवारी उमरी तालुक्यातील नागठाणा येथे एका बाल साधू व एक शिश अशी दुहेरी खुनाची घटनासमोर आली होती. त्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे. नांदेड तालुक्यातील हसापुर-नसरतपुर शिव रस्त्यावर पत्याचा डाव युवकांचा बसला होता. त्यासाठी वादा-वादी झाली. यात मोहदम वाजिद मोहमद गौस (वय.29) याच्यावर चाकुने हल्ला करून जखमी केले. यात मोहमद वाजिद मोहमद गौस याचा मृत्यू झाला.शासकीय रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास घोटके हे करत आहेत.

ही घटना लिंबगाव पोलिस ठाण्यात हद्दीत घडली, असून पोलिसांना हसापुर-नसरतपुर परिसरातील घटनास्थळ शोधण्यास बरीच कसरत करावी लागली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला, असून तिन्ही आरोपी फ रार आहेत. या प्रकरणाचा तपास फ ौजदार जी.ए. घोटके हे करत आहेत. सदरची खुनाची घटना पूर्ववैमनश्यातून घडल्याचे घोटके यांनी सांगितले.

दुसरी खुनाची घटना बिलोली तालुक्यातील अटकाळी येथे लेकानेच बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मारेकर्‍याचे वडिल हे सतत दारू पिऊन कुटुंबियांना त्रास देत होते. याचा राग भुजाजी रघुपती (वय.20) वर्षे याने धारदार शस्त्राने पिता मारोती रघुपती(वय.40) यांच्या पोटात चाकु मारला असता रक्तभोंबाळ झालेल्या पिताचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीची आई पारूबाई मारोती रघुपती यांच्या फि र्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या सदिच्छा कि राजकारण ? आमदार अमर राजूरकर

नांदेड: - लोकांमध्ये जावून काम करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलविण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना बरे होण्याचे सदिच्छा देताना राजकारण करण्याचा जो काही प्रयोग होत आहे तो अतिशय खालच्या पातळीचे असल्याचे मत विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केले.
देशात आणि राज्यात जेंव्हा कोरोनाचा प्रसार होत होता. अशावेळी आपला नांदेड जिल्हा हा या रोगापासून दूर राहिला पाहिजे. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अहोरात्र प्रयत्न केले. वारंवार बैठका घेवून प्रशासनास सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीपैकी 33 टक्के निधी हा आरोग्य सेवेसाठी वापरण्यात यावा असा आदेश दिला. नांदेडमधील जुन्या दवाखान्यातील सेवासुविधा वाढविण्यासाठी त्यांनी 2.25 कोटी निधी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ उपलब्ध करून दिला. प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना केली. भविष्यात वाढणार्‍या रूग्णांसाठी सेवेत कुठलीही कमी पडू नाही यासाठी औषध उपलब्धता, पीपीई किटची उपलब्धता, मास्क यासोबत अन्य वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता अनेकदा तपासून पाहिली.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील गरीब माणसांना अन्नधान्याची अडचण येवू नये यासाठी घरपोच अन्नधान्य योजना राबविली. दुर्देवाने लोकांमध्ये काम करताना त्यांना कोरोनाची  लागन झाली. यामुळे जिल्ह्यातील जनता चिंताक्रांत आहे. लवकरच या आजारातून मुक्त होवून जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांना सोडविण्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
अशावेळी एका बाजूस त्यांनी बरे व्हावेत ह्या शुभेच्छा देताना दुसर्‍या बाजूस जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची सुश्रुशा व सेवा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून यावर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म लक्ष असल्याचेही आ. राजुरकर यांनी यावेळी सांगीतले.

26 May 2020

चार रुग्णसंख्या वाढले; 16 रुग्णांना डिस्चार्ज

नांदेड:– बालतपस्वी महाराजासह एक जणाच्या हत्येमुळे उमरी हे गाव देशभर चर्चेला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे, मंगळवारी एकटया उमरी तालुक्यात चार कोरोनाची रुग्ण सापडल्याने तालुक्याला मोठा हदरा बसला आहे. तर सोळा रुग्णांना मंगळवार दि. 26 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील प्रयोग शाळेकडून मंगळवार दि. 26 मे रोजी 122 नमूने तपासणीचा अहवालांपैकी 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चार अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्वच्या सर्व अहवाल हे उमरी तालुक्यातील आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 133 वरून आता 137 झाली आहे.

नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमध्ये सात वर्षाच्या मुलगा, 9 व 14 वर्षांची मुलगी व 48 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. या सर्वांवार उमरी येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरु असून सर्वांची प्रकृतीस्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

—–
आज तब्बल 16 रुग्ण बरे
आरोग्य यंत्रणेकडून मंगळवार दि. 26 मे रोजी एनआरआय यात्री निवास येथील उपचार घेणार्‍या 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 79 झाली आहे. तर 51 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच 52 व 55 वय वर्षे असलेल्या दोन महिलांची प्रकृती नाजूक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.

25 May 2020

साहेब, लवकर बरे व्हा..! सोशल मीडियावर अशोक चव्हाणांच्या समर्थंकासह विरोधकांनाही काळजी

नांदेड - पालकमंत्री अशोक चव्हाण यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांसह सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासन, पालकमंत्र्यांच्या अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा दिला गेला नाही. परंतु काँग्रेस नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही 'साहेब लवकर बरे व्हा..' चे संदेश सामाजिक माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहोचवले आहेत.नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण हे जिल्हा प्रशासनात आघाडीवर राहिले. प्रारंभीच्या काळात त्यांनी दररोज बैठका घेतल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत नसल्याने ते तातडीने मुंबईत गेले. तेथील सर्वपक्षीय चर्चेत सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या जागेसाठी ताणले गेले नाही आणि निवडणूक बिनविरोध झाली. आठवडाभर मुंबईत थांबलेल्या चव्हाण हे मंत्रालयातील काही महत्त्वाच्या बैठकीला व मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व शपथ कार्यक्रमास हजर राहिले. त्यानंतर सहा दिवसापूर्वी ते नांदेडला परतले. परंतु त्यांनी जनसंपर्क टाळला. अगदी आमदारांना देखील त्यांनी भेट नाकारली. त्यावरून स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांची ही उपाययोजना असावी, असे सर्वांनाच वाटत होते. काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . पण रेड झोन असलेल्या मुंबईहून परतले असल्याने त्यांनी स्वतः विलगीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचे मानले जाऊ लागले . रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेडच्या खासगी रुग्णालयात त्यांनी स्वतःची तपासणी केल्याचे सांगितले जाते . सोशल मीडिया आणि वेब मीडियावरील माहितीनुसार चव्हाण यांचा मुंबईतील वाहन चालक कोरोनाबाधित आल्याने त्यांनी तिथे आपल्याही घशाचे नमुने दिले होते . त्यानंतर त्यांनी नांदेडला येऊन विश्रांती घेतली . परंतु अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . मुंबईच्या अहवालाचे काय झाले , याची कोणतीही बातमी किंवा संदर्भ नांदेडला आजपर्यंत अधिकृतपणे कळालेला नाही . नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . नीळकंठ भोसीकर यांनी रविवारी रात्री जारी केलेल्या कोरोना प्रेस नोटमध्ये शिवाजीनगर भागातील 61 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तसेच एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले आहे . त्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे . वय , परिसर आणि खासगी रुग्णालयाच्या संदर्भाने अनेकांचे अंदाज , फोनाफोनी सुरू झाली . दबक्या आवाजात सुरू झालेली चर्चा टीव्हीवर नाव झळकल्याने खात्री न करता अनेक जण एकमेकांना पाठवत होते . त्यातून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या काळजीचे वातावरण तयार झाले . समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले . महत्वाचा दुवा हाती लागला असावा , तेव्हाच काँग्रेसचे नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर जाहिराती तयार करून ' साहेब , लवकर बरे व्हा .. ' असे संदेश झळकवले .
  समर्थकांच्या भावना... 
कोरोनाविरुद्ध जीव धोक्यात घालून मैदानात उतरलेला योद्धा लवकर बरा होऊन येईल . या कठीण काळात आपण नांदेडची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून घेत होता . जनतेचे आशीर्वाद , शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत . माझा देव हार माननारा नाही . आशीर्वादाची मोठी पुण्याई साहेबांच्या पाठीशी आहे . साहेब लवकरच बरे होऊन येतील अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत .
 प्रवीण पाटील चिखलीकर यांचा संदेश..
राजकारण करत असताना आपल्यात वैचारिक मतभेद नक्कीच आहेत व ते पुढील काळात पण राहतील . पण , बातमी कानावर पडली आणि काळजात धस्स झालं . साहेब , लाखो समर्थकांसह आमच्या सारख्या विरोधकांच्या पण शुभेच्छा आपणांसोबत आहेत . त्यामुळे तुम्ही या संकटातून लवकरच बाहेर पडाल , यात काही शंका नाही . आपणास शतायुष लाभो , अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो अशा शुभेच्छा दिल्या आहेत .

