नांदेड :शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढच होत असून सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह होते. तर दुपारी आखणी दोन जणांची भर पडली आहे. हे दोन्ही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे गुरुव्दारा परिसरातील कर्मचारी आहेत. दिवसभरात पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात एक महिलेचा मृत्यू झाल्याने नांदेड शहर पुन्हा हादरून गेले.शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहचली आहे. यात तिघांचा मृत्यूची नोंद झाली आहे.नांदेड शहरात मागच्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली, असून शनिवारी एकाच दिवशी गुरुव्दारा परिसरातील वीस कर्मचार्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडवून दिली होती. रविवारी सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.यात दोन ट्रॅव्हल्स चालकांचाही समावेश होता. तर देगलूर नाका येथील रहमत नगर येथे राहणार्या महिलेचा सुद्धा समावेश होता. मात्र या महिलेस रविवारी दुपारी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळविलेल्या प्रेसनोटनुसार गुरुव्दारा परिसरातील आणखी दोघांना लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.रहमत नगर येथील महिलेचा मृत्यू सारी च्या आजाराने की कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे झाला हे मात्र स्पष्टपणे समजू शकले नाही. मात्र या महिलेचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. असे प्रशासनाने आदेशित केले होते.
03 May 2020
Home »
» गुरुव्दारा येथील आणखी दोन कर्मचार्यांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या 31







0 comments:
Post a Comment