उमरी दुहेरी खुनातील आरोपीस पोलिस कोठडी

उमरी :तालुक्यातील नागठणा खु. येथील बालयोगी महाराज व एका इसमाची गळा आवळून खुन केल्याच्या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीस भोकर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस दि. 29 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली,अशी माहिती उमरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक अंनतारे यांनी दिली.

उमरी तालुक्यातील नागठाणा खुर्द येथील महादेव मंदिराचे मठाधीश 108 प.पु.बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज (वय.33) व भगवान बाबाराव शिंदे (वय.50) यांचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवार दि. 24 मेच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती.या दुहेरी हत्याकांडाने राज्यासह देशभर खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील गावातच राहणारा आरोपी साईनाथ आंनदराव लिंगोडे यास त्याच दिवशी तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्हयातील तान्नूर या गावातून पकडण्यात आले होते.
उमरी पोलिसांनी साईनाथ लिंगोडे यास सोमवार दि. 25 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भोकरच्या न्यायालयासमोर हजर केले, असता न्यायदंडाधिकारी बी.ए. तळेकर यांनी आरोपी साईनाथ लिंगोडे यास चार दिवसांची म्हणजे दि 29 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून शिवराज डावकरे यांनी तर आरोपीच्या बाजूने आर.डी. खाडे यांनी बाजू मांडली.

बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी संतापजनक मजकूर; कारवाईची मागणी

नायगाव:- कोरोनाचा संसर्गाला पालकमंत्री अशोक चव्हाण हे लढा देत असताना
नायगाव तालुक्यातील एकाने फेसबुकवर अशोक चव्हाण यांच्या संदर्भाने सामाजिक भावना भडकविणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांना कोरोनाचा लागण रविवारी झाली आहे.ते या आजारातून लवकर बरे व्हावेत,यासाठी जिल्हाभरातून प्रार्थना केली जात आहे. काँग्रेस पक्ष व इतर पक्षातील मंडळी सुद्धा त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त असताना नायगाव तालुक्यातील गोविंद पाटील कदम शिरशिकर यांनी त्यांच्या फेसबुल अकाउंटवरून पोस्ट शेअर करताना म्हंटले आहे,की जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो ईशवर, इतक्यावरच गोविंद पाटील थांबले, नसून बातमी खरी आहे,की खोटी माहित नाही,असेल तर खूप छान वाचला नाही पाहिजे, अशी मनाचा संताप उडविणारी पोस्ट टाकली.

सदरची पोस्ट वाचून मन संतापून जाण्यासारखे आहे. अशा मानसिक विकृतीच्या गोविंद पाटील कदम शिरशिकर याच्या विरोधात नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार सुधाकर भिलवंडे,नजीर बागवान,नजीर फरिद्साब शेख,फारुख महबूब बेग पटेल यांनी दिली आहे.तात्काळ गुन्हा नोंद करा,अन्यथा उपोषण करू असा इशारा यांनी दिला आहे.

55 वर्षीय रुग्णांने जीव सोडला;आणखी रुग्ण वाढले

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवार दि.25 मे रोजी नव्याने सहा रुग्णांची भर पडली आहे. तर एका 55 वर्षीस इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर कोरोनाग्रस्तांची संख्या 133 इतकी झाली आहे.

रविवारी रात्री प्राप्त झालेल्या शिवाजी नगरमधील एका व्यक्तीच्या कोरोनाच्या अहवालाने महाराष्ट्रात भुकंप उडवून दिला होता. या धक्यातून जिल्ह्यातील नागरिक सावरण्यापूर्वीच सोमवारी सायंकाळी सहा वाजता कोरेानाची प्रेसनोट प्रसिद्ध झाली. यामध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील मिलतनगर येथील 55 वर्षीस इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर पाच रुग्णांमध्ये इतवारा भागात 2 रुग्ण आढळले ते दोघे ही पुरुष असून ज्यांचे वय हे 27 व 32 वर्षे इतके आहे. आंनद कॉलनीमधील जिजामाता कॉलनीत राहणार्‍या 80 वर्षीय वृद्धास ही कोरोनाची लागण झाली आहे. माहुर तालुक्यातील वडगा येथील 17 वर्षांच्या बालक ही कोरोनाबाधित झाला, किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील 29 वर्षीय युवकाचा अहवाल ही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

सोमवारी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 63 झाली आहे. सध्या 63 जणांवर उपचार सुरु आहेत. 63 रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंजाब भवन व यात्री निवास येथे 45 रुग्ण, मुखेड ग्रामीण रुग्णालय 5, भोकर-1, बिलोली रुग्णालय-1 तर शिवाजी नगर व वैभव नगर येथील एक असे दोन रुग्णांवर मुंबई येथे उपचारास हलविण्यात आले आहे. तसेच एका 55 वर्षीस महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.

24 May 2020

नांदेडमध्ये आता नव्या 2 रुग्णांची भर , एकूण आकडा 127 वर .

- नांदेड दि 24 | नांदेड शहरातील रविवार दिनांक 24 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 2 अहवाला पैकी नवीन 2 रुग्णांच्या स्वाब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 127 वर पोहोचली आहे . आता प्राप्त झालेल्या 2 पॉझिटिव रुग्णांपैकी 1 रुग्ण शिवाजीनगर भागातील तर 1 रुग्ण विवेक नगर भागातील आहे . दोन्ही रुग्ण पुरुष असून अनुक्रमे ( वय वर्ष 61 व 40 ) आहे . या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल

 . आज दिवसभरात 2 पॉझिटिव रुग्णांची भर वसभरात 4 रुग्णांना सुट्टी एकूण रुग्ण संख्या 127 वर 

. आतापर्यंत 59 बरे होऊन घरी 72 पॉसिटीव्ह रुग्ण फरार

 . 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू .

 62 रुग्णांवर उपचार सुरू . 

दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे . अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा 4 जणांना सुट्टी ,आज पॉझिटिव्ह नाही,आतापर्यंत 59 रुग्ण बरे होऊन घरी .

 नांदेड दि 24 | रविवार दिनांक 24 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात एकही , रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही तर 4 जणांना सुट्टी देण्यातआली आहे , सध्या नांदेडचा एकूण पॉसिटीव्ह रुग्णांचा आकडा 125 वरच थांबला असून , त्या पैकी आतापर्यंत एकूण बरे होऊन घरी गेलेल्यांची रुग्णांची संख्या 59 वर पोहचली आहे . तर 6 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे , व 2 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण अद्यापही फरार आहेत , सध्या 60 पॉसिटीव्ह रुग्णांनावर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत , तर आज 172 लोकांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे . कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती दि : 24/05/2020 वेळ 05.00 PM आत्तापर्यंत एकूण संशयित - 3149 एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या -2828 . क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1482 • अजून निरीक्षणाखाली असलेले - 256 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -71 घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2757 आज घेतलेले नमुने - 172 एकुण नमुने तपासणी- 3254 एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -125  पैकी निगेटीव्ह - 2746 नमुने तपासणी अहवाल बाकी- 243 नाकारण्यात आलेले नमुने - 14 अनिर्णित अहवाल - 122 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 59 कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - 6 . जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 132091 राहण्या सल्ला दिलेला आहे . तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत . दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

उमरी - नागठाणा प्रकरणात साधुंचा खुन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उमरी- ( प्रतिनिधी ) तालुक्यातील नागठाणा येथिल मठाधिश यांच्या खुन प्रकरणातील आरोपी उमरी पोलिसांनी तेलंगाणातील तानुर ता . भैंसा जि . निजामाबाद येथुन तेलंगणा पोलिसांच्या मदतीने त्याच्या मावशीच्या घरून ताब्यात घेतला आहे . मठाधिश प.पु १०८ बालयोगी निर्वाण रूद्र पशुपती महाराज , व भगवान शिंदे यांची रात्री उशीरा हत्या झाली होती , त्याचे दुपार पर्यंत राज्य भरात तीव्र पडसाद उमटले त्या दरम्यान आरोपींस दुपारी पोलिसांच्या एका पथकाने ताब्यात घेतले .राज्यात सकाळ पासुन मठाधिपती महाराजांची गावातील एका संधिसाधुने रविवारी रात्री गळा आवळुन हत्या केली , हि घटना सकाळी उघडकीस आली , त्या नंतर घटनेचे लोन भक्त गण समाज माध्यमातुन राज्यात पोहचले समाजमाध्यमातुन प्रकरण उचलुन धरल्याने यंत्रणा सतर्क झाली , प्रशासनावर टिका टिप्पणी होताच पोलिसांची तपासाची चक्रे गतीमान झाली , भजपानेही प्रकरण उचलुन धरले होते . तिकडे ग्रामस्थांनी देखिल आरोपीस अटक करे पर्यंत सोपस्कार पुर्ण न होवु देण्याचा निर्णय घेतला होता .येथिल महादेव मंदिरात मठाधीश १०८ प.पु. बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज पुजा विधी करत होते . मुळेचे कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथिल होते . वयाच्या विसाव्या वर्षा पासुन ते इथेच राहतात . मठात राहून आधात्मिक व धार्मिक कार्य करत होते . महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक - भक्त येत असत . प्रती वर्षी येथे दिपोत्सव भरत असतो . यासाठी तीस ते चाळीस हजार भाविक येतात . त्यांचे शिष्यगण महाराष्ट्र तेलंगाणा राज्याच्या काही भागात आहेत . उमरी तालुक्यातील तळेगाव येथे गोशाळा उभारण्याचे कार्य हाती घेतले होते . हे कामही प्रगतीपथावर होते . पंचक्रोशित धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले महाराजांच्या हत्येच्या बातमीने रविवारचा दिवस उजाडला.त्याचसोबत मठात राहणारे भगवान शिंदे । चिंचाळा , ता . उमरी ) या सेवकाची सुद्धा गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले .या प्रकरणाची साईनाथ आनंदा लिंगाडे याचे कडे संशयाची सुई जात असल्याने तो गुंडप्रवृतीचा आहे असे लोक सांगतात होते , घटने नंतर त्याने दुचाकी वरून तिथुन पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले होते , या अगोदरही तो वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी होता असे सांगण्यात येते त्यास पोलिसांच्या एका पथकाने तेलंगाणातील तानुर ता . भैंसा जि . निजामाबाद येथुन तेलंगाणा पोलिसांच्या मदतीने मावशीच्या घरून ताब्यात घेतले आहे . या प्रकरणात आनखी कोणाचा हात आहे का ? याची माहिती आता संशयीत आरोपी कडुन पोलिसांना पाहिजे आहे .

मठापतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

नांदेड, 24 मे: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा खून झाला. मठाच्या बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे महाराजांचा निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
नागठाणा मठात आणखी एक मृतदेह..

नागठाणा मठातील शौचालयात आखणी एक मृतदेह आढळला आहे. चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा हा मृतदेह आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मिळालेली माहिती अशी की, गावातीलच एका माथेफिरू तरुणाने चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केले. महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटल्याचं बोललं जात आहे. महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना मठाशेजारी राहणारे नागरिकांना जाग आली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महाराजांचा मृतदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

23 May 2020

कोरोनाचा पुन्हा नांदेडला धक्का:आज 9 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

 नांदेड दि 23 | दि 23 मे 2020 रोजी सांयकाळी प्राप्त झालेल्या एकूण 135 अहवालानुसार 120 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत . त्या पैकी 6 अहवाल पॉसिटीव्ह व सकाळी 3 रुग्णांचे स्वाब पॉसिटीव्ह आल्यामुळे नांदेड ची पॉसिटीव्ह एकूण रुग्णांची संख्या 125 झाली आहे . वर्ष 6 ) 

आता प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव रुग्णांपैकी करबला भागातील दोन रुग्ण ( 1 पुरुष वय वर्ष 38 , 1 मुलगी वय वर्ष ६ व कुंभार टेकडी येथील 2 रुग्ण ( 1 पुरुष वय वर्षे 15 व 1 स्त्री वय वर्ष 28 ) आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 2 रुग्ण ( 1 पुरुषं वय वर्ष 24 व 1 स्त्री वय वर्ष 22 ) असे तीन पुरुष , एक 6 वर्षी मुलगी , व दोन स्त्रिया असे एकूण 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळे असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . 

व तसेच ग्रामीण रुग्णालय बारडच्या कोविड सेंटर येथील 1 रुग्ण डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2 रुग्ण आज दिवसभरात असे 3 रुग्ण बरे झाल्यामुळे , त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे . 

आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातून 125 रुग्णांपैकी 55 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उर्वरित 62 रुग्णावर औषध उपचार चालू आहेत .

 एकूण 125 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे , 55 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे , उर्वरित 62 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड पंजाब भवन कोवीड सेंटर , यात्री निवास कोवीड सेंटर येथे 49 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 रुग्ण , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . 

नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल . 

•आज दिवसभरात 9 पॉझिटिव रुग्णांची भर 

•एकूण रुग्ण संख्या 125 वर

• 55 बरे होऊन घरी 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार .

• 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू . 

•62 रुग्णांवर उपचार सुरू .

 दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना सकाळी 9 ते सायं .5 पर्यंत नियम , अटींच्या अधीन राहून मुभा

नांदेड - ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह यात शुक्रवार २२ मे पासून पुढील आदेशापर्यंत नियम , अटी व शर्तीच्याय अधिन राहून प्रतिबंधीत क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना सकाळी ९ ते सायं . ५ पर्यंत नियम व अटीच्या अधीन राहून मुभा देण्याळत आली आहे , असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे मुभा दिली आहे .नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे निर्गमीत आदेश , १७ मे अन्वये नांदेड जिल्हयात जमावबंदी आदेश , नियमावलीसह १७ ते ३१ मे पर्यंत नागरी , ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश व शुध्दीपत्रकानुसार निर्गत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार नांदेड जिल्हयात प्रतिबंधीत वगळून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत .
  
नांदेड जिल्हययात पुढील बाबी प्रतिबंधित राहतील ▪ 

सर्व शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक , प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ . बंद राहतील . तथापि ऑनलाईन । आंतर शिक्षण यास मुभा राहील . 

▪ हॉटेल / रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्या सेवा , गृहनिर्माण / आरोग्यि / पोलीस / शासकिय अधिकारी / आरोग्यस सेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्याय व्य तीर आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल . तसेच उपरोक्त / सेवेसाठीच बसस्टॉप , रेल्वे स्टेणशन येथे चालू असलेल्यान कॅन्टीसनचा सुध्दाई वापर करता येईल . रेस्टॉसरंटला खाद्य पदार्थाच्याल होम डिलेव्हवरीसाठी स्वयंपाकघर वापरण्यास मुभा असेल .

▪ . सर्व सिनेमा हॉल , शॉपींग मॉल , व्यारयामशाळा व जलतरण तलाव , मनोरंजन पार्क , थिएटर , बार आणि सभागृह , असेंब्लीश हॉल व इतर तत्स्म ठिकाणे बंद राहतील .

▪सर्व सामाजिक / राजकीय / खेळ / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृवतिक / धार्मिककार्ये / इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल . .

▪ सर्व धार्मिक स्थाळे / पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्याहत येतील . तसेच धार्मिक कार्यक्रम , परिषदा इत्यादीवर बंदी राहील ▪. नांदेड जिल्हायातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील .

▪ • नांदेड जिल्हायातील सर्व ढाबे , तंबाखु व तंबाखुजन्यल पदार्थाची दुकाने , चहा - कॉफी सेंटर , पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील . 

▪नांदेड जिल्हरयातील टाळेबंदीच्या कालावधीत सायं . ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागु राहील . कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये . मात्र यामधून अत्यावश्यतक सेवेकरिता नेमण्यायत आलेले अधिकारी , कर्मचारी व वैद्यकिय कारणास्तव रुग्णर व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील . सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यरक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यांत येईल . 

आरोग्यी सेतुचा नियमित वापर करा 

▪आरोग्ये सेतुचा वापरामुळे कोव्हिड १ ९ आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वोरीत सूचना मिळते व त्यामचा फायदा व्य क्तीश व समाजाला सुध्दिा होतो त्या मुळे Android Phone चा वापर करणा - या सर्व नागरिकांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे .

▪ शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या व इतरांच्याय सुरक्षितेकरिता आरोग्या सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील . 

• नांदेड जिल्हययातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्याकचा नियमित वापर करण्यांचे आवाहन जिल्हाल प्रशासनाचे वतीने करण्यासत येत आहे . 

जेष्ठ नागरिक , लहान मुलांनी घरीच रहावे 

आरोग्याच्याव दृष्टी ने धोकादायक वयोगट असणारे ६५ वर्षाचे वरिल जेष्ठत नागरिक , अनेक व्या धी असणारे व्यिक्तीन , गरोदर माता , दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी ( Lockdown ) काळात अत्यावश्य क कामाचे | आरोग्यादचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही . त्यांनी घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे . 

नांदेड जिल्हो नॉन रेड झोनमध्या असल्यानने नांदेड जिल्हादंडाधिकारी यांनी समक्रमांकीत आदेश क्रमांक ( १ ) व ( २ ) नुसार दिलेल्याय सवलती , मुभा व परवानग्या जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . तसेच त्याळव्यअतिरिक्त पुढील नमूद प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी ९ ते सायं . ५ पर्यंत नियम व अटीच्यां अधीन राहून मुभा देण्यात आली आहे .

• क्रीडा कॉम्पवलेक्स् आणि स्टीडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यातयामकरीता मोकळी राहील . परंतू या ठिकाणी प्रेक्षक आणि Group Activities करीता मुभा राहणार नाही . सर्व शारीरिक व्यायाम व त्या संबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील . . 

• सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस पुढीलप्रमाणे मुभा राहील टु व्हिलर- १ व्याक्ती , थ्री व्हिलर १ + २ व्यक्ती , फोर व्हिलर १ + २ व्यक्ती .

• नांदेड जिल्हजयांतर्गत बससेवा जास्तीमतजास्त ५० टक्के क्षमतेनुसार सुरु करण्यास मुभा देण्योत येत आहे . परंतु सामाजिक अंतर व स्वतच्छतेची उपाययोजना करणे आवश्यिक राहील . 

• सर्व दुकाने , बाजारापेठ सुरु ठेवण्यास मुभा देण्याोत आली आहे . परंतु नमूद दुकाने / बाजारपेठच्याआ ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्या त येत नसल्याजचे दिसून आल्यारस दंडात्मोक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यायत येईल . 

•या बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रात ( Containment Zone ) मध्येक केवळ जीवनावश्यलक वस्तुंचा पुरवठा तसेच अत्यापवश्यीक वैद्यकीय सेवांना मुभा राहील . 

वरील दुकाने / आस्थाकपनाच्यो ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील . 

कामाच्या ठिकाणी / दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्डोवॉश , सॅनिटायझरचा वापर करणे .

 एका वेळेस दुकानात ५ पेक्षा जास्तन ग्राहकास प्रवेश राहणार नाही .

 दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्कश असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्याथा १ हजार रुपयांचा एवढा दंड संबंधितांकडून आकारण्यासत येईल .

मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूत / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे . 

ग्राहकांकडून खरेदीनंतर पैश्यांची देवाण - घेवाण आरबीआयच्याठ सुचनेनुसार ई - वॉलेटस व स्वागईप मशीनव्दाररे करणेस भर द्यावा .

 वरील नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यावस तसेच उपाययोजनेचे भंग केल्यानस ५ हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्यात येईल . 

परिशिष्टय -2 

• सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे . 

•सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास १ हजार रुपये दंड आकारण्या त येईल . . 

•सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक याठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत . . 

•लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी ५० पेक्षाजास्त आमंत्रित असु नयेत . तसेच लग्नि सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच पार पाडणे आवश्यरक असेल . . 

•अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व ५० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये . 

•दारु , पान , गुटखा , तंबाखू इत्यादीचे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्याथा कायदेशिर कारवाई करण्या त येईल . 

• सर्व दुकाने ही दोन ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस ५ पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील .

कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना

थर्मल स्क्रीनींग हँडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे . 

• कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा . दरवाज्याचे कडी , कोंडी इ . चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे . 

•सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे . तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात . . 

•या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यवक कायदेशीर व दंडात्माक कारवाई करण्यादस पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यापत आले आहे 

.महानगरपालिका हद्दीत : - महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तआ पथके गठीत करावीत 

नगरपालिका हद्दीत : - नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तक पथके गठीत करावीत 

गावपातळीवर : - ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्तु पथक गठीत करावे .

 याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांच्याकडे सादर करावीत . संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्याव अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल . 

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यजक्तीक , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८ ९ ७ व आपत्तीद व्य वस्थायपन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यानत येईल . 

सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यईक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्दब कठोर कारवाई करावी . तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्याद कृत्यादसाठी कुठल्यायही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्दत कुठल्या ही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . हे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी २१ मे रोजी निर्गमित केले आहेत . 


सलुन उघडणार पण;ग्राहकांना हे साहित्य घेऊन जावे लागणार

नांदेड:– लांबचलक वाढलेली दाडी, लांब-लांब झालेली केसांमुळे होणार्‍या त्रासापासून लोकांची सुटका होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केस कर्तनालय दुकाने घडण्यास मुभा दिली आहे. मात्र ग्राहकांना दुकानात जाताना घरून टॉवेल व नॅपकीन घेऊन जावी लागणार आहे.कोरोनामुळे कराव्या लागलेल्या टाळेबंदीचा एक-एक नियम सैल केला जात आहे. यापूर्वी काही दुकाने उघडण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार बाजारपेठ दोन महिन्याच्या कालावधीनंतर गजबजू लागली आहे. दि. 22 मे रोजी केश कर्तनालय/स्पा सलुनची दुकाने सुरु ठेवण्यात आदेशित करण्यात आले आहे. मात्र दुकानाबाहेर फ लकावर घरून टॉवेल व नॅपकीन घेऊन यावी, असे लिहावे तसेच टॉवेल व नॅपकीन आणण्याशिवाय आत प्रवेश देऊन नये, दुकानातील बैठक व्यवस्था व औजारांचे निर्जतुकीकरण करावे,चार पेक्षा जास्त ग्राहक दुकानात नसावे.सेवा देणारा व घेणार यांच्या व्यतरिक्त इतरांमध्ये तीन फुटांपेक्षा जवळचे अंतर नसावे, केस कर्तनालय केल्यानंतर खुर्चीचे निर्जतुकीकरण करावे, मास्क किंवा रुमाल नाका-तोंडाला बांधून ठेवावे, तसेच हॅण्डवॉस ही ठेवणे बंधनकारक ठरणार आहे आदी आदी व नियमांना अधिन राहून दुकाने चालू ठेवता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

22 May 2020

कर्तव्यावरील पोलीसांना शिवीगाळ दोघावर गुन्हा दाखल

भोकर : दारू पिउन कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांना खालच्या भाषत शिवीगाळ करून धक्का बुकी केल्याने दोन मद्यपीविरूध शासकीय कामात आउथळा केल्याचा गुन्हा दाखल करून गजाउनाड केले आहे .भोकर शहरात गेल्या अनेक दिवसापासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथील वाहतूक सुरळीतरहावी त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीसाकडून सदापोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात . दि .२१ रोजी जनता कर्फ्यू असतांना सायंकाळी सहा वाजता मद्यपी दिलीप गुरूप्रसाद तिवारी, गंगाधर जयराम लोणे हे दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी इश्वर बळीराम राठोड यांचे कॉलर पकडून तुमच्यामुळे आमच्या भोकरला करोना रुग्ण आला म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषत शिवीगाळ केली .करोनाच्या कालावधीत चोखपणे आपले कर्तव्य बजावनारे पोलीस यांना मदत करणे त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा करून त्यांना सहकार्य करणे गरजेचे असतांना अशा प्रकारचे अशोभनीय वर्तन या मद्यपीने केल्याने कर्तव्यावरील इश्वर बळीराम राठोड यांनी पोलीसात तक्रार दिल्यांने ३५३, ३३२, ५०४, १८८, १८६, २६९, २७०, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा मद्यपीनां तात्काळ आटक करून गजाआड करण्यात आले असून भोकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .बी. डेडवाल हे पुढील तपास करत आहेत .

कोरोनामुक्त झालेल्या 11 रुग्णांची घरवापसी

नांदेड:– नांदेड जिल्हयात उपचार घेणार्‍या कोरोनाच्या रुग्णांचे बरे होऊन घरी परतणार्‍यांची संख्या वाढत आहे. शुक्रवार दि. 22 मे रोजी तब्बल अकरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यासंबंधीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळंकट भोसीकर यांनी दिली.

शहरातील उपचारामध्ये दाखल केलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये एनआरआय कोविड केअर सेंटर यात्री निवास येथील 10 रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारा एक रुग्ण असे बारा जणांना वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्याने सुट्टी देण्यात आली. या रुग्णांवर मागच्या दहा दिवस उपचार करण्यात आले. या दहा दिवसांच्या काळात कोरोनाची लक्षणे न आढळून आल्याने सुट्टी देण्यात आल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली, असून उपचार घेणारे रुग्ण संख्या 56 इतकी आहे.
नांदेड जिल्ह्यात 22 मे पर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 29 हजार 474 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 961 रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहेत . त्यापैकी 2 हजार 541 स्वब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून गुरुवार 22 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 134 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 43 रुग्णांचे स्वब तपासणी चालू आहे . सदर घेतलेल्या एकुण स्वबपैकी 116 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . 4 गुरुवार 21 मे रोजी प्राप्त झालेले एकुण 87 अहवालांपैकी 6 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे . त्यामध्ये पुरुष ज्यांचे अनुक्रमे वय वर्षे 14 , 18 , 33 , 74 आहे तर दोन स्त्री रुग्णांचे वय अनुक्रमे 34 व 65 आहे . त्यामधील एका पुरुषाचे वय वर्षे 74 यांचा मृत्यू झाला आहे . या रुग्णांपैकी 2 रुग्ण मुखेड तालुक्यातील , एक बिलोली तालुक्यातील तर एक रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरीत दोन रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहेत . एकुण 116 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 52 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . कोरोनाचे 56 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 42 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण , मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 3 रुग्ण , भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण आहेत . या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थिर आहे . जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतृ अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावा , जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . 

जिल्हाधिकार्‍यांनी काढले नवीन आदेश

नांदेड:– नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 21 मे रोजी आदेश काढले. परंतु त्यासंबंधीची अधिकृत माहिती प्रशासनाकडून दि. 22 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आदेशात रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ घरपोच मागविता येणार असले,तरी इतर सर्व बाबीवर पूर्वीच सारखे निर्बंध राहणा आहेत. या आदेशाची अंमलबजावणी दि. 22 मे पासून सुरु झाली असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

आदेशात म्हटले, की सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणीक, प्रशिक्षण संस्था बंद राहतील, मात्र ऑनलाईन व आंतर शिक्षणास मुभा असेल, जिल्ह्यातील सर्व ढाबे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच चहा व थंड पेय चालू राहणार नाहीत. आठवडी बाजार ही पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, धार्मिक व पुजेची ठिकाणी बंद असतील, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार थिटर, सभागृहे बंद राहणार आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट, इतर हॉस्पिटॅलीटीच्या सेवा, गृहनिर्माण आरोग्य/पोलिस/शासकीय अधिकारी/आरोग्य सेवा कर्मचारी/पर्यटकांसह अडकलेली व्यक्ती तसेच विलगीकरण सुविधेसाठी वापरात येणार आहे. मात्र उपरोक्त सेवेसाठी बस स्टॉप, रेल्वेस्टेशन येथ चालू असलेल्या कॅटीनचा वापर करता येणार आहेत. तसेच रेस्टॉरंटला खाद्यपदार्थाच्या होम डिलेव्हरी स्वयंपाकघर वापरण्यास मुभा असणार असल्याचे सांगण्यात आले.

बिलोली तालुक्यातील केरूर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

बिलोली:तालुक्यातील केरूर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला आहे.सदरील रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या  कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.काही दिवसापासून जिल्हासह काही तालुक्यातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत होते त्यामध्ये आता बिलोली तालुक्याचाही नंबर लागलेला आहे.त्यामुळे बिलोली तालुक्यात आता खळबळ उडाली आहे.सदरील व्यक्ती हा काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आला होता त्यानंतर तो व्यक्ती नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला होता.त्यानंतर नांदेड येथुन  नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने आला नंतर नरसी येथुन बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली. त्या व्यक्तीती  प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतःहुन पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्या म्हणण्या नुसार त्याची दुसऱ्यांदा चाचणी केली असता दुसरा अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती बिलोलीचे ता आरोग्य अधिकारी वाडेकर यांनी दिली आहे.या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने ज्या ट्रक ने नरसी ते बिलोली पर्यंत चा प्रवास केला होता त्या ट्रक ड्रायव्हर ला देखील विलगीकरणात ठेवण्यात आल्याचेही सांगितले.तसेच नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने  करण्यात येत आहे.

आजपासून लालपरी धावणार;80 गाड्यांचे नियोजन

नांदेड:- कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार आहे.यासाठी परिवहन विभागाकडून 80 गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे डेपो नियंत्रक सुनील कचरे यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने काही दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दारू दुकानांचाही समावेश आहे. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवून कार्यालय फुलविण्याचा प्रयत्न सुरू आहे.दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहेत. नांदेड नऊ डेपोमधून आठ ते दहा बसेस सोडण्यात येणार असून जिल्हा ठिकाण ते अंतर्गत तालुका ठिकाण असा मार्ग असेल,मात्र माहूर येथे इतर तालुक्यातून बस जाणार नाही,या तालुक्यात जायचे झाल्यास विदर्भातून जावे लागते,तसेंच हदगाव येथे सुद्धा वारंगाफाटा मार्गे बस धावणार नसून तामसा मार्गे बसेस सोडण्यात येणार असल्याचे सुनील कचरे यांनी सांगितले.

——
ग्रामीण भागाला फटका
शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत,याचा लाभ ग्रामीण भागातील प्रवाशांना मिळणार नाही,ग्रामीण भागातील लोकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

——-
दुपारनंतर चाके मंदावणार

टाळेबंदीत सकाळी सात ते दुपारी दोन अशी दुकानांना सूट देण्यात आली आहे,त्यामुळे बसला सकाळ ते दुपारी दोन पर्यंत गर्दी असू शकते,गर्दी पाहून दुपारनंतर गाड्या चालविण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सुनील कचरे यांनी सांगितले.

21 May 2020

धक्कादायक | नांदेडात गुरुवारी आणखी 6 पॉझिटिव्ह वाढले ; एकाचा मृत्यू तर नांदेडच्या बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव

नांदेड 21 मे : - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशासह राज्यात धुमाकूळ घातला असून नांदेडकरांच्याही चिंतेतही दिवसोंदिवस भर पडत आहे जिह्यात आज आणखीन ६ नव्या रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ११६ वर पोहचला आहे . आज वाढलेल्या रुग्णांमधील २ रुग्ण गाडीपुरा भागातील असुन त्यांना डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते , तर त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे , ०१ रुग्ण यात्री निवास , नांदेड येथे दाखल आहे , तर ०२ रावण कुळा , तालुका मुखेड , येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत व ०१ केरुर तालुका बिलोली येथील रहिवासी असून त्याला बिलोली येथील ccc मध्ये दाखल करण्यात आले आहे.तर जिल्ह्यात दिवसोंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने या संकट समयी नागरिकांनी सुरक्षित राहावे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नांदेडकरांना करण्यात आले आहे .

कोरोना गो;आज एकही पॉझिटिव्ह नाही जिल्ह्यातील पाच रुग्ण कोरोनामुक्त

नांदेड , दि . 21 | डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर मधील 1 रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोवीड सेंटर येथील 1 रुग्ण असे एकुण 5 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत 110 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 41 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत . नांदेड जिल्ह्यात एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 26 हजार 716 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 827 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत . त्यापैकी 2 हजार 461 स्वब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून बुधवार 21 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 66 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 64 रुग्णांचे स्वब तपासणी चालू आहे . घेतलेल्या एकुण स्वबपैकी 110 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . आतापर्यंत एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 41 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . कोरोनाचे 62 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण , मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1 रुग्ण , भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थिर आहे .जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावा , जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

जावयाला भेटायला गेला आणि सासरा कोरानाबाधित झाला,

नांदेड:- गुरुवारी सायंकाळी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलिस कॉलनी स्नेह नगर येथील एका इसमाचा समावेश आहे. तो इसम पोलिस नसून कर्मचारी महिलेचा पती आहे. त्या इमास सराफ ा येथे राहणार्‍या जावयामुळे कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 36 जण कोरोनामुक्त झाले आहे. पाच जणांचा बळी गेला. 69 जणांवर उपचार सुरु आहेत. मागच्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी आठ तर बुधवारी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणारे रुग्णांची संख्या वाढत, असून मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे दगावल्याची नोंद नोंदविली गेली नाही.

बुधवारी डाक विभागात काम करणारा एक कर्मचारी जो मुंबई येथून आला होता. त्या रुग्णाचे स्वॅब पॉझिटीव्ह आले. नायगाव तालुक्यातील टेंभूणी येथील एक जण मुंबई येथून आले होते. सदरचा अहवाल सुद्धा पॉझिटीव्ह आला. सांगवीमध्ये राहणारा कोरेाना पॉझिटीव्ह रुग्ण कर्नाटकातून आला होता. तर स्नेह नगर येथे राहणारा एक इसम 54 वर्षे आहे. सराफ ा भागात राहणार्‍या जावयाच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. या रुग्णाच्या संपर्कातील बाधितांची संख्या 7 इतकी झाली आहे.जावयाला भेटायला गेला आणि सासरा कोरानाबाधित झाला, अशी चर्चा सुरु आहे.

तो पोलिस नसून कर्मचारी महिलेचा पती

स्नेहनगर येथील कोरोनबाधित पुरुषाची पत्नी पोलिस खात्यात नौकरीस आहे. या भागातील रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. कुणी पोलिस कर्मचारी असल्याची अफ वा उठली होती. मात्र तो पोलिस नसून पोलिस कर्मचारी महिलेचा पती असल्याचे समोर आले.

नांदेडकरांच्या चिंतेत वाढ 4 नव्या कोरोना रूग्णाची भर जिल्हातील कोरोनाग्रस्ताचा आकडा ११० वर

नांदेड :शहरापुरता मर्यादीत राहिलेले कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात पाय पसरू लागले आहेत. यापूर्वी बारड व माहूर येथे रुग्ण सापडले. आता भोकर व नायगाव तालुक्यात ही प्रत्येकी एक रुग्ण सापडला, असून भोकर येथील रुग्ण डाक विभागात कर्मचारी आहे. ते नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नियमितपणे नांदेड-भोकर येणे जाणे असत.भोकर येथील डाक विभागात नौकरीत असलेल्या एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या कोरोनाबाधित रुग्णावर भोकर येथेच उपचार सुरु आहेत. सदरील कोरोनाबाधित रुग्णा नांदेडवरून ये-जा करत असत. त्यांच्या संपर्कातील लोकांना प्रशासनाने अलगीकरण कक्षात ठेवले आहे.भोकर येथे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून विविध विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलविली आहे. ही बैठक उशिरापर्यंत सुरु होती. जनता संचारबंदी लावण्याबाबत निर्णय झाला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.अप-डाऊनमुळे धोका वाढला
भोकर येथे सेवेत असणारे विविध विभागाचे कर्मचारी हे भोकर येथे न राहता नांदेड येथून येणे-जाणे करतात. त्यामुळे भोकर शहर व ग्रामीण भागाला अशा अप-डाऊन कर्मचार्‍यांकडून धोका होण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

20 May 2020

नवीन आठ अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात नवीन आठ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सकाळपासून नऊ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 106 झाली आहे. तर आतापर्यंत 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 69 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

रात्री उशिरा 137 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 124 रिपोर्टस हे निगेटीव्ह आले, तर 8 रिपोर्टस हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. पुरुषांचे वय हे 55, 41, 25, 34, 54 व एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. तर महिलांमध्ये 28 व 50 वर्षांच्या दोन महिला आहेत.सहा जण हे कुंभारटेकडी, अबचल नगर -1, करबला-1 अशा आठ जणांचा समावेश आहे. तर सकाळी सापडलेला रुग्णा हा करबला नगर येथील होता. सकाळपासून नऊ रुग्णांची भर पडली आहे.

19 May 2020

काकाणी यांच्या पुढाकाराने 32 दिवसांमध्ये 6 लाख लोकांना अन्नदान;

धर्माबाद:– टाळेबंदीमुळे उपासमार होणार्‍या सहा लाख गोरगरिबांना 32 दिवसांच्या काळात येथील सामाजिक कार्येकर्ते सुबोध काकाणी यांनी अन्नदान करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडले आहे.या तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा मोलमजुरीवर चालतो. या लॉकडाऊनमुळे सर्वच काम धंदे बंद पडली आहेत. त्यामुळे हाथावर पोट असणार्‍या लोकांचे हाल होऊ लागले होते. त्यातून सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांनी आपल्या गावकर्‍यांचे किचन हा उपक्रम सुरू केला.सुरुवातीला काकाणी यांनी शहरातील गोरगरिबांना जेवण देण्यास सुरुवात केली. मात्र ग्रामीण भागात लोकांचे हाल सुरू झाले होते. हे पाहून काकाणी यांनी शहरातील सर्व लोकांना आवाहन करून मदतीची विनंती केली. अनेकांनी आपल्या मदतीचे हाथ पुढे केले. लोकसहभागातून सुरू झालेल्या या अन्नछत्राने तब्बल 32 दिवस गरजूंना जेवण दिले आहे.या उपक्रमासाठी अनेकांनी मिळून पन्नास लाखाच्या आसपास देणगी मिळाली. त्यातून सलगपणे 32 दिवस सहा लाख लोकांना जेवणाची तयार पॉकिटे पुरवण्यात आली. हा उपक्रम राबवत असताना तालुक्यातील प्रत्येकांनी आपला खारीचा का होईना वाटा उचलला. त्यामुळेच अन्नछत्र 32 दिवस चालू शकले. लोकांच्या हाताला काम मिळण्यास सुरुवात झाल्याने हे अन्नछत्र मंगळवार दि. 19 मे रोजीचे जेवण देऊन बंद करण्यात आल आहे. 32 दिवसांच्या काळात धर्माबादकरांनी दाखवलेली एकजूट माणुसकी व्यक्त करणारी ठरली.

देशी दारूच्या उलटलेल्या ट्रकवर तळीरामांचा डल्ला


उमरी- दोन महिन्यांच्या खंडानंतर देशी दारूची च्या विक्रीस दुकानांवर मुभा मिळाल्यामुळे नांदेड येथून उमरीकडे देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक जामगावजवळ उलटला. याची माहिती मिळताच तळीरामांनी घटनास्थळी गर्दी करत काही बॉक्स लांबविले. त्यामुळे अनेक तळीरामांना आयत्या दारूच्या बॉटल्या मिळाल्याने वनवास मिटल्यासारखे झाले.मंगळवापासून जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी व बिअर शॉपी उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उमरी येथील देशी दारू दुकानाकडे माल पोहचविण्यासाठी एम.एच. 43 वाय.1102 क्रमांकाची ट्रक नांदेड येथून उमरीकडे निघाली होती. परंतु उमरीपासून पाच किलोमीटर अलिकडे जामगाव जवळ उतराव चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पल्टी झाली. ही घटना मंगळवार दि. 19 मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.या गाडीत देशी दारूची 414 बॉक्स होते. त्यातील 100 बॉक्समध्ये काही बॉक्स फु टले तर काही बॉक्स तळीरामांनी लांबविले. उवरलेले 314 बॉक्स दुसरीगाडी बोलावून घेत त्या गाडीत भरून उमरीकडे पाठविण्यात आल्याचे आमच्या बातमीदाराने सांगितले.
—–
तळीरामांमध्ये आनंदी आनंद
गाडी पल्टी झाल्याची घटना वार्‍यासारखी पसरल्यानंतर तळीरामांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस येण्यापूर्वी काही जण बॉक्स घेऊन पसार झाले. बर्‍याच दिवसांपासून चढया दराने विकत घेऊन पिणार्‍यांसाठी फु कटात दारू मिळाल्याने आनंदी आनंद झाला बघायला मिळाले.

नांदेड शंभरीच्या दोन पाऊल_दूर । करबला भागात आढळला आणखी एक कोरोना पॉसिटीव्ह , नांदेडचा आकडा 98 वर .

  नांदेड दि . 19 | शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष ( वय 60 वर्षे ) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु आहेत . सद्य : स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे . त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे . कोरोना विषाणु संदर्भात मंगळवार 19 मे 2020 रोजी सकाळी 11 वा . नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 17 व 18 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 182 स्वबपैकी 28 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे . त्यामध्ये एक रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण संख्या 98 झाली आहे . आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . मृत्यू पावलेले 5 रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते . या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी . अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे . तसेच आपल्या मोबाईलमध्ये " आरोग्य सेतू अॅप " डाऊनलोड करुन घ्यावा , जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अॅपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल , असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

18 May 2020

पुण्यापासूनची सुरु असलेली पायपीट अखेर नांदेड जिल्हाच्या सीमेवर थांबली ..... जांब येथील सरपंचाने केली कामगारास वाहनाची व्यवस्था

मुखेड: कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे बेहाल झाले . यात मुखेड तालुक्यातील मोठा कामगार वर्ग यापुर्वीच पुणे येथून मिळेल त्या कंपनीत काम करण्यासाठी गेला . पण लॉकडाऊनमुळे हातचे काम गेले अन कंपनीही बंद त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा ... मोटाला दोन मुले पती पत्नी कसे राहयाचे यामुळे अनेकांनी आपले बस्तान मुखेडकडे वळवले . यात पुणे येथुन पायी चालत चालत आलेले झाडी आंबुलगा ( ता.मुखेड ) येथील मजुर लहान - लहान बालके , डोक्यावर संसाराउपयोगी वस्तुंचे ओझे अश्या परिस्थितीत अनेक अडचणींना तोंड देत देत टेंभूर्णी , इंदापूर , कुर्ल्डवाडी , बार्शी , मुरुड लातूर , शिरुर असा पायी प्रवा करत अखेर त्यांनी नांदेड जिल्ह्रच्या सीमेवर म्हणजेच जांब बु . येथे दि . १६ मे २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे कुटुंब दाखल झाले . पुणे येथुन चालत दमत मुखेडची येस गाठताच कामगारांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची मदतीची याचना दिसून येत होती . पुणे येथुन कामगार पायी चालत आले अशी जांब येथील नागरीकांना माहिती कळताच त्यांच्यासाठी मदत म्हणुन नाष्टा , थंड पाणी आणि त्यांच्या सोबत अन्नधान्याची किट देउन व त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली तसा मुखेड तालुका हा समाज चळवळीचा तालुका म्हणुन अगोदरच ओळखला जातो . कामगारांना जांब ब . येथील सरपंच यांनी आयचर टेंपो करुन त्यांच्या गावी आंबुलगा बु येथे पाठविण्यात आले . यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील , जमादार आत्माराम कामजळगेकर , सरपंच बाळासाहेब पुंडे , संजय यरपुरवाड , दयानंद कानगुले , उपसरपंच बालाजी कोल्हे , शाम शिंदे , शंकर वंजे , जांब येथील आँन्टी कोरोना फोर्स कमीटीतील सर्व सदस्य ऊपस्थित होते . 

17 May 2020

चार रुग्णांना सुट्टी; 30 जण कोरोनामुक्त

नांदेड:– एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून मुक्त होणारे रुग्ण ही पुढे येत आहेत.चार रुग्णांमध्ये उपचारादरम्यान कोरोनाचे संसर्ग आढळून न आल्याने रविवार दि. 17 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 30 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.मागच्या दोन दिवसांमध्ये दिवसांमध्ये नांदेड शहरामध्ये 31 रुग्णांची भर पडली.शनिवारी 18 व रविवारी 13 नवे रुग्ण सापडले. तर आतापर्यंत जिल्ह्यात मिळालेल्या रुग्णांची संख्या 97 इतकी झाली आहे. यात पाच जण दगावले आहेत. 64 रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 8, कोविड केअर सेंटर येथे 50 व बारड येथे दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात आत कोविड केंअर सेंटर येथील चार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने तेथील रुग्णसंख्या 46 झाली आहे.चार दिवसांपूर्वी 26 कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य यंत्रणेने डिस्चार्ज दिला होता. त्यामुळे रुग्णसंख्या 33 झाली होती. मात्र दोन दिवसांमध्ये 31 रुग्ण वाढल्याने उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 64 वर पोहचली. आता यात रविवारी 4 रुग्ण बरे झाल्याने ही संख्या 60 इतकी झाली आहे. हे चार यात्री निवास कोविड केंअर सेंटर येथे उपचार घेत होते.

दहा दिवसांच्या उपचारानंतर प्रशासनाने त्यांना आज घरी सोडले असले. मात्र पुढील सात दिवस त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेची वॉच राहणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.

कटनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील काही दुकानांना ठरवून दिलेल्या दिवशी , वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी

नांदेड  दि . 17 : - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अटी व शर्तीच्या अधीन राहून कंटनमेंट झोन वगळता नांदेड जिल्ह्यातील काही दुकाने / आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी , वेळेत तसेच पुढील आदेशापर्यंत सामाजिक अंतराचे व सुचनांचे पालन करुन सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे . या आदेशानुसार महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील शहरी भागातील सर्व मॉल्स , व्यापरी संकूल , आणि बाजारपेठ या बंद राहतील . परंतू अशा व्यापारी संकूलातील व बाजारपेठेमधील अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने चालू राहतील . तसेच सर्व एकल दुकाने , वस्तीतील दुकाने , निवासी संकूलातील दुकाने कंटेनमेंट झोन वगळता , शहरी भागात चालू ठेवण्यास व ग्रामीण भागातील सर्व दुकाने ( मॉल मधील वगळून ) चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे . नमूद सर्व दुकाने चालू ठेवतांना सामाजीक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल असे निर्देशीत केले आहे . नांदेड शहरात कोरोना विषाणुच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील नमूद निर्देशाची जशाच तशी अंमलबजावणी करणे शक्य नाही . त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा नांदेड जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून यापूर्वी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात अंशत : बदल करुन पुढील तपशीलाप्रमाणे आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेत चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत कंटनमेंट झोन वगळता सामाजिक अंतराचे व नमूद सुचनांचे पालन करण्याचे अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे . सोमवार ते शुक्रवार ( शनिवार व रविवार वगळून ) दुकानाचा प्रकार- अॅटोमोबाईल्स , कॉम्पुटर इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रीकल्स , टायर्स , बॅटरी , मोबाईल शॉपी रस्सी , वॉच स्टोअर्स , स्टेशनरी / बुक स्टोअर्स ( पुस्तकालय ) , सायकल स्टोअर्स स्टील ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राहील . रविवार वगळून दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील . रविवारसह दररोज शेतीविषयक - बी बियाणे औषधे इत्यादींची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत तर हॉस्पीटल मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ 24 तास दररोज देण्यात आली आहे . या दुकाने / आस्थापनाच्या ठिकाणी पुढील उपाययोजना करणे बंधनकारक राहील.यामध्ये कामाच्या ठिकाणी / दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश , सॅनिटायझरचा वापर करणे , एकावेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही . दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे , मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करणे , ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशाची देवाण - घेवाण आरबीआयच्या सुचनेनुसार ई वॉलेटस व स्वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावा . नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास तसेच उपाययोजनेचा भंग केल्यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदाराकडून आकारण्यात येईल . दुपारी 2 वाजेनंतर नमूद आदेशाप्रमाणे संचारबंदी / जमावबंदी आदेश कायम राहतील . या आदेशाची अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी पथके गठीत करुन पर्यवेक्षणाची जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे . महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका , पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत . नगरपालिका हद्दीत नगरपालिका , पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत . तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे . वरीलप्रमाणे संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांच्याकडे सादर करावीत . संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमबलजबावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असले .या व्यतीरिक्त नमूद नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश , शुद्धीपत्रकानुसार निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही , असे आदेश 16 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत .

कोरोना शंभरीच्या उबरठयावरः नव्या 13 रुग्णांचा समावेश

नांदेड,:- नांदेड जिल्ह्यात तेरा जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या जिल्ह्यात 97 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. तर 26 जण कोरोनामुक्त झाले, असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 64 इतकी झाली आहे, तर दोघा जणांचा अद्याप ठावठिकाणा पोलिसांना लागू शकला नाही.

प्रयोग शाळेतील तांत्रिक अडचणीमुळे अहवाल येण्यास मागच्या दोन दिवसांपासून विलंब होत आहे. गुरुवारचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यातली 303 अहवाल होते.यात 41 स्वॅबपैकी 18 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. शनिवार आठरा व रविवारी 13 असे 33 अहवाल मागच्या चौविस तासात कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या तेरा जणांचे अहवालांमध्ये नऊ जण हे नांदेड येथे दर्शनाच्या निमित्ताने आलेले यात्रेकररू आहेत.दोन जण हे अबचल नगर व एक जण बारड येथील रहिवासी आहे. यापूर्वी बारड येथे एक 25 वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. तो युवक मुंबई येथून आला होता. कालही आठरा जणांमध्ये 13 जण हे यात्रेकरूंच होते. परराज्यातील यात्रेकरूंची वाढती संख्या चिंत्तेची बाब ठरत आहे.

16 May 2020

सतराशे जण ठरले ऑनलाईन लाभार्थी

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात काही अटी व शर्तीच्या अधीन राहून शनिवारपासून घरपोच विदेशी दारू सुरू करण्यात आली.यामध्ये 1900 जणांनी अर्ज केला.त्यापैकी 1700 जणांना घरपोच दारू देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दारू विक्री सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडून हिरवाकंदील मिळू शकला नव्हता.परंतु जनतेमधून दारू सुरू करण्यात यावा,यासाठी वाढत असलेला रेटा पाहता.अखेर शुक्रवारी डॉ.इटनकर यांनी दारू विक्री करण्यास अटी व शर्ती लावत मंजूरी दिली.नांदेड जिल्हयात 250 बिअर शॉपी व 19 वाईन शॉप आहेत. ज्या भागात कंटेन्मेंट झोन आहे,असे भाग वगळून दारू विक्रीस मान्यता देताना फक्त ऑनलाईन मागणीनुसार पुरवठा करण्यात आला. यासाठी दुकानाच्या बाहेर मोबाईल नंबर देण्यात आला होता.मागणी केल्यानंतर घरपोच सेवा देण्यात आली,यासाठी दुकानदारांनी डिलिव्हरी बॉय नेमले होते.मात्र मागणी ऑनलाईन असल्याने मोजक्याच ग्राहकांना दारूचा लाभ मिळू शकला.सरसकट दारूची विक्री दारू दुकानावर करण्यात यावी,अशी ग्राहकांची मागणी आहे.दोन महिन्यांच्या अंतराने ग्राहकांना अधिकृतपणे दारू विकत मिळाल्याने आनंद पारावर चढला होता. यातून शासनाला उत्पादन ही मिळाले आहे.परंतु नियम घालून दुकानावर दारू मिळाल्यास शासनाला चांगले उत्पादन मिळू शकते,असे दारू विक्रते यांचे म्हणणे आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर हे काय निर्णय घेतात,याकडे ही लक्ष लागले आहे.

आकडा दणक्यात वाढला; नव्याने आठरा कोरोनाग्रस्त

नांदेड: दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल शनिवार दि. 16 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यामध्ये नव्याने आठरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 13 जण प्रवासी, चार जण करबला नगर व एक जण सराफ ा भागातील रहिवासी आहे.मागच्या दोन दिवसांपासून अहवाल प्रलंबित होते. प्रयोग शाळेत काही तांत्रिक अडचण असल्याने दि. 15 मे रोजी अहवाल येऊ शकले नव्हते. सदरचे अहवाल शनिवारी सकाळी धडकले. यात 18 जणांना कोरेानाची लागण झाल्याने नांदेडकरांना पुन्हा जोर का झटका बसला आहे.आठरा जणांमध्ये 13 जण हे परराज्यातील असल्याचा अंदाज असून काही दिवसांपूर्वी करबला नगर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच भागातील चार जणांना कोरोनाची लागण झाली, तर सराफ ा भागात ही नव्याने रुग्ण आढळून आल्याने सराफ ा परिसरातही सकाळी-सकाळी मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षणे न आढळून आल्याने 26 जणांना कोविड केअर सेंटरकडून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यासाठी दिलासा बाब काही औटघटकेची ठरली, असून पुन्हा नवे आठरा रुग्ण सापडल्याने नांदेडमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 84 इतकी झाली. यात 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा यापूर्वी मृत्यू झाला, तर दोन कोरोनाग्रस्तांचा तपास अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या आता 51 वर आली आहे.

नोट ःयासंबंधीचे सविस्तर वृत्त काही वेळात…